माझा व्यवसाय - कापडावर प्रिटींग आणि एम्ब्रॉयडरी - प्राईम एंटरप्राईजेस

Submitted by हिम्सकूल on 8 December, 2011 - 04:06

आम्ही सध्या कापडावर एम्ब्रॉयडरी आणि कापडावरील स्क्रीन प्रिंटींग या प्रकारचे काम करतो. टी शर्टस्‌, टोप्या, ड्रेस मटेरियल,साड्या यावरती हे काम चालते. कॉम्प्यूटरवर डिजाईन बनवून यंत्राच्या सहाय्याने एम्ब्रॉयडरी केली जाते. गिर्‍हाईकांच्या मागणीनुसार हे काम केले जाते. हा एक सेवा उद्योग आहे.

आमचा व्यवसाय १९८० साली मी आणि माझ्या पत्नीने मिळून सुरु केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात स्टेशनरी पुरवणे, टायपिंग करुन देणे आणि छपाई करुन देणे, ग्रीटींग कार्डस छापून देणे अश्या प्रकारे हा व्यवसाय सुरु केला. कालांतराने एका गिर्‍हाईकाने आमच्या सेवा चांगल्या वाटल्या म्हणून कापडाच्या टेप वर छपाई करुन देणार का अशी विचारणा केली. त्याकाळी कापडावर छपाई करण्यासाठी लागणारी शाई सहज उलपब्ध नसे. ती केमिकल्स मुंबईमधून मिळवून हळूहळू त्यात प्राविण्या मिळविले. ह्या प्रकारे कापडावरच्या छपाईत लक्ष घालून कागद छपाईचे काम कमी करत आणले. कापडावरची छपाई जोखमीचे काम असल्यामुळे ह्या व्यवसायात फार लोक काम करत नाहीत त्याचा फायदा घ्यायचे ठरवले. त्यानंतर गिर्‍हाईकांच्या मागणीनुसार एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय चालू केला. कापडावर छपाई आणि एम्ब्रॉयडरी हे दोन्ही एकमेकाला पूरक असे व्यवसाय आहेत. बर्‍याच वेळेस एकाच टी-शर्टवर पुढच्या भागात एम्ब्रॉयडरी तर मागच्या भागात छपाई अशी मागणी असते. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे गिर्‍हाईकांची सोय होते.

समस्या - सर्व व्यवसायांना भेडसावणार्‍याच समस्या म्हणजे कामगारांची कमतरता, वीजेची अनुपलब्धता, माल वेळेवर न मिळणे, इत्यादी.

नवीन कल्पना - स्क्रीन प्रिंटींग खेरीज कापडावर छपाई करण्याचे आधुनिक मार्ग म्हणजे डिजीटल प्रिंटींग, ट्रान्सफर प्रिंटींग, कापडावर प्रिंटरच्या सहाय्याने डायरेक्ट प्रिंटींग च्या प्रकारचे आहेत. ह्या पद्धतींचा वापर करून छपाई करण्याचा आम्ही विचार करत आहोत. शिवाय एम्ब्रॉयडरीचा व्यापही वाढता असल्यामुळे नवीन मशिन घेण्याचा विचारही चालू आहे.

आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येत जाते तस तसे आपण आपल्या व्यवसायाचे स्वरुप बदलत रहावे लागते.

नवीन उद्योजक बनणार्‍यांना असा सल्ला द्यावसा वाटतो की, तुम्हाला जे काम येते त्याचं व्यवसायात रुपांतर करणे हे फारसे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला व्यवसायाच्या इतर अंगांची माहिती असणे फर जरुरीचे आहे. उदा. आर्थिक नियोजन, सरकारी नियमांची माहिती घेणे आणी त्याची अंमलबजावणी करणे, मार्केटींग, व्यवसायासाठी लागणार्‍या कच्च्या मालाची फायदेशीर खरेदी, जोखीम घेण्याची प्रवृत्ती, जग कुठे चालले आहे त्याकडे बारकाईने लक्ष ठेवणे व त्यानुसार व्यवसायाची दिशा ठरविणे, इ. वरील सर्व गोष्टींचा एकत्रित सुपरिणाम म्हणजे यशस्वी व्यवसाय.

आम्ही छापलेले काही टी-शर्ट्स http://sheepstop.com/index.php?zone=330 ह्या वेबसाइटवर बघता येतील

पद्मजा कुलकर्णी व रवींद्र कुलकर्णी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्स, मस्त लिहिलेस. तुम्ही मोठ्या ऑर्डर्स घेता फक्त की छोट्याही?
म्हणजे समजा, मला माझ्या काही ड्रेस मटेरियल्सवर असे काही प्रिंटींग/ एम्ब्रॉयडरी करुन घ्यायचे असले तर? तसे करुन देता का? आणि तुम्हांला तसेच मलाही ते परवडेबल असेल का?

