नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न मी माझ्या क्षमतेला समजून करतो आहे.
भारतीय परंपरेत चार वेद, त्याचे आठ अंग म्हणजे शाखा, उपनिषद ह्या सगळ्या प्रकारातून धर्म, समाज, जात, कूळ व व्यक्ती ही मांडणी का व कशी घडली ते मी समजण्याचा प्रयत्न केला. वेद काळात सृष्टीतील प्रत्येक ऊर्जेचा स्वतंत्र अभ्यास केला गेला. त्या प्रत्येक ऊर्जेला देव किंवा देवी म्हणून संबोधले गेले. ह्या प्रत्येक देवाची / देवीची उपासना म्हणजेच ऊर्जेचे सखोल ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला ऋषी म्हणून मान्यता मिळाली होती. ह्या सगळ्या ऋषी मुनिजनांनी सृष्टीच्या स्पंदन शक्तीला मान्य केले. स्पंदन शक्तीचा एक भाग मानव हे मान्य झाले. स्पंदन शक्तीला समजण्याची क्षमता व गुणधर्म फक्त मानव समूहातच आहे हे सर्वमान्य झाले. ह्या क्षमता व गुणधर्मांचा उपयोग ह्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे हे सर्वमान्य ठरले. ह्या कर्तव्याचे पालन करण्याचे नियम ठरवले गेले. ह्या संकल्पनेला मानवाचा सनातन म्हणजे सतत कार्यरत असणारा, अंत नसलेला धर्म म्हणून ऋषी मुनिजनांनी मान्यता दिली. धर्माचे पालन कारणार्या समूहाला एक समाज म्हणून मान्यता दिली. इथे धर्म म्हणजे मानवी गुण धर्म, कर्तव्य अशाच अर्थाने होता व आहे पण पाश्चात्य पद्धतीने विचार करण्याची सवय व त्यातच मोक्ष आहे अशी समजूत झालेल्या विचार वंतांनी धर्म ह्या संकल्पनेला रिलीजन, पंथ, मजहब, दीन, ईमान ह्याला जोडण्याचा अतिरेक केला.
ज्या ऋषींनी समाजाच्या सखोल अभ्यासातून नियम व कर्तव्ये सुनिश्चित केली त्या प्रत्येक गुरुचे नाव देऊन त्या नियम-कर्तव्यांना गोत्र असे नाव दिले गेले. (पंचांगात ही सगळी माहिती वाचायला मिळते. पण ते समजून घेण्याऐवजी नटनट्यांची, आधुनिक साधनांची, मित्र - मैत्रीण जोडीची, कोणती फॅशन वगैरे माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे झाले आहे.) गोत्र ह्या संकल्पनेचा अर्थ मला असा समजला. आधुनिक समाज रचनेत विद्यापीठ हे अपवाद वगळता गोत्र असण्याची शक्यता आहे.
ऋषी मुनिजनांच्या समूहाने मानव शरीराला जिवंत ठेवण्या करता शरीरातील प्रत्येक अवयवांच्या कार्याचा अभ्यास केला होता म्हणूनच त्या अभ्यासातून समाज एका मानव शरीरा सारखा असून चार वर्णात आहे असे सर्वमान्य झाले. वेदकाळा पासून सृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळी गाठणारे गुरु, ऋषी मुनीजन मान्यता मिळवलेले होते त्यांच्या शिष्यगणांना ठरावीक पातळी गाठल्यावर ब्राम्हण ही पदवी दिलेली आहे. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूची जबाबदारी अंतर्बाह्य घटनांचे सुनियोजित आकलन करून, प्रक्रिया झाल्यावर इतर अवयवांना पुरवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य पद्वीधारक ब्राम्हण वर्णाला दिले गेले. प्रत्यक्षात ब्राम्हण ही जात नसून विचार पद्धती आहे, वैचारिक कामाची पातळी आहे. (मुसलमान धर्मात सय्यद ह्या नावाने ह्याची गणना होते. पाश्चात्य पध्दतीत वैज्ञानिक, प्राध्यापक ह्या अर्थाने गणना होते.) आधुनिक काळात ह्या वर्णात भेसळ पदवी धारक, सतत बदलणारे नियम व बाह्य शक्तींचे नियंत्रण असल्याने कर्तव्य पालनात गोंधळ झाला आहे. संगणक भाषेत ह्याला रोगट (करपटेड) बॉयॉस म्हणता येईल.
समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य धोक्यापासून संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्या भागाला क्षत्रिय वर्ण गणले गेले ही जबाबदारी हात - पाय, डोळे, नाक, कान ह्यां अवयवयांची होती. समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य शरीराच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी छातीपासून कंबरेपर्यंत असणारे अवयव फुपुसे, हृदय, पोट वैश्य वर्ण गणले गेले. ह्या तिन भागांनी तयार केलेली व त्यांना आवश्यक असणारी माहिती वाहक अवयवांचा वर्ण शूद्र (क्षुद्र नव्हे) गणला गेला हे मी समजू शकलो. ह्या चारही वर्णांचे महत्त्व मानव शरीरातील प्रत्येक अवयवाचे असते तितकेच संतुलित होते. मात्र समाजरुपी शरीरातील अनावश्यक द्रव्ये, वस्तूंचा कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची होती कोणत्याही वर्णाची नव्हती हे मी निश्चित समजू शकलो. मात्र आज प्रत्येक वर्णातील अंतर्बाह्य संबंध बिघडवण्याचे नियोजित प्रयत्न होत आहेत.
