Submitted by डॅफोडिल्स on 5 December, 2011 - 01:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मारी बिस्किटे २०० ग्रॅम
ड्रिंकिंग चॉकलेट १००ग्रॅम
पिठीसाखर ४०० ग्रॅम
डेसिकेटेड खोबरे १०० ग्रॅम
लोणी ३० ग्रॅम
क्रमवार पाककृती:
मारी बिस्किटांचा मिक्सर मध्ये चुरा करुन घ्या व बारीक चाळणीने चाळुन घ्यावा.
बिस्कीटाच्या चुर्यात ड्रिंकिंग चॉकलेट, अर्धी पिठीसाखर व लागेल तसे दुध घालून कणकेसारखे मळुन गोळा करुन ठेवा.
पोळपाट व लाटण्याला तुपाचा हात लावुन गोळा पोळीसारखा लाटुन घ्यावा.
लोणी, उरलेली पिठी साखर व डेसिकेटेड खोबरे एकत्र करुन तयार करुन त्या लाटलेल्या पोळीवर सर्वत्र एकसारखे लावावे.
मग पोळीचा रोल करुन फ्रीज़ मधे गार करण्यास ठेवावे.
१ तासाने बाहेर काढुन हव्या त्या मापाच्या जाडसर वड्या कापाव्यात. झटपट स्विस रोल तय्यार.
वाढणी/प्रमाण:
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा:
लहान मुलांसाठी बनवताना आणखी लहान आकाराचे बनवता येईल.
बच्चा पार्टी असेल किंवा अचानक कुणी येणार असेल तर झटपट करता येण्यासारख्या आहेत.
माहितीचा स्रोत:
जुन्या मायबोलीतुन
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त फोटो!! डॅफो, एकदम तों पा
मस्त फोटो!! डॅफो, एकदम तों पा सु
ओएम्जी!!!! कसले सह्ही
ओएम्जी!!!! कसले सह्ही दिसतायत. आणि रेसिपीही किती सोप्पीये. जरा लोण्याला पर्याय सुचवा ना. बाजारच्या लोण्याला एकप्रकारचा वास येतो.
रच्याकने, यात जॅमही लावतात ना?
सुरेख आणि सोप्पी ही! मस्तच!
सुरेख आणि सोप्पी ही! मस्तच!
मस्त दिसतायत
मस्त दिसतायत
काय सह्हीये प्रकार! सोप्पाय
काय सह्हीये प्रकार! सोप्पाय करायला आणि खायला मस्त.
छान... सोपंय. किती दिवस
छान... सोपंय. किती दिवस टिकतात या? म्हणजे जरा जास्त करता येतील!
खरंच झटपट आणि छानही.
खरंच झटपट आणि छानही.
सह्हीये प्रकार!
सह्हीये प्रकार!
खरच ं एक्दम तोपासु.. मस्त च.
खरच ं एक्दम तोपासु.. मस्त च.
काय सुरेख प्रकार दिसतो आहे
काय सुरेख प्रकार दिसतो आहे हा!
मस्त आणि सोप्पी वाटतेय कृती.
मस्त आणि सोप्पी वाटतेय कृती. नक्की करून बघणार.
मस्त!
मस्त!
कधीच चुकणार नाही असा
कधीच चुकणार नाही असा नाविन्यपुर्ण पदार्थ..
यशने सेम टू सेम पाकृ इकडे
यशने सेम टू सेम पाकृ इकडे लिहिली आहे. डॅफो, तू यशची आत्या तर नाहीस ना?
मंजुतै वर म्या सपश्ट
मंजुतै वर म्या सपश्ट लिव्ह्लंय की जुन्या मायबोलीतुन

ट्राय करुन फोटो पण जुनाच टाकलाय. का चेष्टा करताय म्या पामरीची
का चेष्टा करताय म्या पामरीची
का चेष्टा करताय म्या पामरीची >> डॅफो, पोस्टीतली स्मायली नाही का पाहिली?
यशने त्याच्या पाकृत माहितीचा स्रोत 'माझी आत्त्या' असं लिहिलंय, म्हणून मी तू त्याची आत्त्या का? असं विचारलं, बाकी काही नाही. तुझ्या विपूतही मी हेच लिहिलं आहे.
झकास
झकास
छान फोटो!
छान फोटो!