पाकिस्तान का मतलब क्या? या समस्येचे विश्लेषण

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 29 November, 2011 - 05:46

((खालील लेख http://agphadnavis.blogspot.com/2011/11/blog-post.html या ठिकानावरून मूळ लेखकाच्या पुर्वपरवानगीने टापलेला आहे. माझ्या मनातले जणू इथे उतरवले आहे त्यामुळे मी परत लिहिण्याचा खटाटोप केला नाही.
साम्प्रत काळात अमेरिका मध्य एशियात का तळ ठोकून आहे ते समजते. तसेच पाकिस्तान सांस्कृतिकदृष्टया भारताचाच भाग असल्याने तिथल्या गृहयुद्धाच्या आगीची झळ भारताला लागणार हेही कळते.))

पाकिस्तान हा मुलुख जरी मोठा असला तरी तो आर्मीच्या तावडीत आहे. आर्मी आणि तेथील मोठे जनरल हा पाकिस्तान सांभाळतात. हे जनरल सहसा पंजाबी असतात आणि त्यातही मुस्लीम समाजातील बरेलवी पंथातले असतात. या पंथास दर्ग्यावरजाऊन पूजा करणे, पीर फकीर, उरूस वगैरे करणे मान्य आहे म्हणून देवबंदी आणि वहाबी संप्रदाय बरेलवीलोकांना काफिर म्हणतात. हे पंजाबी बरेलवी जमीनदार लाहोर ते इस्लामाबाद येथील १७ जिल्ह्यांमधून नियुक्त होतात. इतर भागातील सैनिक आर्मीत मोठ्या पदावर सहसा जाऊ शकत नाहीत. त्यामुळे असे म्हणता येईल कि पाकिस्तान हे पंजाबी आर्मीची वसाहत आहे. या बरेलवी संप्रदाय आणि पंजाबी वृत्ती ची खासियत आहे कि यांना इस्लाम पण हवा आणि राष्ट्रवाद पण हवा. म्हणजे यांना इस्लामी राष्ट्र हवे होते.

हि गरज कशी काय उद्भवली यासाठी आपला इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.

भारताचा भूगोल आणि त्याचा इतिहासावर झालेला परिणाम

भारत म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एक असलेले राष्ट्र आहे. एखादा कांदा असतो, तश्या भारताच्या पाकळ्या आहेत. सर्वात बाहेरची लेयर म्हणजे गांधार प्रांत - आजचा दक्षिण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान चा उत्तरपश्चिम प्रांत एन.डब्ल्यू.एफ.पी. सिंधुनदी च्या पश्चिमेचा इलाखा. पेशावर पासून काबुल पर्यंत. हा इलाखा म्हणजे "भारताची" नैसर्गिक, सामरिक आणि शास्त्रीय सीमा. ह्याच्या पलीकडे "बाहेर" चा प्रदेश सुरु होतो. ह्या प्रदेशाच्या बाहेरच्या लोकांनी केलेले आक्रमण म्हणजे "परकीय" आक्रमण. पारशी, अरब, मोगल, इंग्रज, हूण, शक, कुशाण, ग्रीक वगैरे सगळे लोक "परकीय" होते कारण ते गांधारच्या बाहेर चे लोक होते..

गांधारकर लोकांनी पंजाबवर केलेले आक्रमण म्हणजे परकीय आक्रमण नव्हे, ती भारतातली अंतर्गत लढाई. गजनी आणि घोरी च्या आधी सुद्धा काबुल (कापिषा हे संस्कृत नाव) चे राजे केकय (पंजाब) वर आक्रमण करत असायचेच. त्या न्यायाने, गजनी आणि घोरी यांनी "परकीय" म्हणणे उचित नाही. त्यांनी परकीय रिलीजन स्वीकारला, पण लोक भारतातलीच होती.

अशी जर वर्षे मोजली तर मूळ भारतावर "परकीयांचे" राज्य फक्त ८०० वर्षे होते, ५००० वर्षात. म्हणजे जवळपास फक्त २०% वेळ आपण "परकीयांच्या राजकीय अधिपत्याखाली होतो, ८०% आपण स्वतंत्र होतो. इच्छुक लोकांनी ग्रीक-शक-कुशाण-हूण-अरब-मोगल-इंग्रज यांच्या तारखा तपासून बेरीज करून बघावी.

गजनी-घोरी वगैरे मंडळी म्हणजे बाटलेले ऋषी पतंजली आणि ऋषी पाणिनी चे वंशज. खिलजीवंश पण क्रमू नदी (आजची वजिरीस्तान मधली कुर्रम नदी) च्या काठची जमात. लोकांनी नकाशा जरूर तपासावा, इतिहास चटकन लक्षात येईल. सोमनाथ फोडणाऱ्या मेहमूद गजनीच्या २०-२५ वर्षे आधीपर्यंत गजनी शहरावर "राजा शिलादित्य" राज्य करत होता. त्यावरून त्या भागाचे "भारतीयत्व" लक्षात येईल. या शिलादित्याचे पूर्वज पण मेहमूद सारखेच पंजाबवर आणि इतर आसपासच्या राजांवर चढाई करायचे, पण मेहमूद सारखा विध्वंस कुणी केल्याचा उल्लेख इतिहासात नाही. इस्लाम स्वीकारल्या नंतर गजनी आणि तिथल्या एकंदर सर्व भावी राजांच्या आणि लोकांच्या "चित्त-वृत्ती" मध्ये मूलभूत बदल झाला आणि तिथले लोक हे भारतासाठी कायमचे शत्रू होऊन बसले. ते शत्रुत्व अजून ही तालिबान च्या रूपाने सुरु आहे. असो.

भारत म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एक असलेले राष्ट्र आहे. गांधार पासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंध पासून आसाम पर्यंत राजकीय एकता इतिहासात फार काल नव्हती. आणि सांस्कृतिक एकतेवर आधारित या राष्ट्रास राजकीय एकतेचे इतके वेद पण नव्हते.

१. मौर्य कालीन एकता - चंद्रगुप्त-बिन्दुसार-अशोक यांनी मिळून पादाक्रांत केलेला संपूर्ण भारत (१५० वर्षे)
२. मोगल कालीन एकता - औरंगजेबाने जिंकलेला संपूर्ण भारत (फक्त १७ वर्षांकरिता)
३. इंग्रजांनी जिंकलेला अखंड भारत - ९९ वर्षे (१८४९ ते १९४७)

गेल्या ५००० वर्षात फक्त २६६ वर्षे भारत हा राजकीय दृष्ट्या एक राष्ट्र म्हणून राहिला आहे. आज "भारतामध्ये" ८ वेगळी राष्ट्रे आहेत - भारतीय गणराज्य, पाकिस्तान चे इस्लामी गणराज्य, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश. असा भारत आज नाही, याचे कारण म्हणजे इंग्रजांनी १९३७ आणि १९४७ साली केलेल्या दोन फाळण्या. १९३७ मध्ये ब्रह्मदेश वेगळा केला आणि १९४७ पाकिस्तान (पूर्व आणि पश्चिम) ची निर्मिती करून उरलेला भारत देखील तोडला. त्या फाळणीमुळे आजचे प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाले आहेत. आणि ती फाळणी समजावून घेण्यासाठी मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे मोगलांशी असलेले संबंध समजावून घेणे आवश्यक आहे.