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या बुध्दी व कार्यक्षमते नुसार प्रत्येक व्यक्तीचे वर्गीकरण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा चार वर्णात झाले. प्रत्येक व्यक्तीचे कार्य, दैनंदिनी, आहार ह्याचे नियम ठरलेले आहेत. ब्राम्हणाने ह्या सृष्टीचा, ब्रह्मांडाच्या प्रत्येक ऊर्जेचा अभ्यास करावा हे त्याचे कर्तव्य ठरले. अभ्यास करण्याची क्षमता सतत टिकावी म्हणून पूजा, पाठांतर, आहार ह्याचे नियम पाळण्याची सवय आवश्यक झाली. अनुभवी गुरु समूहाने अशा ब्राम्हणाला मान्यता देऊन प्राकृत भाषेत सामान्य व्यक्तीला त्याने मिळवलेल्या ज्ञानाचा सत्कारणी उपयोग व मदत करण्याचे काम दिले. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूचे काम ब्राम्हण वर्गाने करावे मालक बनू नये. तर इतर तीन वर्णांनी त्या कामात मदत करावी, गुलामी नव्हे. क्षत्रिय समूहाची मानसिकता, आहार, संरक्षण क्षमता व त्यांचे नियम ठरवले गेले. क्षत्रियांच्या संरक्षणाच्या कामात इतर तीन वर्णांनी मदत करावी अडथळे निर्माण करू नयेत. शरीराला आवश्यक असणार्या गरजेच्या वस्तूंचे भांडार, व्यवहार वैश्य समूहाने करावे, परंतु समाजाला वेठीस (रॅनसम) धरू नये. तसेच ह्या तीन वर्णांना शारीरिक मदत व माहिती पुरवण्याचे काम शूद्र समूहाने करावे, जेणे करून हा शरीर समाज सुदृढ व निरोगी असावा हाच मूळ उद्देश होता. मानव शरीराचे प्रत्येक अवयव एकमेकाशी जुळलेले असतात, कोणत्याही एका अवयवाला वेगळे महत्त्व नसते तसेच ह्या समाजरूपी शरीरातील चारही वर्णांच्या समूहांचे एक संध असणे आवश्यक असणे सर्वमान्य झाले होते. आज राज्य करते, नेता, पुढारी, जमीनदार, मालक, कार्यवाह, अभियंता, कोशाध्यक्ष, मुकादम, कामगार वगैरे आधुनिक गोत्र प्रकार आहेत असेच माझे ठाम मत झाले आहे.
कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला असावा. ह्या पूजेला हजर असणार्या प्रत्येकाला पूजेला बसणार्या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्या पुजार्याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता) हे कर्तव्य होते की त्याने पूजेला बसणार्या व्यक्तीच्या परंपरेची, गोत्र, कुळ, जात, जन्मस्थान अशा तपशीलवार माहितीची उजळणी करूनच पूजेला सुरुवात करणे आवश्यक ठरले होते. आज ह्या सगळ्या तर्कशुद्ध संस्कारांचे समाजातले महत्त्व संपवण्याचा प्रयत्न काही समाज सुधारक व राज्यकर्ते करीत आहेत. ह्या प्रयत्नांना मान्य करणार्या संधीसाधूंना प्रमाण पत्र, नोकरी, मोठ्या हुद्याचे गाजर खायला देण्याच्या पध्दतीला महत्त्व मिळालेले आहे.
जातपात म्हणजे एखाद्या जातीची पातळी असा साधा अर्थ मला समजलेला आहे. मुळातच व्यक्तीची जातपात ही दैनंदिन व्यवसायाने ठरते, त्या व्यवसायाशी संबंधित आचरण (वागण्याची पद्धती) म्हणून आहार त्यामुळे तयार होणारे विचार, ह्या सगळ्याच्या मिश्रणाची ती एक जात असते असे आजवरच्या अनुभवांनी मला पटले आहे. कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते. प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा एक समूह असा असतो की जो त्याच जातीच्या ब्राम्हण वृत्तीच्या विरोधात असतो. ह्या समूहाला फक्त आरक्षणाचे फायदे हवे असतात. आरक्षण देऊन गोंधळ माजवण्याचा हक्क व त्याकरता संरक्षण देण्याचे आश्वासन ह्या समूहाला मिळते.
लहान पणी मला समजलेले जातपात हे प्रकार पुढील काही प्रसंगातून मी अनुभवले आहेत. आमच्या गावात राहणारी दोन वयाने लहान, सिंधी मुले (सिंध प्रांत वासी ह्या अर्थाने), भवनानी आणि लालवानी आपसात भांडत होते, कपडे फाडून शिवीगाळ चालू होती. भवनानीने एका नटीचा फोटो लालवानीला ५० पैशाला विकला होता. लालवानीने तो फोटो त्याच्या दुसर्या एका मित्राला दोन रुपयाला विकण्याचा प्रयत्न केल्यावर भवनानीने तोच विकलेला फोटो एक रुपयाला परत मागितला होता त्यातून हे भांडण झाले होते. इतक्या लहानपणी एका वस्तूची गरज लक्षात घेऊन ती पुरवण्याचा व्यवसाय करणारी धंदेवाईक जात मला समजली होती. पण ह्याच सिंधी समाजात साधू वासवानी सारखे सत्पुरुष मानवजातीच्या मदतीला ठामपणे उभे असतात.
