हदगा ही भाजी असते हे मला मायबोलीवरूनच कळल. आमच्या एरीयात हे झाड मी कधीच पाहील नव्हत. पण मायबोलीवर हदग्याचा बरेचदा विषय निघायचा. एक दिवस मला गो-ग्रिन नर्सरीत हदग्याच झाड दिसल. अर्थात त्या झाडावर नावाची पाटी होतीम्हणून मला ते कळाल. ते पाहून मला इतका आनंद झाला आणि मी मागच्या उन्हाळ्यात घेतल. पाऊस अनुभवून हे झाड उंच झाल आणि आता त्याला फुले येऊ लागलि आहेत. मला वाटलच नव्हत एवढ्या लवकर फुले येतील. सुरुवातीला २-३ फुले आली. ती मी रोज काढून फ्रिज मध्ये ठेऊन जमवली आणि वरची भाजी केली. आता ७-८ फुले एकदम येतात. आता ती मी काढत नाही.
बर फुलेआली खरी पण भाजी कशी करायची माहीत नाही. मग सारीका, दिनेशदा यांनी काही टिप्स दिल्या होत्या. भाजी करायची वेळ आली तेंव्हा मी साधनाला फोन केला तिने तिच्या आईला विचारून भाजीची माहीती दिली. शिवाय ह्या फुलांची भजीही करतात ते सांगितले. पुढच्या वेळी भजीचा प्लॅन आहे.
टेस्ट खुपच आवडली ह्या भाजीची. मी वरील प्रमाणे केली आता ह्याच्यात अजुन काही सुधारणा असेल तर जाणकारांनी सांगावे.
इतर रानभाज्या:
१) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
८) कोरल - http://www.maayboli.com/node/16860
९) कवळा - http://www.maayboli.com/node/17069
१०) वाघेटी - http://www.maayboli.com/node/17171
११) कोरांटी/कोलेट - http://www.maayboli.com/node/17448
१२) मायाळू - http://www.maayboli.com/node/17566
१३) सुरणाचे देठ - http://www.maayboli.com/node/17631
१४) दिंडा - http://www.maayboli.com/node/17948
१५) शेवग्याचा पाला - http://www.maayboli.com/node/18177
१६) रानभाजी टेरी (अळू) - http://www.maayboli.com/node/17006
१७) शेवग्याची फुले - http://www.maayboli.com/node/23204
१८) भूईछत्री/आळंबी (मश्रुम्स) - http://www.maayboli.com/node/29346
पहिल्यांदाच पाहिला/ऐकला हा
पहिल्यांदाच पाहिला/ऐकला हा प्रकार. फुलं खुपच सुंदर आहेत. फुलांची भाजी करण्याचा विचारच आगळा-वेगळा. भाजीची रंगसंगतीही छानच दिसतेय.
सह्हीच - या हदग्यात काही औषधी
सह्हीच - या हदग्यात काही औषधी गुणधर्म आहेत का ?
मस्त लागते ही भाजी!
मस्त लागते ही भाजी!
छान आहे कृती आणि फुले. झाडाचा
छान आहे कृती आणि फुले. झाडाचा फोटोही टाक.
भाजी मी पण प्रथमच बघितली. मला
भाजी मी पण प्रथमच बघितली. मला तर फ॑क्त भजीच माहीती होती. भजी तर मस्तच लागतात.
वा मस्त!! मी ही भा़जी प्रथमच
वा मस्त!! मी ही भा़जी प्रथमच बघतेय.
मस्त जागू. माझ्या आजीकडे
मस्त जागू. माझ्या आजीकडे विदर्भात होतं हे झाड. ताटं भरभरून फुलं काढली जायची. काही शेजारीपाजारी पोचती व्हायची. दिवशी भाजी होत असे नि दुसर्या दिवशी भजी. चव मात्र मुळीच आठवत नाहीय. खूप लहानपणी खाल्लीय.
श्रद्धादिनेश, बित्तुबंगा,
श्रद्धादिनेश, बित्तुबंगा, अखी, निलू, मधुरीमा धन्यवाद.
अमी पुर्ण झाडाचा नंतर टाकेन. सध्या हाच घे.

