श्री. शंकर महाराज - धनकवडी - एक श्रीमंत अनुभव

Submitted by नितिन२९ on 6 December, 2011 - 12:35

श्री. शंकर महाराज - धनकवडी - एक श्रीमंत अनुभव,

लहानपणा पासून मी ऐकत आलो आहे कि गुरु आपल्याला शोधात असतो, आपण फक्त त्यांच्या आगमनाची वाट बघायची. काहीच कळाले नाही. कारण वयच असे होते. असे वाटत होते कि फक्त शांत बसून राहायचे तर कशाला शोधाशोध करा. बसा स्वस्थ. खरे म्हणजे आतून ती ओढ पण वाटत नव्हती. मला सगळयात कंटाळा आणणारे काम म्हणजे देव पूजा वाटायचे. जेव्हा जेव्हा पूजा करायची वेळ माझ्या वर यायची तेव्हा मी असे वागायचो कि आता आठवले तरी लाज वाटते. ( देव, मला क्षमा कर ).
साधारण १९९२ -९३ साल असेल मी माझ्या एका नातेवाईकाबरोबर बोलत होतो आणि एक गृहस्थ त्याच्या ओळखीचे आले मला आठवत त्यांचे नाव श्री. राव होते. काही वर्ष ते भुसावळला पण होते. त्यांनी एका पुस्तक चा उल्लेख केला होता " साद देती हिम शिखरे" त्याच बरोबर त्यांनी मला सूचना दिली कि तू ते पुस्तक वाचू नकोस. कारण काय तर माझे आताच विचार वैराग्याचे आहेत पुस्तक वाचून मी सन्यास घ्यायचो अशी त्यांना भीती वाटत होती.
एखादी गोष्ट करू नको म्हटले कि प्रथम तीच गोष्ट करावीशी प्रत्येकाला वाटते तसे मला पण झाले. मुळात मला वाचनाची व्यसन होतेच. त्यात असे कळल्यावर मग आता ते पुस्तक वाचायचे ठरवले. पुस्तक आणले शांतपणे वाचन सुरु केले. मस्त अशी समाधी लागली. वाचन एका दमात पूर्ण केले. खूप आवडले. मला सर्वात आवडले तर त्या पुस्तकाची प्रस्तावना. त्यात श्री. शंकर महाराजानबद्दल माहिती दिली आहे. माझ्या सारखेच नास्तिक श्री. प्रधानांना, महाराजांनी कसे विचारले? हे आठवून मनाची अशी धारणा झाली कि आता पुण्याला गेलो कि धनकवडीला जायचेच. तसा गेलोहि. तिथल्या सिगारेट पेटवून ठेवलेल्या बघून लक्षात आले कि चौकटीतले महाराज नाही, हे अवलिया. मनात ओढ निर्माण झाली. पण ती तेवढ्या पुरतीच. पुढे फक्त त्यांच्या बद्दल वाटत राहायचे पण काही मी केले नाही.
अशी वर्षे जात होती. माझ्या मित्राने पण ते पुस्तक वाचले त्याला पण खूप आश्चर्य वाटले. तो पण मठात जाऊन दर्शन घेऊन आला. पण प्रगती अशी त्या क्षेत्रात झाली नाही.
पुढे संसारात पडलो आणि ह्या विषयाचा थोडा विसरच पडला असे झाले खरे. नाशिकला ज्योती स्टोर्स माहित नाही असे फार कमी लोक असतील. मला पण कधी त्यांच्या कडे कधी काम पडले नाही. त्यामुळे त्यांचे उपक्रम फक्त पेपरमध्ये वाचत होतो. पण माझी वेळ आले होती. श्री. शंकर महाराजांनी मला हाक मारली होती. बस पुढे काय? मी गेलो काही कामा निमित्त आणि मला श्री. शंकर महाराजांचा एक मोठा फोटो दिसला. मी श्री. ज्योतीराव खैरनार ह्यांच्या कडे चौकशी केली. त्यांनी खूप उत्साहाने मला माहिती दिली. काही पुस्तके पण भेट दिली. काहीहि परिचय नाही. मग मी मधून मधून त्यांच्या कडे जात होतो. माझ्या पत्नी मुळात काही देवाची आवड नाही पण असे आम्ही गेलो त्यांच्या कडे आणि हि म्हणाली कि असा मोठा फोटो श्री. शंकर महाराजांचा आपल्या कडे असावा. जणू महाराजांनी हिचे बोलणे ऐकलेच. झाले मला भला मोठा फोटो श्री. ज्योतीराव खैरनार ह्यांनी भेट दिला. मी म्हणालो कि हे बघा मी कर्म सिद्धांत मानतो. त्यामुळे मी फुकट काही घेत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या फोटो चे किती पैसे झाले मला सांगा? मी जास्त शहाणा. त्यांनीच मार्मिक उत्तर कि मी महाराजांच्या फोटोचे पैसे घेणार नाही. माझा नाईलाज झाला.