जेव्हा नजीबउद्दौला ने अब्दाली ला आमंत्रण दिले, त्याच वेळेस फाळणीचे बीज पेरल्या गेले. तर वर म्हंटल्या प्रमाणे मुहम्मद घोरी नंतर ही पठाण लॉबी गंगेच्या खोऱ्यात स्थिरावली आणि दिल्ली ही त्यांच्या सल्तनतीची राजधानी बनली. पांडवांच्या युधिष्ठिरानंतर दिल्लीला (तेव्हाचे इंद्रप्रस्थ) राजधानी बनवणारा पहिला राजा म्हणजे मुहंमद घुरी आणि त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक. ३०० वर्षे एकंदर भारतात अराजकता होती. लूट, कत्तली, धर्मांतरे, देवळांची-विद्यापीठांची-स्तूपांची-मठांची-मूर्तींची तोडफोड निरंकुश सुरु होती.

३०० वर्षांनंतर १५०० च्या सुमारास या लोकांना शह देणाऱ्या दोन शक्ती भारतात होत्या. राजपूत आणि मोगल. एक आतली आणि एक परकीय. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने लोदीवंशाला हरवून दिल्ली वर कब्जा केला. मोगल हे उघडपणे परकीय होते, तेव्हा दोन भारतीयांनी (राजपूत आणि पठाण) मिळून बाबराच्या मुलाला हाकलून दिले. हुमायूनला हाकलल्या नंतर राजपुतांनी पठाणांना सुद्धा हाकलून दिले आणि त्यांचा सेनापतीने स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि "सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमू" दिल्लीच्या सिंहासनावर बसला.

पानिपतच्या दुसऱ्या लढाई बैरमखानच्या मदतीने १३ वर्षीय अकबराने हेमुला हरवले आणि दिल्लीचा बादशाह झाला. अकबराने स्थिरता आणली, राजपूत आणि पठाण दोघांना पाळून शांत ठेवले. जिझिया रद्द केला.आणि एक मोठं साम्राज्य स्थापन केले. अकबर-जहांगीर-शाहजहान-औरंगझेब यांनी ही नीती चालू ठेवली आणि पठाणांना सत्ते पासून वंचित ठेवले. काजी आणि उलेमा (इस्लामी धर्मगुरू) यांना पठाण-मोगल काही फरक पडत नाही, जोपर्यंत राजा मुसलमान आहे. म्हणून या सगळ्या झगड्यात काजी लोक तटस्थ होते.

१७व्या शतकात दक्षिणेत शिवछत्रपतींचा प्रादुर्भाव झाला आणि समीकरणे बदलू लागलीत. शिवछत्रपतींची खरी "महिमा' त्यांच्या मृत्युनंतर दिसते. त्यांच्या मृत्युनंतर अवघ्या ५०-६० वर्षात मोगलांची सत्ता केवळ लाल-किल्ल्यापर्यंत मर्यादित राहिली. शिवाजी ने निर्माण केलेली 'मुवमेंट" इतकी मोठी झाली कि ती मोगलांचा "पर्याय" आणि उत्तराधिकारी म्हणून सबंध भारतात ती मान्य झाली. इथे काजी-मुल्लाह लॉबी मधील लोकांचा तटस्थपणा तुटला.

पठाण लोक रोहीलखंडात मोठ्या प्रमाणात होते. रोहिलखंड म्हणजे आजचा पश्चिम यु.पी. देवबंद, आझमगढ, गोरखपूर आग्रा वगैरे सगळे आजची "कुप्रसिद्ध" स्थळे इथेच आहेत. औरंगझेबाच्या दक्षिण मोहिमेत इथल्या पठाणांना खूप फायदा झाला (आर्थिक). मोगल क्षीण झाले आणि ३०० वर्षांपूर्व हातातून गेलेली सत्ता परत मिळवण्याचे वेध पठाणांना लागले. आता कॉम्पीटीशन सुरु झाली मराठे आणि पठाण यांच्या मध्ये. एक मोठी सत्ता लयाला जाते तेव्हा ती पोकळी भरून काढायची ची चढाओढ लागते, ती आपण इथे बघतोय. रोहीलखंडातल्या पठाणांनी गांधार मधल्या पठाणांची मदत घ्यायची ठरवले आणि अब्दालीला आमंत्रण दिले. यात काजी लोकांनी पूर्ण सहकार्य केले आणि या लढाईला "जिहाद" चे रूप दिले. "काफिर" हिंदू भारताला बळकावत असताना उत्तरेतल्या मुसलमान राजांना एकत्र आणायचे मोठे काम उलेमा आणि काजी जमातीने केले.

गेल्या लेखमालेत मराठ्यांची चूक इथे परत सांगतो. रोहिलखंड, अवध आणि बंगाल "साफ" केल्याशिवाय पंजाबात जाणे ही मराठ्यांची सर्वात मोठी घोडचूक. या २ प्रांतातल्या मुसलमान राजांनी (नजीब आणि शुजा) अब्दालीला या जिहाद मध्ये मदत केली. पानिपत झाले आणि पदरात काहीही न पाडून घेता, उलट तीव्र हानी सोसून अब्दाली परत गेला. १० वर्षात मराठे परत आले, तो पर्यंत अवध इंग्रजांनी जिंकला होता बक्सर च्या लढाईत आणि नजीब म्हातारा होऊन मेला होता. पण इथला उलेमा संप्रदाय अजून ही होता जो "हातातून" गेलेल्या सत्तेच्या सोनेरी आठवणीमध्ये रमला होता. या उलेमा लोकांनी पुढे देवबंद वगैरे मदरसे उघडले आणि नंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठ, सैय्यद अहमद खान, मुस्लीम लीग वगैरे सुरु केले. पाकिस्तान च्या कल्पनेला पूर्ण पाठींबा देणारी लोक इथलीच होती, पंजाब आणि बंगाल मधली नाही.

इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला होतं, त्यामुळे इंग्रज गेल्यानंतर उद्भवलेल्या समस्या समजावून घेण्यासाठी मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे मोगलांशी असलेले संबंध समजावून घेणे अत्यावश्यक आहे. शिवाजीच्या काळात मराठे नेहमी दक्षिण-विरुद्ध उत्तर असा संघर्ष करीत. मोगलांविरुद्ध दक्षिणेतल्या राजांनी एक व्हावे ही नीती शहाजी राजांची. ती शिवाजी व संभाजीने पुढे चालवली. औरंगझेब मेल्यानंतर मात्र, हा संघर्ष उत्तर विरुद्ध दक्षिण न राहता भारतीय विरुद्ध परकीय असा झाला.

मराठे हे मोगलांचे सर्वात विश्वासू मित्र झाले. मराठे (भारतीय) विरुद्ध परकीय (इंग्रज) आणि हिंदू (मराठे) विरुद्ध बाटलेले हिंदू (काजी लॉबी आणि पठाण लॉबी) असा दुहेरी संघर्ष भारतात सुरु झाला. एक सूचना - इथे "हिंदू" म्हणजे भारतीय. हिंदू रिलीजन विषयी बोलणे होत नाहीये, हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. असाच संघर्ष हेमचंद्र विक्रमादित्य करत होता. परकीय सत्तेला (मोगलवंशीय हुमायून ला) हिंदू (राजपूत) आणि बाटगे हिंदू (पठाण) यांच्या संयुक्त शक्ती ने हाकलून दिले. नंतर, राजपुतांनी पठाणांना पण हाकलून दिले.

