((खालील लेख http://agphadnavis.blogspot.com/2011/11/blog-post.html या ठिकानावरून मूळ लेखकाच्या पुर्वपरवानगीने टापलेला आहे. माझ्या मनातले जणू इथे उतरवले आहे त्यामुळे मी परत लिहिण्याचा खटाटोप केला नाही.
साम्प्रत काळात अमेरिका मध्य एशियात का तळ ठोकून आहे ते समजते. तसेच पाकिस्तान सांस्कृतिकदृष्टया भारताचाच भाग असल्याने तिथल्या गृहयुद्धाच्या आगीची झळ भारताला लागणार हेही कळते.))
पाकिस्तान हा मुलुख जरी मोठा असला तरी तो आर्मीच्या तावडीत आहे. आर्मी आणि तेथील मोठे जनरल हा पाकिस्तान सांभाळतात. हे जनरल सहसा पंजाबी असतात आणि त्यातही मुस्लीम समाजातील बरेलवी पंथातले असतात. या पंथास दर्ग्यावरजाऊन पूजा करणे, पीर फकीर, उरूस वगैरे करणे मान्य आहे म्हणून देवबंदी आणि वहाबी संप्रदाय बरेलवीलोकांना काफिर म्हणतात. हे पंजाबी बरेलवी जमीनदार लाहोर ते इस्लामाबाद येथील १७ जिल्ह्यांमधून नियुक्त होतात. इतर भागातील सैनिक आर्मीत मोठ्या पदावर सहसा जाऊ शकत नाहीत. त्यामुळे असे म्हणता येईल कि पाकिस्तान हे पंजाबी आर्मीची वसाहत आहे. या बरेलवी संप्रदाय आणि पंजाबी वृत्ती ची खासियत आहे कि यांना इस्लाम पण हवा आणि राष्ट्रवाद पण हवा. म्हणजे यांना इस्लामी राष्ट्र हवे होते.
हि गरज कशी काय उद्भवली यासाठी आपला इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.
भारताचा भूगोल आणि त्याचा इतिहासावर झालेला परिणाम
भारत म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एक असलेले राष्ट्र आहे. एखादा कांदा असतो, तश्या भारताच्या पाकळ्या आहेत. सर्वात बाहेरची लेयर म्हणजे गांधार प्रांत - आजचा दक्षिण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान चा उत्तरपश्चिम प्रांत एन.डब्ल्यू.एफ.पी. सिंधुनदी च्या पश्चिमेचा इलाखा. पेशावर पासून काबुल पर्यंत. हा इलाखा म्हणजे "भारताची" नैसर्गिक, सामरिक आणि शास्त्रीय सीमा. ह्याच्या पलीकडे "बाहेर" चा प्रदेश सुरु होतो. ह्या प्रदेशाच्या बाहेरच्या लोकांनी केलेले आक्रमण म्हणजे "परकीय" आक्रमण. पारशी, अरब, मोगल, इंग्रज, हूण, शक, कुशाण, ग्रीक वगैरे सगळे लोक "परकीय" होते कारण ते गांधारच्या बाहेर चे लोक होते..
गांधारकर लोकांनी पंजाबवर केलेले आक्रमण म्हणजे परकीय आक्रमण नव्हे, ती भारतातली अंतर्गत लढाई. गजनी आणि घोरी च्या आधी सुद्धा काबुल (कापिषा हे संस्कृत नाव) चे राजे केकय (पंजाब) वर आक्रमण करत असायचेच. त्या न्यायाने, गजनी आणि घोरी यांनी "परकीय" म्हणणे उचित नाही. त्यांनी परकीय रिलीजन स्वीकारला, पण लोक भारतातलीच होती.
अशी जर वर्षे मोजली तर मूळ भारतावर "परकीयांचे" राज्य फक्त ८०० वर्षे होते, ५००० वर्षात. म्हणजे जवळपास फक्त २०% वेळ आपण "परकीयांच्या राजकीय अधिपत्याखाली होतो, ८०% आपण स्वतंत्र होतो. इच्छुक लोकांनी ग्रीक-शक-कुशाण-हूण-अरब-मोगल-इंग्रज यांच्या तारखा तपासून बेरीज करून बघावी.
गजनी-घोरी वगैरे मंडळी म्हणजे बाटलेले ऋषी पतंजली आणि ऋषी पाणिनी चे वंशज. खिलजीवंश पण क्रमू नदी (आजची वजिरीस्तान मधली कुर्रम नदी) च्या काठची जमात. लोकांनी नकाशा जरूर तपासावा, इतिहास चटकन लक्षात येईल. सोमनाथ फोडणाऱ्या मेहमूद गजनीच्या २०-२५ वर्षे आधीपर्यंत गजनी शहरावर "राजा शिलादित्य" राज्य करत होता. त्यावरून त्या भागाचे "भारतीयत्व" लक्षात येईल. या शिलादित्याचे पूर्वज पण मेहमूद सारखेच पंजाबवर आणि इतर आसपासच्या राजांवर चढाई करायचे, पण मेहमूद सारखा विध्वंस कुणी केल्याचा उल्लेख इतिहासात नाही. इस्लाम स्वीकारल्या नंतर गजनी आणि तिथल्या एकंदर सर्व भावी राजांच्या आणि लोकांच्या "चित्त-वृत्ती" मध्ये मूलभूत बदल झाला आणि तिथले लोक हे भारतासाठी कायमचे शत्रू होऊन बसले. ते शत्रुत्व अजून ही तालिबान च्या रूपाने सुरु आहे. असो.
भारत म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एक असलेले राष्ट्र आहे. गांधार पासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंध पासून आसाम पर्यंत राजकीय एकता इतिहासात फार काल नव्हती. आणि सांस्कृतिक एकतेवर आधारित या राष्ट्रास राजकीय एकतेचे इतके वेद पण नव्हते.
१. मौर्य कालीन एकता - चंद्रगुप्त-बिन्दुसार-अशोक यांनी मिळून पादाक्रांत केलेला संपूर्ण भारत (१५० वर्षे)
२. मोगल कालीन एकता - औरंगजेबाने जिंकलेला संपूर्ण भारत (फक्त १७ वर्षांकरिता)
३. इंग्रजांनी जिंकलेला अखंड भारत - ९९ वर्षे (१८४९ ते १९४७)
गेल्या ५००० वर्षात फक्त २६६ वर्षे भारत हा राजकीय दृष्ट्या एक राष्ट्र म्हणून राहिला आहे. आज "भारतामध्ये" ८ वेगळी राष्ट्रे आहेत - भारतीय गणराज्य, पाकिस्तान चे इस्लामी गणराज्य, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश. असा भारत आज नाही, याचे कारण म्हणजे इंग्रजांनी १९३७ आणि १९४७ साली केलेल्या दोन फाळण्या. १९३७ मध्ये ब्रह्मदेश वेगळा केला आणि १९४७ पाकिस्तान (पूर्व आणि पश्चिम) ची निर्मिती करून उरलेला भारत देखील तोडला. त्या फाळणीमुळे आजचे प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाले आहेत. आणि ती फाळणी समजावून घेण्यासाठी मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे मोगलांशी असलेले संबंध समजावून घेणे आवश्यक आहे.
जेव्हा नजीबउद्दौला ने अब्दाली ला आमंत्रण दिले, त्याच वेळेस फाळणीचे बीज पेरल्या गेले. तर वर म्हंटल्या प्रमाणे मुहम्मद घोरी नंतर ही पठाण लॉबी गंगेच्या खोऱ्यात स्थिरावली आणि दिल्ली ही त्यांच्या सल्तनतीची राजधानी बनली. पांडवांच्या युधिष्ठिरानंतर दिल्लीला (तेव्हाचे इंद्रप्रस्थ) राजधानी बनवणारा पहिला राजा म्हणजे मुहंमद घुरी आणि त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक. ३०० वर्षे एकंदर भारतात अराजकता होती. लूट, कत्तली, धर्मांतरे, देवळांची-विद्यापीठांची-स्तूपांची-मठांची-मूर्तींची तोडफोड निरंकुश सुरु होती.