मी तो फोटो घरी आणण्यासाठी दुचाकी घेऊन गेलो तर ते म्हणाले कि तुमच्या कडे चारचाकी नाही का? मी म्हणालो कि असा किती मोठा फोटो आहे? बापरे तो तर खूप मोठा फोटो होता...! आता काय करायचे? मी मुलीला - मधुराला म्हणालो तू मागे नीट धरून बस. तिच्या कडे फोटो दिला. फोटो काय तो तर फ्रेम केलेला फोटो होता. ती बसली खरी पण माझा जीव वर खाली. हि जर तो फोटो घेऊन पडली तर? मधुरा म्हणाली कि बाबा गाडी जोरात चालवा मला काही वजन जाणवत नाही आहे. घरी आलो मी जेव्हा ती फ्रेम उचलली तेव्हा माझा विश्वास बसेना हि फ्रेम एवढी जड हिने कशी काय पेलली असेल?
घरी आलो मन भरून आले. काय त्यांचा थाट? माझी काय लायकी? पण सदगुरुनी कृपा केली. त्यांच्या आगमना नंतर एक महत्त्वाचा फरक जाणवला कि घरात कोणी मोठा आधार आला असे वाटायला लागले. सतत त्यांची भेदक नजर आमच्या कडे असायची. पुढे तर मला असा एक फरक जाणवत होता कि त्यांची नजर सुरुवातीला जी भेदक वाटायची ती आता प्रेमळ वाटत होती तसे कधी मिशिकील सुद्धा. रोजच्या ताण तणावात क्षण दोन क्षण जरी बसलो कि झाले संपले ताण तणाव.
पुढे मला श्री. ज्योतीराव खैरनार ह्यांनी श्री शंकर गीता दिली म्हणाले कि रोज एक अध्धाय वाचा अन बघा महाराज भेटतात कि नाही? आम्ही घरात तिघे रोज श्री. शंकर गीता वाचायला लागलो. खरोखर असे जाणवते कि महाराज आमच्या बरोबर आहेत. मग आली दिवाळी. एक दिवाळी अंक मागच्या वर्षी बघितला होता. श्री. शंकर महाराजांवर होता. "ग म भ न" हा अंक फक्त एका दिवसासाठी वाचायला आणला आणि त्यातले इतरांचे अनुभव वाचून तर खूप रडायला आले. खूप भरून आले. महाराजांना विनंती केली महाराज मला तुम्ही ह्या दिवाळी अंकाच्या स्वरुपात हवे आहात. मागच्या वर्षी माझ्याकडे हा मोठा फोटो नव्हता. आता दिवाळी होऊन दोन महिने झालेले. दिवाळी अंक संपलेले. काय करणार? ज्या संस्थेचा अंक होता त्यांना विनंती केली पण त्यांच्या कडे पण एकाच अंक होता. त्यांचा पण नाईलाज झाला. मी त्यांच्या संपादकांना फोन केला विनंती केली कि मला हा अंक नाशिकला मिळेल काय? खूप उशीर झाला आहे पण बघा. त्यांनी मला एक पत्ता सांगितला. मी गेलो अंक होते दोन घेतले एक माझ्या साठी अन एक श्री. खैरानारांसाठी. माझ्या साठी तिथे फोन आला संपादकांचा कि जेवढे अंक त्यांच्या कडे असतील ते तुम्ही घ्या आणि जे महाराजांचे भक्त असतील त्यांना ते द्याल. मी तर रडायला लागलो. माझी काय लायकी आणि महाराजांना मी एक अंक मागितला त्यांनी तर मलाच वाटायला सांगितले. माझा वाटा फक्त एका वीज घेऊन जाणारया वायर इतका फक्त महाराजांचा आदेश मला पाळायचा होता. बाकी सगळी महाराजांची कृपा.
ह्या वर्षी चा ग म भ न चा दिवाळी अंक पण अत्यंत सुंदर आहे. खरोखर महाराजांची सगळ्यात मोठी गम्मत मला वाटते कि सगळे घर जोडले जाते. बहुतेक वेळा असे होते कि घरातील एखादी व्यक्ती देवभक्त असते पण जेव्हा महाराज आमच्या घरी आले आणि सगळे घरच जोडले गेले असे झाले.
आता तिरुपतीला जायचे झाले आहे पण त्या पूर्वी महाराजांना भेटायचे असे मनात होते पण जमणार कसे कारण गाडी मुंबई हून पाकादाची होती आणि धनकवडी ला जाने जमणार कसे? पण महाराजांची म्हटले आहे अशक्य ते शक्य झालेही तसेच मला वरून आदेश पुण्याला एक मिटिंग आहे त्या साठी जाणे आवशक आहे. कार पण दिली आहे आणि हे फक्त महाराजाच करू शकतात. कार मला द्यायची असेल तर इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात आज मी फक्त लिहिले आणि अगदी वरून आदेश आला मला कार मंजूर झाली. धन्य ते महाराज धन्य त्यांची लीला..."जय श्री शंकर महाराज" तुमची अशीच कृपा आम्हावरी राहू द्या.