अगदी असाच गेम मराठे-पठाण यांच्यात झालेला दिसतो. परकीय सत्तेला हरवून (मोगलांना) मराठे या बाटलेल्या हिंदूंना पण उत्तर भारतातून हुसकावून लावायचा प्रयत्न करीत होते. इंग्रज नसते आले, तर हे झाले सुद्धा असते. पठाणांचे ७०० वर्षांचे गंगेच्या आणि सिंधूच्या खोऱ्यावरचे वर्चस्व मराठ्यांनी आणि नंतर शिखांनी उचकटून फेकले होते. ही एक स्लो-प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस इंग्रजांनी अचानक पणे ती पूर्ण व्हायच्या आत थांबवली. म्हणून आजच्या समस्या (हिंदू-मुस्लीम प्रॉब्लेम आणि त्याचेच अंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे भारत-पाकिस्तान समस्या) वगैरे भारतात आहेत.

शिवाजी-नानासाहेब-माधवराव-रणजितसिंह या चौघांचे राजकारण समजावून घेतल्या शिवाय पाकिस्तान आणि रिलेटेड समस्या कायमच्या सोडवता येणे शक्य नाही. म्हणून हा इतिहास सांगायचा खटाटोप.

या समस्येला ला मदत करणारे क्रिमिनल घटक

काबुल-पेशावर-कराची-कोंकण-घाट चढून हैदराबाद-विशाखापट्टण-शाम (म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया वगैरे देश) हा खूप जुना अफूचा ट्रेड रूट आहे. खूप जुना म्हणजे कमीतकमी ५००-७०० वर्षे जुना. मुंबई अंडरवर्ल्ड हे या चेन चे एक प्रमुख केंद्र आहे. वरील दिलेल्या लिंक वरून लक्षात येते कि ड्रगट्रेड हा तालिबान चा एक खूप मोठा आर्थिक स्त्रोत होता. अजूनही आहे. त्यामुळे या व्यापारातील लॉबी बघणे आणि त्या सांप्रत काळात अश्या उत्क्रांत का झाल्या याचा एक जुजुबी इतिहास बघणे आवश्यक आहे.

पाकिस्तान च्या निर्मितीत इतर काही घटक आहेत जे खूप महत्वाचे आहे त्यातला एक म्हणजे पाश्चात्य आणि रशिया यांचात मध्यआशियात आणि पूर्वयुरोपात चालणारा १८०० नंतरचा ग्रेट गेम. त्या विषयी पुढे बोलूच.

समुद्रउल्लंघनबंदी वगैरे रूढींमुळे आणि इस्लामी शासन असल्यामुळे या मार्गावर हिंदू व्यापाऱ्यांचे वर्चस्व हळूहळू नाहीसे झाले. आणि एक नेटवर्क बनले आहे व्यापाऱ्यांचे जे पिढ्यानपिढ्या या धंद्यात आहे. फाळणी झाली तरी हे नेटवर्क अबाधित राहिले. परंतु हा व्यापार बेकायदेशीर झाला. शेवटी कायदा म्हणजे काय हो? शेकडो वर्षे चालू असलेले काही तरी कायदा बदलला कि बेकायदेशीर होते. धंदा तर उत्कृष्ट आहे पण सांप्रत काळात बेकायदेशीर. याचा फायदा म्हणजे कर वाचतो (एकदा एक गोष्ट बेकायदेशीर ठरविल्यावर त्यावर कर वसूल करणे सरकार ला अशक्य).

म्हणून हे लपून छपून ट्रांसपोर्ट करणारी एक लॉबी बनली. अशीच लॉबी अरबस्थानात, कराची जवळील पाकिस्तानात आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर आहे. हा व्यापार करणाऱ्यांचे हे नेटवर्क आहे. एकमेकांचे जातबंधू. यांचा धंदा आणि संबंध संप्रदाय, राष्ट्र वगैरे सर्वांपेक्षा वरचे आहेत. जसे आधी सांगितले कि फाळणी आधी हि संपूर्ण चेन बऱ्यापैकी अबाधित होती. पण फाळणी मुळे काही दिवस हि तुटली. हळूहळू ती परत जुळली. करीम लाला ने ६०-७० च्या दशकात सोन्याचे स्मगलिंग सुरु केले. रूट तोच, हळूहळू परफेक्ट बनला. तिथून माल चढवणारे, इथे उतरवून घेणारे, त्यांचे कस्टम वाल्यांशी संबंध तटरक्षक दलाशी संबंध हे सगळे त्यात आले. हे एक प्रचंड विणलेले जाले आहे. आणि समहाऊ यातले सगळे लोक ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे, सर्व मुस्लीम आहेत. असो.

७०-८२ वगैरे हाजी मस्तान आला. याने सोन्या-चांदी-वगैरे सोबत दारूची पण स्मगलिंग सुरु केली. हाजी कारीमचा ड्रायवर. दाउद हाजीचा ड्रायवर. ८० च्या दशकात अफगाणिस्तानात युद्ध सुरु झाले आणि अमेरिकेने पाकिस्तान आणि सौदी ला मदत केली रशिया ला हरवायला. यात अमेरिकाचा रोल (पैसे आणि शस्त्रपुरवठा) सोडून म्हणजे पाकिस्तान करीत असलेल्या अण्वस्त्रांची आणि अफूची स्मगलिंग. मुजाहिदीन लोक अफू विकून पैसा उभारू लागले, आणि भारत आणि दक्षिणपूर्व आशिया मार्केट होतेच. तिथून पुढे अमेरिका (ते वेगळे नेटवर्क आहे). अफू ची हेरॉईन करून विकणे जास्त फायदेशीर. म्हणून ते हि हे लोक शिकले.

भारतातील दाउद वगैरे मंडळी त्या ग्लोबल चेनचा हिस्सा बनली. १९९३ पासून तर दाउद आय-ए-आय चा हस्तक बनला आणि त्यामुळे त्यास तालिबान, अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा वगैरे अंतरराष्ट्रीय जिहादी ग्रुप्सचे अंग बनला. ज्या रूट ने कसाब वगैरे भारतात आले, १९९३ मध्ये तोच रूट होता. माणसे पण त्याच नेटवर्क ची होती. कोंकण किनारपट्टी वरील पश्चिमेला होणारी स्मगलिंग होते हे सर्वांना ठाऊक आहे.

आता प्रत्येकाने २+२ = ? हे गणित सोडवून घ्यावे. हे हळूहळू झाले आहे, आणि ठरवून झाले आहे, असे म्हणत नाही. पण जागतिक परिस्थिती अशी उत्क्रांत होत गेली. या पार्श्वभूमीवर ९० च्या दशकात झालेले एनकाउंटर आठवावे आणि मेलेल्या गुंडांची टोळी व त्या टोळीचे दाउदशी असलेले संबंध तपासावे. थोडे कष्ट घ्यावे लागतील पण अशक्य नाही आणि हे सामरिक अथवा शासकीय गुपित वगैरे पण नाही. अर्थात हे सगळे इतके सोपे पण नव्हते आणि यास बाकी अनेक बाजू पण आहेत. मी फक्त एक दृष्टीकोन देत आहे.

