धर्म, समाज, जातपात

Submitted by विनायक.रानडे on 6 December, 2011 - 01:30

नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न मी माझ्या क्षमतेला समजून करतो आहे.

भारतीय परंपरेत चार वेद, त्याचे आठ अंग म्हणजे शाखा, उपनिषद ह्या सगळ्या प्रकारातून धर्म, समाज, जात, कूळ व व्यक्ती ही मांडणी का व कशी घडली ते मी समजण्याचा प्रयत्न केला. वेद काळात सृष्टीतील प्रत्येक ऊर्जेचा स्वतंत्र अभ्यास केला गेला. त्या प्रत्येक ऊर्जेला देव किंवा देवी म्हणून संबोधले गेले. ह्या प्रत्येक देवाची / देवीची उपासना म्हणजेच ऊर्जेचे सखोल ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला ऋषी म्हणून मान्यता मिळाली होती. ह्या सगळ्या ऋषी मुनिजनांनी सृष्टीच्या स्पंदन शक्तीला मान्य केले. स्पंदन शक्तीचा एक भाग मानव हे मान्य झाले. स्पंदन शक्तीला समजण्याची क्षमता व गुणधर्म फक्त मानव समूहातच आहे हे सर्वमान्य झाले. ह्या क्षमता व गुणधर्मांचा उपयोग ह्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे हे सर्वमान्य ठरले. ह्या कर्तव्याचे पालन करण्याचे नियम ठरवले गेले. ह्या संकल्पनेला मानवाचा सनातन म्हणजे सतत कार्यरत असणारा, अंत नसलेला धर्म म्हणून ऋषी मुनिजनांनी मान्यता दिली. धर्माचे पालन कारणार्‍या समूहाला एक समाज म्हणून मान्यता दिली. इथे धर्म म्हणजे मानवी गुण धर्म, कर्तव्य अशाच अर्थाने होता व आहे पण पाश्चात्य पद्धतीने विचार करण्याची सवय व त्यातच मोक्ष आहे अशी समजूत झालेल्या विचार वंतांनी धर्म ह्या संकल्पनेला रिलीजन, पंथ, मजहब, दीन, ईमान ह्याला जोडण्याचा अतिरेक केला.

ज्या ऋषींनी समाजाच्या सखोल अभ्यासातून नियम व कर्तव्ये सुनिश्चित केली त्या प्रत्येक गुरुचे नाव देऊन त्या नियम-कर्तव्यांना गोत्र असे नाव दिले गेले. (पंचांगात ही सगळी माहिती वाचायला मिळते. पण ते समजून घेण्याऐवजी नटनट्यांची, आधुनिक साधनांची, मित्र - मैत्रीण जोडीची, कोणती फॅशन वगैरे माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे झाले आहे.) गोत्र ह्या संकल्पनेचा अर्थ मला असा समजला. आधुनिक समाज रचनेत विद्यापीठ हे अपवाद वगळता गोत्र असण्याची शक्यता आहे.

ऋषी मुनिजनांच्या समूहाने मानव शरीराला जिवंत ठेवण्या करता शरीरातील प्रत्येक अवयवांच्या कार्याचा अभ्यास केला होता म्हणूनच त्या अभ्यासातून समाज एका मानव शरीरा सारखा असून चार वर्णात आहे असे सर्वमान्य झाले. वेदकाळा पासून सृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळी गाठणारे गुरु, ऋषी मुनीजन मान्यता मिळवलेले होते त्यांच्या शिष्यगणांना ठरावीक पातळी गाठल्यावर ब्राम्हण ही पदवी दिलेली आहे. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूची जबाबदारी अंतर्बाह्य घटनांचे सुनियोजित आकलन करून, प्रक्रिया झाल्यावर इतर अवयवांना पुरवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य पद्वीधारक ब्राम्हण वर्णाला दिले गेले. प्रत्यक्षात ब्राम्हण ही जात नसून विचार पद्धती आहे, वैचारिक कामाची पातळी आहे. (मुसलमान धर्मात सय्यद ह्या नावाने ह्याची गणना होते. पाश्चात्य पध्दतीत वैज्ञानिक, प्राध्यापक ह्या अर्थाने गणना होते.) आधुनिक काळात ह्या वर्णात भेसळ पदवी धारक, सतत बदलणारे नियम व बाह्य शक्तींचे नियंत्रण असल्याने कर्तव्य पालनात गोंधळ झाला आहे. संगणक भाषेत ह्याला रोगट (करपटेड) बॉयॉस म्हणता येईल.

समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य धोक्यापासून संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्‍या भागाला क्षत्रिय वर्ण गणले गेले ही जबाबदारी हात - पाय, डोळे, नाक, कान ह्यां अवयवयांची होती. समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य शरीराच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी छातीपासून कंबरेपर्यंत असणारे अवयव फुपुसे, हृदय, पोट वैश्य वर्ण गणले गेले. ह्या तिन भागांनी तयार केलेली व त्यांना आवश्यक असणारी माहिती वाहक अवयवांचा वर्ण शूद्र (क्षुद्र नव्हे) गणला गेला हे मी समजू शकलो. ह्या चारही वर्णांचे महत्त्व मानव शरीरातील प्रत्येक अवयवाचे असते तितकेच संतुलित होते. मात्र समाजरुपी शरीरातील अनावश्यक द्रव्ये, वस्तूंचा कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची होती कोणत्याही वर्णाची नव्हती हे मी निश्चित समजू शकलो. मात्र आज प्रत्येक वर्णातील अंतर्बाह्य संबंध बिघडवण्याचे नियोजित प्रयत्न होत आहेत.

