'संतसूर्य तुकाराम' या तुकारामांवरील चरित्रात्मक कादंबरीतील तथाकथित आक्षेपार्ह मजकुरावरून उठलेल्या वादंगामुळे आणि भावना दुखावल्याच्या कांगाव्याआडून वारकरी संघटनांनी राबवलेल्या दबावतंत्रामुळे कादंबरीचे लेखक आनंद यादव यांना ही कादंबरी मागे घेत क्षमा याचावी लागली. 'मटा'वर काही आठवड्यांपूर्वी झळकलेल्या कादंबरीतील तथाकथित आक्षेपार्ह मजकुरात निंद्य असं खरं तर काही नव्हतं. भौतिक सुखलोलुपतेत अडकलेल्या सामान्य माणसापासून संतत्वापर्यंत उत्क्रमत गेलेल्या तुकारामांच्या मनात कुठल्याशा प्रसंगी स्वतःच्या पूर्वायुष्यातील सुखलोलुपतेची, भरकटलेपणाची जाणीव उमटते अशा स्वरूपाचं ते लिखाण होतं. पण त्यावरून 'जेम्स लेन' प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. देहूच्या संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या विश्वस्त समितीने 'तुकाराम खतरेमे' अशी जिहादी हाळी दिली आणि देहूत बंद पाळला गेला. भावना दुखावण्याच्या निमित्ताने मराठा महासंघानेही वारकरी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत आनंद यादवांनी आगामी महाबळेश्वर साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्यास साहित्यसंमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. जेम्स लेन प्रकरणात हात असलेल्या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड इत्यादींच्या मांदियाळीत मोडणार्या महासंघाने अशी भूमिका जाहीर करणं हे सूचक आहे. दरम्यान यादवांचा पुतळा प्रतीकात्मक निषेध म्हणून जाळण्यात आला. यादवांनी या दबावापुढे क्षमा मागत पुस्तक मागे घेणार असे जाहीर केले. पण निषेधकर्त्यांचं एवढ्यानं समाधान झालं नाही. त्यांना यादवांकडून जो संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा हवा होता, तोही अखेरीस परवा मिळाला. आता वारकरी संघटनांनी एक नवीन मागणी केली आहे : 'खास' संतसाहित्यविषयक सेन्सॉर समिती स्थापून संतचरित्रावरील पुस्तके प्रकाशण्याआधी संमत करवून घेण्याची!
संतसूर्य, साहित्यसंमेलन आणि प्रायश्चित्त
Submitted by संकल्प द्रविड on 18 March, 2009 - 23:59
गुलमोहर:
शेअर करा
फ मला
फ मला चित्र दिसत नाहीय.
मजकुर्-तपश
मजकुर्-तपशील चान्गला (लिन्कसहीत)
सहज म्हणून चित्राच्या तिथे क्लिक केल्यावर दिसायला लागले! 
चित्र दिसत नव्हते!
भाग्या, तसे करुन बघ
चित्राची कल्पना अफलातून माण्डणी चान्गली
यादवन्चे फेसिन्ग चान्गले जमले आहे
खर तर हे चित्र सकाळ्/लोकसत्ता (अन खास करुन मटा) वगैरे वृत्तपत्रात प्रकाशित व्हायला-करायला हवे!
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
फ, जरा तोंड
फ, जरा तोंड सांभाळून बोल.
मोरे आडनाव सोडून इतरांनी संत हा शब्द वापरायला बंदी घातल्याचा फतवा तुमच्य वाचनात आला नाही असे दिसते.
तो वापरल्याबद्दल तुम्ही माफी तर मागितलीच पाहिजे शिवाय तुम्ही जिथे काम करता तिथे ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर कंपनीचे कामकाज उधळून लावले जाईल.
मला तसे
मला तसे केल्यावरही दिसत नाहिये.
चित्र
चित्र अफलातुन आहे
भाग्ये,
भाग्ये, आता दिसतंय का?
लिंबूटिंबू, धन्यवाद!
जीएस्, आपले म्हणणे ऐकून मी इथे सिंगापुरात राजीनामा देण्यास गेलो असता कंपनीला संतसूर्य, साहित्यिककाजवा, वारकरी आणि मोरे यांपैकी एकाही गोष्टीचे आकलन न झाल्याने त्यांनी राजीनामा घेण्यास असमर्थता दाखवली. आता भारतात येऊन, तिथे नोकरी पटकावून मग राजीनामा द्यायला हवा!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
चित्र दिसत
चित्र दिसत नाही
-----------------------------------------
- सक्षम दळवी
मला पण
मला पण चित्र दिसत नाहीये.
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)
जीएस.......
जीएस.......
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
दिसले आता
दिसले आता ...त्या फुलीवर राइट क्लिक करुन शो पिक्चर करा..दिसेल !
फ, मार्मिक चित्र. डिटेल्स आवडल्या.
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
अरे चित्र
अरे चित्र पाहिलेच नव्हते.
महाराष्ट्रातील तमाम व्यक्तीस्वातंत्र्यवादी, लोकशाहीवादी आणि स्वयंघोषित पुरोगामी टोळ्या दांभिकपणे मूग गिळून गप्प असतांना संकल्प यांनी दाखवलेली सचोटी आणि निर्भयता विशेष आहे.
मायबोली प्रशासनाला विनंती की या विषयाचे मराठी आणि महाराष्ट्र यासाठी असलेले गांभीर्य लक्षात घेता, या चित्राला मुखपृष्ठावर स्थान मिळावे.