३०० वर्षांनंतर १५०० च्या सुमारास या लोकांना शह देणाऱ्या दोन शक्ती भारतात होत्या. राजपूत आणि मोगल. एक आतली आणि एक परकीय. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने लोदीवंशाला हरवून दिल्ली वर कब्जा केला. मोगल हे उघडपणे परकीय होते, तेव्हा दोन भारतीयांनी (राजपूत आणि पठाण) मिळून बाबराच्या मुलाला हाकलून दिले. हुमायूनला हाकलल्या नंतर राजपुतांनी पठाणांना सुद्धा हाकलून दिले आणि त्यांचा सेनापतीने स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि "सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमू" दिल्लीच्या सिंहासनावर बसला.
पानिपतच्या दुसऱ्या लढाई बैरमखानच्या मदतीने १३ वर्षीय अकबराने हेमुला हरवले आणि दिल्लीचा बादशाह झाला. अकबराने स्थिरता आणली, राजपूत आणि पठाण दोघांना पाळून शांत ठेवले. जिझिया रद्द केला.आणि एक मोठं साम्राज्य स्थापन केले. अकबर-जहांगीर-शाहजहान-औरंगझेब यांनी ही नीती चालू ठेवली आणि पठाणांना सत्ते पासून वंचित ठेवले. काजी आणि उलेमा (इस्लामी धर्मगुरू) यांना पठाण-मोगल काही फरक पडत नाही, जोपर्यंत राजा मुसलमान आहे. म्हणून या सगळ्या झगड्यात काजी लोक तटस्थ होते.
१७व्या शतकात दक्षिणेत शिवछत्रपतींचा प्रादुर्भाव झाला आणि समीकरणे बदलू लागलीत. शिवछत्रपतींची खरी "महिमा' त्यांच्या मृत्युनंतर दिसते. त्यांच्या मृत्युनंतर अवघ्या ५०-६० वर्षात मोगलांची सत्ता केवळ लाल-किल्ल्यापर्यंत मर्यादित राहिली. शिवाजी ने निर्माण केलेली 'मुवमेंट" इतकी मोठी झाली कि ती मोगलांचा "पर्याय" आणि उत्तराधिकारी म्हणून सबंध भारतात ती मान्य झाली. इथे काजी-मुल्लाह लॉबी मधील लोकांचा तटस्थपणा तुटला.
पठाण लोक रोहीलखंडात मोठ्या प्रमाणात होते. रोहिलखंड म्हणजे आजचा पश्चिम यु.पी. देवबंद, आझमगढ, गोरखपूर आग्रा वगैरे सगळे आजची "कुप्रसिद्ध" स्थळे इथेच आहेत. औरंगझेबाच्या दक्षिण मोहिमेत इथल्या पठाणांना खूप फायदा झाला (आर्थिक). मोगल क्षीण झाले आणि ३०० वर्षांपूर्व हातातून गेलेली सत्ता परत मिळवण्याचे वेध पठाणांना लागले. आता कॉम्पीटीशन सुरु झाली मराठे आणि पठाण यांच्या मध्ये. एक मोठी सत्ता लयाला जाते तेव्हा ती पोकळी भरून काढायची ची चढाओढ लागते, ती आपण इथे बघतोय. रोहीलखंडातल्या पठाणांनी गांधार मधल्या पठाणांची मदत घ्यायची ठरवले आणि अब्दालीला आमंत्रण दिले. यात काजी लोकांनी पूर्ण सहकार्य केले आणि या लढाईला "जिहाद" चे रूप दिले. "काफिर" हिंदू भारताला बळकावत असताना उत्तरेतल्या मुसलमान राजांना एकत्र आणायचे मोठे काम उलेमा आणि काजी जमातीने केले.
गेल्या लेखमालेत मराठ्यांची चूक इथे परत सांगतो. रोहिलखंड, अवध आणि बंगाल "साफ" केल्याशिवाय पंजाबात जाणे ही मराठ्यांची सर्वात मोठी घोडचूक. या २ प्रांतातल्या मुसलमान राजांनी (नजीब आणि शुजा) अब्दालीला या जिहाद मध्ये मदत केली. पानिपत झाले आणि पदरात काहीही न पाडून घेता, उलट तीव्र हानी सोसून अब्दाली परत गेला. १० वर्षात मराठे परत आले, तो पर्यंत अवध इंग्रजांनी जिंकला होता बक्सर च्या लढाईत आणि नजीब म्हातारा होऊन मेला होता. पण इथला उलेमा संप्रदाय अजून ही होता जो "हातातून" गेलेल्या सत्तेच्या सोनेरी आठवणीमध्ये रमला होता. या उलेमा लोकांनी पुढे देवबंद वगैरे मदरसे उघडले आणि नंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठ, सैय्यद अहमद खान, मुस्लीम लीग वगैरे सुरु केले. पाकिस्तान च्या कल्पनेला पूर्ण पाठींबा देणारी लोक इथलीच होती, पंजाब आणि बंगाल मधली नाही.
इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला होतं, त्यामुळे इंग्रज गेल्यानंतर उद्भवलेल्या समस्या समजावून घेण्यासाठी मराठ्यांचा इतिहास आणि त्यांचे मोगलांशी असलेले संबंध समजावून घेणे अत्यावश्यक आहे. शिवाजीच्या काळात मराठे नेहमी दक्षिण-विरुद्ध उत्तर असा संघर्ष करीत. मोगलांविरुद्ध दक्षिणेतल्या राजांनी एक व्हावे ही नीती शहाजी राजांची. ती शिवाजी व संभाजीने पुढे चालवली. औरंगझेब मेल्यानंतर मात्र, हा संघर्ष उत्तर विरुद्ध दक्षिण न राहता भारतीय विरुद्ध परकीय असा झाला.
मराठे हे मोगलांचे सर्वात विश्वासू मित्र झाले. मराठे (भारतीय) विरुद्ध परकीय (इंग्रज) आणि हिंदू (मराठे) विरुद्ध बाटलेले हिंदू (काजी लॉबी आणि पठाण लॉबी) असा दुहेरी संघर्ष भारतात सुरु झाला. एक सूचना - इथे "हिंदू" म्हणजे भारतीय. हिंदू रिलीजन विषयी बोलणे होत नाहीये, हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. असाच संघर्ष हेमचंद्र विक्रमादित्य करत होता. परकीय सत्तेला (मोगलवंशीय हुमायून ला) हिंदू (राजपूत) आणि बाटगे हिंदू (पठाण) यांच्या संयुक्त शक्ती ने हाकलून दिले. नंतर, राजपुतांनी पठाणांना पण हाकलून दिले.
अगदी असाच गेम मराठे-पठाण यांच्यात झालेला दिसतो. परकीय सत्तेला हरवून (मोगलांना) मराठे या बाटलेल्या हिंदूंना पण उत्तर भारतातून हुसकावून लावायचा प्रयत्न करीत होते. इंग्रज नसते आले, तर हे झाले सुद्धा असते. पठाणांचे ७०० वर्षांचे गंगेच्या आणि सिंधूच्या खोऱ्यावरचे वर्चस्व मराठ्यांनी आणि नंतर शिखांनी उचकटून फेकले होते. ही एक स्लो-प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस इंग्रजांनी अचानक पणे ती पूर्ण व्हायच्या आत थांबवली. म्हणून आजच्या समस्या (हिंदू-मुस्लीम प्रॉब्लेम आणि त्याचेच अंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे भारत-पाकिस्तान समस्या) वगैरे भारतात आहेत.
शिवाजी-नानासाहेब-माधवराव-रणजितसिंह या चौघांचे राजकारण समजावून घेतल्या शिवाय पाकिस्तान आणि रिलेटेड समस्या कायमच्या सोडवता येणे शक्य नाही. म्हणून हा इतिहास सांगायचा खटाटोप.