या व्यवस्थेस पर्याय म्हणून उभारणारे हिंदू गुंड होते. पण त्यांना लोकल ठेवण्यात आले. आंतराष्ट्रीय नेटवर्क पर्यंत गेलेला एकमेव हिंदू गुंड म्हणजे छोटा राजन. आणि त्यास रॉ आणि आय.बी ची साथ १९९३ नंतर होती असे बोलले जाते. अश्या गोष्टींचा पुरावा असणे हे गुप्तचर संस्थांचे अपयश आहे हे इथल्या काही लोकांना कळत नाही आहे. इतर हिंदू टोळ्यांना हे अंतरराष्ट्रीय नेटवर्क मुंबई पोलिसांनी हातात घेऊ दिले नाही, फक्त याच टोळ्यांचा (नाईक, पुजारी, गवळी इत्यादी) खातमा का केला गेला? दाउद च्या टोळ्यांना व त्याच्या नेटवर्क ला हात का नाही लावला गेला?

हा प्रश्न आहे. या भारताबाहेरील क्रिमिनल नेटवर्क वर हिंदू गुंडांचे अधिराज्य असणे अत्यावश्यक आहे. इच्छुकांनी इस्ट-इंडिया-कंपनीचा इतिहास वाचवा. तसेच अरबांचा इतिहास देखील या बाबतीत शिकण्यासारखा आहे. इंग्लंड सरकार (आणि युरोपातील समस्त युरोपीय सरकारे) समुद्रातील चाचेगिरीला अधिकृत मान्यता आणि आर्थिक आणि सामरिक सपोर्ट देत असत. हि गोष्ट हिंदी महासागरात १८०० पर्यंत होती. मराठ्यांचे आरमार शक्तीहीन झाल्यावर आणि माचलीपट्टण ते कलकत्ता हि पूर्व किनारपट्टी जिंकल्यावर (साधारण १७७० नंतर) चाचेगिरी इंग्रजांनी बेकायदेशीर केली). हिंदी महासागरातील ट्रेडरूट इंग्रजांनी अश्याच समुद्रीस्मगलिंग आणि लुटालूट करणाऱ्या चाच्यांकरवी हातात घेतले आहे. सलग १५० वर्षे या गुंडांना त्यांच्या सरकारचे समर्थन होते आणि इतर संस्कृतींच्या गुंडांना व त्यांच्या व्यापाऱ्यांच्या नेटवर्क ला त्यांनी यांच्याकरवी नेस्तनाबूत केले. हीच गोष्ट ७व्य शतकात भारतावर आक्रमण करावयाच्या काही दशके अगोदर अरब व्यापाऱ्यांची. या बद्दल नंतर कधीतरी चर्चा करू.

पाकिस्तान ची सांप्रत काळातील समस्या

पाकिस्तान हा मुलुख जरी मोठा असला तरी तो आर्मीच्या तावडीत आहे. आर्मी आणि तेथील मोठे जनरल हा पाकिस्तान सांभाळतात. हे जनरल सहसा पंजाबी असतात आणि त्यातही मुस्लीम समाजातील बरेलवी पंथातले असतात. या पंथास दर्ग्यावरजाऊन पूजा करणे, पीर फकीर, उरूस वगैरे करणे मान्य आहे म्हणून देवबंदी आणि वहाबी संप्रदाय बरेलवीलोकांना काफिर म्हणतात. हे पंजाबी बरेलवी जमीनदार लाहोर ते इस्लामाबाद येथील १७ जिल्ह्यांमधून नियुक्त होतात. इतर भागातील सैनिक आर्मीत मोठ्या पदावर सहसा जाऊ शकत नाहीत. त्यामुळे असे म्हणता येईल कि पाकिस्तान हे पंजाबी आर्मीची वसाहत आहे. या बरेलवी संप्रदाय आणि पंजाबी वृत्ती ची खासियत आहे कि यांना इस्लाम पण हवा आणि राष्ट्रवाद पण हवा. म्हणजे यांना इस्लामी राष्ट्र हवे.

पण यांची समस्या हि आहे कि इस्लाम राष्ट्रवादास मान्यता देत नाही. इस्लाम नुसार जग दोन हिस्स्यात विभागले गेले आहे. दार-उल-इस्लाम आणि दार-उल-हर्ब. दारूल हर्ब म्हणजे काफिरांच्या तावडीत असलेला भूभाग. दारूल इस्लाम म्हणजे मुस्लिमांच्या तावडीत असलेला. दारूल इस्लाम मध्ये सगळे काही अल्लाह चे असल्यामुळे वेगवेगळी राष्ट्रे म्हणवून घेणे गैरइस्लामी आहे. कौम (म्हणजे एक समूह) ला राष्ट्र होण्याचा अधिकार नाही. अधिक माहिती साठी श्री. शेषराव मोरे यांचा इस्लाम वरील अभ्यासपूर्ण ग्रंथ वाचावा.

जे जिहादी पाकिस्तानवर हल्ला करताना दिसतात ते सहसा वहाबी, देवबंदी सेक्ट चे असतात आणि ते अहमदी, सुफी, बरेलवी आणि पाकीसेनेतील लोक यांच्यावर हल्ला करत असतात. पाकिस्तान हे "राष्ट्र" आतंकवादाच्या तावडीत सापडलाय हे खरं पण हे तात्पुरते आहे. काही वर्षांनी हि आर्मी देखील हि कन्सेप्ट सोडून देईल. तेव्हा यांचा संपूर्ण रोख भारताकडे अजुन कटाक्षाने वाढेल. पाकिस्तान प्रॉब्लेम मध्ये नाही. ते गृहयुद्धात आहे. अनेक वेगळे लोक आपसात भांडत आहेत. कालांतराने एक जेता उद्भवणार जो सगळ्यांचा बाप असणार. भारत सध्या (म्हणजे गेल्या ६५ वर्षात) टाईमपास करतोय. त्यास वाटते कि अमेरिका किंवा कोणीतरी इतर हि घाण साफ करेल. पण पाकिस्तान हे भारताचे कर्ज आहे. ते इतर कुणी फेडूच शकत नाही कारण इतरांना हा देश समजत नाही.