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या बुध्दी व कार्यक्षमते नुसार प्रत्येक व्यक्तीचे वर्गीकरण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा चार वर्णात झाले. प्रत्येक व्यक्तीचे कार्य, दैनंदिनी, आहार ह्याचे नियम ठरलेले आहेत. ब्राम्हणाने ह्या सृष्टीचा, ब्रह्मांडाच्या प्रत्येक ऊर्जेचा अभ्यास करावा हे त्याचे कर्तव्य ठरले. अभ्यास करण्याची क्षमता सतत टिकावी म्हणून पूजा, पाठांतर, आहार ह्याचे नियम पाळण्याची सवय आवश्यक झाली. अनुभवी गुरु समूहाने अशा ब्राम्हणाला मान्यता देऊन प्राकृत भाषेत सामान्य व्यक्तीला त्याने मिळवलेल्या ज्ञानाचा सत्कारणी उपयोग व मदत करण्याचे काम दिले. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूचे काम ब्राम्हण वर्गाने करावे मालक बनू नये. तर इतर तीन वर्णांनी त्या कामात मदत करावी, गुलामी नव्हे. क्षत्रिय समूहाची मानसिकता, आहार, संरक्षण क्षमता व त्यांचे नियम ठरवले गेले. क्षत्रियांच्या संरक्षणाच्या कामात इतर तीन वर्णांनी मदत करावी अडथळे निर्माण करू नयेत. शरीराला आवश्यक असणार्‍या गरजेच्या वस्तूंचे भांडार, व्यवहार वैश्य समूहाने करावे, परंतु समाजाला वेठीस (रॅनसम) धरू नये. तसेच ह्या तीन वर्णांना शारीरिक मदत व माहिती पुरवण्याचे काम शूद्र समूहाने करावे, जेणे करून हा शरीर समाज सुदृढ व निरोगी असावा हाच मूळ उद्देश होता. मानव शरीराचे प्रत्येक अवयव एकमेकाशी जुळलेले असतात, कोणत्याही एका अवयवाला वेगळे महत्त्व नसते तसेच ह्या समाजरूपी शरीरातील चारही वर्णांच्या समूहांचे एक संध असणे आवश्यक असणे सर्वमान्य झाले होते. आज राज्य करते, नेता, पुढारी, जमीनदार, मालक, कार्यवाह, अभियंता, कोशाध्यक्ष, मुकादम, कामगार वगैरे आधुनिक गोत्र प्रकार आहेत असेच माझे ठाम मत झाले आहे.

कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला असावा. ह्या पूजेला हजर असणार्‍या प्रत्येकाला पूजेला बसणार्‍या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्‍या पुजार्‍याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता) हे कर्तव्य होते की त्याने पूजेला बसणार्‍या व्यक्तीच्या परंपरेची, गोत्र, कुळ, जात, जन्मस्थान अशा तपशीलवार माहितीची उजळणी करूनच पूजेला सुरुवात करणे आवश्यक ठरले होते. आज ह्या सगळ्या तर्कशुद्ध संस्कारांचे समाजातले महत्त्व संपवण्याचा प्रयत्न काही समाज सुधारक व राज्यकर्ते करीत आहेत. ह्या प्रयत्नांना मान्य करणार्‍या संधीसाधूंना प्रमाण पत्र, नोकरी, मोठ्या हुद्याचे गाजर खायला देण्याच्या पध्दतीला महत्त्व मिळालेले आहे.

जातपात म्हणजे एखाद्या जातीची पातळी असा साधा अर्थ मला समजलेला आहे. मुळातच व्यक्तीची जातपात ही दैनंदिन व्यवसायाने ठरते, त्या व्यवसायाशी संबंधित आचरण (वागण्याची पद्धती) म्हणून आहार त्यामुळे तयार होणारे विचार, ह्या सगळ्याच्या मिश्रणाची ती एक जात असते असे आजवरच्या अनुभवांनी मला पटले आहे. कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते. प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा एक समूह असा असतो की जो त्याच जातीच्या ब्राम्हण वृत्तीच्या विरोधात असतो. ह्या समूहाला फक्त आरक्षणाचे फायदे हवे असतात. आरक्षण देऊन गोंधळ माजवण्याचा हक्क व त्याकरता संरक्षण देण्याचे आश्वासन ह्या समूहाला मिळते.

लहान पणी मला समजलेले जातपात हे प्रकार पुढील काही प्रसंगातून मी अनुभवले आहेत. आमच्या गावात राहणारी दोन वयाने लहान, सिंधी मुले (सिंध प्रांत वासी ह्या अर्थाने), भवनानी आणि लालवानी आपसात भांडत होते, कपडे फाडून शिवीगाळ चालू होती. भवनानीने एका नटीचा फोटो लालवानीला ५० पैशाला विकला होता. लालवानीने तो फोटो त्याच्या दुसर्‍या एका मित्राला दोन रुपयाला विकण्याचा प्रयत्न केल्यावर भवनानीने तोच विकलेला फोटो एक रुपयाला परत मागितला होता त्यातून हे भांडण झाले होते. इतक्या लहानपणी एका वस्तूची गरज लक्षात घेऊन ती पुरवण्याचा व्यवसाय करणारी धंदेवाईक जात मला समजली होती. पण ह्याच सिंधी समाजात साधू वासवानी सारखे सत्पुरुष मानवजातीच्या मदतीला ठामपणे उभे असतात.

असाच एक दुसरा प्रसंग मी लहान असताना अनुभवला होता. बालपणी मी ज्या इमारतीत भाड्याने राहत होतो त्या इमारतीच्या मारवाडी (मारवाड प्रांत वासी, आजचे राजस्थान) मालकाचा मुलगा माझ्या बरोबर खेळायला येत असे. मी त्याला विचारले होते की तो त्याचा गृहपाठ केव्हा करतो? त्याने व्यावसायिक जातीला शोभेल असेच उत्तर मला दिले होते. तो शिकवणीला जात होता तिथल्या एका गरीब (?) मुलाला गोळ्या बिस्किटे देऊन त्याच्या कडून गृहपाठ तयार करून घेत होता. हा असला विचार माझ्या ब्राह्मणी संस्कारित डोक्यात कधीच येणार नाही. मी मात्र मार खात, रडत ओरडत माझा गृहपाठ करायला शिकलो होतो. ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात. मंदिर ह्या संकल्पने विषयी एक वेघळा लेख येणार आहे.