गुलमोहर: 

भेटतील भेटतील.. फक्त तुम्हालाच कशाला.. सगळ्यानाच भेटतील... ( शंकर महाराजांवर पहिला मराठी थ्री डी षिणेमा येणार आहे म्हणे.. प्रमुख भुमिका शरद पोंक्षे.. खरे खोटे/कधी ते म्हाराजानाच ठाऊक ) Happy http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=155...

श्रद्धेची अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही असं जाणवलं.
----- सहमत...

जामोप्या,
तुम्हाला असल्या गोष्टींचा वास कसा लागतो हो?
------ कुठलाही नवा व्यावसाय (दुकान) थाटण्याच्या आधी सखोल अभ्यास करणे गरजेचे असते... Happy

श्री शंकर महाराज, मला माफ करा, माझ्या मुर्खपणामुळे तुमचे अनुभव हा थट्टेचा विषय बनला आहे.
माय बोलीकारानो मी हा लेख मागे घेण्य विषयी संपादक मंडळाला विनंती केलीली आहे.

जागो मोहन प्यारे :तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद मला माफ करा आणि हा विषय इथे थांबावा हि कळकळीची विनंती..

नितीन ,

सुवर्णसुत्राणि न उच्चारणीयानि ||

( अर्थात सुवर्णसुत्रे , {अध्यात्मित अनुभव वगैरे }, कधीही {सद्गुरुव्यतिरिक्त} कोणालाही सांगु नयेत )

बाकी लेख आवडला...अन्तरस्थितीचिये खुणा | अन्तर्निष्ठचि जाणति ||

चरैवति चरैवति !!

जय हो !