असाच एक दुसरा प्रसंग मी लहान असताना अनुभवला होता. बालपणी मी ज्या इमारतीत भाड्याने राहत होतो त्या इमारतीच्या मारवाडी (मारवाड प्रांत वासी, आजचे राजस्थान) मालकाचा मुलगा माझ्या बरोबर खेळायला येत असे. मी त्याला विचारले होते की तो त्याचा गृहपाठ केव्हा करतो? त्याने व्यावसायिक जातीला शोभेल असेच उत्तर मला दिले होते. तो शिकवणीला जात होता तिथल्या एका गरीब (?) मुलाला गोळ्या बिस्किटे देऊन त्याच्या कडून गृहपाठ तयार करून घेत होता. हा असला विचार माझ्या ब्राह्मणी संस्कारित डोक्यात कधीच येणार नाही. मी मात्र मार खात, रडत ओरडत माझा गृहपाठ करायला शिकलो होतो. ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात. मंदिर ह्या संकल्पने विषयी एक वेघळा लेख येणार आहे.
बालपणीच्या त्याच इमारतीच्या समोर आठवड्याचा बाजार दर रविवारी जमत होता. तिथे मास - मासे विकणारे होते. डुकराचे मास गर्दी करून विकत घेणारे होते. ती डुकरे संडासातील घाण, कचर्यातील घाण खाताना मी बघितली होती. त्याच डुकरांना कापताना मी बघितले होते. तेच मास आवडीने खाणारी एक जात मी तिथे बघितली होती. तसेच "चाक फिरवतो गरागरा मडकी करतो भराभरा तो कोण ? कुंभार, कपडे शिवतो तो शिंपी, चपला तयार करतो तो चांभार, लाकडाच्या वस्तू बनवणारा सुतार, लाल झालेल्या लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार," शालेय पुस्तकातील बालगीतातून मला व्यावसायिक जाती ह्या अशा समजल्या होत्या, त्यांची कामे किती आवश्यक होती हे मला समजले होते. पुजा पाठ सांगणार्याला भट, पुजारी म्हणतात हे समजले होते. राशींचा अभ्यास करणारे ज्योतीशी होते. पण ह्या भट, पुजारी, ज्योतीशी व्यक्तींना ब्राम्हण पदवी मिळवणे आवश्यक होते ती एक जात नव्हती.
हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे.
ह्या समाजरुपी शरीरातील
ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूची जबाबदारी अंतर्बाह्य घटनांचे सुनियोजित आकलन करून, प्रक्रिया झाल्यावर इतर अवयवांना पुरवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य पद्वीधारक ब्राम्हण वर्णाला दिले गेले.
बामणानी इतर लोकाना आजवर असे काय पुरवले आहे, सांगू शकाल का? देश सोडून चाललाय तर मुकाट्याने जा ना.. इथल्या जातीव्यवस्थेचे कौतुक कशाला? आणि जाती व्यवस्था ही योग्यच असेल तर तुमची जात बामण असून या देशात तुम्ही टिकला का नाहीत?
तो शिकवणीला जात होता तिथल्या एका गरीब (?) मुलाला गोळ्या बिस्किटे देऊन त्याच्या कडून गृहपाठ तयार करून घेत होता.
हो का? आणि गोळ्या बिस्किटाची लाच खाऊन गृहपाठ करुन देणारा.... तो कुठल्या जातीचा होता? तो नक्की बामणच असनार.. बरोबर ना?
मी खरंतर अजिबात इथे कुठेही
मी खरंतर अजिबात इथे कुठेही लिहिणार नव्हते. पण जरा फारच होतंय.
रानडे, तुम्हाला स्वतःला काय वाटतंय ते लिहा ना. उग्गाच कशाला वेद, तत्कालीन धर्म, पाश्चात्य पद्धतीने प्रभावित विचारवंतांचे धर्मावरील काम असे मुद्दे मधे आणता? तुम्हाला या विषयांची काय माहिती आहे? यावरील कुठल्या विद्वत्मान्य संशोधक, विचारवंतांची कामं तुम्ही वाचली आहेत? निदान वैदिक वाङ्मयात किती आणि कुठले ग्रंथ येतात याची माहिती करून घ्या. मूळ संस्कृतात नाही तरी त्यांची भाषांतरं आणि त्यावरची सटीक कामं काय आहेत ती तरी चाळा की.. वैदिक धर्म आणि आताचा धर्म यात काय जमीन अस्मानाचा फरक आहे हे तुम्हाला कळलं तरी खूप झालं.
पोरखेळ झालाय हा माबोवर असल्या धाग्यांचा... स्वतःची मतं काय आहेत ती जर तर्कसुसंगत असतील तर आत्मविश्वासाने मांडावीत. त्यासाठी कुणी न वाचलेल्या न पाहिलेल्या, अनेको शतके पूर्वीच्या -त्या त्या सामाजिक संदर्भांमधे तयार झालेल्या वेदांची, धर्मग्रंथांची वानगी हवीये कशाला??
या माणसाचा काय प्रॉब्लेम आहे,
या माणसाचा काय प्रॉब्लेम आहे, समजेना बुवा.
याना..
१. एक लेवा पाटील भेटला, रस्त्याव्र हगणारा.
२. सिंधी भेटला, कुठल्यातरी व्यवहारासाठी मार्यामार्या करणारा
३. आणखी कुठल्या जातीतला डुक्कर खाणारा भेटला.
४. एक मारवाडी भेटला दुसर्याकडून गृहपाठ करुन घेणारा..
अजून ढीगभर जाती धर्म शिल्लक आहेत.. काय काय वाचायला लागतय कुनास ठाऊक
बामनाव्यतीरिक्त दुसर्या जतीतला यान्ना कुणी चाम्गला भेटलाच नाही वाटतं !
वरदा, सहमत. आणि लेखावर टीका
वरदा, सहमत.
आणि लेखावर टीका करणार्यांपैकी काही टीका हे लेख किंवा काही प्रतिक्रिया जणू काही अखिल ब्राह्मण समाजाने येथे नेमलेले प्रतिनिधी त्यांची भूमिका मांडत आहेत अशा थाटात ब्राह्मण किंवा कोणत्याही जातीवर घाऊक टीका का करत आहेत ते ही कळत नाही. जे कोणी जे काही लिहीत आहेत ते त्यांचे वैयक्तिक मत आहे एवढे लक्षात घ्या.