बालपणीच्या त्याच इमारतीच्या समोर आठवड्याचा बाजार दर रविवारी जमत होता. तिथे मास - मासे विकणारे होते. डुकराचे मास गर्दी करून विकत घेणारे होते. ती डुकरे संडासातील घाण, कचर्‍यातील घाण खाताना मी बघितली होती. त्याच डुकरांना कापताना मी बघितले होते. तेच मास आवडीने खाणारी एक जात मी तिथे बघितली होती. तसेच "चाक फिरवतो गरागरा मडकी करतो भराभरा तो कोण ? कुंभार, कपडे शिवतो तो शिंपी, चपला तयार करतो तो चांभार, लाकडाच्या वस्तू बनवणारा सुतार, लाल झालेल्या लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार," शालेय पुस्तकातील बालगीतातून मला व्यावसायिक जाती ह्या अशा समजल्या होत्या, त्यांची कामे किती आवश्यक होती हे मला समजले होते. पुजा पाठ सांगणार्‍याला भट, पुजारी म्हणतात हे समजले होते. राशींचा अभ्यास करणारे ज्योतीशी होते. पण ह्या भट, पुजारी, ज्योतीशी व्यक्तींना ब्राम्हण पदवी मिळवणे आवश्यक होते ती एक जात नव्हती.

हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे.

गुलमोहर: 

काल माझ्या राशीभविष्यात 'विनाकारण वादविवाद होतील' असे वर्तवले होते. ते खरे करण्याच्या जबाबदारीतून एक लेख वाचायची आंतरिक उर्मी आली. पण सध्याच्या माझ्या पद्धतीनुसार आधी प्रतिसाद, मग मूळ लेखन असे वाचताना मूळ लेख वाचायचा राहून गेला. वर्तनामनपत्रात तेच विनाकारण वादविवादाचे राशिभविष्य पुन्हा कधीतरी माझ्या राशीला असेलच, तेव्हा या किंवा पुढे येणार्‍या लेखाच्या राशीला येईन.

पण वरील लेखकाने जातीविरहीत "निखळ ब्राह्मणत्व" म्हणजे काय हेच सान्गू पाहिलय

ही लेखमाला म्हणजे इतर जातीतल्या एकेका वाइट मान्साचा आलेला अनुभव .. निखळ ब्राह्मणत्वाचा आणि असल्या उदाहरनाम्चा काय संबंध?

शिवाय, आजच्या काळात चाम्गले नागरिक कसे व्हावे याबाबत देशाच्या घटनेने दिलेल्या गाइडलाइन्स आहेतच की... त्या जाती धर्म लिंग असे भेदभावरहीत आहेत.. तिथे ह्या असल्या ब्राह्मण्याच्या आउट डेटेड व्याख्या हव्या तरी कशाला ?

भारतात जगता आले नाही म्हणून हे कायमचे परदेशाला चालले.. आणि आता हे हा सग्ळा शोध कसा घेनार?
वाक्याच्या उत्तरार्धातले 'हे' कोण हो? कायमचे परदेशी गेलेलेच ना?
ते कशाला काही करतील तुमच्यासाठी?!
कशाला उगीचच परदेशी गेलेल्या लोकांना तुमच्या चर्चेमधे आणता?
तुमची 'चर्चा' म्हणजे मूर्खासारखे उगाच कुठलेतरी शब्द संदर्भ लक्षात न घेता वाचायचे त्याचा विपरित अर्थ लावायचा नि त्यावर वाद घालायचा! याला चर्चा म्हणतात??
जो काही जुना हिंदू धर्म, तत्वज्ञान होते ते सगळे फक्त पुस्तकात उरले आहे. प्रत्यक्ष जगातले लोक त्याचा नुसता विपर्यास करून स्वार्थ बघतात! भारतात कसला हिंदू धर्माचा नि तत्वज्ञानाचा अभ्यास करणार? नि केला तरी भारतीयांना कशाला सांगायचा! त्यांचा नि हिंदू धर्म नि तत्वज्ञान यांचा काय संबंध? सतत दुसरे काय करतात किंवा नाही इकडे लक्ष, स्वतः नुसता इतरांना शिव्या देणे यापलीकडे काही नाही!

वरदा, तुमची संशोधनाची पद्धत साफ चुकीची आहे.
आधी तुम्हाला कोणता निष्कर्श काढायचा आहे ते ठरवा. मग त्याच्या समर्थनार्थ पुरावे शोधा. नाही मिळाले तर अनुमानास पोषक असे अनुभव घ्या!!!!

यांचे दोन धागे झाले, कुठे काय चालु होते, तेच समजेना. Proud अजुन २-४ पुढचे भाग आले की काय होणार देव जाणे

यांचे दोन धागे झाले, कुठे काय चालु होते, तेच समजेना. अजुन २-४ पुढचे भाग आले की काय होणार देव जाणे
---- जामोप्या तुम्ही विनायक नावाचा खुप धसका घेतलेला दिसतो आहे. Happy

भरत Proud

हे असले लेख वाचले की फुक्कट इतकी वर्षं अभ्यास केला/ किंवा त्या समाजशास्त्रातल्या, भाषाशास्त्रातल्या, संस्कृतातल्या विद्वानांनी आयुष्य वेचून भारतीय समाज, जातिव्यवस्था, इतिहास, धर्म अशा विषयांवर संशोधन केलं असं कधीतरी वाटून जातं. संशोधन सगळेच नाही करू शकत मान्य आहे, पण निदान ज्या विषयावर 'विचारप्रवर्तक' काहीतरी लिहायचंय त्यावर थोडं तरी जगन्मान्य वैचारिक वाचन करावं, नाही का?

