१) घोळीच्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मी वरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या आहेत.
२) भांड्यात तेल गरम करून त्यावर लसुणाची फोडणी द्यायची.
३) त्यातच लगेच हिंग, हळद, मसाला घालून पटकन ढवळून लगेच वाटण घालायचे. जर पटापट जमत नसेल तर वाटण घातल्यावर मसाला घाला त्यामुळे मसाला करपणार नाही. पण जर तेलातच घातलात तर कालवणाला चांगला लाल रंग येतो.
४) आता त्यात चिंचेचा कोळ, घोळिच्या तुकड्या, मिठ, गरज असेल तेवढेच पाणी घालून ढवळून उकळवत ठेवा
५) उकळी आल्यावर साधारण ७-८ मिनीटांत गॅस बंद करा.
झाले घोळीचे कालवण.हाकानाका?
घोळात घोळ नव्हे घोळ म्हणजे मासा
घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात.
मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात.
ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात.
घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात. (माझा फेव्हरेट लहानपणापासुन) हा काटा उखळीप्रमाणे असतो. ह्याच्या मधले जॉइंट काढले की त्यात रस मिळतो तो प्यायचा हा पुर्वीपासूनचा छंद. काट्याच्या म्हणजे मणक्याच्या बाजूला थोडे मांस असते.
घोळीचा पिसारा म्हणजे प्रराकडचा मांसल भाग. ह्याचे कालवण करतात.
घोळीच्या मधल्या भागाच्या तुकड्या तळण्यासाठी व कालवणासाठीही वापरतात.
चविला हा मासा मध्यम, म्हणजे कोणालाही आवडेल असाच. अती चविष्ट नाही व मुळमुळीतही नाही.
घोळीच्या कालवणात शेवग्याच्या शेंगा, टोमॅटोही चांगला लाग्तो. शेंगा घालायच्या असतील तर चिंचेचा कोळ व तुकड्या घालण्याआधी शिजवून घ्याव्यात.
हे कालवण जास्त दाट न करता पातळच करावे म्हणजे वाटणाची चव न येता खरी माश्याची चव त्यात उतरते. काहीजण वाटण न घालताही हे कालवण करतात.
तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात.
मी पयला..... मस्त ग जागू
मी पयला.....
मस्त ग जागू ताइ.....तों पा सू
बरो घोळ घातलस. तोंपासु गं
बरो घोळ घातलस. तोंपासु गं तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदरच घोळ!!! पण आललसुणाच्या
सुंदरच घोळ!!! पण आललसुणाच्या वाटणामध्ये खोबर वगैरे काही नाही का रस्स्यासाठी?
अहाहा!! रस्सा मस्त दिसतोय
अहाहा!! रस्सा मस्त दिसतोय एकदम्.....तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॉरीनेशन नाहिका करायचे?
मॉरीनेशन नाहिका करायचे?
जागु ह्यात खोबरं नाही?
जागु ह्यात खोबरं नाही?
त्या घोळ माश्याला देखील वाटले
त्या घोळ माश्याला देखील वाटले पाहिजे... वा काय घोळ घातलाय माझा...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जागु हा घोळ मासा इतका मोठा
जागु हा घोळ मासा इतका मोठा असतो?
त्याच्या पोटाला चिर दिलिये का? त्यात आत काहीतरी दिसतय, काय आहे?
बाकी ही रेसिपी काही इतकी इंटरेस्टींग वाटली नाही, त्याबद्दल सॉरी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तुकड्या तळण्यासाठी
तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात. >> याचे फोटो टाक, मग रेसिपी, मजेदार वाटेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जागू, असाच प्रत्येक माश्याचा
जागू, असाच प्रत्येक माश्याचा स्वतंत्र फोटो हवा.
(कोळणीचा पण नावानिशी टाकला तरी चालेल.)
जागुताई,.. :( मार्गशीष आणि
जागुताई,..
मार्गशीष आणि घोळ, बिर्यानी.. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
घोळीचे कालवण एकदम delicioso
घोळीचे कालवण एकदम delicioso दिसतय! माझी आजी घोळीचे कटलेट आणि थालिपीठ पण करायची.
<<<<(कोळणीचा पण नावानिशी
<<<<(कोळणीचा पण नावानिशी टाकला तरी चाल>>>>> दिनेशदा,![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
साक्षिमी, निकिता मी खरच
साक्षिमी, निकिता मी खरच घोळीच्या वाट्णात घोळ घातला. खोबरे लिहायचेच विसरले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दक्षे एकदा खाऊन पण बघ ग मग दोन्हीतली मजा अनुभवशील
अग तळलेल्या तुकड्यांचा फोटोच नाही सापडत. पण परत तळल्या की टाकते.
नाना, निलू, मयुरी, रोहन, बीएस धन्यवाद.
दिनेशदा
असे केले तर त्या रोज किलोभर दागिने घालून बसतील मार्केटमध्ये.
प्रिती केल तर उत्तम पण नाही केल तरी काही हरकत नसते.
रुपाली हे फोटो शिळे आहेत
मे महिन्यातले.
