अब्दुल लाट, कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातलं एक छोटं गाव. या गावाचं नावच फक्त वेगळं नाहीये तर इथले प्रयोगही वेगळे आहेत. काही वर्षांपूर्वी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून बालोद्यान नावाचा अनाथाश्रम सुरू केला गेला. या प्रयोगात गावातून बाहेर नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले अनेक लोक सहभागी झाले. हे माझं आजोळ. मालदीवच्या भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, कुलभूषण बिरनाळे, जितेंद्र चुडाप्पा, राजेंद्र देसाई, राजकुमार कारदगे अशी अनेक नावं त्यात आहेत.
सध्या आमच्याकडे जिल्ह्यातली सर्वात मोठी ई-लर्निंगची लॅब आहे. ३० संगणक आहेत. मुलं खूप एंजॉय करतात. आम्ही इथे मुलांना बसल्याबसल्या परदेशांची सैर घडवतो. अधिकारी मुलांशी संवाद साधतात. शिकताना केवळ पुस्तकातून न शिकवता प्रत्यक्ष शिक्षण देण्याकडे कल असतो. यासाठी इन्फोसिसने आर्थिक साहाय्य केलं असून विजय भाटकर यांचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे.
बालोद्यान हा आमचा अनाथाश्रम आहे. सध्या इथे २५ मुलं आणि ३ मुली आहेत. सरकारने हल्लीच आम्हाला २ एकरांची जागा दिलीय आणि तिथे १०० मुलं आणि १०० मुलींसाठी अनाथाश्रम बांधायचा आहे. येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण व्हायचंय. या कामाचं डिझाईन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुरचनाकार शिरीश बेरी यांनी तयार केलंय. मुक्तांगणसारख्या संस्थांचं डिझाईन तयार करणारे बेरी आमच्या या प्रकल्पात सहभागी झाले याचा आम्हाला आनंद वाटतो. या कामाचा भूमीपूजन समारंभ येत्या २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अब्दुल लाटेत व्हायचा आहे. आम्ही या मोठ्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकतो आहोत. या कार्यक्रमाला कुणाला यायचं असेल तर स्वागत आहे आणि आम्हाला आनंदच होईल. हे डिझाइन असं आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत चालल्यात. शिक्षक अतिरिक्त होत चाललेल. पण याच शाळांना एक वेगळ्या रूपात तयार केलं तर? तोच करायचा प्रयत्न सुरू केलाय. इथली कुमार विद्यामंदिर आम्ही दत्तक घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही शाळा मिळाल्यावर राज्यातल्या सर्व शाळांना आदर्श वाटेल असा शिक्षणाचा एक वेगळा प्रयोग आम्ही राबवणार आहोत. कुठल्याही ठिकाणी एका मजल्यावर चालणार्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा आपल्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकावं असं पालकांना वाटावं असा हा आमच्या स्वप्नातला प्रकल्प. त्यालाही आम्ही आकार देत आहोत.
गावातल्या स्त्रिया दुपारच्या वेळेत मोकळ्याच असतात. त्यांनी हा वेळ सत्कारणी लावावा, स्वतःच्या प्रगतीसाठी काही करावं असेही प्रयत्न सुरू आहेत. इथल्या कन्याशाळेत त्यसाटी प्रकल्प राबवणार आहोत. ते पुढच्या टप्प्यात. सध्या फोकस बालोद्यानवर.
या प्रकल्पासाठी मदत करू इच्छिणार्यांचं स्वागत आहे. सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला आनंदच वाटेल.
छान उपक्रम.. खूप खूप शुभेच्छा
छान उपक्रम.. खूप खूप शुभेच्छा
उपक्रमासाठी खूप सार्या
उपक्रमासाठी खूप सार्या शुभेच्छा.
चांगला उपक्रम.. खूप शुभेच्छा
चांगला उपक्रम.. खूप शुभेच्छा .
छान उपक्रम.. खूप खूप
छान उपक्रम.. खूप खूप शुभेच्छा!!!
छान उपक्रम, शुभेच्छा पुढील
छान उपक्रम, शुभेच्छा पुढील कार्यासाठी.
मण भरुन शुभेच्छा!!! ठमुतै...
मण भरुन शुभेच्छा!!! ठमुतै...
(२०० च्या मानाने डिझाईन मोठे आहे.)
खूप चांगला उपक्रम आहे.
खूप चांगला उपक्रम आहे. मनःपूर्वक शुभेच्छा !
चातका अरे तिथे फक्त अनाथाश्रम
चातका अरे तिथे फक्त अनाथाश्रम नाही तर एक रिक्रिएशन सेंटर, लायब्ररी अशा इतरही अनेक गोष्टींसाठीही जागा आहे. शिवाय एवढ्या मुलांची राहण्याची, व्यवस्था करणं, खेळ\ण्यासाठी मैदान, बाथरूम या सर्व गोष्टी आहेत त्यात. बैठं आहे ते. मजले नाहीत.
आभार सर्वांचे...
ठमे, चांगला उपक्रम. एक चांगला
ठमे, चांगला उपक्रम. एक चांगला आदर्श घडवेल हा उपक्रम.