या समस्येला ला मदत करणारे क्रिमिनल घटक
काबुल-पेशावर-कराची-कोंकण-घाट चढून हैदराबाद-विशाखापट्टण-शाम (म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया वगैरे देश) हा खूप जुना अफूचा ट्रेड रूट आहे. खूप जुना म्हणजे कमीतकमी ५००-७०० वर्षे जुना. मुंबई अंडरवर्ल्ड हे या चेन चे एक प्रमुख केंद्र आहे. वरील दिलेल्या लिंक वरून लक्षात येते कि ड्रगट्रेड हा तालिबान चा एक खूप मोठा आर्थिक स्त्रोत होता. अजूनही आहे. त्यामुळे या व्यापारातील लॉबी बघणे आणि त्या सांप्रत काळात अश्या उत्क्रांत का झाल्या याचा एक जुजुबी इतिहास बघणे आवश्यक आहे.
पाकिस्तान च्या निर्मितीत इतर काही घटक आहेत जे खूप महत्वाचे आहे त्यातला एक म्हणजे पाश्चात्य आणि रशिया यांचात मध्यआशियात आणि पूर्वयुरोपात चालणारा १८०० नंतरचा ग्रेट गेम. त्या विषयी पुढे बोलूच.
समुद्रउल्लंघनबंदी वगैरे रूढींमुळे आणि इस्लामी शासन असल्यामुळे या मार्गावर हिंदू व्यापाऱ्यांचे वर्चस्व हळूहळू नाहीसे झाले. आणि एक नेटवर्क बनले आहे व्यापाऱ्यांचे जे पिढ्यानपिढ्या या धंद्यात आहे. फाळणी झाली तरी हे नेटवर्क अबाधित राहिले. परंतु हा व्यापार बेकायदेशीर झाला. शेवटी कायदा म्हणजे काय हो? शेकडो वर्षे चालू असलेले काही तरी कायदा बदलला कि बेकायदेशीर होते. धंदा तर उत्कृष्ट आहे पण सांप्रत काळात बेकायदेशीर. याचा फायदा म्हणजे कर वाचतो (एकदा एक गोष्ट बेकायदेशीर ठरविल्यावर त्यावर कर वसूल करणे सरकार ला अशक्य).
म्हणून हे लपून छपून ट्रांसपोर्ट करणारी एक लॉबी बनली. अशीच लॉबी अरबस्थानात, कराची जवळील पाकिस्तानात आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर आहे. हा व्यापार करणाऱ्यांचे हे नेटवर्क आहे. एकमेकांचे जातबंधू. यांचा धंदा आणि संबंध संप्रदाय, राष्ट्र वगैरे सर्वांपेक्षा वरचे आहेत. जसे आधी सांगितले कि फाळणी आधी हि संपूर्ण चेन बऱ्यापैकी अबाधित होती. पण फाळणी मुळे काही दिवस हि तुटली. हळूहळू ती परत जुळली. करीम लाला ने ६०-७० च्या दशकात सोन्याचे स्मगलिंग सुरु केले. रूट तोच, हळूहळू परफेक्ट बनला. तिथून माल चढवणारे, इथे उतरवून घेणारे, त्यांचे कस्टम वाल्यांशी संबंध तटरक्षक दलाशी संबंध हे सगळे त्यात आले. हे एक प्रचंड विणलेले जाले आहे. आणि समहाऊ यातले सगळे लोक ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे, सर्व मुस्लीम आहेत. असो.
७०-८२ वगैरे हाजी मस्तान आला. याने सोन्या-चांदी-वगैरे सोबत दारूची पण स्मगलिंग सुरु केली. हाजी कारीमचा ड्रायवर. दाउद हाजीचा ड्रायवर. ८० च्या दशकात अफगाणिस्तानात युद्ध सुरु झाले आणि अमेरिकेने पाकिस्तान आणि सौदी ला मदत केली रशिया ला हरवायला. यात अमेरिकाचा रोल (पैसे आणि शस्त्रपुरवठा) सोडून म्हणजे पाकिस्तान करीत असलेल्या अण्वस्त्रांची आणि अफूची स्मगलिंग. मुजाहिदीन लोक अफू विकून पैसा उभारू लागले, आणि भारत आणि दक्षिणपूर्व आशिया मार्केट होतेच. तिथून पुढे अमेरिका (ते वेगळे नेटवर्क आहे). अफू ची हेरॉईन करून विकणे जास्त फायदेशीर. म्हणून ते हि हे लोक शिकले.
भारतातील दाउद वगैरे मंडळी त्या ग्लोबल चेनचा हिस्सा बनली. १९९३ पासून तर दाउद आय-ए-आय चा हस्तक बनला आणि त्यामुळे त्यास तालिबान, अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा वगैरे अंतरराष्ट्रीय जिहादी ग्रुप्सचे अंग बनला. ज्या रूट ने कसाब वगैरे भारतात आले, १९९३ मध्ये तोच रूट होता. माणसे पण त्याच नेटवर्क ची होती. कोंकण किनारपट्टी वरील पश्चिमेला होणारी स्मगलिंग होते हे सर्वांना ठाऊक आहे.
आता प्रत्येकाने २+२ = ? हे गणित सोडवून घ्यावे. हे हळूहळू झाले आहे, आणि ठरवून झाले आहे, असे म्हणत नाही. पण जागतिक परिस्थिती अशी उत्क्रांत होत गेली. या पार्श्वभूमीवर ९० च्या दशकात झालेले एनकाउंटर आठवावे आणि मेलेल्या गुंडांची टोळी व त्या टोळीचे दाउदशी असलेले संबंध तपासावे. थोडे कष्ट घ्यावे लागतील पण अशक्य नाही आणि हे सामरिक अथवा शासकीय गुपित वगैरे पण नाही. अर्थात हे सगळे इतके सोपे पण नव्हते आणि यास बाकी अनेक बाजू पण आहेत. मी फक्त एक दृष्टीकोन देत आहे.
या व्यवस्थेस पर्याय म्हणून उभारणारे हिंदू गुंड होते. पण त्यांना लोकल ठेवण्यात आले. आंतराष्ट्रीय नेटवर्क पर्यंत गेलेला एकमेव हिंदू गुंड म्हणजे छोटा राजन. आणि त्यास रॉ आणि आय.बी ची साथ १९९३ नंतर होती असे बोलले जाते. अश्या गोष्टींचा पुरावा असणे हे गुप्तचर संस्थांचे अपयश आहे हे इथल्या काही लोकांना कळत नाही आहे. इतर हिंदू टोळ्यांना हे अंतरराष्ट्रीय नेटवर्क मुंबई पोलिसांनी हातात घेऊ दिले नाही, फक्त याच टोळ्यांचा (नाईक, पुजारी, गवळी इत्यादी) खातमा का केला गेला? दाउद च्या टोळ्यांना व त्याच्या नेटवर्क ला हात का नाही लावला गेला?
हा प्रश्न आहे. या भारताबाहेरील क्रिमिनल नेटवर्क वर हिंदू गुंडांचे अधिराज्य असणे अत्यावश्यक आहे. इच्छुकांनी इस्ट-इंडिया-कंपनीचा इतिहास वाचवा. तसेच अरबांचा इतिहास देखील या बाबतीत शिकण्यासारखा आहे. इंग्लंड सरकार (आणि युरोपातील समस्त युरोपीय सरकारे) समुद्रातील चाचेगिरीला अधिकृत मान्यता आणि आर्थिक आणि सामरिक सपोर्ट देत असत. हि गोष्ट हिंदी महासागरात १८०० पर्यंत होती. मराठ्यांचे आरमार शक्तीहीन झाल्यावर आणि माचलीपट्टण ते कलकत्ता हि पूर्व किनारपट्टी जिंकल्यावर (साधारण १७७० नंतर) चाचेगिरी इंग्रजांनी बेकायदेशीर केली). हिंदी महासागरातील ट्रेडरूट इंग्रजांनी अश्याच समुद्रीस्मगलिंग आणि लुटालूट करणाऱ्या चाच्यांकरवी हातात घेतले आहे. सलग १५० वर्षे या गुंडांना त्यांच्या सरकारचे समर्थन होते आणि इतर संस्कृतींच्या गुंडांना व त्यांच्या व्यापाऱ्यांच्या नेटवर्क ला त्यांनी यांच्याकरवी नेस्तनाबूत केले. हीच गोष्ट ७व्य शतकात भारतावर आक्रमण करावयाच्या काही दशके अगोदर अरब व्यापाऱ्यांची. या बद्दल नंतर कधीतरी चर्चा करू.