हे सगळे नियोजित चांगले होते
हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे.
भारतात जगता आले नाही म्हणून हे कायमचे परदेशाला चालले.. आणि आता हे हा सग्ळा शोध कसा घेनार?
"बामणानी इतर लोकाना आजवर असे
"बामणानी इतर लोकाना आजवर असे काय पुरवले आहे, सांगू शकाल का? देश सोडून चाललाय तर मुकाट्याने जा ना.. इथल्या जातीव्यवस्थेचे कौतुक कशाला? आणि जाती व्यवस्था ही योग्यच असेल तर तुमची जात बामण असून या देशात तुम्ही टिकला का नाहीत?"
ते शोधण्याची जबाबदारी तुमची, मी बामण तर मुळीच नाही, रानडे म्हणून बामण जातीचा ठरवणे इथेच घोड चूक झाली आहे. आज मोठ्या दिमाखाने साठे, आठवले, गोखले, जोशी नाव लिहिणारे सगळे बामण आहेत का? पुन्हा हेच सांगेन बामण जात नाही ती एक पदवी आहे, विचारांची पातळी आहे. तुम्ही ती पातळी गाठण्याचा प्रयत्न करू शकता ह्यात कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
म्हणूनच हे पुन्हा इथे जोडले आहे - "आजवरच्या अनुभवांनी मला पटले आहे. कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते. प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा एक समूह असा असतो की जो त्याच जातीच्या ब्राम्हण वृत्तीच्या विरोधात असतो. ह्या समूहाला फक्त आरक्षणाचे फायदे हवे असतात. आरक्षण देऊन गोंधळ माजवण्याचा हक्क व त्याकरता संरक्षण देण्याचे आश्वासन ह्या समूहाला मिळते."
वाचकहो एक नम्र विनंती, मी माझे विचार स्वातंत्र्य वापरतो आहे, तुम्ही तुमचे निवड स्वातंत्र्य वापरा, माझे मत पटलेच पाहिजे असा माझा आग्रह नाही. तुमचा वेळ मला कमी लेखण्यात का घालवता? माफ करा वेळ घालवणे हे तुमचे निवड स्वातंत्र्य असेल कदाचीत!!!!
कोणाला दुखवण्याचा हेतू नाही हे पुन्हा एकदा सांगतो.
रानडे, वरदाचे पोस्ट वाचा
रानडे,
वरदाचे पोस्ट वाचा जरा.
काय प्रत्येक धाग्यावर तेच तेच. या असल्या शेंडाबुडखा नसलेल्या बेजबाबदार विधानांनीच धोपटू पहाणार्यांना अजून मटेरियल मिळतं.
काय वाट्टेल त्याचा शोध घ्या,
काय वाट्टेल त्याचा शोध घ्या, ती तुमची वैयक्तिक मते आहेत पण लिहिताना कृपया ब्राह्मण असे लिहा.
णडेपाटील चालू द्या. भारतात
णडेपाटील चालू द्या.
भारतात एकूण ४०० च्यावर जाती-पोटजाती आहेत. भरपूर मटेरियल आहे. शोध घ्या आणि इथे लेख प्रसवत रहा. रिटे आहेतच चर्चा करण्यासाठी.
हा लेख मी लिहिला तेव्हा एका
हा लेख मी लिहिला तेव्हा एका शब्द सुधार प्रणाली ने ब्राम्हण तेव्हा बरोबर मानला होता, तसा तो लिहिला गेला, ब्रा - ह - म - ण हे बरोबर असेल तर तसे लिहीन, मला विचार समजणे महत्वाचे आहे. बघाना प्राजक्ता ह्यातला उच्चार क ला त जोडून होतो मग हे त ला क जोडणे जरा वेगळेच वाटते. शेवटी काय तर कोण खरे का खोटे ह्या वर वाद घालणे पदवी मिळवणे व समाजात मिरवणे ह्याला खूप महत्व आहे.
साकेत साहेब तुमच्या ह्या
साकेत साहेब तुमच्या ह्या नावाचा मराठीत काय अर्थ आहे? एक उत्सुकता, करण फारसी भाषेत साकेत = चु्प्प बसणे, शांत होणे असा आहे. कृपया तुम्हाला दुखवायचा उद्देश नाही.
http://vkthink.blogspot.com/2
http://vkthink.blogspot.com/2011/05/blog-post.html अबबबबबब ! आता हे सगळे मायबोलीवर येनार...
आणि हो! खबरदार, या लेखाला कुणी घाणेरडा वगैरे म्हणाल तर! हा लेख कसा वाटला ते सांगायला फक्त तीनच पर्याय आहेत.. मजेदार, रुचीपूर्ण किंवा छान
साकेत साहेब तुमच्या ह्या
साकेत साहेब तुमच्या ह्या नावाचा मराठीत काय अर्थ आहे?
साकेत हे अयोध्यानगरीचे दुसरे नाव होते.. http://en.wikipedia.org/wiki/Saket
तुमचा संस्कृती आणि संस्कारांचा अभ्यास सखोल असुणही हे माहेत नसावे म्हंजे आश्चर्यच!
जामोप्या, तुम्हाला फार उत्साह
जामोप्या, तुम्हाला फार उत्साह बुवा.. नेटसंशोधन करून एकदम या लेखांची गंगोत्रीच शोधून काढली की.