अध्यात्माबद्दल आदेशच आहे... अशिष्याय न देयं.... अशिष्याला देऊ नये.. पण मायबोलीवर हा नियम कसा पाळणार? म्हणून आपण खचायचं नाही... तुमचे अनुभव तुम्ही सांगा.. दत्त संप्रदाय गूढ अनुभवानी युक्त असाच आहे.

श्री शंकर महाराज यांचे आध्यात्मिक गुरू श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समजले जातात. परंतु महावतार श्री श्री बाबाजी हे देखील श्री शंकर महाराजांचे गुरू समजले जातात. श्री श्री बाबाजी हे, संत तुकाराम महाराज, क्रियायोग परंपरेतील श्री श्री लाहिरी महाशय (यांचे शिष्य हे श्री श्री युक्तेश्वर महाराज व श्री श्री युक्तेश्वर महाराजांचे शिष्य श्री श्री परमहंस योगानंद आहेत. श्री श्री योगानंदांनीच 'Autobiography of a Yogi' हे स्वानुभवावर आधारित प्रसिद्ध आत्मचरित्र लिहिले आहे.) व आद्य श्री शंकराचार्य यांचे देखील गुरू समजले जातात. मुंबईचे प्रसिद्ध मसाजतज्ज्ञ श्री राम भोसले हे देखील श्री श्री बाबाजींचे शिष्य आहेत. श्री राम भोसले व श्री शंकर महाराज यांची देखील भेट झाली होती.

धनकवडी येथील श्री शंकर महाराजांच्या मठात जाऊन अनेकवेळा समाधी दर्शनाचा योग आलेला आहे.

नितिन२९:
अहो, इथे मूर्ख कोण आहेत हा एक वादाचा विषय होईल. तुमचा लेख खूपच आवडला तेव्हा कृपया हा बाफ चालू ठेवा.

मास्तुरे यांच्या प्रतिक्रियेतील माहिती पण खूप इंटरेस्टिग आहे. माझे गुरु इंडोनेशियातील आहेत आणि त्यांना सुद्धा श्री श्री बाबाजी महाराजांचा अनुग्रह झाला आहे. क्रिया योग हा एक थक्क करणारा विषय आहे. त्याबद्दल पुढे कधीतरी. Autobiography of a Yogi हे एक अतिशय वाचनीय पुस्तक आहे. कुतुहल म्हणून तरी वाचा! श्री श्री योगानंदाना आलेले अनुभव आपली मती कुंठीत करतात.

>>>> माझ्या मुर्खपणामुळे तुमचे अनुभव हा थट्टेचा विषय बनला आहे.
माय बोलीकारानो मी हा लेख मागे घेण्य विषयी संपादक मंडळाला विनंती केलीली आहे. <<<<
अहो काही मोजक्या दीडशहाण्यान्मुळे तुम्ही कशाला स्वतःला मूर्ख म्हणवुन घेताय? तुमचे अनुभव, प्रामाणीक असतील तर ते काढून टाकण्याची गरज नाही. ज्यान्ना वाचून समजुन घ्यायचे, ते वाचतातच. त्यान्च्यावर असल्या राळ उडविण्याने काही फरक पडत नाही.