>>>.

वरदा संशोधन केलं केलं असे म्हणून काय फायदा? ते संशोधन तुम्ही जगासमोर त्यांना वाचाव्या वाटलेल्या भाषेत आणले नसेल तर आपला अभ्यास केवळ परत एका आणखी नवीन पुरातत्व वाल्याला कामी येणार किंवा जसे इथे मायबोलीवर पुरतत्व विषयाचा अभ्यास करणारे आहेत तशा दोन पाच जनांना. बाकींना त्याचा काय फायदा? म्हणून तुम्ही फुक्कट अभ्यास करण्याऐवजी ते संशोधन सुलभ भाषेत जन माणसात पोचवा.

जे खरे विचारवंत असतात ते कधीच असं प्रदर्शन करायला जात नाहीत.>> परत तेच. विचारवंताची (असलाच) तर जबाबदारी असते की त्याने समाजात चांगले विचार रुजवावा, समाजाचा दिशादर्शक म्हणून काम करावे. जर तो करत नसेल तर काय उपयोग?

वरील दोन्ही विधाने घेऊन मी लिहिले कारण तुम्ही संशोधन क्षेत्रातल्या आहात तर त्याचा उपयोग व्हावा हे तुम्हाला सांगायची गरज वाटली. कृपया खरच विचार करा. सोप्या भाषेत लोकांना समजेल असे संशोधन (खास करून भारतीय इतिहास, मग तो कसाही का असेना) तुम्ही व सहकार्‍यांनी मांडला पाहिजे.

शिवाय हिंदू देवतांना त्यांच्या देवताप्रभावळीत हीन स्थान दिले आहे. या बाबतीत सगळे धर्म/उपासना पंथ सारखेच आहेत. तेव्हा अशी कसलाही आधार नसलेली विधानं करून इथे काड्या कशाला टाकता? >>>

जामोप्याला कशाला सांगता? ते कशाचाही फक्त विरोधच करतात, त्यांना त्यात मजा वाटते. खरेतर त्यांनाही काही माहिती नाहीच पण लेखनस्वातंत्र्य असल्यामुळे त्यांचे लिखाण इथले लोक सहन करतात.

आता मूळ लेख -
हा लेख, मनन व त्यावरील चिंतन विनायकरावांनी केलेले आहे. त्यांना हे सर्व करण्यासाठी वेद वाचायची गरज नाही, कारण त्यांचा जीवनात त्यांना जे वाटले तसे ते त्यांनी लिहिले. त्यांचा अनुभव आहे तो. त्याची खिल्ली उडवली तरी तो अनुभवच.
श्री बाबासाहेब आंबेडकरांनी पण वेद व राम व एकुण हिंदू ह्या विषयावर अनेक भलत्याच गोष्टी लिहिल्या आहेत. ज्या संशोधन करून लिहिल्या नाहीत. जर ते लिहू शकतात तर कोणीही लिहू शकते. तसेच जसे जामोप्या व मायोबोलीवर अनेक लिहित सुटतात तेच स्वातंत्र्य विनायकरावांना का देता येत नाही? दोन्ही लेख वाचल्यावर मला नाही वाटत ते "ब्राह्मण जातीवर" अडकले आहेत. उलट "ब्राह्मण" ही जात नसून वेगळी जीवन पद्धती आहे असे त्यांचे म्हणने आहे असे वाटते. ब्राह्मण कोणीही असू शकतो असे त्यांचे म्हणणे असावे असे वाटते. मग लिहूदेत ना? असा लेख लिहिल्यावर काय फरक पडतो? हा त्यांचा नजरीया आहे असे मान्य करून पुढे सरकावे.

राहिली गोष्ट प्रतिक्रिया व चर्चा होण्याची. मायबोलीवर हे नवीन नाही. Happy

वावावा.
रुचकर, मजेदार, हास्यास्पद इ.

हिंदू ही एक जीवनशैली होती पूर्वी.
आता >> "ब्राह्मण" ही जात नसून वेगळी जीवन पद्धती आहे असे त्यांचे म्हणने आहे.<<

क्या बात है!
येउ द्या अजून.

खरेतर त्यांनाही काही माहित नाहीच

मी जे लिहितो त्याला माझ्याकडे संदर्भ असतो. आता पुन्हा संदर्भ दिल्ला की तो खरा की खोटा, लेखक कोणत्या जातीचा- त्याचं खरं असेल कशावरुन? .. हे मुद्दे पुन्हा शिल्लक रहातातच.. बरं, मी असं काय फार मोठं नवीन पांडित्य मांडतो की जे मलाच माहीत असेल ? गुगलऊन पाहिलेत, तर माझ्या मुद्द्यांशी सुसंगत मुद्दे मिळतील की.
आधार नसलेली विधानं करून इथे काड्या कशाला टाकता? म्हणे... ज्याचा आधार आहे त्या ग्रंथाचे नावही दिले
आहे.

http://www.scribd.com/doc/24813464/Shri-Shivlilamrut-%E0%A4%B6%E0%A5%8D%...

jain.JPG

माझे मुद्दे खरेच माना , असा आग्रहही नाही. मी आधीच लिहिले आहे, ज्याला जे पटेल ते त्याने मानावे.

देशी, तुम्ही माझ्या सगळ्या पोस्ट नीट वाचल्या नाहीत.
<<स्वतःची मतं काय आहेत ती जर तर्कसुसंगत असतील तर आत्मविश्वासाने मांडावीत. त्यासाठी कुणी न वाचलेल्या न पाहिलेल्या, अनेको शतके पूर्वीच्या -त्या त्या सामाजिक संदर्भांमधे तयार झालेल्या वेदांची, धर्मग्रंथांची वानगी हवीये कशाला??>> हा माझा मूळ मुद्दा आहे. मी त्यांच्या मतांची खिल्ली उडवतच नाहीये.