पाकिस्तान ची सांप्रत काळातील समस्या
पाकिस्तान हा मुलुख जरी मोठा असला तरी तो आर्मीच्या तावडीत आहे. आर्मी आणि तेथील मोठे जनरल हा पाकिस्तान सांभाळतात. हे जनरल सहसा पंजाबी असतात आणि त्यातही मुस्लीम समाजातील बरेलवी पंथातले असतात. या पंथास दर्ग्यावरजाऊन पूजा करणे, पीर फकीर, उरूस वगैरे करणे मान्य आहे म्हणून देवबंदी आणि वहाबी संप्रदाय बरेलवीलोकांना काफिर म्हणतात. हे पंजाबी बरेलवी जमीनदार लाहोर ते इस्लामाबाद येथील १७ जिल्ह्यांमधून नियुक्त होतात. इतर भागातील सैनिक आर्मीत मोठ्या पदावर सहसा जाऊ शकत नाहीत. त्यामुळे असे म्हणता येईल कि पाकिस्तान हे पंजाबी आर्मीची वसाहत आहे. या बरेलवी संप्रदाय आणि पंजाबी वृत्ती ची खासियत आहे कि यांना इस्लाम पण हवा आणि राष्ट्रवाद पण हवा. म्हणजे यांना इस्लामी राष्ट्र हवे.
पण यांची समस्या हि आहे कि इस्लाम राष्ट्रवादास मान्यता देत नाही. इस्लाम नुसार जग दोन हिस्स्यात विभागले गेले आहे. दार-उल-इस्लाम आणि दार-उल-हर्ब. दारूल हर्ब म्हणजे काफिरांच्या तावडीत असलेला भूभाग. दारूल इस्लाम म्हणजे मुस्लिमांच्या तावडीत असलेला. दारूल इस्लाम मध्ये सगळे काही अल्लाह चे असल्यामुळे वेगवेगळी राष्ट्रे म्हणवून घेणे गैरइस्लामी आहे. कौम (म्हणजे एक समूह) ला राष्ट्र होण्याचा अधिकार नाही. अधिक माहिती साठी श्री. शेषराव मोरे यांचा इस्लाम वरील अभ्यासपूर्ण ग्रंथ वाचावा.
जे जिहादी पाकिस्तानवर हल्ला करताना दिसतात ते सहसा वहाबी, देवबंदी सेक्ट चे असतात आणि ते अहमदी, सुफी, बरेलवी आणि पाकीसेनेतील लोक यांच्यावर हल्ला करत असतात. पाकिस्तान हे "राष्ट्र" आतंकवादाच्या तावडीत सापडलाय हे खरं पण हे तात्पुरते आहे. काही वर्षांनी हि आर्मी देखील हि कन्सेप्ट सोडून देईल. तेव्हा यांचा संपूर्ण रोख भारताकडे अजुन कटाक्षाने वाढेल. पाकिस्तान प्रॉब्लेम मध्ये नाही. ते गृहयुद्धात आहे. अनेक वेगळे लोक आपसात भांडत आहेत. कालांतराने एक जेता उद्भवणार जो सगळ्यांचा बाप असणार. भारत सध्या (म्हणजे गेल्या ६५ वर्षात) टाईमपास करतोय. त्यास वाटते कि अमेरिका किंवा कोणीतरी इतर हि घाण साफ करेल. पण पाकिस्तान हे भारताचे कर्ज आहे. ते इतर कुणी फेडूच शकत नाही कारण इतरांना हा देश समजत नाही.
हे आतंकवाद वगैरे मूलतः दोन व्यवस्था मधला लढा आहे. पाकिस्तान हे "राष्ट्र" हि मूलतः भारतीय कन्सेप्ट आहे आणि दारूल इस्लाम हि इस्लामी कन्सेप्ट आहे जिला राष्ट्रवाद मान्य नाही. फक्त हिंदू संस्कृती आणि ज्यू अथवा यहुदी संस्कृती या दोन संस्कृत्या एका विशिष्ट भूभागाशी जोडल्या गेल्या आहेत. हिंदू संस्कृती "सप्तसिंधू" (म्हणजे भारतीय उपखंड) शी निगडीत आहे आणि यहुदी/ज्यू संस्कृती "इस्राईल" शी निगडीत आहे. ख्रिस्त्यांना आणि मुस्लिमांना आणि कम्युनिस्टांना राष्ट्रवाद मान्य नाही आणि अमुक भूभागाशी जोडल्या जाणे मान्य नाही.
तालिबान्यांची पाकिस्तानच्या "राष्ट्र" या कन्सेप्ट शी चालणारी लढाई आहे. जर हे "राष्ट्र" तगले तर इस्लामी व्यवस्था हरेल पण हे राष्ट्र भारतास त्रास देत राहील. जर हे "राष्ट्र" बुडले तर पुढील येणारा तेथील जेता आणि नेता भारतातील मुस्लिमांना दारूल इस्लाम चे सरळ आवाहन करेल आणि तेव्हा भारतात आगडोंब उसळेल. मुल्ला लोक मशिदींतून असले आवाहन करीत असतातच. तेव्हा त्याच्याकडे जेतेपणाचा हक्क देखील राहील. हा भारतीय आणि इस्लामी व्यवस्थेतला मूलभूत फरक आहे.
पाकिस्तान ने कारगील मध्ये, १९४७ मध्ये, १९६५ मध्ये आणि १९८९ नंतर वाढलेल्या घुसखोरी मध्ये आपले रिटायर झालेले सैनिक वापरले आहे. कारगील मध्ये तर सरळ त्यांची नॉर्दन लाईट इन्फन्ट्री तैनात होती. फक्त त्यांनी युनिफॉर्म घातला नव्हता. प्रत्येकाच्या खिशातून आय-डी कार्ड मिळाले होते. चीन कडून अणुबॉम्बची तस्करी केली. ते डिझाईन इराण, उत्तर कोरिया, लिबिया सारख्या आततायी देशांना विकले. भारतात असंख्य लोकांना मारले. बांगलादेशात ३० लाख लोकांची कत्तल केली. त्यांच्या देशात बलुचीलोकांचा संहार करीत आहेत. कोण काय बोलते हो?
करणारे जे करायचे ते हव्या त्या मार्गाने करून जातात. या मार्गात हे क्रिमिनल नेटवर्क देखील आले. परिणामाची चिंता भारत करत बसतो म्हणून काहीच करत नाही. आणि हळूहळू बलहीन होतो आहे. सामरिक बळ नाही, सांस्कृतिक आणि राजकीय बळ देखील. हे सारखे होणारे आतंकवादी हमले, त्यावर दिसणारा भारताचा ठार निरुत्तर चेहरा , मोठेमोठे घोटाळे इतके वाढले आहे कि लोकांचा भारतीय व्यवस्थेवरील अनास्था वाढत चालली आहे. जर हि अशीच वाढली तर पुढे काय? फळाची परिणामाची चिंता आणि अपेक्षा करू नको असे कृष्ण म्हणतो, व त्याच ओळीत पुढे म्हणून कर्म करायचे देखील सोडू नको असेही म्हणतो. तो भाग पद्धतशीर सगळे विसरतात.
इंग्लंड-रशिया ग्रेट गेम
मध्यआशिया जो सांभाळील तो युरेशिया सांभाळतो हे एका इंग्रज भूराजकीयतज्ञाची थियरी आहे. खालील लिंक मधून ह्या थियरी बद्दल जुजुबी माहिती घ्यावी. त्या तज्ञाचे नाव Halford John Mackinder असे आहे.
.
http://en.wikipedia.org/wiki/The_Geographical_Pivot_of_History
.