काये ना, एरवीच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही बघितले अनुभवले असेल, काही काही लोक अस्तात, म्हणजे कसे? तर समजा हास्यविनोद चाललेला असेल, तर हे मधेच येणार अन कुठला तरी हॉरर अथवा दु:खदायक प्रसन्ग ओढुनताणून तिथे पचकणार नी स्वतःकडे लक्ष वेधुन घेण्याच्या नादात वा स्वतःलाच जास्त अक्कल आहे या भ्रमात बाकिच्यान्चा मूड खल्ल्लास करणार/बुद्धिभेद करायचा प्रयत्न करणार.
हास्यविनोदच कशाला? भर पन्गतीत जे जेवले जातय त्याचे पुढे काय बनणार आहे, अन उद्या सकाळी कसे ढेन्डाळायला होणार आहे याच्या चर्चा मूद्दामहून जेवतानाच इतरान्ना किळस यावी अन अन्न घशाखाली जाऊ नये याच विकृत उद्देशाने करणारे अनेकजण बघितलेत.
पिठल्याला तिखटमीठाचे श्रिखण्ड म्हणणारे जसे बघितलेत तसेच विरुद्ध बाजुला पिठल्याची तुलना भर पन्गतीत ढेण्ढाळल्याशी करीत तेच पिठले ओरपणारे देखिल बघितलेत. एकाने सान्गुनही अती केले तेव्हा भर पन्गतीत आता मुस्काटात तर मारेनच पण इथल्या इथेच स्वतःच्या हाताने (गू) उचलुन आणुन तुझ्या तोन्डात कोम्बिन, असा हग्या दम भरला तेव्हा चुप बसला.
या वृत्तीला मी "भरल्या बासुन्दीच्या पातेल्यात मुतणार्‍यान्ची जात" म्हणतो. याहुन वेगळे काय सान्गू? असे नग असतातच. धार्मिक विषयावर काहीही बोलले/लिहीले की हे निधर्मान्ध सन्शयान्ध आपापल्या घिश्यापिट्या त्याच त्या फसवणूकीच्या धन्द्याचा बाता घेऊन येणार. जिथे तिथे यान्ना धन्दाच उघडलेला दिसणार! श्रद्धेचा बाजार दिसणार, उत्सवातील केवळ बेशिस्त/उधळपट्टीच दिसणार, त्याला कोण काय करणार?
असो. तुमचे लिखाण चालुद्यात ( अन त्या बुप्रा निधर्मान्धान्चेदेखिल चालुद्यात! कारण मला कसलाच फरक पडत नाही. सारी इश्वराचीच लेकरे नै का? Proud [आता लेकरे म्हणल म्हणूनही कोणतरी बोम्बलत येईल बघा Wink ] )

सिगारेट चा नैवेद्यय दाखवितात >>>

दत्त संप्रदायातील अनेक संत तंबाखू-धुम्रपान करीत. तो त्यांच्या लीलेचा म्हणा की क्रियेचा भाग होता. साईबाबा, गजानन महाराज चिलीम ओढीत तर स्वामी समर्थ हुक्का पीत.

शंकर महाराजांच्या अनुभवांवर आधारीत शंकर सुमन की अशाच काहीतरी नावाचे पुस्तकही आहे. त्याचे २ की ३ भागही आहेत. दोनचार महिन्यांपूर्वीच वाचले होते.

नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केल्यानन्तर भक्त तो वाटून भक्षण करतात. सिगारेटचे काय केले जाते? आरोग्याच्या दृष्टीने हा नैवेद्य अयोग्य वाटतो. असो.

>>> नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केल्यानन्तर भक्त तो वाटून भक्षण करतात. सिगारेटचे काय केले जाते? आरोग्याच्या दृष्टीने हा नैवेद्य अयोग्य वाटतो. असो.

श्री शंकर महाराजांना सिगरेट आवडत असे, अशी काही भक्तांची समजूत होती. पूर्वी (म्हणजे साधारण १९९० पर्यंत) श्री महाराजांच्या समाधीवर मूर्तीच्या पायांवर मस्तक ठेवून नमस्कार करता येत असे, तसेच समाधीला गाभार्‍याच्या आतून व मूर्तीच्या मागून प्रदक्षिणा घालता येत असे. श्री महाराजांची मूर्ती हातांची मिठी गुडघ्याभोवती घातलेली अशा बसलेल्या आसनात आहे. काही भक्त भक्तिभावाने श्रीमहाराजांच्या मूर्तीचे हातपाय व पाठ चेपून आपला सेवाभाव व्यक्त करीत असत.