पुरंदरे मलाही नवीनच आहे ही भाजी जाणकार सांगतील गुणधर्म तर चांग्ले आहे.
जागु अप्रतिम, तु माझ्याकडे
जागु अप्रतिम,

तु माझ्याकडे महिनाभर रहायला ये आणि मला तुझ्यासारखी सुगरण करून सोड
दक्षीणा मला तुझ्याकडे येऊन
दक्षीणा मला तुझ्याकडे येऊन तुला मासेखाऊ करुन सोडायची आहे
हादग्याच्या नुसत्या फुलांचा
हादग्याच्या नुसत्या फुलांचा दरवळपण छान असतो! सौम्य!!
छान भाजी. हि फुले जरा कडवट
छान भाजी. हि फुले जरा कडवट असतात म्हणून एकदा उकडून पाणी
फेकून देतात. याचा गुलाबी फुले येणारा पण एक वाण असतो.
धारावीला निसर्ग उद्यानात एक मोठे झाड आहे. पण बहुतेक कुणाला
माहीत नसावे ते, कारण झाडावर भरपूर फुले दिसतात.
बित्तुबंगा हो थोडा मंद वास
बित्तुबंगा हो थोडा मंद वास असतो.द
दिनेशदा पण मला कडवटपणा नाही जाणवला त्या भाजीला.
मस्तच गं जागू. छान दिसतिये
मस्तच गं जागू. छान दिसतिये भाजी! बघून खाविशी वाटतिये. इथे पुण्यात जर ही फुलं मिळाली तर नक्की करून पाहीन.
जागू,हादगा म्हणजेच अगस्ती
जागू,हादगा म्हणजेच अगस्ती का?कारण अगस्ती खूप औषधी झाड आहे.
याची मी पीठ पेरुन करते भाजी.
याची मी पीठ पेरुन करते भाजी. ती पण छान लागते. चिरताना याच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो
समई माझ्या सासूबाई पण म्हणत
समई माझ्या सासूबाई पण म्हणत होत्या की अगस्तीची फुल आहेत का ? पण मलाही निट माहीत नाही.
आस पुढच्यावेळी लक्षात ठेवेन. पण मला कडू नाही लागली भाजी.
हादगा म्हणजेच अगस्ती का?
हादगा म्हणजेच अगस्ती का? >>
मलाही तेच वाटते.
गणपतीच्या २१ पत्रींमध्ये "अगस्ती" ही एक पत्री आहे.
http://www.esakal.in/moraya/ganeshpatri_agasti.aspx
आई म्हणाली याची कोशिंबीरपण
आई म्हणाली याची कोशिंबीरपण करतात.
रानडूक्कर (तुमचा आयडी बदला हो
रानडूक्कर (तुमचा आयडी बदला हो प्रश्न विच्यारण्यासाठी कसतरीच वाटत) प्लिज आईला विचारून लिहाल का हदग्याची कोशींबीर.
लामणदिवा शोध घ्यावा लागेल.
आमच्याकडे हरबरा डाळ भिजत
आमच्याकडे हरबरा डाळ भिजत घालून कोबीच्या भाजी सारखी करतात ओला नारळ घालून्.शान्कली शनिपाराजवळ देसाई बन्धू दुकानासमोर जे शेतकरी बसतात तिथे ही भाजी हमखास मिळते.छान लागते.
आजपर्यंत हदग्याची फक्त भजी
आजपर्यंत हदग्याची फक्त भजी खाल्ली होती.
भाजी नाही
ह्या भाज्या न खाता मेलो तर
ह्या भाज्या न खाता मेलो तर पुन्हा जन्मास यावे लागणारच.
आयला! म्हंजे सुसुकु, गेल्या
आयला!
म्हंजे सुसुकु, गेल्या जन्मी हादग्याची भजी खाल्ली नाहियेत तु? अरेरे! फुकट रे! फुकट!! तो ही जन्म फुकट गेला तुझा..
सुचरीता म्हणजे कुठल्या एरीयात
सुचरीता म्हणजे कुठल्या एरीयात ?
सुसुकु, इब्लिस