ग्रेट गेम ला धरून हि थियरी रचल्या गेली आहे. १८५७ नंतर इंग्रजी साम्राज्याची परराष्ट्रनीती या थियरी नुसार उत्क्रांत झाली. जरी हि थियरी १९०४ मध्ये शब्दांकित झाली, त्याआधी ६० वर्षे इंग्रजांचे वर्तन आणि धोरण या थियरीला प्रमाणित करणारे होते.
.
http://en.wikipedia.org/wiki/Great_Game
.
या ऐतिहासिक ग्रेट गेम बद्दल माहिती करून घ्या वरील लिंक मधून. रशियाला हिंदीमहासागरापर्यंत पोहोचायचे होते कारण त्यांच्याकडे गरम पाण्याचे बंदर नाही. त्यांची सगळी बंदरे हिवाळ्यात गोठून बंद होतात. अधिक तेलाचे महत्व १९व्या शतकाच्या उत्तरार्धात खूप वाढले. त्यामुळे इराण, मध्य आशिया, पश्चिम आशिया (अरब प्रदेश) वगैरे वरती नियंत्रण ठेवण्याची शर्यत पाश्चात्य आणि रशिया यांच्यात सुरु झाली. या शर्यतीला ग्रेटगेम म्हणतात.
या ग्रेटगेम मध्ये भारत आणि भारतीयांचा स्वातंत्र्यलढा फुकटचा ओढल्या गेला कारण आपला भूगोल.
१५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य आले ते फाळणीच्या जखमा घेऊन. फाळणीची कारणे नोंदताना : १) जीनांचा हट्टाग्रह २) ‘फोडा-झोडा’ ही ब्रिटिश नीती ३) नेहरू-पटेल यांना सत्ता स्वीकारण्याची घाई ४) महात्मा गांधींचा मुस्लीम अनुनय ५) अखंड भारत स्वीकारून प्रत्येक बाबतीत जीनांना ‘व्हेटो’ (नकाराधिकार) देऊन राष्ट्र दुबळे ठेवण्यापेक्षा तुकडा तोडण्याचा नेहरू-पटेल यांचा निर्णय ६) अनेक तुकडे होण्यापेक्षा पाकिस्तान देऊन उरलेला भारत अखंड ठेवणे (सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्युजती पंडित:) असा विचार, अशी अनेक कारणे, त्याचे पुरावे-अनुमान-तर्क मांडले गेले आहेत. ‘अटळ निर्णय’ ते ‘फाळणीचे गुन्हेगार’ असा मोठा पट या कारणमीमांसेत व्यापला आहे.
एक मुद्दा सहजच लक्षात येतो की, वरील सर्व गोष्टी या भारतीय उपखंडातले घटक-घटना केंद्रस्थानी ठेवून मांडल्या आहेत. भारताच्या फाळणीला एक फार महत्त्वाचा मोठा पदर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे (आजही अस्तित्वात) याकडे पुरेसे लक्ष दिलेले नव्हते.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) व दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) या विश्वव्यापी महायुद्धांनी अत्यंत बलशाली ब्रिटिश साम्राज्य कोसळले. जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर १९४७ ला स्वातंत्र्य शक्य नव्हते, हे आपण मनोमन स्वीकारलेले नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी आपणास गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत. मात्र पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नौदल अमेरिकेच्या नौदलापेक्षा लहान झाले व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून पुढे येत ब्रिटनचे जागतिक महत्त्व संपले. सुंभ जळला पण पीळ? हा पीळ केविलवाणी वळवळ पुढे काही काळ करत राहिला. (सुवेझ १९५६, युद्धात भारतानेच प्रथम आक्रमण केले- १९६५ भारत-पाकिस्तान युद्ध- ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य.) या पीळ जपण्याच्या भावनेतून भारत सोडताना त्यातला पश्चिमेचा भाग (गिलगिट ते कराची हा पट्टा) हा त्या पलीकडच्या तेल क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी (इराण, इराक, आखाती देश, सौदी अरेबिया) आपल्याला सैनिकी तळ उभारू देईल, अशा मंडळींच्या ताब्यात हा पट्टा हवा. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणार असलेली काँग्रेस साम्राज्यवादविरोधी असल्याने तळ उभारू देणार नाही म्हणून फाळणी, असा विचार पक्का झाला, कृती झाली.
भारतात एकेकाळच्या अमेरिकेविरोधी तयार केलेल्या मानसिकतेमुळे दोन गोष्टी ठळकपणे मांडल्या जात नाहीत. १) भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी केलेले मोठे प्रयत्न व २) काश्मीरचे भारतातले विलीनीकरण कायदेशीर आहे ही अमेरिकेची सुरुवातीची भूमिका. १९४६ साली पं. नेहरूंच्या (अंतरिम) इंटेरिम मंत्रिमंडळाची सत्तेत स्थापना होणार हे लक्षात येताच ब्रिटनचा विरोध डावलून अमेरिकेने नवी दिल्ली येथे स्वत:चा राजदूत तातडीने नेमला.
खनिज’ तेल या गोष्टीला अतोनात महत्त्व आले, ते साधारण गेल्या १००-११० वर्षांत. मात्र त्या आधी हाच गिलगिट ते कराची हा पट्टा रशिया दक्षिणेकडे हातपाय पसरेल या अनाठायी भीतीपोटी ब्रिटनला सामरिक महत्त्वाचा वाटत असे. याला आवर घालणे या बुद्धिबळाच्या खेळाला नाव पडले ‘द ग्रेट गेम’. ब्रिटन जाऊन अमेरिका आली, रशिया जाऊन चीन आला. ‘ग्रेट गेम’ सुरूच आहे. या पट्टय़ाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात वायव्य सरहद्द प्रांत जर भारताच्या बाजूला ठेवता आला असता तर पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली नसती. कारण पश्चिम तेल क्षेत्राकडे भौगोलिक सलगता मिळत नव्हती. खान अब्दुल गफारखानांना बाजूला सारत हा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला हूल देत ब्रिटिशांनी कसा आपल्याला अनुकूल सोडवला त्याचा इतिहास थक्क करणारा आहे.
महंमद अली जीना व त्यांचा फुलवलेला अहंकार हे खरे तर प्यादे होते. काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) १९४७ पर्यंत मुस्लीम समाज कधीच स्वातंत्र्य चळवळीत नव्हता. जीना काँग्रेसमध्ये असताना वा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मुस्लीम जनतेत अनुयायी किती? अगदी १९४५-४६ पर्यंत पंजाब, सिंध, बंगाल व सरहद्द प्रांत (स्थापनेच्या वेळचा पाकिस्तान) इथले निवडून आलेले सत्ताधारी मुस्लीम पक्ष व नेते जीना व पाकिस्तान यांच्याविरोधीच होते. हे सर्व भाग मुस्लीम बहुसंख्येचे, त्यामुळे त्यांना ‘एक व्यक्ती-एक मत’ याआधारे सत्ता मिळतच होती, हिंदू बहुसंख्येची भीती नव्हती. जीनांना पाठिंबा आजच्या भारतातल्या - विशेषत: बिहार-उत्तर प्रदेश इथल्या मुस्लीम नेते-अनुयायांचा होता. हे सर्व राजकारण ब्रिटिशांनी घडवले.
सिमला योजना ही एक हूल- धूळफेक होती. फाळणी करायची, पण ही मागणी जीनांप्रमाणे काँग्रेस नेतृत्वानेही करावी यासाठी भारताची अनेक शकले होण्याची शक्यता असलेली ही योजना एकमेव नव्हे. क्रिप्स मिशन, सिमला, कॅबिनेट मिशन हे सर्व एकाच माळेचे मणी. मात्र एकदा काँग्रेस नेतृत्वाने फाळणी स्वीकारल्यावर भारताचे आणखी तुकडे फाळणीच्या वेळी होणार नाहीत हे तत्त्व प्रधानमंत्री अॅटली यांनी जपले.