स्लार्टी यांनीही यावर एक उत्कृष्ट लेख लिहिला होता.
फ, अफलातुन
फ, अफलातुन मार्मीक चित्र. सही आहेस तू.
नेहेमीप्रमाणेच.
जीएस यांना पाठींबा.
मार्मिक
मार्मिक चित्र आणि भाष्य! सही आहेस फ तू खरंच..
-----------------------------------
Its all in your mind!
Pha, चित्र
Pha,
चित्र नेहेमीप्रमाणेच चांगले काढले आहेस.
पण त्यातून तुला जे सूचीत करायचे आहे त्याच्याशी मात्र असहमत...
>'खास' संतसाहित्यविषयक सेन्सॉर समिती स्थापून संतचरित्रावरील पुस्तके प्रकाशण्याआधी संमत करवून घेण्याची!
सेन्सॉर समिती नाही (सेन्सॉरशिप हा शब्द थोडा अतीरेकी वाटतो) तरी फक्त अशा ऐतिहासीक व्यक्तींवर लिहीताना तरी एखादी review समिती झालच तर moderation समिती असावी अशी अपेक्षा ठेवणे मला तरी वावगे वाटत नाही. चित्रपट, आकाशवाणी, दूरसंचार, यावर सेन्सॉरशिप आहेच, ईतर माध्यमे, वृत्तपत्रे अगदी वैयक्तीक ब्लॉग्स यावरील content साठीही नियमावली, संहिता, अन संकेत आहेतच. अगदी मायबोलीवरही moderation मंडळ पूर्वी होतेच (अर्थात बहुतांशी ते "साफसफाई" चे काम करत, लिखाण आधी review करून प्रकाशित करण्याआधी सहसा काट छाट, गाळणी केलेली मला तरी आठवत नाही. त्या बाबतीत मायबोली प्रशासनाने नेहेमीच लेखनास पुरोगामी व उत्तेजक धोरण ठेवले आहे).
असो. v&c करायचा मुळीच हेतू नाही.
चू.भू.दे.घे.
मार्मिक
मार्मिक चित्र. पण परवानगी घेतली का तुम्ही हे प्रकाशित करण्यापूर्वी ?
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
मला
मला चित्रापेक्षा चित्रातली कल्पना जास्त आवडली. तुकारामांनी इंद्रायणीत गाथा बुडवली होती तो काळ आणि आता आनंद यादव पुस्तक बुडवत आहे तो काल्पनिक भाग आणि दोन्ही काळातील बघा दांभिक समाज. हा समन्वय फार आवडला!
मस्त
मस्त चित्र! मार्मिक एकदम!
>>'खास' संतसाहित्यविषयक सेन्सॉर समिती स्थापून संतचरित्रावरील पुस्तके प्रकाशण्याआधी संमत करवून घेण्याची!
कठीण आहे!
.....
.....
छान ! छे
छान ! छे मार्मिक !!
'वारकरी, आता 'वार करणारे' झालेत !
'खास'
'खास' संतसाहित्यविषयक सेन्सॉर समिती स्थापून संतचरित्रावरील पुस्तके प्रकाशण्याआधी संमत करवून घेण्याची!
पण एकदा का हे झाले की मग इतरही अनेक समाजगट पुढे येतील.
मग कामगार विषयक सेन्सॉर मन्डळ, दलित विषयक सेन्सॉर मन्डळ, स्त्री विषयक सेन्सॉर मन्डळ,
पेशवे विषयक सेन्सॉर मन्डळ ई ई.
सॉरी
सॉरी फ,
तुमच्या चित्राबद्दल लिहिलेच नाही. अतिशय समर्पक व्यंगचित्र आहे. वर कोणी लिहिलेय त्याच्याशी सहमत. मायबोलीच्या फ्रंट पेज वर दिले पाहिजे.
मीही क्षमस्व,,v&C करायचा हेतु नव्हता. पण तुकोबा आमचा weak point आहे त्यामुळे लिहिले गेले.
चित्र
चित्र आवडले. एकदम मार्मिक.
फ, हे
फ, हे तुम्ही काढलेलं व्यंगचित्र आहे का? अतिशय सुन्दर.. समर्पक. त्यावरची टिप्पणीही आवडली.
चित्र
चित्र सुरेख (दिसतंय आता). आणि अगदी मार्मिक, नेमके.
चित्र एकदम
चित्र एकदम भन्नाट. आणि त्यातही ते काळे गॉगल घातलेले जे लोक दाखवले आहेत्...ते तर अजुनच उत्तम!!
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
सुरेख
सुरेख चित्र. खासकरून काळा चष्मावाले सही
***
तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||
Too good
Too good !!!!
सेन्सॉरशिप इथेही? पांडुरंगापासून तुकारामांपर्यंत सगळ्यांनी डोक्याला हात लावला असेल.
'गप्प बसा' संस्कृतीचं जे नवं रूप दिसतंय.
परागकण
मस्त आहे
मस्त आहे चित्र.. काळा गॉगलवाले सहीच...
चित्र बाकी
चित्र बाकी सह्हीच आहे भिडू!
अभिनंदन..
आपला,
(चित्रकलाप्रेमी) तात्या.
अतिशय
अतिशय सुंदर आणि समर्पक चित्र अन त्यावरची टीपही ! वा आवडले दोन्ही !
Pages