Submitted by ग्लोरी on 8 December, 2011 - 02:00
आभाळाच्या सागरात चांदोबाची होडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी
उसळती लाटा निळ्या
निळ्या अंधाराच्या
आदळूनी होडीवर
होतात रुप्याच्या
नजरेला येत जाते दुधाळशी गोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी
लुकुलुकु पोहतात
मासे चांदण्यांचे
कुठे कुठे लागतात
बेटही ढगांचे
आरामात पाहा सारे करू नका खोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी
एरवी या सागराचे
पाणी काळेभोर
चांदोबाची होडी म्हणजे
उजेडाचा मोर
होडीला या जगामधे नाही कुठे जोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सह्ही...!! सह्ह्ही...!!!
सह्ही...!! सह्ह्ही...!!! सह्ह्हीच...!!!
कित्ती... गोड.. मस्तंय..
कित्ती... गोड.. मस्तंय..
मस्त
मस्त
खुप सुंदर.
खुप सुंदर.
सुंदर काव्य!!!
सुंदर काव्य!!!
खुपच गोड
खुपच गोड
सुरेख.
सुरेख.
उत्तमच. मुलाना म्हणून दाखवेन.
उत्तमच. मुलाना म्हणून दाखवेन. नाच बसवला तर चालेल का?
चांदोबाची होडी म्हणजे
उजेडाचा मोर --> कळले नाही.