थोडक्यात : स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी जीनांना पाठबळ दिले. मात्र दुसरे महायुद्ध ऐन भरात असतानाच युद्धोत्तर स्वतंत्र भारतात आपले तळ ‘तेल क्षेत्रा’साठी हवेत म्हणून फाळणी घडवून आणली. जीनांनी माघार-तडजोड असा मार्ग चोखाळला असता तर दुसऱ्या कुठल्या तरी साधनाने परतणाऱ्या ब्रिटिश सत्तेने फाळणी घडवलीच असती.
मुस्लीमलीग ने पाकिस्तान चे स्वातंत्र्य १९४२ मध्येच विकले होते. ते अगदी सुरुवाती पासून इंग्रजांची (आणि आता अमेरिकेची) वसाहत आहेत. १९९० मध्ये सोवियत युनियन विघटीत झाल्या नंतर या "चौकी"ची गरज संपली. मधल्या काळात पाश्चात्यांनी पाकिस्तानी लोकांचा आणि तेथील पंजाब्यांचा भारतद्वेष आणि हिंदूद्वेष इतका फुलवला होता आणि भारतास इतक्या वेळा थांबवले होते कि पाश्चात्यांच्या पैसा घेऊन वाढलेली तालिबान ची चळवळ हि सरसकट "काफिरविरोधी" झाली. उघडपणे त्यांनी स्वतःला बुतशिकन, कुफ्रशिकन वगैरे म्हणावयास सुरुवात केली.
इस्लाम नुसार इस्लाम चे विरोधक तीन. मुनाफिक, मुशरिक आणि काफिर. मुशरिक म्हणजे मुस्लीम असून सुद्धा कुराणाचे पालन न करणारे. मुनाफिक म्हणजे इस्लाम सोडणारे. काफिर म्हणजे जे मुस्लीम कधीच नव्हते. या तिघांविरुद्ध तालिबान आणि त्यारूपात असलेल्या इस्लामचे युद्ध सुरु आहे. त्याची परिणीती म्हणजे पाकिस्तानातील गृहयुद्ध. तालिबान नुसार पाकी सेना मुशरिक आणि मुनाफिक आहे जी काफरांना (हिंदू-ज्यू-ख्रिस्ती म्हणजे भारत-इस्राईल-अमेरिका) यांना मदत कर्ते. म्हणून हे सगळे "वाजीब-उल-कतल" म्हणजे मृत्युदंडास पात्र आहेत.
दुष्टचक्र
या ग्रेट गेम आणि बाकीच्या राजकारणात १७५५ पासून पानिपतावर सुरु झालेले हे दुष्टचक्र अजून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे बनले आहे.
कालौघात भारताची इच्छा नसताना देखील या संघर्षाला दोन सभ्यतांचे युद्ध असे स्वरूप मिळाले आहे. आणि या संघर्षास असे स्वरूप देण्यास भारतातील काजी-मुल्ला वर्ग जवाबदार आहे. मराठ्यांच्या फौजेत देखील मुस्लीम होते. पण त्यांनी त्यांचा स्टान्स कधी साम्प्रदायींक होऊ दिला नाही. इब्राहिमखान गारदी मरेपर्यंत मुस्लीम राहिला. मराठे इस्लाम ला संपवू इच्छित नव्हते, ते इस्लामची भारतावरील राजकीय आणि सामाजिक वर्चस्व संपवू इच्छित होते.
आणि काझी-मुल्लाह वर्गास हेच सामाजिक आणि राजकीय वर्चस्व हवे होते म्हणून यास जिहादचे स्वरूप तेव्हा देण्यात आले आणि आताही देण्यात येते आहे.
कालौघात मुस्लीम समाज सांप्रदायिकता सोडून हिंदू समाजात विरघळून जायच्या निकट आला होता. तेव्हा तेव्हा मुल्लाह वर्गाने काही न काही बहाणा बनवून हे एकीकरण थांबवले. दाराशिकोह उपनिषदांचे फारसी भाषांतर करीत होता, अकबर दिन-ए-उलाही वगैरे स्थापन करून इस्लाम चे हिंदुकरण व भारतीयीकारण करीत होता. तेव्हा मुल्लाह सरहिंदी (औरंगजेबाचा गुरु म्हणता येईल यास, जरी यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही) ने या एकीकरणात खोड घातली. नंतर मराठ्यांनी उत्तर भारत जिंकला आणि मुस्लिमांचे राजकीय वर्चस्व नाहीसे केले. उत्तर भारतात चालणारे हिंदूंवरील अत्याचार थांबले. मुस्लीम राजांची सर्वंकष सत्ता गेली पण म्हणून मुस्लिमांचा छळ झाला नाही. पण या वेळेस अब्दालीस बाहेरून बोलावून पानिपत घडवायला भाग पडणारा मुल्ला म्हणजे मुल्ला शाहवली. नजीब गद्दारीचे राजकारण खेळत होता आणि यास शाहवली ने जिहादचे रूप दिले.
नंतर इंग्रज आल्यानंतर याच शाहवलीच्या नातवाने दारूल उलूम देवबंद या मदरसा स्थापित केला. इथल्याच लोकांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठ, जामिया मिलिया, ओस्मानिया विद्यापीठ वगैरे स्थापित केले. द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम १८७५ मध्ये मांडणारे सय्यद अहमद खान याच मदरसाचे विद्यार्थी. मुस्लीम लीग चे सर्व समर्थक याच केंद्रांमधून आले. यांनीच खिलाफत चळवळ केली. १९४० नंतर पाकिस्तान च्या मागणीस सर्वाधिक समर्थन इथूनच आले.
नंतर पाकिस्तानला इस्लामी जगताचे तारणहार म्हणावयास भाग पडणारा मुल्लाह तर एक मराठी माणूस होता. औरंगाबादेत १९०३ मध्ये जन्मलेला मुल्ला अबुल आला मउदुदी. यानेच जमात-ए-इस्लामी स्थापन केली. पुढे हा पाकिस्तानात गेला आणि पोलिटिकल इस्लाम आणि शरीया वार आधारित घटना लिहिण्यात याने सिंहाचा वाट उचलला. भारताचे सुदैव कि हा रोल आपल्याकडे डॉ.आंबेडकर सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीने पार पाडला. त्यांच्याकडे हे काम मौदुदी ने केले.योगायोगाने या दोन देशांच्या घटनेत मोठा वाट असणाऱ्या व्यक्ती मराठी होते. पण एकाने भारताचे सोने केले आणि दुसऱ्याने सगळ्या जगाला ताप देणारा देश घटीत केला.
हि ऐतिहासिक साखळी आहे. हि साखळी प्रत्येक भारतीयाचा आयुष्याच्या प्रत्येक भागास जवळून स्पर्श करते. यात क्रिमिनल नेटवर्क आले, भूराजकीय समीकरणे आलीत, तेलाचे राजकारण आले, वोट बँकेचे राजकारण आले, भारताची अंतर्गत हलाखी, सांस्कृतिक आणि राजकीय दिवाळखोरी आली, त्यातून उद्भवणारा भ्रष्टाचार आला. हे सगळे आतून जोडल्या गेले आहे. आणि या समस्येचे पूर्ण दज्ञान व्हायला या मोठ्या चित्राची जाणीव होते आवश्यक आहे.
शुभम अस्तु
पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू
पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू का आहे?
पंजाबी / सिंधी / बलुच / पख्तु किंवा बंगाली असायला हवी होती.
फाळणीच्या वेळेस शांततेचा मार्ग अवलंबणार्या खान अब्दुल गफारखान वगैरे लोकांवर बराच अन्याय झाला असं वाटतं.
प्रतिक्रियांबद्दल शतशः
प्रतिक्रियांबद्दल शतशः धन्यवाद..