<<हा लेख, मनन व त्यावरील चिंतन विनायकरावांनी केलेले आहे. त्यांना हे सर्व करण्यासाठी वेद वाचायची गरज नाही, कारण त्यांचा जीवनात त्यांना जे वाटले तसे ते त्यांनी लिहिले.>>
पण स्वतःचा वैयक्तिक अनुभव (अगदी माझा, तुमचा, त्यांचा, कुणाचाही) हा अंतिम सर्वसिद्ध सत्य असल्यासारखा मांडू नये एवढीच अपेक्षा आहे. आणि जर प्राचीन परंपरेचे दाखले देतच बोलायचं असेल तर मग निदान काहीतरी व्यवस्थित माहिती करून घेऊन बोलावं. यात कुणावरच वैयक्तिक आकस दाखवतेय असं काही मला वाटत नाही. हा त्यांचा नजरिया आहे हे ही मान्य, तसंच मला काय वाटतं ते मी मांडलं हाही माझा नजरिया आहे. तुम्हीही तो दुर्लक्षित करून पुढे जा.

ते ज्या विषयात लिहिताहेत ते विषय माझ्या संशोधनाचे नव्हेत. मी एवढेच म्हटले की त्या विषयातील तज्ज्ञांनी लिहिलेली सहज उपलब्ध असलेली पुस्तके त्यांनी वाचावीत. विचारवंतांनी त्यांचे काम बहुसंख्य लोकांना कळेल अशा भाषेत इंग्लिशमधे लिहिले आहे. रानड्यांची मनाची घालमेल समजण्यासारखी आहे, पण या विषयावर विचार करायचा असेल तर असा विचार आधी कुणी केलाय का? आणखी कुणाचे काय दृष्टीकोन आहेत याचे थोडीफार माहिती करून घेतली तर त्यांच्या विचारांना दिशा सापडेल असं वाटत नाही का?

<<श्री बाबासाहेब आंबेडकरांनी पण वेद व राम व एकुण हिंदू ह्या विषयावर अनेक भलत्याच गोष्टी लिहिल्या आहेत. ज्या संशोधन करून लिहिल्या नाहीत. जर ते लिहू शकतात तर कोणीही लिहू शकते.>> लिहूदेत ना. मी थोडंच त्याचं समर्थन करतेय..
पण आपण एका मायबोली परिवाराचे सदस्य आहोत. आपण आपले विचार प्रकट करताना स्पष्टपणे करावेत पण त्यातून उगाचच बेसलेस वादविवाद तयार होऊ नयेत/ दुसर्‍यांच्या भावनांना अकारण दुखावले जाऊ नये याची काळजी जशी एरवीच्या वागण्यात घेतो तशी इथे घेतली तर काय बिघडते? नियम-संस्कार च्या बाफ वरचे प्रतिसाद बघा म्हणजे मी काय म्हणते ते कळेल.

शेवटी रहाता राहिला माझं संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रश्न! तर मी आत्तापर्यंत काय विषयात काम करते आहे तो विषय सगळ्यांपर्यंत पोचावा यासाठी मी इथे २-३ लेख लिहिलेत. तुम्ही वाचा असा माझा मुळीच आग्रह नाही. पण माहीत नसताना खोटे आरोप करू नका. आणि इथल्या संशोधकांचे लेखन सुलभपणे इतर माबोकरांपर्यंत पोचावे यासाठी काही लोक गेले काही आठवडे प्रयत्नशील आहेत हे तुम्ही मुद्दाम नजरेआड करत आहात का?

जामोप्या,
<<जशी हिंदूंनी जैन बौद्धांवर टीका केलीये तशी त्यांनीही 'हिंदू'धर्मावर टीका केलीच आहे, शिवाय हिंदू देवतांना त्यांच्या देवताप्रभावळीत हीन स्थान दिले आहे. या बाबतीत सगळे धर्म/उपासना पंथ सारखेच आहेत>> असं माझं पोस्ट आहे. मी अजिबात हिंदूंनी केलेली टीका नाकारत नाहीये. मी फक्त 'सिलेक्टिव्ह एव्हिडन्स' दाखवल्याबद्दल आक्षेप घेतलाय.

हेमाशेपो

जामोप्याला कशाला सांगता? ते कशाचाही फक्त विरोधच करतात, त्यांना त्यात मजा वाटते. >> +१०००००००००.

काही लोक गेले काही आठवडे प्रयत्नशील आहेत हे तुम्ही मुद्दाम नजरेआड करत आहात का? >>

अहो वरदा, इतर संशोधनांबद्दल अजिबात हे चालू नाही. फक्त पुरातत्वाबद्दल आहे ना? मग "मुद्दाम नजरेआड" हा शब्द योजायची काय गरज? मी तुम्हाला उल्लेखून लिहिले कारण तुम्ही ह्या (इतिहास, पुरतत्त्व) विषयाशी निगडित आहात, नाहीतर श्री उदय ह्यांचे नाव वा श्री पेशवा ह्यांचे नाव घेऊन लिहिले असते, त्यांच्याही पोस्ट ह्या बाफवर आहेतच ना?

मी तुमचे लेख वाचतो, मला आवडले, आणि योग आला म्हणून आपणास सांगीतले. बाकी आपली मर्जी.

आपण आपले विचार प्रकट करताना स्पष्टपणे करावेत पण त्यातून उगाचच बेसलेस वादविवाद तयार होऊ नयेत/ दुसर्‍यांच्या भावनांना अकारण दुखावले जाऊ नये याची काळजी जशी एरवीच्या वागण्यात घेतो तशी इथे घेतली तर काय बिघडते >>> बरोबर आहे. पण एरवीच्या जगात पण ही काळजी घेतली जात नाही म्हणूनच तर घोळ आहे ना? इनफॅक्ट तुम्ही न मांडलेल्या पण मुद्द्यावर मी आधीच विचार करून एरवीच्या जगातील श्री बाबासाहेबांचे नाव घेऊन उदाहरण दिले. कारण ते मायबोलीशी निगडित नाही.