हे आतंकवाद वगैरे मूलतः दोन व्यवस्था मधला लढा आहे. पाकिस्तान हे "राष्ट्र" हि मूलतः भारतीय कन्सेप्ट आहे आणि दारूल इस्लाम हि इस्लामी कन्सेप्ट आहे जिला राष्ट्रवाद मान्य नाही. फक्त हिंदू संस्कृती आणि ज्यू अथवा यहुदी संस्कृती या दोन संस्कृत्या एका विशिष्ट भूभागाशी जोडल्या गेल्या आहेत. हिंदू संस्कृती "सप्तसिंधू" (म्हणजे भारतीय उपखंड) शी निगडीत आहे आणि यहुदी/ज्यू संस्कृती "इस्राईल" शी निगडीत आहे. ख्रिस्त्यांना आणि मुस्लिमांना आणि कम्युनिस्टांना राष्ट्रवाद मान्य नाही आणि अमुक भूभागाशी जोडल्या जाणे मान्य नाही.
तालिबान्यांची पाकिस्तानच्या "राष्ट्र" या कन्सेप्ट शी चालणारी लढाई आहे. जर हे "राष्ट्र" तगले तर इस्लामी व्यवस्था हरेल पण हे राष्ट्र भारतास त्रास देत राहील. जर हे "राष्ट्र" बुडले तर पुढील येणारा तेथील जेता आणि नेता भारतातील मुस्लिमांना दारूल इस्लाम चे सरळ आवाहन करेल आणि तेव्हा भारतात आगडोंब उसळेल. मुल्ला लोक मशिदींतून असले आवाहन करीत असतातच. तेव्हा त्याच्याकडे जेतेपणाचा हक्क देखील राहील. हा भारतीय आणि इस्लामी व्यवस्थेतला मूलभूत फरक आहे.

पाकिस्तान ने कारगील मध्ये, १९४७ मध्ये, १९६५ मध्ये आणि १९८९ नंतर वाढलेल्या घुसखोरी मध्ये आपले रिटायर झालेले सैनिक वापरले आहे. कारगील मध्ये तर सरळ त्यांची नॉर्दन लाईट इन्फन्ट्री तैनात होती. फक्त त्यांनी युनिफॉर्म घातला नव्हता. प्रत्येकाच्या खिशातून आय-डी कार्ड मिळाले होते. चीन कडून अणुबॉम्बची तस्करी केली. ते डिझाईन इराण, उत्तर कोरिया, लिबिया सारख्या आततायी देशांना विकले. भारतात असंख्य लोकांना मारले. बांगलादेशात ३० लाख लोकांची कत्तल केली. त्यांच्या देशात बलुचीलोकांचा संहार करीत आहेत. कोण काय बोलते हो?

करणारे जे करायचे ते हव्या त्या मार्गाने करून जातात. या मार्गात हे क्रिमिनल नेटवर्क देखील आले. परिणामाची चिंता भारत करत बसतो म्हणून काहीच करत नाही. आणि हळूहळू बलहीन होतो आहे. सामरिक बळ नाही, सांस्कृतिक आणि राजकीय बळ देखील. हे सारखे होणारे आतंकवादी हमले, त्यावर दिसणारा भारताचा ठार निरुत्तर चेहरा , मोठेमोठे घोटाळे इतके वाढले आहे कि लोकांचा भारतीय व्यवस्थेवरील अनास्था वाढत चालली आहे. जर हि अशीच वाढली तर पुढे काय? फळाची परिणामाची चिंता आणि अपेक्षा करू नको असे कृष्ण म्हणतो, व त्याच ओळीत पुढे म्हणून कर्म करायचे देखील सोडू नको असेही म्हणतो. तो भाग पद्धतशीर सगळे विसरतात.

इंग्लंड-रशिया ग्रेट गेम

मध्यआशिया जो सांभाळील तो युरेशिया सांभाळतो हे एका इंग्रज भूराजकीयतज्ञाची थियरी आहे. खालील लिंक मधून ह्या थियरी बद्दल जुजुबी माहिती घ्यावी. त्या तज्ञाचे नाव Halford John Mackinder असे आहे.
.
http://en.wikipedia.org/wiki/The_Geographical_Pivot_of_History
.
ग्रेट गेम ला धरून हि थियरी रचल्या गेली आहे. १८५७ नंतर इंग्रजी साम्राज्याची परराष्ट्रनीती या थियरी नुसार उत्क्रांत झाली. जरी हि थियरी १९०४ मध्ये शब्दांकित झाली, त्याआधी ६० वर्षे इंग्रजांचे वर्तन आणि धोरण या थियरीला प्रमाणित करणारे होते.
.
http://en.wikipedia.org/wiki/Great_Game
.
या ऐतिहासिक ग्रेट गेम बद्दल माहिती करून घ्या वरील लिंक मधून. रशियाला हिंदीमहासागरापर्यंत पोहोचायचे होते कारण त्यांच्याकडे गरम पाण्याचे बंदर नाही. त्यांची सगळी बंदरे हिवाळ्यात गोठून बंद होतात. अधिक तेलाचे महत्व १९व्या शतकाच्या उत्तरार्धात खूप वाढले. त्यामुळे इराण, मध्य आशिया, पश्चिम आशिया (अरब प्रदेश) वगैरे वरती नियंत्रण ठेवण्याची शर्यत पाश्चात्य आणि रशिया यांच्यात सुरु झाली. या शर्यतीला ग्रेटगेम म्हणतात.

या ग्रेटगेम मध्ये भारत आणि भारतीयांचा स्वातंत्र्यलढा फुकटचा ओढल्या गेला कारण आपला भूगोल.

१५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य आले ते फाळणीच्या जखमा घेऊन. फाळणीची कारणे नोंदताना : १) जीनांचा हट्टाग्रह २) ‘फोडा-झोडा’ ही ब्रिटिश नीती ३) नेहरू-पटेल यांना सत्ता स्वीकारण्याची घाई ४) महात्मा गांधींचा मुस्लीम अनुनय ५) अखंड भारत स्वीकारून प्रत्येक बाबतीत जीनांना ‘व्हेटो’ (नकाराधिकार) देऊन राष्ट्र दुबळे ठेवण्यापेक्षा तुकडा तोडण्याचा नेहरू-पटेल यांचा निर्णय ६) अनेक तुकडे होण्यापेक्षा पाकिस्तान देऊन उरलेला भारत अखंड ठेवणे (सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्युजती पंडित:) असा विचार, अशी अनेक कारणे, त्याचे पुरावे-अनुमान-तर्क मांडले गेले आहेत. ‘अटळ निर्णय’ ते ‘फाळणीचे गुन्हेगार’ असा मोठा पट या कारणमीमांसेत व्यापला आहे.

एक मुद्दा सहजच लक्षात येतो की, वरील सर्व गोष्टी या भारतीय उपखंडातले घटक-घटना केंद्रस्थानी ठेवून मांडल्या आहेत. भारताच्या फाळणीला एक फार महत्त्वाचा मोठा पदर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे (आजही अस्तित्वात) याकडे पुरेसे लक्ष दिलेले नव्हते.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) व दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) या विश्वव्यापी महायुद्धांनी अत्यंत बलशाली ब्रिटिश साम्राज्य कोसळले. जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर १९४७ ला स्वातंत्र्य शक्य नव्हते, हे आपण मनोमन स्वीकारलेले नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी आपणास गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत. मात्र पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नौदल अमेरिकेच्या नौदलापेक्षा लहान झाले व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून पुढे येत ब्रिटनचे जागतिक महत्त्व संपले. सुंभ जळला पण पीळ? हा पीळ केविलवाणी वळवळ पुढे काही काळ करत राहिला. (सुवेझ १९५६, युद्धात भारतानेच प्रथम आक्रमण केले- १९६५ भारत-पाकिस्तान युद्ध- ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य.) या पीळ जपण्याच्या भावनेतून भारत सोडताना त्यातला पश्चिमेचा भाग (गिलगिट ते कराची हा पट्टा) हा त्या पलीकडच्या तेल क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी (इराण, इराक, आखाती देश, सौदी अरेबिया) आपल्याला सैनिकी तळ उभारू देईल, अशा मंडळींच्या ताब्यात हा पट्टा हवा. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणार असलेली काँग्रेस साम्राज्यवादविरोधी असल्याने तळ उभारू देणार नाही म्हणून फाळणी, असा विचार पक्का झाला, कृती झाली.

