Submitted by ग्लोरी on 17 December, 2011 - 00:31
ससोबा आले
उंदराच्या घरी
उंदराने केली
अंडाकरी
ससोबा म्हणाले
"काय उंदीरराव
शाकाहारी मी
नाही का ठाव ?"
उंदीर म्हणाला
"तसे नाही ससोबा
अंडाकरी खायला
येणार आहेत वाघोबा"
"तुमच्यासाठी आहे
हिरवेगार झुडूप"
असे म्हणेस्तोवर
ससोबा गुडूप
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
एकदम मस्त !!
एकदम मस्त !!
मस्त जमलिये. छोटीशी, पटकन
मस्त जमलिये. छोटीशी, पटकन म्हणून दाखवता येईल आणी सहज साभिनय सादरही करता येईल.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख.
सुरेख.
ससोबा गुडूप>> कसलं क्युट
ससोबा गुडूप>> कसलं क्युट
मस्तं जमलीये
सहज सोपी आणि खूपच सूंदर
सहज सोपी आणि खूपच सूंदर
सिंपल अँड स्वीट
सिंपल अँड स्वीट
छान.
छान.
सो स्वीट
सो स्वीट![smileyvault-cute-big-smiley-animated-024.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/smileyvault-cute-big-smiley-animated-024.gif)
ह.बा. यांच्याशी सहमत.
ह.बा. यांच्याशी सहमत.
मस्त कवीता! लेकीला आवडली!
मस्त कवीता! लेकीला आवडली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर आहे.
सुंदर आहे.
झक्कास.
झक्कास.
एकदम मस्त !!
एकदम मस्त !!
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.
वत्सला, कविता लेकीला आवडली, ही माझ्यासाठी फार मोठी दाद आहे...
एकदम मस्त लिहलेय....
एकदम मस्त लिहलेय....:स्मित:
मस्त आहे ही पण! तुमच्या
मस्त आहे ही पण! तुमच्या सगळ्या बालकविता आवडल्या.
कित्ती गोड
कित्ती गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार मस्त! प्रिन्ट घेतो आहे,
फार मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रिन्ट घेतो आहे, माझ्या मूलीला ऐकवतो आज... तिला खूप आवडणार.