४ ते ५ ताजे मध्यम आकाराचे घट्ट बांगडे. (शिळे बांगडे निस्तेज असतात आणि मऊ पडलेले असतात. )
अर्धा नारळ खवून
१५ सुक्या बेडगी मिरच्या
सुपारीइतकी चिंच
लहान चमचा धणे
५-६ मिरीचे दाणे
एक कांदा - मध्यम आकारात
पाव चमचा हळद
८-१० तिरफळे (बिया काढून)
फोडणीसाठी खोबरेल तेल
बांगड्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी तिखट आणि हळद - २ ते ३ चमचे प्रत्येकी. (आवडीनुसार - कसे कमी, जास्त तिखट हवे त्यानुसार)
१. बांगडे विकत घेतानाच कोळिणीला साफ करुन देण्यास सांगावे, त्या बांगड्यांचा डोळ्यांचा भाग, पोटातली घाण, कल्ले, शेपटी वगैरे साफ करुन देतील. घरी आणून साफ केल्यास हे सर्व भाग काढून टाकावे.
२. बांगड्यांचे आकारानुसार २ वा ३ तुकडे करुन थोडा वेळ बांगड्यांना मीठ किंवा चिंचेचा कोळ लावून ठेवावा, अंदाजे १५ ते २० मिनिटे, नंतर हे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. धुवून झाल्यावर तुकड्यांना तिखट, हळद लावून ठेवावे.
३. कांदा चिरावा, चिरलेला कांदा वाटणात वापरायचा आहे. त्यातलाच थोडासा फोडणीसाठी.
४. वाटणासाठी खवलेला नारळ, बेडगी मिरच्या, कांदा, चिंच, हळद, मिरी आणि धणे हे एकत्र करुन मिक्सरमधून काढून घ्यावे. अगदी गंधगोळी असे वाटायचे नाही आणि वाटणात खूप पाणीही वापरायचे नाही.
५. गॅसवर लंगडी तापत ठेवून त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून, ते तापले की बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यावर बांगड्याचे तुकडे घालून, त्यावर वाटण घालावे. किंचित पाणी घालावे - सगळे ढवळता येईल इतपत. खूप पाणी नको.
६. ह्यातच आता तिरफळे ठेचून घालावी व चवीपुरते मीठ.
७. १० एक मिनिटे वा उकळी येईपर्यंत शिजवावे.
मंगळवारी मासे मला चालतात
मंगळवारी मासे मला चालतात
मस्तच.... तोपांसु फोटो टाकणे
:लाळ गाळ्णारी भावली: ता
:लाळ गाळ्णारी भावली: ता तिरफळा घालूच्या आधी वायच माका बाजूक काढून ठेव आणि बांगड्याची एक शेपडी
करेक्ट पारंपारिक ! << ता
करेक्ट पारंपारिक !
<< ता तिरफळा घालूच्या आधी वायच माका बाजूक काढून ठेव >> तिखलांच होयां मां ? मग तिरफळांशिवाय कसां चलात ! पण , तिरफळांऐवजीं हळदीचां पान टाकून केलेलां तिखलांय मी कोणाकडे तरी खाल्लंय; बरां लागलेलां.
होय करतत तसाय, पण तां सुक्या.
होय करतत तसाय, पण तां सुक्या.
फोटो न टाकल्याबद्दल धन्यवाद,
फोटो न टाकल्याबद्दल धन्यवाद, तेव्हढेच न मिळणार्याचे मीठ अळणी
असामी
असामी
शैलजा, रेसिपी मस्तच पण मी हेच
शैलजा, रेसिपी मस्तच पण मी हेच लिहायला आले होते की फोटो का नाही टाकलास ?
बांगड्यात काटे असतात ना खूप ? मला काटे जास्त असलेले मासे खायला भिती वाटते.
असामी पण फोटो हवा होता.
असामी
पण फोटो हवा होता. बांगडे माझे लईच फेवरेट.
अगो, रविवारी बनवून टाकेन
अगो, रविवारी बनवून टाकेन नक्की. बांगड्यात खूप काटे नसतात. काटे पहायचे तर करलीचे.
ओके
ओके
जितके काटे जास्त तितका मासा
जितके काटे जास्त तितका मासा जास्त चविष्ट.
अभक्ष्य भक्षण नाही. क्षमस्व !
अभक्ष्य भक्षण नाही. क्षमस्व ! बटाटा घेऊन हीच पाकृ. करुन बघीन.. तिरफळ काय असते? कुठे मिळते?
शैलजा भन्नाट गो.
शैलजा भन्नाट गो.
मस्तच!! तिखले किंवा उडीदमेथी
मस्तच!! तिखले किंवा उडीदमेथी काहीही चालेल.
मस्तच रेसीपी...
मस्तच रेसीपी...
रेसिपी मस्त आहे. फक्त लंगडी
रेसिपी मस्त आहे.
फक्त लंगडी म्हणजे काय ते कळले नाही
असो, फोटो टाकणे कृपयाच, नायतर पाकृ च्या १० मार्कांपैकी ३ मार्क कट
तिरफळांचाही फोटो टाकल्यास माझ्यावतीने एक मार्क जास्तीचा मिळेल.
लंगडी म्हणजे आकाराने पसरट
लंगडी म्हणजे आकाराने पसरट असलेले पातेले. पातेल्याचा बेस सहसा जाड असतो.
पण फोटो हवा होता. बांगडे माझे
पण फोटो हवा होता. बांगडे माझे लईच फेवरेट.>> खरच ग
तिरफळ काय असते? कुठे
तिरफळ काय असते? कुठे मिळते?>
तिरफळ गोवा कोकणचि स्पेशालिटी आहे. ते एक फळ असत ज्याच सुकल्यावर कवच वापरल जात. मिरमीरीत चव असते याचि. आमच्याकडे तिरफळ आणि हळदीच पान वापरुन बनवतात. बांगड्याना भरपुर मिठ लागत.
आज संकष्टी आहे..
आज संकष्टी आहे..
निकिता, रेसिपी काल लिहिलेली
निकिता, रेसिपी काल लिहिलेली आहे
हे घ्या बांगडे आणि शैलजाचे
हे घ्या बांगडे आणि शैलजाचे मार्क वाढवा.
जायफळ आणि दगडीफुलच्या मधला तिरफला आता अजून मार्क वाढवा बघु.
वा, वा जागू, धन्यवाद मस्त
वा, वा जागू, धन्यवाद मस्त फोटो.
मस्त. भाता बरोबर खायचे ना.
मस्त. भाता बरोबर खायचे ना.
हो, हो. मस्त वाफाळता भात आणि
हो, हो. मस्त वाफाळता भात आणि सोलकढीबरोबर.. स्वर्गसुख.
नको रे नको रे. आज चतुर्थी आसा
नको रे नको रे. आज चतुर्थी आसा
मस्त वाफाळता भात आणि
मस्त वाफाळता भात आणि सोलकढीबरोबर.. स्वर्गसुख >>> अगदी अगदी हेच लिहायला आले होते. मस्त
गो शैलजा !
खुपच छान. तोंपासू येक्दम.
खुपच छान. तोंपासू येक्दम. बांगडे माझे बी फेवरेट. <<<<<मस्त. भाता बरोबर खायचे ना.>> लाळ गाळणारी बाहुली.
हो ग.. पण मी आज वाचल
हो ग..
पण मी आज वाचल ना...बुधवारची संकष्टी अगदी परीक्षा पाहते
माका वनाताय दिसतत काय??
माका वनाताय दिसतत काय?? शैलू तुझ्या तिखल्याने वनातायंका येवचाच पडला बघ.
Pages