शिवलिलामृतात जसे लिहिले तसेच मागे मधुकर चर्चेत मझ्झीम निक्कायचा ह्या धर्म ग्रंथाचा उल्लेख व त्यावर हिंदूबंदल्लचे मत लिहिल्याचे वाचले. ते हिंदूविरोधी होतेच ना? असो आपण लिहित राहावेत. करमणूक होते.

मी फक्त 'सिलेक्टिव्ह एव्हिडन्स' दाखवल्याबद्दल आक्षेप घेतलाय. >>> सहमत! आणि असेच श्री जामोप्या, इब्लिसराव वगैरे मंडळी न थकता मांडत राहतात.

जामोप्या, ते शिवलिलामृत आणि मी इतरत्र टाकलेली काशीची गोष्ट या गेल्या काही शतकातल्या. त्यांचा आणि वैदिक साहित्याचा फार काही संबंध नाही. नवा काळ, नवे लोक, नवे राज्य, नवे विचार, नवे धर्म, नव्या प्रथा ...

पूरक पुरावे मिळवण्यासंबंधी - साधारण कोणत्याही विधानाचे पुरावे आजकाल मिळवता येतात. 'इतिहास हा जेत्यांनी लिहिला असतो' असे म्हणतात. त्यामुळे जुने ते सोने (संदर्भांसंबंधी) असे ही जरुरी नाही. उद्या रानडेंच्या ब्लॉगचाही हवाला देऊन कोणी म्हणेल की कशा काही गोष्टी सर्वमान्य होत्या ते.

हे रानड्यांना उद्देशुनः
त्यामुळे एखाद्या विषयावरील विविध मते पाहुन मग(च) (सारासार विचार करुन) आपले(च) मत मांडावे. तुम्ही लिहिता तेंव्हा ते तुमचेच मत असणार पण जर चार-चार वेळा हे सर्वमान्य आहे असे लिहीत असाल तर त्या पुढे 'असे माझे मत आहे' असे आवर्जुन लिहा.

हेमापआहोशेपो

च् च् च् आशीष! 'हो' कशाला तो मधे? 'हेमाशेपो'ची मजा जाते अशाने! Proud

रानडे,
तुम्ही एकीकडे जात ही कर्मावरून ठरण्याबद्दल बोलता आणि दुसरीकडे
>> पण ह्याच सिंधी समाजात साधू वासवानी सारखे सत्पुरुष मानवजातीच्या मदतीला ठामपणे उभे असतात.
>> ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात.
असली विधानं करता. त्यामुळे इतकं चिंतन वाचून काहीच हाती लागत नाही.

वरदाच्या मुद्द्याला अनुमोदन. एकतर पुराणांतल्या वानग्या देऊ नका नाहीतर नीट अभ्यासानिशी द्या. नुसते विचार मांडायला कोणाची ना असेल असं वाटत नाही. पण चुकीचे दाखले नकोत.

ब्राह्मण कोणीही असू शकतो असे त्यांचे म्हणणे असावे असे वाटते.

हे एक काही समजतच नाही.... देशप्रेमी मुसलमानानी स्वतःला हिंदु म्हणवून घ्यावे, इतर जातीतील बुद्धीमानाना ब्राह्मण समजावए.... दुसर्‍यानी हे आणि ते कशाला म्हणवून घ्यायचे? एक चांगला मनुष्य, नागरिक.. इतके पुरेसे नाही का?

फारएन्ड व वरदा यांच्याशी बराचसा सहमत. कालानुरुप बदल होऊन चातुर्वर्ण व्यवस्था फार पूर्वीच इतिहासजमा झाली आहे. तिचे कायद्यानेच उच्चाटन होऊन त्याजागी आता नवी समाजव्यवस्था राजघटनेद्वारे प्रस्थापित होऊनही ६० वर्षे झाली आहेत. थोडक्यात फार फार जुन्या काळात मनुस्मृतीचे जे स्थान होते ते आता घटनेला आणि तिच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केलेल्या कायद्यांना प्राप्त झाले आहे. त्या घटनेची देखील वाटचाल पुन्हा वेगळ्या प्रकारे मनुस्मृतीच्याच दिशेने होत नाही ना तसेच घटनेची जी काही उद्दिष्टे होती त्या दिशेने समाजाची वाटचाल खरोखरी चालू आहे का यावर चर्चा होण्याऐवजी 'शिळ्या कढीला ऊत' अशा प्रकारच्या चर्चेला वाव देणारे लेखन आपण करतो आहोत असे लेखकाला आणि त्याला गांभीर्याने प्रतिसाद देणार्‍यांना वाटत नाही का ?

लेखक महोदय

पूर्वी मी जसा पेटून उठत असे तसं आता होत नाही. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे हे महत्वाचं. त्यासाठी तुम्ही काही स्त्रोत शोधलेत जे तुमच्या संस्कारातून आले. या संस्काराच्या बाहेर जाता आल्यास विशाल ज्ञानाचं भांडार तुम्हाला खुलं होईल असं मला वाटतं. महोदय, आपण बिझी माणसं, आपल्याला बुद्धी नक्कीच आहे, पण खरं सांगू. आपलं स्वतःच कार्यक्षेत्र जसं स्पेशलायझेशन मागतं तसंच या क्षेत्राचं देखील आहे. असं वरवर त्याकडे पाहता नाही येणार.

मी वरदा यांच्याबद्दल वाचलेलं आहे. अशा लोकांची मतं ही आपल्याला शिकण्यासाठी असतात. हे ही शक्य आहे कि तुमच्या ते वाचनात आलेलं नसावं. तसंच तुमचा दृष्टीकोण प्रामाणिक असावा, अभ्यास अपुरा असावा हे ही शक्य आहे.....