हे असले लेख वाचले की फुक्कट इतकी वर्षं अभ्यास केला/ किंवा त्या समाजशास्त्रातल्या, भाषाशास्त्रातल्या, संस्कृतातल्या विद्वानांनी आयुष्य वेचून भारतीय समाज, जातिव्यवस्था, इतिहास, धर्म अशा विषयांवर संशोधन केलं असं कधीतरी वाटून जातं. संशोधन सगळेच नाही करू शकत मान्य आहे, पण निदान ज्या विषयावर 'विचारप्रवर्तक' काहीतरी लिहायचंय त्यावर थोडं तरी जगन्मान्य वैचारिक वाचन करावं, नाही का?
<< पदवी मिळवणे व समाजात मिरवणे ह्याला खूप महत्व आहे.>> असंच जर असतं तर सगळ्यांनीच हे केलं असतं. एकदम सोप्पं असतं ना पदव्या मिळवणं?
काय आहे ना, बर्याच जणांना आपल्याला विचारवंत म्हणून एखाद्या छोट्याशा का होईना पण सामाजिक गटात/ पातळीवर ओळखले जावे असं मनातून सुप्तपणे वाटत असतं. म्हणून हे असले लेख पडतात. जे खरे विचारवंत असतात ते कधीच असं प्रदर्शन करायला जात नाहीत. बाकी आमच्यासारखे बरेच ना घरके ना घाटके स्वतःचं नेमून दिलेलं काम करण्यात आणि मग इतरवेळी स्वतःला आवडतं ते छंद सांभाळण्यात बिझी असतात. एखादी नवी इंटरेस्टिंग माहिती कळली तर ती, त्यावरचे विचार आम्ही जरूर शेअर करतो. पण सामाजिक गटांबद्दल असा घाऊक तिरस्कार, अभिमान, गैरसमज करून घेण्याइतकी आमची बौद्धिक कुवत नाही हे ही तितकंच खरं!!!
मजेदार, रुचीपूर्ण किंवा
मजेदार, रुचीपूर्ण किंवा छान
यातलं काय निवडावं ? ..
भारतातून बाहेर गेल्यावर असे
भारतातून बाहेर गेल्यावर असे ख्रिस्चन, मुस्लिमांच्या जातीवर लेख लिहू नका.. बडवतील ते.
अतिशय उत्कृष्ट माण्डणी असलेला
अतिशय उत्कृष्ट माण्डणी असलेला लेख.
>>>> वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. <<<
हे वाक्य पटले. त्यातिल तथ्यही उमगले.
तुम्ही लिहा हो.
नीट सलग न वाचताच, नाऊमेद करणार्या वा तद्दन विरोधी प्रतिक्रिया देणार्यान्ची इथे वानवा नाहिये.
खरे तर वरील वाक्यच दर्शविते आहे की तुमचे लेख "ब्राह्मण जाती/पोटजातीन्चा" उदो उदो करणारे नसून, "ब्राह्मणी विचार/आचार" नेमके काय ते सान्गु पहाताहात. पण हल्ली काये ना, की ब्राह्मण हा शब्द जरी आला तरी ब्राह्मण जातीतल्यान्ची देखिल कानशिले तापू लागतात इतका विषप्रभाव गेल्या पन्चविस वर्षात ब्रिगेडी/सरकारी नेते लोकान्नी "ब्राह्मणीवृत्ती" बद्दल केला/चालविला आहे.
त्यास अनुलक्षून, मला खरे तर तुमचे लेख खरोखरच विचारप्रवर्तक असेच वाटताहेत. लिहीत रहा, प्रतिक्रिया देण्यात शक्ति व्यर्थ दवडू नका.
(अत्यन्त दुर्दैवाने, पण सत्य असे आहे की माझ्या आजवरच्या अनुभवाप्रमाणे "लिम्ब्या एखाद्या गोष्टीला चान्गले म्हणाला" की त्यावर शिन्चा लिम्ब्या म्हणतोय ना चान्गले? मग त्या त्या गोष्टि, ते ते धागे, ते ते विषय/धागे/लेखक तद्दन टाकाऊ/भडकाऊ/अनुल्लेखनीय अशा प्रकारे हल्ल्लाबोल करणार्यान्ची देखिल इथे वानवा नाहीये! अहो इतकेच काय? मी नुस्ते "सोने" (गोल्ड हो) सुन्दर सोनेरी पिवळे अस्ते असे म्हणले तर इथे "डर्टी यल्लो डर्टी फेल्लो" अशी बोम्बाबुम्ब करणारे देखिल कमी नाहीयेत
त्याहुन मोठे दुर्दैव म्हणजे मी तुमच्या लेखान्ना चान्गले आहेत अशी प्रतिक्रिया आधीच देऊन तर बसलोय! काय करणार? आदतसे मजबुर... असो. तुमचे चालुद्यात, "त्यान्चे"पण चालूद्यात, मी आहेच काठावरती )
>>>> आणि लेखावर टीका
>>>> आणि लेखावर टीका करणार्यांपैकी काही टीका हे लेख किंवा काही प्रतिक्रिया जणू काही अखिल ब्राह्मण समाजाने येथे नेमलेले प्रतिनिधी त्यांची भूमिका मांडत आहेत अशा थाटात ब्राह्मण किंवा कोणत्याही जातीवर घाऊक टीका का करत आहेत ते ही कळत नाही. <<<<
फारेण्डा, इथली लोक का करताहेत माहित नाही, पण त्यामागे गेल्या पन्चवीस वर्षात "ब्राह्मण" वा "ब्राह्मणत्व" या शब्दच्छलाद्वारे रुजवलेली विषवल्ली आहे. त्यान्चे १९८५ मधिलच ध्येय होते की इतका निरर्गल प्रचार करा ब्राह्मण याशब्दावर की "ब्राह्मण " वा "ब्राह्मणत्व" हा शब्दही शिवीसमान वाटू लागावा व अस्सल ब्राह्मणान्नादेखिल आपण ब्राह्मण आहोत हे सान्गायला भिती वाटावी. २०११ मधे त्याची फळे "इथे देखिल" दिसताहेत.