१. प्रादुर्भाव हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण शिवाजी महाराजांकडे दिल्लीपतीने याच दृष्टीने बघितले आहे. दिल्लीपती म्हणजे फक्त मोगल नाहीत, इंग्रज आणि आधुनिक नेहरू-प्रणीत भारतीय गणराज्य सुद्धा. भारतास कांद्याप्रमाणे बघितले कि लक्षात येईल कि भारतातील वेगवेगळ्या लेयर्स चे आपापसातले राजकारण खूप अभ्यासनीय आहे. या बद्दल पुढे बोलूच. पण गंगेच्या खोऱ्यातील शक्तीला कृष्णा-गोदावरी मधील शक्ती केंद्र हे नेहमी टक्कर देणारे ठरले आहे (सातवाहन काला पासून आधुनिक शिवसेना-रा.स्व.संघा पर्यंत).. एका पोईंट नंतर गंगेतील शक्तिकेंद्र दक्षिणेतील शक्तीकेंद्रास संशयाने बघू लागते. हि गोष्ट पाटलीपुत्र अथवा उज्जैन भारताची राजधानी असताना इतके नव्हते. पण घोरी नंतर दिल्लीला अनन्यसाधारण महत्व आले (जे महाभारातानंतर प्रथमच आले) आणि हे "इक्वेशन" उघडपणे दिसू लागले. शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात नितांत आदराशिवाय काहीही नाही. पण सांप्रत काळात (म्हणजे मागील १६६० पासून पुढे) देशी तंत्र (स्व-तंत्र) राबवू इच्छिणाऱ्या प्रत्येक शक्तीच्या उदयाला दिल्लीपती ने "प्रादुर्भाव" या अर्थानेच बघितले आहे.
वेताळजी - मोगल कालीन एकता - औरंगजेबाने जिंकलेला संपूर्ण भारत (फक्त १७ वर्षांकरिता)<<
हे कळल नाही.
१६९० ते १७०० या कालावधीत जवळपास संपूर्ण भारतभर औरंगजेबाचे राजनीतिक अधिराज्य होते. हे मोगल कालीन भारतैक्य यास मी "मोगल कालीन एकता" असे म्हणत आहे. पोईंट हा आहे कि राजकीय एकता भारतास कधी हवीहवीशी नव्हती. या शिवाय देखील भारत एक एकसंघ सांस्कृतिक राष्ट्र म्हणून सहस्त्रो वर्षे नांदले आहे.
पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू
पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू का आहे?
पंजाबी / सिंधी / बलुच / पख्तु किंवा बंगाली असायला हवी होती.
>>>
मुस्लिम लीगला प्रामुख्याने आजच्या युपी-बिहार-एमपी भागातून पाठिंबा होता जिथे मुसलमान (व हिंदुंचीदेखील) प्रमुख भाषा उर्दु होती. त्यामुळे पाकिस्तानची भाषा उर्दु झाली. पण ही झाली मोहाजिरांची भाषा. म्हणुन उर्दुला विरोध तिथे होत राहिलाच. बांग्लादेशाची निर्मितीच मुळी बंगाली अस्मितेतून झाली.
>> पोईंट हा आहे कि राजकीय एकता भारतास कधी हवीहवीशी नव्हती. या शिवाय देखील भारत एक एकसंघ सांस्कृतिक राष्ट्र म्हणून सहस्त्रो वर्षे नांदले आहे.
>>>
राष्ट्रसंघ ही कल्पनाच भारतीयांना (वा युरोप सोडून इतर सर्वांना) माहिती नव्हती. मध्ययुगातील युरोपमध्ये ह्या संकल्पनेने मूळ पकडले, तिथे औद्यिगिक क्रांति झाली, वसाहतवाद निर्माण झाला आणि सगळी गणितेच बदलली. नेशन-स्टेट ही संकल्पना अनेक ठिकाणी बळेची लादली गेली (आफ्रिका-अरबस्तान) तर काही ठिकाणी 'संस्कृतीसाधर्म्याचे' व एकच वसाहतमालक असलेल्या भुभागाचे राष्ट्रात रुपांतर झाले, जसे भारत.
अपर्णाजी - पाकिस्तानची
अपर्णाजी - पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू का आहे?
पंजाबी / सिंधी / बलुच / पख्तु किंवा बंगाली असायला हवी होती.
फाळणीच्या वेळेस शांततेचा मार्ग अवलंबणार्या खान अब्दुल गफारखान वगैरे लोकांवर बराच अन्याय झाला असं वाटतं
बळी तो कान पिळी.. कॉंग्रेस ने १९३९ मध्ये राजीनामा देऊन मुस्लीम लीग आणि इंग्रज सरकारवर खूप मोठे उपकार केले. सुभाषचंद्र बसू आणि गांधीजींमध्ये याच कारणास्तव वाद होऊन याची परिणीती सुभाषचंद्रांच्या कॉंग्रेस त्यागात झाली.
कष्टाने मिळविलेली सत्ता व जमेची बाजू आपणहोऊन सोडून मग कमजोर पोझिशन वरून काय डिमांड करणार कोण? जो भाग आज पाकिस्तान आहे तिथे १९३७ मध्ये कॉंग्रेस आणि तेथील शेतकऱ्यांची पार्टी निवडून आली होती. एकदा सत्ता सोडली कि मग बोंबाबोंब करून काही हशील नाही.
असे नाही कि काहीच झाले नसते. भारतीयांनी उघडपणे उठवलेला आवाज म्हणजे १८५७ चे भारत-इंग्लंड युद्ध. त्यात ज्या क्रौर्याने भारतीयांचे दमन इंग्रजांनी केले आहे त्या क्रौर्यास तुलना नाही. त्या नंतर असे म्हणता येईल कि भारताचा कणाच मोडला.
१८५७ सारख्या प्रचंड संग्रामाचा निकाल जे इंग्रज दीड वर्षात लावू शकले, १९४२ च्या चळवळीला काही आठवड्यात बंड करू शकले ते इंग्रज मुस्लीम लीग सारख्या तीन-पाट पक्षास आणि त्यांच्या दंगलींना हाताळू शकले नाहीत हे पटत नाही. आता मागे वळून पाहताना कारणे कळतात. त्यामुळे खान अब्दुल गफार खानांचे आणि गांधार प्रांताचे (आजचा अफगाणिस्तान) भवितव्य तेव्हाच ठरले जेव्हा कॉंग्रेस ने १९३९ मध्ये प्रांतीय सरकारातून राजीनामा दिला.
एकदा पाकिस्तान बनला कि त्यांना संपूर्ण पणे एक नवीन दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक होते. पाकिस्तानची मूळ व्याख्याच भारत आणि हिंदूद्वेषावर आधारित आहे.
"जे हिंदू नाही, ते पाकिस्तानी. जे हिंदू विरोधी, ते पाकिस्तानी" इतकी सरळ सोपी व्याख्या आहे. पंजाबी, सिंधी, पश्तो, बंगाली या साऱ्या भाषा त्यातील लोक साहित्य संस्कृतोद्भव आहे, आणि हिंदू संस्कृतीपासून अनुप्राणीत आहे. असल्या काफर भाषा "शुद्ध-राष्ट्रा"स कश्या चालतील.
उर्दूचे पण फाळणी नंतर प्रचंड प्रमाणात मुद्दाम फारसीकारण करण्यात आले. कित्येक संस्कृत तत्सम व तद्भव शब्द (नैन, बरखा इत्यादी) मुद्दाम जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आले. एक सरकारही उपक्रमच होता तो. असे असताना बंगाली (जी मराठीहून अधिक संस्कृताळलेली आहे) ती हे "शुद्ध" लोक कसे स्वीकार करतील.
त्या देशात फक्त "शुद्ध" माणूस राहू शकतो.. शुद्ध कोण? जो खरा मुस्लीम.. खरा मुस्लीम कोण? ज्याची संख्या जास्त व ज्याला फंडिंग जास्त.
सर्व मुस्लिमांनी मिळून अशुद्ध आणि काफर हिंदू-शीख-बौद्धांना मारले अथवा बाटवले अथवा हाकलून दिले.
ते झाल्यावर शियांनी आणि सुन्नींनी मिळून अहमदियांना मारले व हाकलून लावले.
ते झाल्यावर सुन्नी हळूहळू शियांना मारत आणि हाकलत आहेत.
