वारली (मोर)

Submitted by बस्के on 16 May, 2008 - 19:00

नेहेमीचे वारलीचे पॅटर्न्स नाही आहेत.. पण चित्र खूप आवडलं म्हणून घेतलं कापडावर करायला.. पहील्यांदाच केल्यामुळे सफाईदारपणा काही नाही आला..
(फ्रेमच्या काचेत, फ्लॅश पडलाय.. Sad )

2497710902_aa172ecc22_o.jpg

गुलमोहर: 

हे मस्त आलय. वारली प्रकार काहीही काढल तरी छानच दिसत.

मस्तच जमलय की!! आणखी काय सफाईदार व्ह्यायचेय! Happy

छान आहे चित्र. दिवसाच्या उजेडात, फ्रेम उजेडात ठेउन, फ्लॅश न वापरता फोटो काढला तर आणखी छान येईल.

मस्त आहे डिजाईन Happy
जमलय की अजुन कस जमायला हव???
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

थॅंक्स दिव्या,आयटी,दिनेशदा आणि झकास..
अजुन सफाईदार म्हणजे रेषा एकाच जाडीच्या आल्या पाहीजेत्.. ब्रश खूप दिवसांनी घेतला हातात.. त्यामुळे ते नाही जमलं.. नाहीतर कदाचित अजुन चांगलं दिसु शकलं असतं..
दिनेशदा, दिवसाच काढला फोटो, पण त्या भिंतीवर अंधार येतो, म्हणून फ्लॅश थेवावा लागला.. असो.. धन्यवाद!

छान आलंय Happy मोराची पिसं मस्त, आणि दोन्ही बाजूला दगडाखाली साप आणि विन्चू आहेत.. ती कल्पना भन्नाट आहे! Happy

थँक्स पुनम.. एक सांगायच राहीलं.. तुळशीबागे समोर एका दुकानात याचं किट मिळतं.. आय मिन, कापड, रंग, ब्रश, आणि चित्राचा फोटो.. त्या फोटोवरून काढायचं.. त्यामुळे चित्राची आयडिआ माझी नाही.. Happy

चित्र छान आहे... विशेषतः मध्यभागी जो मोर आहे तो अतिशय छान!
Happy

मस्तच आलय चित्र.
मला वारली हा प्रकार शिकायचाय. पूनम माझ्यासाठी पण एक किट घे ग तिथे जाशिल तेव्हा Wink

मस्तय चित्र. आवडलं.

भाग्यश्री, तू काहीही म्हण पण चित्र छान आहे. रेघ आणि रेघ बघायला गेलं तर जाणवेल लहान बारिक रेषा. पण over all गेटअप छानच आहे.. मोर छान जमला आहे. मलाही ते साप आणि विंचू आवडले.

थँक्स सगळ्यांना! Happy

मस्त आलंय चित्र. वारली पेंटींग च्या बारीक रेषा काढण्यासाठी ब्रश रंगात बुडवून एका दुसर्‍या कागदावर झाड, प्राणि, घर वगैरे फॉर्म्स ५-१० मिनिटे काढायचे आणि मग मुख्य कागद, कापडावर ब्रश वापरायचा. त्यामुळे रेघा एकसारख्या यायला मदत होते व सफाईदार पणा येतो (स्वतः पण चित्र बनवू शकता वेगवेगळी मांडणी करुन)

थँक्स अश्विनि, स्नेहा, प्रकाशखेळ! Happy