भारतात एकेकाळच्या अमेरिकेविरोधी तयार केलेल्या मानसिकतेमुळे दोन गोष्टी ठळकपणे मांडल्या जात नाहीत. १) भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी केलेले मोठे प्रयत्न व २) काश्मीरचे भारतातले विलीनीकरण कायदेशीर आहे ही अमेरिकेची सुरुवातीची भूमिका. १९४६ साली पं. नेहरूंच्या (अंतरिम) इंटेरिम मंत्रिमंडळाची सत्तेत स्थापना होणार हे लक्षात येताच ब्रिटनचा विरोध डावलून अमेरिकेने नवी दिल्ली येथे स्वत:चा राजदूत तातडीने नेमला.
खनिज’ तेल या गोष्टीला अतोनात महत्त्व आले, ते साधारण गेल्या १००-११० वर्षांत. मात्र त्या आधी हाच गिलगिट ते कराची हा पट्टा रशिया दक्षिणेकडे हातपाय पसरेल या अनाठायी भीतीपोटी ब्रिटनला सामरिक महत्त्वाचा वाटत असे. याला आवर घालणे या बुद्धिबळाच्या खेळाला नाव पडले ‘द ग्रेट गेम’. ब्रिटन जाऊन अमेरिका आली, रशिया जाऊन चीन आला. ‘ग्रेट गेम’ सुरूच आहे. या पट्टय़ाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात वायव्य सरहद्द प्रांत जर भारताच्या बाजूला ठेवता आला असता तर पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली नसती. कारण पश्चिम तेल क्षेत्राकडे भौगोलिक सलगता मिळत नव्हती. खान अब्दुल गफारखानांना बाजूला सारत हा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला हूल देत ब्रिटिशांनी कसा आपल्याला अनुकूल सोडवला त्याचा इतिहास थक्क करणारा आहे.

महंमद अली जीना व त्यांचा फुलवलेला अहंकार हे खरे तर प्यादे होते. काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) १९४७ पर्यंत मुस्लीम समाज कधीच स्वातंत्र्य चळवळीत नव्हता. जीना काँग्रेसमध्ये असताना वा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मुस्लीम जनतेत अनुयायी किती? अगदी १९४५-४६ पर्यंत पंजाब, सिंध, बंगाल व सरहद्द प्रांत (स्थापनेच्या वेळचा पाकिस्तान) इथले निवडून आलेले सत्ताधारी मुस्लीम पक्ष व नेते जीना व पाकिस्तान यांच्याविरोधीच होते. हे सर्व भाग मुस्लीम बहुसंख्येचे, त्यामुळे त्यांना ‘एक व्यक्ती-एक मत’ याआधारे सत्ता मिळतच होती, हिंदू बहुसंख्येची भीती नव्हती. जीनांना पाठिंबा आजच्या भारतातल्या - विशेषत: बिहार-उत्तर प्रदेश इथल्या मुस्लीम नेते-अनुयायांचा होता. हे सर्व राजकारण ब्रिटिशांनी घडवले.

सिमला योजना ही एक हूल- धूळफेक होती. फाळणी करायची, पण ही मागणी जीनांप्रमाणे काँग्रेस नेतृत्वानेही करावी यासाठी भारताची अनेक शकले होण्याची शक्यता असलेली ही योजना एकमेव नव्हे. क्रिप्स मिशन, सिमला, कॅबिनेट मिशन हे सर्व एकाच माळेचे मणी. मात्र एकदा काँग्रेस नेतृत्वाने फाळणी स्वीकारल्यावर भारताचे आणखी तुकडे फाळणीच्या वेळी होणार नाहीत हे तत्त्व प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी जपले.

थोडक्यात : स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी जीनांना पाठबळ दिले. मात्र दुसरे महायुद्ध ऐन भरात असतानाच युद्धोत्तर स्वतंत्र भारतात आपले तळ ‘तेल क्षेत्रा’साठी हवेत म्हणून फाळणी घडवून आणली. जीनांनी माघार-तडजोड असा मार्ग चोखाळला असता तर दुसऱ्या कुठल्या तरी साधनाने परतणाऱ्या ब्रिटिश सत्तेने फाळणी घडवलीच असती.

मुस्लीमलीग ने पाकिस्तान चे स्वातंत्र्य १९४२ मध्येच विकले होते. ते अगदी सुरुवाती पासून इंग्रजांची (आणि आता अमेरिकेची) वसाहत आहेत. १९९० मध्ये सोवियत युनियन विघटीत झाल्या नंतर या "चौकी"ची गरज संपली. मधल्या काळात पाश्चात्यांनी पाकिस्तानी लोकांचा आणि तेथील पंजाब्यांचा भारतद्वेष आणि हिंदूद्वेष इतका फुलवला होता आणि भारतास इतक्या वेळा थांबवले होते कि पाश्चात्यांच्या पैसा घेऊन वाढलेली तालिबान ची चळवळ हि सरसकट "काफिरविरोधी" झाली. उघडपणे त्यांनी स्वतःला बुतशिकन, कुफ्रशिकन वगैरे म्हणावयास सुरुवात केली.

इस्लाम नुसार इस्लाम चे विरोधक तीन. मुनाफिक, मुशरिक आणि काफिर. मुशरिक म्हणजे मुस्लीम असून सुद्धा कुराणाचे पालन न करणारे. मुनाफिक म्हणजे इस्लाम सोडणारे. काफिर म्हणजे जे मुस्लीम कधीच नव्हते. या तिघांविरुद्ध तालिबान आणि त्यारूपात असलेल्या इस्लामचे युद्ध सुरु आहे. त्याची परिणीती म्हणजे पाकिस्तानातील गृहयुद्ध. तालिबान नुसार पाकी सेना मुशरिक आणि मुनाफिक आहे जी काफरांना (हिंदू-ज्यू-ख्रिस्ती म्हणजे भारत-इस्राईल-अमेरिका) यांना मदत कर्ते. म्हणून हे सगळे "वाजीब-उल-कतल" म्हणजे मृत्युदंडास पात्र आहेत.

दुष्टचक्र

या ग्रेट गेम आणि बाकीच्या राजकारणात १७५५ पासून पानिपतावर सुरु झालेले हे दुष्टचक्र अजून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे बनले आहे.