बघा पटतंय का..

(सहजच : - आपल्या देशात लोक टोळ्यांनी आले. टोळ्यांनीच राहीले आणि एकमेकांच्यात लग्न टिकवून टोळ्या अबाधित राहील्या. पुढे पराजितांवर जेत्यांनी सेवेचे व्यवसाय लादले जे त्यांना वंशपरंपरागत वागवावे लागले. या व्यवसायावरून पुढे जाती पडल्या तरीही अनेक जातींची एक संस्कृती हे मूळ टोळीचं रहस्य असावं... माझा हा अंदाज आहे... जाणकार खोडून काढतीलच )

पेशवे

>> ह्या लिखाणा ऐवजी ती नशीब सिरिज थोडि छोटि करुन (१५०० वर्ड्स) चा एखाद दुसरा लेख ईथे टाकलात तर ? <<

नशीब सिरीजचे सुरुवातीचे भाग आहेत मायबोलीवर.

लेखावरच्या प्रतिक्रिया फारच मजेशीर आहेत.
एकंदर सगळा प्रकार पाहुन लेखाचे नाव 'धर्म, समाज, जातपात आणि उत्पात ' असावे असे वाटले.

रानडे साहेब, तुमचे विचार वेगळे आहेत आणि ते मांडण्याचा तुम्हाला पुर्ण अधिकार आहे.
(इथे मुस्कटदाबी करण्याचा किंवा लेखकाची 'जात' काढण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याचा निषेध !)

" आज राज्य करते, नेता, पुढारी, जमीनदार, मालक, कार्यवाह, अभियंता, कोशाध्यक्ष, मुकादम, कामगार वगैरे आधुनिक गोत्र प्रकार आहेत असेच माझे ठाम मत झाले आहे."

मला सांगा आज कुणालाही, कुठल्याही घरात, जातीत जन्माला आला म्हणून हाच व्यवसाय केला पाहिजे असे बंधन आहे काय ?
एक शिक्षक किंवा कामगार (कुठल्याही जातीतला, ब्राम्हण देखील) आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर नगरसेवक बनू शकतो, पर्यायाने राज्यकर्ता बनू शकतो. हे स्वातंत्र्य त्या तथाकथित महान व्यवस्थेत होते काय ?
माझ्या मते आत्ताची राज्यव्यवस्था तिच्यात कितीही दोष असले तरी या भारत देशातील सर्वोत्तम राज्यव्यवस्था आहे कारण ती सर्वाना समान संधी देते.

जातपात म्हणजे एखाद्या जातीची पातळी असा साधा अर्थ मला समजलेला आहे. मुळातच व्यक्तीची जातपात ही दैनंदिन व्यवसायाने ठरते

जात ही कर्माने ठरते, जन्माने नाही हे बोलायला सोपे आहे, परंतु शेकडो वर्षे ज्यांनी गुलामी केली आहे त्यांना कसे गोड वाटेल ? कारण त्यांचा इतके वर्षाचा अनुभव याच्या अगदी उलटाच आहे ना?

"कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला असावा.... आज ह्या सगळ्या तर्कशुद्ध संस्कारांचे समाजातले महत्त्व संपवण्याचा प्रयत्न काही समाज सुधारक व राज्यकर्ते करीत आहेत."
अत्यंत बेपर्वा विधान आहे हे.
रस्ता अडवून मांडव टाकला, लाउड स्पीकर वरून गाणी वाजवली, गरिबांकडून जबरदस्ती वर्गणी गोळा केली आणि मग गोत्र वगैरे सांगून पूजा केली तर तर्कशुद्ध संस्कार कसे होतात ?

"हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे."

तुम्हाला शुभेच्छा !!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

>> ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात.

समाज. जातपात. धर्म.

मारवाडी हा धर्म आहे का?
की समाज?
त्यांच्यातले बिर्ला कोणत्या जातीचे??
'आपल्या समाजाचे आहेत' म्हटलं की जातीचे असा अर्थ होतो म्हणे??

लेखक महोदयांचा अभ्यास भल्ताच जबरदस्त दिस्तोय.. नवीण मराठी. नवीण ब्लाग. नवीण विचारमंथन अन मायबोलीसारख्या प्रतिष्ठीत सायटिवर इत्के प्रतिसाद अन ट्यार्पी!! क्याबात क्याबात!!

प्रबोधनकार,

१.
> एक शिक्षक किंवा कामगार (कुठल्याही जातीतला, ब्राम्हण देखील) आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर नगरसेवक बनू
> शकतो, पर्यायाने राज्यकर्ता बनू शकतो. हे स्वातंत्र्य त्या तथाकथित महान व्यवस्थेत होते काय ?

हो. होतं. शिंदे आणि होळकर ही ज्वलंत उदाहरणे आहेत. एक जण पेशव्यांकडे हुजर्‍या होता तर दुसरा पाणक्या. आज कोणी त्यांच्या वंशजांना उपरोक्त हीनवचनांनी संबोधेल काय?

२.
>परंतु शेकडो वर्षे ज्यांनी गुलामी केली आहे त्यांना कसे गोड वाटेल ?

ब्राह्मणांची शेकडो वर्षे गुलामी केली हे गृहीत धरतो. एक प्रश्न उद्भवतो. प्राचीन भारत हा शांति आणि सुबत्तेचे आगार होता. हे कसे शक्य आहे? शोषणावर आधारित व्यवस्थेत सुखशांति कशी नांदेल? ब्राह्मणांनी इतरांचे शोषण केले हा सिद्धांत मुळातूनच चुकीचा आहे. या सिद्धांताला कोणताही आधार/पुरावा नाही.

ब्राह्मणांकडून काही चुका झाल्या असतील. मात्र तो एका वर्गाने केलेला कट होता हे साफ चुकीचं आहे.