वर हे तोन्ड काढून कोर्टात देखिल निवेदने देणार कायद्यातील पळवाट शोधुन की आम्ही "ब्राह्मणत्वाच्या विरोधी" बोलत आहोत, "ब्राह्मण जातीविरोधी" नाही. अन ते कायद्याने मान्य होणार! असा सगळा कारभार आहे.
वरील लेखक हे "ब्राह्मणत्व" म्हणजे नेमके काय, व ते प्रत्येक जातीत कसे असू शकते/असते ते सोदाहरण सान्गत आहेत.
अन बाहेरील जगात मतान्च्या जोगव्याकरता, हिन्दू धर्मात फूट पाडण्याकरता, पूर्वापार चालत आलेला जे जे उच्च ते ते ब्राह्मणत्व हा अर्थ घालवुन जे जे नीऽच ते ते म्हणजे ब्राह्मणत्व असा नवा अर्थ रुजवताहेत.
बुद्धिभेदाच्या त्या रुजण्याला भलेभलेही कसे अन किती बळी पडले आहेत/पडताहेत ते वरील प्रतिक्रियान्वरुन दिसून येतेच आहे.
(हे माझे मत आहे.)
(हे माझे मत आहे.)<<< तुझंच
(हे माझे मत आहे.)<<<
तुझंच असणार ना.
कोणत्याही महत्त्वाच्या
कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला असावा.
सत्यनारायणाची पूजा ही अगदीच अलिकडची आहे- दीड दोनशे वर्षापुर्वीची. आपल्याकडे दक्षिण भारतातून आली आहे.
ह्या पूजेला हजर असणार्या प्रत्येकाला पूजेला बसणार्या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्या पुजार्याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता)
हा नियम नव्हता किंवा अब्राह्मण व्यक्तीही सत्यनारायण पूजा सांगत होत्या, हे लेखकाला कुठून समजले, याबद्दल उत्सुकता आहे.
बाकीच्या देशांतल्या तत्कालीन समाजपुरूषाला अशी वेल डिफाईन्ड अंगप्रत्यंगे नव्हती, किंवा त्यांना त्याची गरज वाटली नाही याचे नवल वाटते. बहुधा ते समाज तेव्हा (आणि अजूनही) अमिबापातळीवर असतील, हे मला समजले.
सदर लेखामुळे माझा दुपारचा फावला वेळ मजेत गेला. त्यामुळे मी 'मजेदार' या पर्यायाला आपले मत देण्याची शक्यता आहे.
>>>>पण सामाजिक गटांबद्दल असा
>>>>पण सामाजिक गटांबद्दल असा घाऊक तिरस्कार, अभिमान, गैरसमज करून घेण्याइतकी आमची बौद्धिक कुवत नाही हे ही तितकंच खरं!!! <<<<
वरदा, तुमच्या पोस्टला प्रतिक्रिया देण्याचे मी टाळत होतो. पण वरील लेखामधे तुम्हाला कसला घाऊक तिरस्कार अभिमान, गैरसमज दिसला, देव अन तुम्ही स्वतःच जाणे.
की नावाला राष्ट्रवादी असलेल्या टग्यान्च्या राज्यात "ब्राह्मणत्व" हा शब्दही त्याज्य व शिव्याशाप देण्याकरता आहे असे जे गेली दहावीसवर्षे चालले आहे, त्याच विचारसरणीचे तुम्ही पालन करता आहात का? अण्णाहजारेन्ना शिव्या घालायच्या असल्या तरी त्यान्ना मधे "ब्राह्मणत्वाला" घुसडवुन ब्राह्मणान्ना शिव्या दिल्याखेरीज काही बोलता येत नाही, अगदी टीव्हीवर देखिल. "एकही दिया' प्रकरणात ते आम्ही उघड डोळ्यान्नी बघितले / ऐकले.
तुमचा संस्कृती आणि
तुमचा संस्कृती आणि संस्कारांचा अभ्यास सखोल असुणही हे माहेत नसावे म्हंजे आश्चर्यच!
अजून नेहमीच्या यशस्वीं कलाकारांच्या प्रतिक्षेत.
साकेत.
>>>> हा नियम नव्हता किंवा
>>>> हा नियम नव्हता किंवा अब्राह्मण व्यक्तीही सत्यनारायण पूजा सांगत होत्या, हे लेखकाला कुठून समजले, याबद्दल उत्सुकता आहे. <<<<
ज्ञानेश, विषयान्तर होतय, पण आजच्या वृत्तपत्रातील बातमी पहा, पर्वती, सारसबाग व जन्गलीमहाराज मन्दिरामधे दानपेट्या फोडून चोर्या झाल्याची. बातमीप्रमाणे त्यातिल जन्गलीमहाराज मन्दिरातील पुजारी ब्राह्मण "जातीचा" नाहीये.
कोकणातील कोणत्याही खेडेगावात जा, ब्राह्मणाव्यतिरिक्त "गुरव" हे नामाभिधान प्राप्त झालेले अन्य ब्राह्मणेतर जातीतील पुजारी सर्रास आढळतील.
हल्ली घाटावर ब्राह्मणेतरान्पैकी, "भक्ते" ही नविन जमात उदयास येऊ लागली आहे.