कालौघात भारताची इच्छा नसताना देखील या संघर्षाला दोन सभ्यतांचे युद्ध असे स्वरूप मिळाले आहे. आणि या संघर्षास असे स्वरूप देण्यास भारतातील काजी-मुल्ला वर्ग जवाबदार आहे. मराठ्यांच्या फौजेत देखील मुस्लीम होते. पण त्यांनी त्यांचा स्टान्स कधी साम्प्रदायींक होऊ दिला नाही. इब्राहिमखान गारदी मरेपर्यंत मुस्लीम राहिला. मराठे इस्लाम ला संपवू इच्छित नव्हते, ते इस्लामची भारतावरील राजकीय आणि सामाजिक वर्चस्व संपवू इच्छित होते.

आणि काझी-मुल्लाह वर्गास हेच सामाजिक आणि राजकीय वर्चस्व हवे होते म्हणून यास जिहादचे स्वरूप तेव्हा देण्यात आले आणि आताही देण्यात येते आहे.

कालौघात मुस्लीम समाज सांप्रदायिकता सोडून हिंदू समाजात विरघळून जायच्या निकट आला होता. तेव्हा तेव्हा मुल्लाह वर्गाने काही न काही बहाणा बनवून हे एकीकरण थांबवले. दाराशिकोह उपनिषदांचे फारसी भाषांतर करीत होता, अकबर दिन-ए-उलाही वगैरे स्थापन करून इस्लाम चे हिंदुकरण व भारतीयीकारण करीत होता. तेव्हा मुल्लाह सरहिंदी (औरंगजेबाचा गुरु म्हणता येईल यास, जरी यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही) ने या एकीकरणात खोड घातली. नंतर मराठ्यांनी उत्तर भारत जिंकला आणि मुस्लिमांचे राजकीय वर्चस्व नाहीसे केले. उत्तर भारतात चालणारे हिंदूंवरील अत्याचार थांबले. मुस्लीम राजांची सर्वंकष सत्ता गेली पण म्हणून मुस्लिमांचा छळ झाला नाही. पण या वेळेस अब्दालीस बाहेरून बोलावून पानिपत घडवायला भाग पडणारा मुल्ला म्हणजे मुल्ला शाहवली. नजीब गद्दारीचे राजकारण खेळत होता आणि यास शाहवली ने जिहादचे रूप दिले.

नंतर इंग्रज आल्यानंतर याच शाहवलीच्या नातवाने दारूल उलूम देवबंद या मदरसा स्थापित केला. इथल्याच लोकांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठ, जामिया मिलिया, ओस्मानिया विद्यापीठ वगैरे स्थापित केले. द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम १८७५ मध्ये मांडणारे सय्यद अहमद खान याच मदरसाचे विद्यार्थी. मुस्लीम लीग चे सर्व समर्थक याच केंद्रांमधून आले. यांनीच खिलाफत चळवळ केली. १९४० नंतर पाकिस्तान च्या मागणीस सर्वाधिक समर्थन इथूनच आले.

नंतर पाकिस्तानला इस्लामी जगताचे तारणहार म्हणावयास भाग पडणारा मुल्लाह तर एक मराठी माणूस होता. औरंगाबादेत १९०३ मध्ये जन्मलेला मुल्ला अबुल आला मउदुदी. यानेच जमात-ए-इस्लामी स्थापन केली. पुढे हा पाकिस्तानात गेला आणि पोलिटिकल इस्लाम आणि शरीया वार आधारित घटना लिहिण्यात याने सिंहाचा वाट उचलला. भारताचे सुदैव कि हा रोल आपल्याकडे डॉ.आंबेडकर सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीने पार पाडला. त्यांच्याकडे हे काम मौदुदी ने केले.योगायोगाने या दोन देशांच्या घटनेत मोठा वाट असणाऱ्या व्यक्ती मराठी होते. पण एकाने भारताचे सोने केले आणि दुसऱ्याने सगळ्या जगाला ताप देणारा देश घटीत केला.

हि ऐतिहासिक साखळी आहे. हि साखळी प्रत्येक भारतीयाचा आयुष्याच्या प्रत्येक भागास जवळून स्पर्श करते. यात क्रिमिनल नेटवर्क आले, भूराजकीय समीकरणे आलीत, तेलाचे राजकारण आले, वोट बँकेचे राजकारण आले, भारताची अंतर्गत हलाखी, सांस्कृतिक आणि राजकीय दिवाळखोरी आली, त्यातून उद्भवणारा भ्रष्टाचार आला. हे सगळे आतून जोडल्या गेले आहे. आणि या समस्येचे पूर्ण दज्ञान व्हायला या मोठ्या चित्राची जाणीव होते आवश्यक आहे.

शुभम अस्तु

- अंबरिष फडणविस

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबरीश,

उत्तम माहिती. गांधाराशी झालेला करार फारसा चर्चेत आला नव्हता. आपली वृत्तपत्रे केवळ मालकांची शय्यासोबत करण्यात दंग आहेत. देव करो आणि गांधारसेनेत पख्तुनी राष्ट्रवाद जागृत होवो.

आ.न.,
-गा.पै.

गौतमीपुत्रशालिवाहन - लेख उत्तम आहे.

अम्बरीष - उत्तम विश्लेषण केलं आहे.

इथल्या असभ्य व संदर्भहीन प्रतिसादांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अजून सविस्तर लिहा.

गेल्याच महिन्यात भारताचा गांधारदेशाशी सामरिक करार झाला तो खूप महत्वाचा आहे. तसल्या करार भारताने आजतागायत कुठल्याही राष्ट्राशी केला नव्हता सोवियत युनियन सोडून (१९७१ पाकिस्तान युद्धाच्या वेळेस).
----- त्यांचे १ लाख सैन्य उभे करण्यास भारत मदत करेल पण... या कराराची शाई वाळायच्या आतच अफगाण राष्ट्राध्यक्षांचे पाक भेटी मधे केलेले वक्तव्य काय आहे?
जर भविष्यात पाकचे अमेरिकेशी (वा भारताशी) युद्ध झालेच तर अफगाण पाकच्या खांद्याला खांदा लावुन लढेल... हे वक्तव्य ३ आठवड्याच्या आत केले आहे. आता यात डिप्लोमॅसी असेलही पण भारताला यातुन काय संदेश मिळतो?

या १००,००० तयार होणार्‍या सैन्यांत तालिबान, तालिबान समर्थक यांचा शिरकाव नसेलच याची काय ग्वाही? १ % म्हटले तरी १००० होतात. यांचे प्रोफायलिंग कोण बघणार...

मला एक मानवतावादी दृष्टीकोन सोडला तर कुठल्याच अर्थाने अफगाण, पाक मधे interest नाही आहे. भारत जो आज आहे, तसा राहुन प्रगती केली तरी महान आहे...

उदय,

तुमचा मुद्दे १०० % पटले. १९७१ साली बांगलादेशच्या वेळी भारत आणि पाकमध्ये युद्ध झालं होतं. म्हणून मुक्तीवाहिनीचे सदस्य आणि भारतीय सैन्य यांची सामरिक दिशा ढाक्याकडे होती. ज्याअर्थी गांधारात सैन्य उभारायचा प्रस्ताव आहे, त्याअर्थी भारतपाक युद्ध अपेक्षित आहेसे दिसते. बहुधा नजीकच्या भविष्यकाळात बार उडणार?

कचखाऊ भारतीय राज्यकर्त्यांच्या सहाय्याने युद्ध लढले जाऊ शकेल?