त्यावेळी काही भक्त उदबत्तीसारखी सिगरेट हाताने पेटवून (तोंडात धरून न पेटवता) समाधीला खाली १-२ मिनिटे लावून मग नंतर गाभार्‍याच्या बाहेर एका मोठ्या रक्षापात्रात उदबत्तीसारखी खोचून ठेवत असत. स्त्रियांना सिगरेट पेटवण्याची बंदी होती. परंतु १९९० नंतर विश्वस्त मंडळाने मूर्तीला स्पर्श करायला व समाधीला गाभार्‍याच्या आतून प्रदक्षिणा घालायला बंदी केली. त्यामुळे सिगरेट पेटवून समाधीला लावायचे प्रकार बंद झालेले दिसत आहेत.

@एब्लिसःजी
वाय्.जी. एफ. के. हे कुठ्ल्या फेमस एक्स्प्रेशन च संक्षिप्त रुपांतर आहे? कुतुहलाने विचारतेय.

@लिम्बूजी: पोस्ट पटली तरी भाषा नाही रुचली! मुद्दा पटवण्यासाठी आवाज चढ्वायची गरज नसते. Do not raise your voice ...improve your argument. खर सांगू का...सोडून द्या हो. किंवा थोडे दिवस थांबा कुणी अमेरिकन माणूस रीसर्च करून, स्वानुभवावरून-- शंकर महाराज हे कसे पराकोटीचे उच्च योगी आणि अवलिया अहेत हे आपल्याला पटवतील. मग तर आपण नक्कीच मान्य करू. असो.

ख्यातनाम मसाजतज्ज्ञ श्री. राम भोसले यांच्या जीवनावर आधारित 'दिव्यस्पर्शी' हे पुस्तक उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी जरूर वाचावे.

त्यांचे जीवन अत्यंत नाट्यमय घटनांनी भरलेले होते. एका अत्यंत सामान्य स्थितीतला मुलगा ब्रिटिशांच्या विरूद्ध चळवळीत भाग घेतो, पोलिस मागावार असताना श्री शंकर महाराजांची भेट होते, वज्रेश्वरी येथील स्वामी नित्यानंद यांच्या सहवासात येतो, सांगली/मिरज या भागातल्या महिलेवर अत्याचार करणार्‍या ब्रिटिश ऑफिसरला जाहीर आव्हान देऊन शिक्षा देतो, भारतातून पळून इंग्लंडला पळून जातो, महावतार श्री श्री बाबाजींचा अनुग्रह मिळतो, कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसताना एका प्रख्यात डॉक्टरांच्या सहवासात येऊन मसाजाचे तंत्र शिकतो, इंग्लंडमध्ये प्रेमभंग होतो, भारतात परत येऊन आपले ज्ञान व अध्यात्मशक्ती वापरून मसाजाच्या सहाय्याने असंख्य रूग्णांना वेदनामुक्ती देतो . . . या अतिशय नाट्यमय घटना वाचण्यासारख्या आहेत.

सिगारेटचा नैवेद्य! आणि महाराज आणि त्यांच्या लीला! तसे पाच "म" कार पण नैवद्य म्हणून खपविले आहेतच लोकांनी. मग अघोर पंथाची उपासना करू, दिसली मदिरा की पिऊ, दिसली मदिराक्षी की बलात्कार करू.

कशाची भक्ती करावी ह्यावर खरचं विचार करू शकत नाही का?

साद देती हिमशिखरे मित्राने सांगीतल्यामुळे वाचले. अतिशय बकवास पुस्तक आहे ते. कशाचा कशाला पत्ता नाही.

आता महाराजांनी माझ्यावर अनुग्रह केला नाही म्हणून मी असे बरळतो असे म्हणा हवे तर. किंवा माझा मित्र म्हणाला तसे " तुला आयुष्यात जबरदस्त भयंकर अनुभव येऊ दे, मग देव अन सदगुरू आहे की नाही हे कळेल" असे म्हणा हवं तर पण महाराजावर (कोणत्याही) भक्तीपर पुस्तके अन त्यांच्या आरत्या, मृतूपश्चात त्यांचे अवडंबर आणि सोन्याचे सिहासन वगैरे अन त्यांचे सोंग ढोंग सगळेच उबग आणणारे आहे. ह्या अशा भक्तांमुळे कदाचित काही खरे बाबा ( श्रद्धेतून समाज सुधारक) मात्र लोकांना आवडत नाहीत. उदा गाडगेबाबा. त्यांचे मंदिर अन सिहांसन अन आरत्या मात्र दिसत नाहीत.