मासे बघूनच माझ्या सारख्या
मासे बघूनच माझ्या सारख्या राक्षसाला बकासुरी भूक लागते.
होता है होता है जागुतै !!
होता है होता है जागुतै !! टेन्शन नै लेनेका !!!
तु कसाही घोळ (खायला) घातलास तरी आम्हाला आवडणारच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने त्या घोळीच्या पोटात
रच्याकने त्या घोळीच्या पोटात काय दिस्तय? मुशीच्या तुकडयांसारखेच दिसतात तुकडे, मी कधी आणत नाही, आता आणुन बघेनच (मार्गशीर्ष संपल्यावर). तो मोठाचा मोठा लाल मासा कापुन ठेवलेला असतो तोच का ग हा?
सुंदर , नेहमीप्रमाणे ! माझ्या
सुंदर , नेहमीप्रमाणे !
माझ्या एका मित्राने मोठ्या घोळीचे तुकडे आणून अप्रतिम पॅटीस करून खायला घातले होते. घोळीचे तुकडे शिजवून ते त्याने उकडलेल्या बटाट्यात चांगले मुरडून एकत्र केले व मग त्यांत आलं, लसूण व मिरची वाटून मिक्स केली. किंचित लिंबू पिळून मीठ टाकलं व त्या सर्वाचे छोटे [लाडवाच्या आकारचे ] गोळे केले. अंड्याचा बलक काढून उरलेल्या भागात हे गोळे बुडवून, ब्रेड क्रम्प्समधे घोळवून डीप फ्राय केले. सॉसबरोबर सर्व्ह केले.
मी हे करायचा प्रयत्न केला पण घोळ व बटाटा याचं माझं मिश्रण खूपच सैल झालं व चव छान आली असूनही माझा प्रयोग फसला. पुन्हा प्रयत्न नाही केलाय.
घोळ झाला. जागू, 'अधिक टिपा'
घोळ झाला.
जागू, 'अधिक टिपा' साठी धन्यवाद.
भाऊ, चांगली रेसिपी आहे. इथे क्रॅबमीट, salmon इ. च्या अश्या patties करतात. त्याना cakes म्हणतात. सहसा बटाटा नसतो त्यात पण कृती साधारण अशीच. breadcrumbs किंवा मैद्यातही घोळवून करतात. सैल झालं तर त्यातच थोडे breadcrumbs किंवा मैदा घातला तर चालेल.
इंगळे, अन्कॅनी
इंगळे, अन्कॅनी धन्यवाद.
साक्षिमी अगदीच लाल असतो तो तांब घोळ एवढी लाल नसते. फक्त लालसर छटा असते कातडीला.
त्या घोळीच्या पोटात गाबोळी असेल ती काढण्यासाठी कोळणीने पोटाला चिर दिली असणार.
भाऊ बटाटा जास्त शिजला गेला असणार. मी करून बघते एकदा. धन्स रेसीपी बद्दल.
<< मी करून बघते एकदा. >>
<< मी करून बघते एकदा. >> जागूजी, मला पक्कं माहित होतं , तुम्ही हे चॅलेंज म्हणून घेणारच ! केल्यावर खरंच सांगा माझं काय चुकलं असावं तें .[आणि हो, बटाटा व घोळीच्या मिश्रणात अगदीं बारिक
चिरलेला कांदाही (कच्चा) पॅटीसची लज्जत वाढवतो ]
अन्कॅनी, मनःपूर्वक धन्यवाद.
ओके भाऊ नक्की करते.
ओके भाऊ नक्की करते.
भारीच दिसतय..
भारीच दिसतय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या घोळीच्या पोटात गाबोळी
त्या घोळीच्या पोटात गाबोळी असेल >> गाबोळी म्हणजे काय?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
गाबोळी म्हण्जे माशाच अंड (हो
गाबोळी म्हण्जे माशाच अंड (हो ना जागू)? पण ते माशापेक्षाही यम्मी लागत फ्राय केल्यावर, लहान असताना यावरुन भांडण व्हायची आमची भावंडात .. !!! करलीची पण मस्तच लागते गाभोळी ... स्लर्प ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करलीची पण मस्तच लागते गाभोळी
करलीची पण मस्तच लागते गाभोळी >>
अख्खीच्या अख्खी करली मस्त लागते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यात मस्त मासा
अम्मी धन्स. दक्षिणा गाबोळी
अम्मी धन्स.
दक्षिणा गाबोळी म्हणजे माश्याच्या पोटात असणारी माश्यांची अंडी. अगदी खसखशिच्या आकाराची असतात. फक्त शिंगाळ्याची गोटीच्या आकाराची असतात.
साक्षिमी हो ग करलीची टेस्टी असते एकदम गाबोळी.
हो निकिता पण काटे काढायचा
हो निकिता पण काटे काढायचा कंटाळा येतो, दोन्ही हात वापरावे लागतात, गाभोळी कशी मटकन तोंडात टाकता येते
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
वा जागू, मस्त दिस्तय ग हे.
वा जागू, मस्त दिस्तय ग हे.
Pages