देवीचे गोन्धळी, वासुदेव, पिन्गळे, यातिल कोणीही ब्राह्मण जातीचे नसते, अन तरीही विशिष्ट पूजापाठ्/विधी यान्चेकडून पूर्वापार करुन घेतले जातात.
खेडेगावातुन आजही, जिथे पौरोहित्य करणारा ब्राह्मण जातीचा माणूस उपलब्ध नसेल, (अन १९४८ नन्तरच्या परिस्थितित आजवर तसा तो नसतोच) तर गावातील्/पन्चक्रोशीतील ज्येष्ठ/ज्ञानी ब्राह्मणेतर वास्तुशान्तीपासून ते अन्त्यसंस्कारापर्यन्त्चे विधी त्या त्या वेळेस गरजे नुसार उरकतो.
आजही कोकणात ज्या मन्दिरान्ना हजारबाराशे वर्षान्ची पूर्वपिठीका आहे, तिथल्या देव/देवीच्या उत्सवात, गावातील/पन्चक्रोशीतील बाराही बलुते/मानकरी यान्चा उत्सवात सक्रिय सहभाग असतो, व त्यान्चे वार्षिक मानपान तिथे जाहीरपणे दिले जातात, व त्या मानपानात किती रोख रक्कमा आहेत याचा विचारही न करता, ते मानपान देव/देवीचा संस्थानचा प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात.
मात्र, जरी बाबासाहेबान्नी "आचारविचारात ब्राह्मणत्वाचे अनुकरण करा" असे इन्डायरेक्टलि/डायरेक्टली सान्गितले असले, तरी त्यान्चे अनुयायान्नी ते केले नाहीच, शिवाय बाबासाहेबान्नी जो हिन्दू धर्मातुन एक शाखा स्वरुपात तयार झालेला बौद्ध धर्म स्विकारला, त्या बौद्ध धर्मियान्चे "उपाध्येपण" अर्थात "भिख्खु"पण स्विकारल्याचेही उदाहरण मला कुठे दिसले नाही. तसे कुणी असतीलच तर सन्ख्यात्मक अभ्यास करायलाच हवा. कारण अजुनतरि त्यान्चे धार्मिक उद्योगात नेपाळहून वा अन्य प्रान्तिय आयातीत बौद्ध भिख्खूच आढळतात. असे का व्हावे हा देखिल विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की बौद्ध भिख्खून्ना भिख्खु बनण्यास जे "ब्राह्मणत्वाचे" आचारविचाराचे कडक नियम आहेत ते कठीण वाटतात म्हणून तिकडेही कुणि फिरकले नाही?
तुलनेत जैन लोकांत, सामान्य जैन व्यक्तिन्मधुनच जैन साधू/साध्वी बनण्याचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. असे का? हा फरक का हा देखिल विचारार्ह भाग आहे.
हे केवळ माहितीकरता म्हणून सान्गितले.
शेवटी प्रश्न केवळ हिन्दून्मधीलच नव्हे तर सर्वच धर्मातील "ब्राह्मणत्वाचा" आहे
विषयान्तराबद्दल क्षमस्व.
( मी अजुन थोडे विषयांतर
( मी अजुन थोडे विषयांतर करतो.. मुळात मूर्तीरुप देव हे बामणांचे कधीच नव्हते.. यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, मित्र, सविता... असले निराकारी आणि यांची देवळं, मूर्तीपूजा आजही नाही... मूर्ती असनारे सगळे देव शंकर, शिवलिंग, मारुती, ग्रामदेवता या मूळच्या अवैदिक धर्मातल्या.. म्हणून तिथे ब्राह्मणेतर पुजारी असतात.. ब्राह्मनानी फक्त पैसा देवणार्या मोथ्या देवळातून घुसखोरी केली. विष्णू, कृष्ण, राम, गणपती, अंबाबाई.. अशी .. त्यामुळे इथे मात्र अगदी गावातल्या लहान देवलातही ब्राह्मण पुजारीच आढळतात... आणि आजचे ब्राह्मण पार अगदी ऋग्वेदापासून उपनिषदापर्यंत सगळं स्वतःच म्हणजे ब्राह्मणानी निर्मिल्याचं तोंड फाटेस्तोवर सांगत असतात . आजचा हिंदु धर्म म्हणजे वैदिक बामणानी अवैदिकांच्यावर केलेली घुसखोरी यापलीकडे काहीही नाही. जैन, बौद्ध हे स्वतंत्र धर्म आहेत, हे कायद्यानेही मान्य केले आहे. हिंदु धर्मातही या धर्मांबद्दल फार वाईट लिहिलेले आहे. शिवलीलाम्रुतात जैनांवर टीका आहे. बौद्धाचीही चुकीचा धर्म साम्गनारा म्हणून पुराणकथांमध्ये उल्लेख आहे. त्यातली एक कथा मायबोलीवर अतिथी देवो भव या नावाने दिली आहे. )
या विषयावरले हे माझे हेमाशेपो.
लिंबूभाऊ, एकच पोस्ट दोन तीनदा
लिंबूभाऊ, एकच पोस्ट दोन तीनदा नका ना एडीट करू प्लीज! काहीतरी नवीन पेटलं असेल या अपेक्षेने यवं तर तेच ते वाचायला मिळतं!
(No subject)
<<मुळात मूर्तीरुप देव हे
<<मुळात मूर्तीरुप देव हे बामणांचे कधीच नव्हते.. यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, मित्र, सविता... असले निराकारी आणि यांची देवळं, मूर्तीपूजा आजही नाही... मूर्ती असनारे सगळे देव शंकर, शिवलिंग, मारुती, ग्रामदेवता या मूळच्या अवैदिक धर्मातल्या.. म्हणून तिथे ब्राह्मणेतर पुजारी असतात..>>
जामोप्या, तुम्हाला पण तीच विनंती आहे. धर्मेतिहासाची नीट माहिती असल्या शिवाय काहीही शेंडाबुडखा नसणारी विधानं करू नका.
