सॅमन मासा: १/२ पौंड
किसलेला ताजा नारळ किंवा खोबरे: १/३ कप
लाल मिरच्या: १२-१५
काळे मीरे: ८-१०
चिंच: साधारण छोट्या लिंबाच्या आकारा एवढी
उडद दाळ: २ चमचे
मेथी: १/४ चमचा
धणे: १ चमचा
कोकम: ३
मोहरी: १/४ चमचा
हळद पूड: १/४ चमचा
कडी-पत्ता: ३-४ पाने
तेल: २-३ चमचे
गरम पाणी: १/२ कप, लागेल तसे.
मीठ: चवीनुसार
१. सॅमनचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याना ह्ळद आणि मिठ लावून २०-२५ मिनिटे बाजूला शोषणासाठी ठेवणे .
२. मासा, कोकम, कडी-पत्ता, मोहरी, आणि चिंच वगळुन, बाकीचे जिन्नस भाजून घेणे. पाहीजे असल्यास, जरासे, तेल वापरणे. भाजतांना विस्तव कमीच ठेवावा, करपता कामा नये. सोनेरी-तपकिरी रांग होईतोपर्यन्त परतावे.
३. गरम पाणी वापरुन भाजलेले जिन्नसाची बारीक पेस्ट करावी.
४. एका पसरट भांड्यात तेल घेऊन त्यात शोषणास ठेवलेले सॅमनचे तुकडे तळुन घेणे. मासा जरा अर्धवटच तळावा जेणेकरून त्याचे तुकडे कढी मध्ये कडक राहतील. सॅमन जरासा फ्लेकी असल्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे लवकर पडतात.
५. भांड्यामधून माश्याचे तुकडे बाजूला काढून घ्या, आणि त्याच भांड्यात, गरज असल्यास अधिक तेल घालून, मोहरी, तडतडुन घ्या, कडी-पत्ता पण घाला.
६. वर तयार केलेली पेस्ट (३) सावाकाश ओता, उकळी येऊ द्या.
७. भाजलेला माश्याचे तुकडे घाला. विस्तव कमी करून, आणखी ४ मिनिटे शिजू द्या.
८. मासा नीट शिजवून घ्यावा. चवीपुरत मीठ घाला. विस्तव बंद करा.
https://lh3.googleusercontent.com/-uRZH_rCbxxk/TulXCwXncnI/AAAAAAAAAAo/k...
https://lh3.googleusercontent.com/-fUi2sS7je_s/TulXC9RMkRI/AAAAAAAAAAs/p...
ही पाककृती करण्यासाठी सहसा बांगडा वापरतात. बांगडा वापरला तर धणे वापरु नये. तसेच मासा नरम भाजण्याची ही गरज नाही. जर शाहाकारी उडद-मेथी करायची असल्यास माश्या एवजी कच्चा आंबा वापरु शकता. फक्त चिंच जरा कमी घ्यावी. शेवटी थोडासा गुळ टाकावा.
छान दिसतायत फोटो! हा सॅमन
छान दिसतायत फोटो! हा सॅमन म्हणजेच 'घोळ' मासा का?
मी पण सामन उडिद-मेथीचाच करते
मी पण सामन उडिद-मेथीचाच करते किंवा मग तेरियाकी सॉसवाला.
बित्तु, इंडियन सामन म्हणजे रावस.
धन्यवाद स्वाती२!
धन्यवाद स्वाती२!
बित्तुबंगा, स्वाती, धन्यवाद
बित्तुबंगा, स्वाती, धन्यवाद