उत्तिष्ठ जाग्रतः !

>>> पण महाराजावर (कोणत्याही) भक्तीपर पुस्तके अन त्यांच्या आरत्या, मृतूपश्चात त्यांचे अवडंबर आणि सोन्याचे सिहासन वगैरे अन त्यांचे सोंग ढोंग किळसवाणे आहे.

केदार,

एखाद्याचे अवडंबर माजविणे किंवा सोन्याचे सिंहासन वगैरे चुकीचे आहे यात वाद नाही. परंतु या यादीत भक्तीपर पुस्तके व आरत्या यांचा उल्लेख सुद्धा "किळसवाणा" असा करणे अयोग्य आहे. तुम्हाला इच्छा नसेल तर तुम्ही भक्तीपर पुस्तके वाचू नका किंवा आरत्या म्हणू नका. तसे करण्याची तुमच्यावर अजिबात सक्ती नाही. पण कृपया त्यांचा उल्लेख "किळसवाणा" असा करू नये ही नम्र विनंती.

मास्तुरे,
अहो व्यक्तीवर रचित आरत्या काय म्हणून. अन शेजारती, काकडआरती, पंखा अन हे अन ते अशी ट्रिटमेंट समाधीला करण्यात येते. ह्याचा एक मला व्यक्ती म्हणून राग येतो. लक्षात घ्या इथे मी गणपतीच्या आरतीला विरोध करत नाही तर व्यक्तीपुजेला विरोध करत आहे.

ह्या व अश्या महाराजांचे कर्तृत्व वाल्मीकी, व्यास, याज्ञवल्क, मैत्रेयी अशा असंख्य तत्ववेक्तांपेक्षा जास्त आहे की काय? आपण त्यांच्या आरत्या करतो का? म्हणून म्हणले हे व्यक्ती म्हणून चूक आहे. शिवाय खुद्द शंकरमहाराज देखील कदाचित म्हणाले नसते पण माझी आरती करून सिगारेटचा नैवेद्य दाखवा, पण लोक दाखवतात. बरोबर. ते चूक नाही का वाटत? अन असे अनेक बापू, बाबा लोक जिवंत असतानाही अश्या आरत्या वदवून घेतात ते तर महान आत्मे आहेत.

केदार,

पण हे महाराज (कोणतेही) सांगतात का? का हा बकवास त्यांचे भक्तगण (?)सुरु करतात? ..त्यांच्या सोयीकरता आणि स्वार्थाकरता. हे पाच "म" काय प्रकरण आहे माहीत नाही पण भलतच नॉन्-अध्यात्मिक वाटतय. ज्याला खरा परमेश्वर कळला आहे किंवा जाणून घ्यायचा आहे तो किंवा ती नैवेध्याच्या भानगडीत पण पडणार नाही. मी परमेश्वर जाणून घ्यायचा प्रयत्न गेली खूप वर्ष करत आहे पण खास पूजा-अर्चा, उपास्-तापास, व्रत्-वैकल्य, देवस्थानांच्या वार्‍या यांच्या वाटेला पण जात नाही. कदाचित माझी बुद्धी तोकडी पडते त्यातला खरा अर्थ समजून घ्यायला पण यातच अडकून गाडी हुकलेले खूप लोक भेटले आहेत. असो.