३.
> माझ्या मते आत्ताची राज्यव्यवस्था तिच्यात कितीही दोष असले तरी या भारत देशातील सर्वोत्तम
> राज्यव्यवस्था आहे कारण ती सर्वाना समान संधी देते.

सर्वांना समान संधी मिळत नाही. खासदार व्हायचं असेल तर कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. केवळ गुणवत्तेच्या जोरावर सत्ताधारी बनू शकत नाही. अन्यथा अण्णा हजार्‍यांना लोकपालाविषयी आंदोलन करायची गरजच उरली नसती.

४.
> रस्ता अडवून मांडव टाकला, लाउड स्पीकर वरून गाणी वाजवली, गरिबांकडून जबरदस्ती वर्गणी गोळा केली
> आणि मग गोत्र वगैरे सांगून पूजा केली तर तर्कशुद्ध संस्कार कसे होतात ?

अगदी बरोबर. १०० % अनुमोदन. देव भावाचा भुकेला असतो. म्हणून भावपूर्ण पूजा कशी करावी हे शिकायला पाहिजे. अगदी पुरोहितांसकट सगळ्यांनीच.

आ.न.,
-गा.पै.

अहो स्वाती_आंबोळे, तुम्ही इथे कशाला वेळ घालवता? त्यापेक्षा आपल्या बाराबाफ वर तरी या. इथे बहुधा तर्कसुसंगत असे काही नसते. 'सिलेक्टिव्ह एव्हिडन्स' देणे, कुठे कुठे वाईट सापडेल ते संदर्भ लक्षात न घेता लिहीणे असल्या पद्धतीने चर्चा चालते! माझ्यासारख्या निरुद्योगी माणसाला ठीक.

ब्राह्मणांकडून काही चुका झाल्या असतील. मात्र तो एका वर्गाने केलेला कट होता हे साफ चुकीचं आहे.
कट कसले करतात ब्राह्मण, डोंबलाचा. दोन ब्राह्मणांची तीन मते! जर खरेच ब्राह्मणांनी कट केला तर पुनः पेशवाई येईल!! होती पेशवाइ त्यात कट करून गारदी नि इंग्रज यांना हाताशी धरून आपल्याच नातलगांना मारले, त्यांच्याशी लढाइ केली!!! हे ब्राह्मण कट काय करणार?

"हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे."

बापरे! म्हणजे आणखी काही लेख येणार !

प्राचीन भारत हा शांति आणि सुबत्तेचे आगार होता.

हे कशावरून ? तसे तर अमेरिकेत गुलामगिरी होती तेव्हा शांती आणी सुबत्ता होतीच की ! तिचा आणी समतेचा संबंध आहे का?

खासदार व्हायचं असेल तर कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात

राजू शेट्टी सारखे लोक पैसा खर्च न करताही खासदार बनू शकतात. आणी ज्या व्यवस्थेचे तुम्ही गोडवे गाताय तिने शंकराचार्य पदावर दलिताला बसवले का? आज तरी बसवेल का?

तुम्ही गोडवे गाताय तिने शंकराचार्य पदावर दलिताला बसवले का? आज तरी बसवेल का? >>>.

परत परत हाच मुद्दा अशा वादात नेहमी येतो. दलित म्हणजे आत्ताचा वर्ग की तेंव्हाचा? हे आधी सांगाल का? तेंव्हाचा असेल तर हो. मंडणमिश्र वैदिकाचा बौद्ध झाला. चर्चेनंतर परत वैदिकात आला व एका पिठाचा शंकराचार्य झाला. ही घटना काय दर्शविते?

आणि प्रश्नच बाळबोध आहे. सॉरी कुळकर्णी पण दुसरे एक्सप्रेशन सापडत नाही - कारणे दोन .

१ इथे शंकराचार्याचे ऐकतो कोण? शंकराचार्य म्हणजे मौलवी नाही की फतवे काढले नी ऐकले. तुम्ही ऐकता का? तसेच लाखो भारतीय (सॉरी लाखो हिंदू) थोडी त्यांचे ऐकतात. मग कोणी असला काय फरक पडतो? धर्म वैयक्तीक आहे ह्याचे प्रतिपादन करताना तुम्हाला मी अनेकदा वाचले, मग अश्यावेळी मूळ तत्व का सोडायचे? का ते ही हवे तसे? शंकराचार्य नको म्हणा. मी अनुमोदन देईल. नाहीतरी सर्वच कुठे लायक असतात?

२. म्हणजे दलित शंकराचार्य हवा. थोडक्यात जातपात हवी. हे म्हणजे डबल ढोलकी आहे. एकीकडे म्हणायचे जातीचे उच्चाटन करा, लगेच दलितांना शंकराचार्य अन ब्राह्मणांना रिझर्व्हेशन हवे असते. गंमत आहे.

अवांतर -
ह्या ब्राह्मण, अब्राह्मण चर्चांनी उत आणला आहे. एकीकडे आपण म्हणतो जातीभेद नाहीसा झाला पण दुसरीकडे मायबोली अन सर्व इंटरनेट साईटींवर मात्र अशाच चर्चा. गंमत आहे. नक्की नाहीसा झाले का सर्व? मला तरी वाटत नाही.

अतिअवातंर - मी अजिबात संस्कृती वगैरेचे गोडवे गात नाही. कुठलाच धर्म / संस्कृती धुतल्या तांदळासारखी नाही. हिंदू धर्म अन बौद्ध अन मुस्लीम कसे अपवाद? अर्थात दगडापेक्षा विट मऊ असते पण ती लागतेच.

जातीपातीचे निर्माते कोण आहेत?
जातीपातींच्या चर्चांना खतपाणि घालून वातावरण पेटते कोण ठेवते?
आजही दलितांच्या आरक्षणाला विरोध करणारे कोण आहेत?
राष्ट्रप्रेमाच्या बेगडी बाता करुन परदेशात वास्तव्य करुन हिरवा माज दाखवणारे कोण आहेत?

Pages