इवल्या इवल्या बाळाचे

Submitted by विदेश on 12 December, 2011 - 09:22

इवल्या इवल्या बाळाचे
इवले इवले ताट
चिऊ काऊ हम्माचे
अवती भवती पाट

पहिला घास चिऊचा
चिव चिव अंगणीचा
मेणाच्या घरातल्या
चिव चिव चिमणीचा

दुसरा घास काऊचा
काव काव फांदीवरचा
शेणाच्या घरातल्या
काव काव कावळ्याचा

तिसरा घास हम्माचा
हम्मा हम्मा कपिलाचा
गवताच्या गोठ्यातल्या
हम्मा हम्मा गाईचा

बाळाची अंगतपंगत
पक्षीप्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत

गोड घास आईचा
मम्म मम्म करण्याचा
चांदोबाला बोलावत
गात निन्नी करण्याचा !

गुलमोहर: 

छान आहे कविता. जुने रम्य दिवस आठवले. पिल्लू ला भरवायचे आणि वरण भात तूप एखादा घास मटकवायचे.