कावळा म्हणाला...

Submitted by ग्लोरी on 17 December, 2011 - 00:06

कावळा म्हणाला
मी नाही काळा
मी तर आहे
जरासा सावळा

बगळा म्हणाला
मी नाही पांढरा
मी तर आहे
गोराच गोरा

पाहा पाहा इकडे
म्हणाला कोंबडा
आहे का कुणाला
तुरा असा तांबडा

पोपट म्हणाला
वळवून मान
अंगावर माझ्या
पाचूचे रान

तितक्यात तिथे
मोर नाचत आला
सगळ्यांनी त्याला
नमस्कार केला

- ग्लोरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बालकविता एकदम मस्त आहे. पण नकळत आपण कावळ्याच काळं असण म्हणजे असुंदर/कुरुप असण अस काही तरी मुलांना सांगतोय का? असा एक विचार मनात डोकावून गेला. असा काही विचार न यावा अशी बालकविता लिहावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
माझा प्रयत्न...

कावळा म्हणाला
मी उडतो सरळ
डावीकडे उजवीकडे
उगीच का वळा? Happy

आता बगळ्या च कडवं लिहायसाठी.... ओवर टू यू !!

( जरासा सावळा ) श्रीकांत Happy