आ.न.,
-गा.पै.

हज यात्रेला दरवर्षी साधारण १ लाख लोक जातात. पर माणशी सरकार ७० हजार खर्च करते आणि यात्रेकरूला १६ हजार भरावे लागतात. भारत सरकार दरवर्षी कैलास-मानस सरोवर यात्रा पण आयोजित करते. त्यात साधारण १ हजार लोक जातात. पर माणशी २७ हजार + $७०० (For china) इतका खर्च येतो.
तर मग देशात अंतर्गत धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी ४ वर्षातून एकदा रेल्वे प्रवासात सूट देणे सरकारसाठी कमी खर्चाचे आहे आणि जास्त लोकांना फायदेशीर आहे.

अमेरिका व भारताला अफगाणिस्तानात स्थेर्य हवे. पण पाकिस्तानला तालिबानी अतिरेक्याचा भारताशी proxy war खेळण्यासाठी उपयोग करून घायचा आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या उभारणीमध्ये भारताचा सहभाग डाचतो आणि अमेरिका चीनच्या वाढत्या वर्चस्वामुळे भारताला प्राधान्य देऊ लागली आहे. त्यामुळे सध्या अमेरिका आणि पाकिस्तान संबंध बिघडत चालले आहेत. त्यामुळे सध्या पाकिस्तान अमेरिका सोडून चीनकडे अपेक्षेने पाहत आहे. अफगानिस्तान-पाकिस्तान हे एक geo-strategic location असल्याने अमेरिकेलाही या भागातून आपले सैन्य हलवायची इच्छा नाही. पाकिस्तानी लोक एखादा अणुबॉम्ब कसब सारख्या non-state actor कडे देऊन जगात कुठेही विध्वंस करू शकतात, वर नामानिराळे राहू शकतात. हाच धोका अमेरिकेच्या लक्षात आला आहे. त्यामुळे सध्या ते पाकिस्तानात शिरायला योग्य संधीची वाट पाहत आहेत. पाकिस्तानला आता सार्वभौम राष्ट्र समजण्याची गरज नाही. ते जर स्वतःच्या देशातच जात नीट राज्य करू शकत नसतील तर काय म्हणून त्यांना सार्वभौम राष्ट्र म्हणायचे?

आजपर्यंत म्हणजे १९७१ नंतर १९८३-८४ साली, कारगिल नंतर, संसदेवर हल्ल्यानंतर, २६/११ नंतर अमेरिकेनी भारताला युद्धपासून रोखले, पण आता इराक आणि अफगाणिस्तान शांत झाल्यावर अमेरिकेलाच युद्धाची इच्छा आहे. बलुची लोकांना स्वताचे राष्ट्र पाहिजे. सध्या बलुचिस्तान हा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेवरील virtual देश आहे. केंद्र सत्ता शक्तिहीन बनल्यावर प्रांतवाद बळावतो. याप्रमाणे आता बलुची लोक स्वन्तंत्राची मागणी करणे सुरु करतील. म्हणजे BBC वर, CNN वर अशा बातम्या देणे सुरु होईल.:स्मित:

मग योग्य वेळ आली कि NATO त्यांच्या नवीन वैमानिकांना पाकिस्तानात आठवडाभर match practice ची संधी देईल. भारत फक्त स्वताच्या सुरक्षेकरता राजस्थानच्या वाळवंटात युद्ध सराव चालू ठेवेल. Happy

बलुचिस्तान होणे हे इराणसाठी डोकेदुखी ठरणार आहे पण अमेरिकेला तेलाच्या पाईपलाईनसाठी उपयोगी पडणार आहे.

मूळ लेख अंबरीश फडणवीस यांनी लिहिला आहे. मलाही या विषयात रस असल्याने मी त्यांच्या परवानगीने मायबोलीवर टाकला. माझी मते मी इथल्या अनेक प्रतिसादात मांडली आहेत.

गौतमिपुत्रशालिवाहन - संपुर्ण लेख वाचल्यावर सर्वात शेवटी तुम्ही योग्य तो खुलासा केलेला आहे. हा खुलासा सुरवातीलाच केला तर गैरसमज नाही होणार (असे वाटते). सर्वच वाचक शेवटपर्यंत लेख वाचन करतात असे नाही.

विषय ज्वलंत Happy असल्याने प्रतिसाद द्यायची घाई असते हे दुसरे कारण.

अमेरिकेच्याच पैश्यानी लादेनचा सांभाळ करणारे विश्वासघातकी वाकड शेपूट आता youtube वर अमेरिकेलाच धमाकावाताय.
अमेरीकेनी हाड टाकायचे बंद केल्यावर चीनच्या दिशेने लाळ गाळायला सुरुवात पण झाली. " चोराच्या उलट्या बोंबा " याचे उत्कृष्ट उदाहरण -> http://www.youtube.com/watch?v=iTDQryQL3Zc

झरदारीची गच्छंती आता अटळ दिसतीये. त्याच्या जागी कयानी येईल की अजून कोणी (नवाझ शरीफ ?) हे सांगता येत नाही. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये २०११ मध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत.

इंग्लंड सरकार (आणि युरोपातील समस्त युरोपीय सरकारे) समुद्रातील चाचेगिरीला अधिकृत मान्यता आणि आर्थिक आणि सामरिक सपोर्ट देत असत.

इन्शुरन्सचा इतिहास सांगतो की समुद्री चाचेगिरीतील लुटल्या जानार्‍या जहाजाना इन्शुरन्स देण्याची पद्धत इंग्लंडमध्ये सुरु झाली. तुम्ही म्हणताय की ही चाचेगिरीच सरकारमार्फत होत होती. काही कळेना

इन्शुरन्सचा इतिहास सांगतो की समुद्री चाचेगिरीतील लुटल्या जानार्‍या जहाजाना इन्शुरन्स देण्याची पद्धत इंग्लंडमध्ये सुरु झाली. तुम्ही म्हणताय की ही चाचेगिरीच सरकारमार्फत होत होती. काही कळेना

हे वेगवेगळ्या काळात होते, हे म्हणतोय.. आधी मान्यता देणारी सरकारी १७००-१७५० नंतर याला बेकायदेशीर ठरवू लागली. तुम्ही नंतरच्या कालावधी बाबत बोलत आहात. १७०० च्या आधी असें नव्हते. आणि याच सुमारास युरीओय लोकांनी समुद्री रूट हळूहळू ताब्यात घेतले.

झरदारीची गच्छंती आता अटळ दिसतीये. त्याच्या जागी कयानी येईल की अजून कोणी (नवाझ शरीफ ?) हे सांगता येत नाही. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये २०११ मध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत.

तालिबान आणि आर्मी दोघांचा आवडीचा उमेदवार म्हणजे इम्रान खान.. अंततोगत्वा तोच येईल. मध्ये कदाचित काही काळ कोम्प्रोमाईझ उमेदवार काहीकाळ येऊ शकतो. पण जर इम्रानचे संबंध सेनेशी आजसारखे राहिले तर वर्ष-दीड वर्षात तो सत्तेवर येणार. म्हणजे सेना.. सेना डायरेक्ट बंड करायचे धाडस या वेळेस दाखवणार नाही.

.

Pages