खुप चांगला उपक्रम.. खूप खूप
खुप चांगला उपक्रम.. खूप खूप शुभेच्छा !
मस्त उपक्रम आहे.
मस्त उपक्रम आहे.
बैठं आहे ते. मजले नाहीत. >>
बैठं आहे ते. मजले नाहीत. >> ओह....मला चार मजली इमारतच वाटली. ५X10 मधील प्रत्येक इमारत.
ठमे... मस्त गं! खुप छान
ठमे... मस्त गं!
खुप छान उपक्रम आणि प्रकल्पाचे डिझाईनही सुंदरच!
तुला खुप खुप शुभेच्छा!
थँक्यू आर्या...
थँक्यू आर्या...
शुभेच्छा....!!!
शुभेच्छा....!!!
उत्तम प्रकल्प. अनेक शुभेच्छा!
उत्तम प्रकल्प. अनेक शुभेच्छा!
खूप छान वाटलं वाचून.
खूप छान वाटलं वाचून. एखाद्याला शिक्षण देणं म्हणजे, त्याच्या अख्ख्या आयुष्याला आकार देणं
शिक्षणातल्या प्रयोगांविषयी जाणून घ्यायला आवडेल.
माहितीबद्दल धन्यवाद. डिझाईन
माहितीबद्दल धन्यवाद. डिझाईन सुरेख आहे. कश्या प्रकारे मदत करता येईल/सहभागी होता येईल याबद्दल कळवा.
शुभेच्छा. खालील गोष्टींबद्दल
शुभेच्छा.
खालील गोष्टींबद्दल जास्त जाणुन घ्यायला आवडेलः
> ही शाळा मिळाल्यावर राज्यातल्या सर्व शाळांना आदर्श वाटेल असा शिक्षणाचा एक वेगळा प्रयोग आम्ही राबवणार आहोत.
> गावातल्या स्त्रिया दुपारच्या वेळेत मोकळ्याच असतात. त्यांनी हा वेळ सत्कारणी लावावा, स्वतःच्या प्रगतीसाठी काही करावं असेही प्रयत्न सुरू आहेत.
उपक्रमाला शुभेच्छा!
उपक्रमाला शुभेच्छा!
अस्चिग तुमच्या पहिल्या
अस्चिग तुमच्या पहिल्या प्रश्नाबाबतचा पूर्ण प्रोग्राम अजून तयार व्हायचाय. तो झाला की सांगते. सध्या तरी इथली मुलं लॅबमध्ये जाऊन जगातल्या अनेक गोष्टी पाहतात. म्हणजे कांगारूचं चित्र पाहणं आणि त्याला टीव्हीवर प्रत्यक्षात हालचाल करताना पाहणं यात फरक आहे. तसंच आफ्रिकेची जंगलं, बर्फाळ प्रदेशातले प्राणी प्रत्यक्ष पाहताना जी गंमत येते ती इतर कशातही नाही. यातून मुलांच्या जाणीवा विकसित होतात. आमची मुलं सध्या हा अनुभव घेत आहेत. त्याहीपुढे जाऊन नवीन मॉड्यूल तयार होत आहे.
गावातल्या स्त्रियांना इथल्या इ-लर्निंगच्या लॅबद्वारे संगणकाची ओळख करून देणं. त्यांना जगाचे दरवाजे ऑनलाईन का होईना खुले करून देणं, त्यासाठी काही मोड्यूल्स तयार होत आहेत. हे लगेच होणार नाही. पण एकदा कॅम्पस तयार झाला की आम्हाला अनेक गोष्टी करण्यासाठी हक्काची जागा मिळेल.
सध्या तरी स्थानिक लोक, पश्चिम महाराष्ट्रात आजही अणुकुचीदार असलेला जातीपातींचा मुद्दा, लोकांचे हितसंबंध यांतून मार्ग काढत काम सुरू आहे. काहीही नवीन मोठं उभं राहत असलेलं लोकांना पाहवत नाही. मग कोण, कुठल्या जातीचं आहे ते पाहा. आपल्या जातीचा ठप्पा त्यावर लावा, असे प्रयत्न सुरू होतात. त्याला नाव कुणाचं द्यायचं इथपासून वादंग झाले आहेत. पण इथले तरूण हे पूर्ण करायचंच या जिद्दीने त्यात काम करत आहेत.
कौतुकास्पद उपक्रम मदतीचा
कौतुकास्पद उपक्रम मदतीचा प्रयत्न नक्कीच करेन
शुभेच्छा
शुभेच्छा
कौतुकास्पद उपक्रम! शुभेच्छा!
कौतुकास्पद उपक्रम! शुभेच्छा!
मस्त आवडला उपक्रम, शुभेच्छा !
मस्त आवडला उपक्रम, शुभेच्छा !
शुभेच्छा तर आहेतच. पण
शुभेच्छा तर आहेतच. पण पुढेमागे इथे काहितरी काम करायलाही आवडेल मला.
नक्कीच दिनेशदा... जरूर...
नक्कीच दिनेशदा... जरूर...
मुकु, वत्सला, सुभाष आणि बाकीच्या सर्वांचे आभार...