मनिमाऊ.. व्यवसाय पुण्यात आहे...

केश्वे.. मी फक्स्त टायपिंग केले आहे.. मजकूर बाबांनीच लिहून दिलाय.. Happy

मस्त लिहिलंय. हे मायबोलीवर वाचून खूपच छान वाटलं, कारण या सेवेचा लाभ मायबोलीकरांनी घेतलेला आहेच. Happy

छानच... Happy खुप शुभेच्छा..

हा व्यवसाय - पुणे/मुंबई कुठे आहे?>>
तुम्ही मोठ्या ऑर्डर्स घेता फक्त की छोट्याही?>>
हे प्रश्न माझे पण समजावे Happy

छान लेख..अजुन लिहल असत तर माझ्यासार्ख्या लोकाना(व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या ) बर पडेल..
मदत होईल तुमचे अनुभव एकून....(नोकरीच्या वेतबिगारीचा कंटाळा आलाय)

वेळ बघा की तै... पोस्ट्ची....

ड्रेस मटेरियल वर एम्ब्रॉयडरी छोट्या प्रमाणातही करता येते.. पण प्रिटींगला एक ठराविक संख्या असणे दोघांच्या दृष्टीने योग्य.. कारण डेव्हलपिंगचा खर्च एका कापडाला किंवा खूप कापडांना काय तोच असतो.. एकच कापड असेल तर तो अर्थातच जास्त होतो आणि जास्त संख्या असेल तर तो विभागला जातो.

पुण्यात, मग मस्तच ! समजा आम्हाला ऑफिससाठी Ts घ्यायचे असतील तर, तुम्हाला फोन करता येइल. लोगो प्रिंट किंवा एम्ब्रॉयडर करायला. जॅनमधे जिमसाठी बनवणार आहोत, तेव्हा मी तुम्हाला संपर्कातुन कोटेशन मागवेन. असं चालेल ना? कि हे फारच unprofessional वाटेल तुम्हाला?

मनिमाऊ... चालेल काहीच हरकत नाही...

अनुसूया.. तुमचे काही ठराविक प्रश्न असतील तर इथेच विचारू शकता.. शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.

छानच आढावा घेतला आहे. नमुने पण सुंदर आहेत.
मी मागच्यावेळी नैरोबी एअरपोर्टवरुन काही टिशर्ट्स घेतले होते, त्यावर चित्ता, मसाई लोक अशी छान एम्ब्रॉयडरी होती. भारतात तशी बघितली नव्हती मी कधी.
काही टिशर्ट वर पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी दोन्ही होते.

दिनेशदा. चित्ता, मसाईलोक ह्यांच्या एम्ब्रॉयडरीचा आकार किती होता?? शक्य असेल तर त्याचा फोटो काढून पाठवणार का??

हिम्स, चांगली माहिती. मार्केटिंग, नव्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबता, त्यांतून प्रतिसाद कितपत येतो यांविषयीही कळाले तर बरे होईल.
माझे एक-दोन नातेवाईक स्क्रीन प्रिंटिंग, कापडावर ब्लॉक प्रिंटिंग इ. व्यवसायात आहेत. परंतु त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप सध्यातरी घरगुती पातळीवर आहे.

हिम्सकूल छानच माहिती !! तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
>>अजून विस्तृत लिहायला हवं होतंस असं वाटलं>> सेम पिंच Happy

अरे वा! अभिनंदन आणि व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा.
एम्ब्रॉयडरीचे फोटो असले तर ते सुद्धा इथे दिले तर छान होईल.

धन्यवाद मंडळी..

लोकहो... सविस्तर नक्की कश्याच्या संदर्भात हवे आहे ते सांगा.. म्हणजे त्यानुसार अजून माहिती देता येईल..

अकु... मार्केटींगसाठी फारसे काही अजून पर्यंत करावे लागलेले नाही... कारण प्रत्येक वेळेस पुढचे पाऊल टाकताना आधीच्या ग्राहकांच्या मागणीचा विचार करुन त्यानुसारच टाकले गेले आहे.. अर्थात ह्या व्यवसायात सर्वात महत्त्वाचे मार्केटींग म्हणजे माऊथ टू माऊथ पब्लिसिटीच.. तुम्ही केलेल्या कामाचा दर्जा ह्या ठिकाणी फार महत्त्वाचा ठरतो...

हिम्स.. ऑलमोस्ट १० वर्षांपूर्वी न्यूयॉर्क ला ट्रांसफर प्रिन्टिंग च्या फॅक्टरीला विजिट दिली होती. भारतात ही हा प्रकार तुम्ही आजमावणार आहात्,केल्यावर डीटेल्स वाचायला आवडतील.

Pages