Submitted by विदेश on 17 December, 2011 - 13:21
मान हलवता सर मजला
'नंदीबैल' पहा म्हणती -
हुषार नाही म्हणून मजला
मित्र किती 'गाढव' म्हणती !
डबे शोधतो हळू नेहमी
'बोका' म्हणते आई मला ,
नुसता चरतो इकडे तिकडे
'घोडा' म्हणती वडील मला !
दादा म्हणतो 'लबाड कोल्हा'
पुढेपुढे मी करताना -
'माकड' समजे ताई मला
गडबड माझी बघताना !
'गरीब गाय' म्हणते मला
आजी माझी आवडती ,
जवळ घेउन आजोबा तर
माझा 'वाघोबा' म्हणती !
गुलमोहर:
शेअर करा
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
भारीय
भारीय
खूप छान. मस्तच अगदी.
खूप छान. मस्तच अगदी.
प्राण्यांचे गुणविशेष सहज
प्राण्यांचे गुणविशेष सहज सांगणारी बालकविता.
मस्तच्,आवडलं.
मस्तच्,आवडलं.
वा सह्हीहे.........
वा सह्हीहे.........
सुन्दर. >>माझा 'वाघोबा'
सुन्दर.
>>माझा 'वाघोबा' म्हणती !<< मला 'वाघोबा' म्हणती ! ?? किंवा माझा वरिल ओळित आले तर समजणे जास्त सोपे होईल.