मुळातच भारतीय धर्माची वाटचाल वेदातील निराकार देवता + यज्ञ + जनसामान्यांचा लोकधर्म अशा पासून ते बौद्ध, जैन व इतर संन्यासी पंथांचा उगम, या सर्व धर्मांत मूर्तीपूजेचे आगमन, आणि मग ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणून ओळखतो त्या स्वरूपात वैदिकोत्तर धर्माचे हळूहळू झालेले परिवर्तन, ते होत असताना उपासना पद्धतींमधे, देवतास्वरूपांमधे, देवताकार्यांमधे झालेले मूलगामी बदल, या धारेत येऊन मिसळलेले अनेक अवैदिक देव-देवता, उपासना पद्धती आणि मग या सगळ्या घडामोडीतून उदयाला आलेले पुराण-ग्रंथ आणि मग या आपल्याला ओळखीच्या असणार्या हिंदू धर्माची पुढील वाटचाल असा काहीसा हा साधारण ३५०० वर्षांचा प्रवास आहे. अजूनही संतोषीमातेसारख्या नवनवीन देवता, शिर्डी-तिरुपती सारख्या नवीन तीर्थयात्रा यांची भर धर्मात पडतेच आहे. आणि जशी हिंदूंनी जैन बौद्धांवर टीका केलीये तशी त्यांनीही 'हिंदू'धर्मावर टीका केलीच आहे, शिवाय हिंदू देवतांना त्यांच्या देवताप्रभावळीत हीन स्थान दिले आहे. या बाबतीत सगळे धर्म/उपासना पंथ सारखेच आहेत. तेव्हा अशी कसलाही आधार नसलेली विधानं करून इथे काड्या कशाला टाकता?
लिंबूभाऊ, तुम्हाला माझ्या विचारसरणीबद्दल काय समजायचे ते खुशाल समजा. मला स्वतःच्या सामाजिक ओळखीबाबत कसलाही अभिनिवेश, गंड, कमीपणा, अहंकार नाही. इतरांना त्याविषयी अडचण असेल आणि जर कुणी त्रास द्यायचा/ खोडी काढायचा प्रयत्न केला तर त्यांना गप्प बसवायलाही मी समर्थ आहे. पण त्यामुळे माझी वागणूक्/विचार बदलू शकत नाहीत. मी कुठल्याही राजकीय गटाचं समर्थन करत नाही. पण सध्या माबोवर जे ब्राह्मणत्व/ ब्राह्मण या विषयावरील अनाभ्यासपूर्ण अभिनिवेशात्मक चर्चेचं बंड माजलंय त्याविषयी मी बोलतेय. या लेखकाचे सगळे लेख आणि त्यावरील बहुतेक प्रतिसाद हे फक्त अगदी कडाडून ब्राह्मणस्तुती आणि कडाडून ब्राह्मणद्वेष या दोन गटांचंच प्रतिनिधित्व करतात. जो कुणी तिसरा सूर काढेल त्याला या दोन्हीपैकी एका गटात घुसडण्याची घाई इतरांना असते. कुणाचं मत वेगळं असू शकतं हेच तुम्हा लोकांना मान्य नाही.. आणि हे दोन्ही गट सगळी विधानं फक्त घाऊक स्वरूपातच करताहेत. वैयक्तिक मतं आणि वैयक्तिक अनुभव म्हणजे सर्वसिद्ध अंतिम सत्य आहे अशा थाटात. माझा आक्षेप याला आहे
( असेल.. तुमचेही खरे असेल..
( असेल.. तुमचेही खरे असेल.. तुम्ही तुमचे खरे माना, आम्ही आमचे संदर्भ खरे मानु. वाचणार्यासमोर आता दोन्ही संदर्भ आहेत. तो ज्याच्या त्याच्या मर्जीने ठरवेल. )
ओक्के, सॉरी बेफिकीरभाऊ. (अहो
ओक्के, सॉरी बेफिकीरभाऊ. (अहो काय करणार? काम करता करता मधेमधेच टाईप करताना मुद्दे विसरले जातात्/नन्तर आठवतात, पण काळजी घेईन)
>>>> पण सध्या माबोवर जे
>>>> पण सध्या माबोवर जे ब्राह्मणत्व/ ब्राह्मण या विषयावरील अनाभ्यासपूर्ण अभिनिवेशात्मक चर्चेचं बंड माजलंय त्याविषयी मी बोलतेय. <<<<
अनाभ्यासपूर्ण हे तुमचे वैयक्तिक मत म्हणून ठीक आहे हो.
पण मला त्याच लेखात तथ्य वाटले ना!
ब्राह्मण्/ब्राह्मणत्व या शब्दान्ची वैचारिक अॅलर्जीच असणे, नव्याने बाधा झालेली असणे मी समजू शकतो.
पण ब्राह्मण/ब्राह्मणत्व म्हणजे काय असू शकते/असु शकेल यावरील लेखकाने मते मान्डलि म्हणजे त्याने कडाडून ब्राह्मणस्तुती केलि वा ब्राह्मणद्वेष केला हे ग्रुहितक कसे काय येते? प्रतिसादात काय वाट्टेल ते येऊ शकते, पण वरील लेखकाने जातीविरहीत "निखळ ब्राह्मणत्व" म्हणजे काय हेच सान्गू पाहिलय. ते जराही समजुन न घेता तुम्ही प्रतिक्रिया देताहात असे भासते आहे.
पुन्हा एकदा, विषयान्तराबद्दल क्षमस्व!
Pages