केदार,

आपले गुरू हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत या भावनेतून शिष्यांनी आरत्या रचून त्यांची स्तुती केली आहे. आपली श्रद्धा व भावना प्रकट करण्यासाठी भक्तांनी आपल्या गुरूंचे चरित्र लिहिले, स्तुती केली, आरत्या रचल्या यात इतरांना खटकायचे कारण काय? ज्यांना असे करायचे नसेल त्यांनी तसे करू नये, पण इतरांनी असे करू नये हा आग्रह अयोग्य आहे.

श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र श्री. के वि बेलसरे यांनी लिहिले, त्यांची आरती श्री ब्रह्मानंद स्वामींनी रचली, दासगणू महाराजांनी श्री साईबाबा व श्री गजानन महाराजांवर गुरूलीलामृत व साईलीलामृत हे ओवीबद्ध चरित्र रचले, नृसिंह सरस्वतींच्या एका शिष्याने गुरूचरित्र हा ग्रंथ लिहिला . . . यात काही वावगे केले आहे का गुन्हा केला आहे. हा त्यांच्या श्रद्धेचा आविष्कार होता. हे करताना त्यांनी कोणाला त्रास दिला आहे का काही अपराध केला आहे? हा त्यांचा अधिकार होता. हे ग्रंथ न वाचण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तो तुम्ही वापरा. याबद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही. पण या ग्रंथांना/आरत्यांना किळसवाणे म्हणणे हे आवडले नाही.

श्री शंकर महाराजांना सिगरेटचा नैवेद्य दाखविणे हे चूकच आहे. पण वर मी लिहिले त्याप्रमाणे फारच थोडे जण असे करीत होते आणि आता मूर्तीला व समाधीला स्पर्श करता येत नसल्याने हा प्रकार जवळपास बंद झाल्यासारखाच आहे.

ह्या व अश्या महाराजांचे कर्तृत्व वाल्मीकी, व्यास, याज्ञवल्क, मैत्रेयी अशा असंख्य तत्ववेक्तांपेक्षा जास्त नसेल सुद्धा, पण ज्यांना त्यांच्याबद्दल श्रद्धा वाटते त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणे ही चूक आहे का?

केदारः
अवलिया आणि फकीर असे साईबाबा, स्वामी समर्थ, यांना self proclaimmed God-बुवा-अम्मांच्या पंक्तीत बसवण चूकच रे! तुझी गल्लत होतेय. त्यांच्या करता लोक सोन्याची सिंहासन का करतात म्हणजे ? ते काळ्या पैशाच आउट्लेट असाव. मार्केटिंग चा जमाना आहे बाबा. थोडे दिवस थांब, कलकत्त्यात संत मदर टेरेसा मंदीर होईल बघ. व्हॅटिकन पैसा ओतेल आणि भारतात अजूनही एक श्रिमंत देवस्थान तयार होइल.

हे पाच "म" काय प्रकरण आहे माहीत नाही पण भलतच नॉन्-अध्यात्मिक वाटतय. >> अगं हे फारच डेंजर प्रकरण आहे. आपण तंत्रपुजा पण माणतो. हा तंत्रपुजेचा प्रकार आहे. ज्यात मदिरा, मैथून अन मदिराक्षी असे प्रकार समाविष्ट आहेत.

तो तुम्ही वापरा. याबद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही. पण या ग्रंथांना/आरत्यांना किळसवाणे म्हणणे हे आवडले नाही >>> मे बी मी जरा जास्तच हार्श लिहिले. आपली श्रद्धा मला मान्य आहे. पण आजकाल हे फारच जास्त होत चालले आहे.

मार्केटिंग चा जमाना आहे बाबा. थोडे दिवस थांब, कलकत्त्यात संत मदर टेरेसा मंदीर होईल बघ. >> हो होईल ह्यात वाद नाही. पण तेच मी ही म्हणत आहे. सर्व बाबालोक मार्केटिंग करतात अन मग त्यातूनच साध्या भिकार्‍याचा अवलिया पण ठरतो / ठरू शकतो. असे आपल्याकडे व्हायला काहीही वेळ लागत नाही. म्हणून चिडलो.

Pages