सुन्नी मध्येही देवबंदी-वहाबी-अहलेहदीस वाले (हे आता पर्यंत सर्वात शुद्ध आणि खरे मुस्लीम आहेत) हे बरेलवी सुन्नी लोकांना हाकलत आणि मारीत आहेत (बरेलवी यांच्या मते काफर).
हि सफाई झाल्यावर पुढे कोणाचा नंबर येणार हे कळत नाही..
हि झाली धार्मिक सफाई.
वांशिक सफाई देखील झाली. गोरे-उंच-क्षात्रवृत्तीचे पंजाब्यांनी काळ्या-भात खाण्याऱ्या बुटक्या बंगल्यांचे शिरकाण केले (हे असे वर्णन पश्चिम पाकिस्तानच्या शालेय पाठ्यपुस्तकात आहे, हे विशेष. पदरचे सांगत नाही मी).
तुलनेने काळ्या असलेल्या आणि गंगाखोऱ्यातून पळून आलेल्या मोहाजीरांना तर फाळणी पासून फटके मिळतच आहेत. पठाण हे मुर्ख आणि धिप्पाड म्हणून प्रसिद्ध आणि मारायला तयार. बलुची टोळीवाले म्हणून अशुद्ध. सिंधी परत हिंदुन्सारखे "बनिये" आणि त्यातल्यात्यात काळे, म्हणून अशुद्ध. म्हणून त्यांची सफाई. हि झाली वांशिक सफाई.
मग आर्थिक सफाई. २२ घराणी समस्त अर्थकारण आणि लष्कर सांभाळतात. इतर समस्त गरीब लोक अशुद्ध. त्यांची यथेच्छ धुलाई करण्यात येते.
अश्या प्रकारे पाकिस्तान सर्वात शुद्ध आणि "साफ" देश व्हायच्या मार्गावर आहे.
टण्या जी - राष्ट्रसंघ ही
टण्या जी - राष्ट्रसंघ ही कल्पनाच भारतीयांना (वा युरोप सोडून इतर सर्वांना) माहिती नव्हती. मध्ययुगातील युरोपमध्ये ह्या संकल्पनेने मूळ पकडले, तिथे औद्यिगिक क्रांति झाली, वसाहतवाद निर्माण झाला आणि सगळी गणितेच बदलली. नेशन-स्टेट ही संकल्पना अनेक ठिकाणी बळेची लादली गेली (आफ्रिका-अरबस्तान) तर काही ठिकाणी 'संस्कृतीसाधर्म्याचे' व एकच वसाहतमालक असलेल्या भुभागाचे राष्ट्रात रुपांतर झाले, जसे भारत.
होय आणि नाही.
या विषयावरील माझी मते इथे उपलब्ध आहेत - http://agphadnavis.blogspot.com/2011/11/blog-post_25.html
राष्ट्रसंघ (युनियन) हे भारताचे मॉडेल आहे. मौर्य, गुप्त, राजपूत, मोगल, मराठे हे सर्व साम्राज्ये "संघ" होते. (फेडेरेशन). आजचे भारतीय गणराज्य देखील एक "फेडेरेशन" आहे.
युरोपीय युनियन जर एक देश असता तर तो भारतासारखा असता. पाश्चात्य अजून पर्यंत "संघा" पर्यंत आलेले नाहीत. जात्याधारित आणी भाषाधारित "राष्ट्रे" या पातळी आहेत अजून हि.
महाराष्ट्रातील पैसा बिहार मध्ये जातो म्हणून मराठी माणूस इतका बोंबाबोंब करीत नाही. जर्मनीतला पैसा ग्रीस मध्ये जातोय तर किती गोंगाट होतोय बघा. युरोपुय हि ओळख अजून तेथल्या जनमानसात यायची आहे. भारतीय हि ओळख भारतीय जनमानसात खूप आधी पासून आहे (कमी-अधिक फरकाने सक्षम)..
जीना, २३ मार्च १९४०, लाहोर :
जीना, २३ मार्च १९४०, लाहोर :
'It is extremely difficult to appreciate why our Hindu friends fail to understand the real nature of Islam and Hinduism. They are not religious in the strict sense of the word, but are, in fact, different and distinct social orders, and it is a dream that the Hindus and Muslims can ever evolve a common nationality, and this misconception of one Indian nation has troubles and will lead India to destruction if we fail to revise our notions in time. The Hindus and Muslims belong to two different religious philosophies, social customs, literatures. They neither intermarry nor interdine together and, indeed, they belong to two different civilizations which are based mainly on conflicting ideas and conceptions. Their aspect on life and of life are different. It is quite clear that Hindus and Mussalmans derive their inspiration from different sources of history. They have different epics, different heroes, and different episodes. Very often the hero of one is a foe of the other and, likewise, their victories and defeats overlap. To yoke together two such nations under a single state, one as a numerical minority and the other as a majority, must lead to growing discontent and final destruction of any fabric that may be so built for the government of such a state.'
अर्थात हे सगळं व्हायचं कारण म्हण्जे ब्रिटिशांनी हळूहळू चालू केलेली लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, मुस्लीमांचा मतदानात निरूस्साह, हिंदी भाषेची निर्मिती आणि तिला राजदरबारी मिळायला लागलेलं उर्दूबरोबरीच स्थान. जवळ जवळ २५ % मुस्लीम लोकसंख्या असून १८% च सिव्हिल सर्व्हिसेस मधे . यामुळे एस्टॅब्लिश्ड / इलीट मुस्लीम लोकांच धाबं दणाणलं असावं . आपल्या प्रिव्हिलेज्ड पोझिशनला कधीही धक्का लागेल याची असलेली काळजी हेच मूळ असावं.
पण तुम्ही जे म्हणता की १९३९ साली काँग्रेसनं दिलेला राजीनामा, हे अगदी बरोबर आहे. स्वतःच्या हातानं मिळवेलेलं उधळून लावलं.
राष्ट्रसंघ ही कल्पनाच
राष्ट्रसंघ ही कल्पनाच भारतीयांना (वा युरोप सोडून इतर सर्वांना) माहिती नव्हती.
>> टण्या राष्ट्रसंघ ही कल्पना आपल्या कडे इस पूर्व कालातही होती. जनपद आणि महाजनपद ह्यावर शोध ध्यावा.
बाळू जोशी जी - लेखकास शामच्या
बाळू जोशी जी - लेखकास शामच्या ऐवजी 'सयाम ' म्हणायचे आहे का? की खरा शब्दच शाम आहे? सयाम म्हनजे थायलंड आणि (मलाया म्हणजे मलेशिआ)
हेच म्हणायचे होते.. जुन्या काळातील रूम-शाम डोक्यात होते, म्हणून शाम वापरले.. सयाम हा योग्य शब्द आहे.. धन्यवाद..
इतिहासाची पुनुरावत्ती होते.
इतिहासाची पुनुरावत्ती होते. अठराव्या शतकातील मुघलाची तुलना सध्याच्या पाकिस्तान सरकारशी करता येईल. नावापुरते पाकिस्तानचे केंद्र सरकार, पण एकूण देशात असंख्य सत्ताकेंद्र. फक्त इंग्रजांची जागा आता अमेरिकेने घेतलीय. ९/११ नंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मूलभूत बदल झाला. भारत जे त्यांना १९८९ पासून पाकिस्तानातील "jihad factory" बद्दल ओरडून सांगत होता ते ११ तारखेला सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष अनुभवातून समजले. त्या इमारती जरी controlled explosion नी पडल्यासारख्या वाटल्या तरी प्रवासी विमानांचा आत्मघाती हल्ला; तो सुद्धा अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रावर हि घटनाच मोठी अदभुत, अतर्क्य होती. अमेरिकेत ३००० लोक प्राणास मुकले त्याबद्दल गेल्या १० वर्षात १० लाख इराकी-अफगाणी-पाकिस्तानी लोकांना मारले. असो.
अमेरिकेला अल-कायदा च्या नावाने मध्य आशिया मध्ये आमंत्रण मिळाले. त्यांनी पाकिस्तानच्याच मदतीने तालिबानला संपवण्याचा प्लान केला आणि आज तो जवळपास तडीसही नेला. (शेवटी अमेरिकन लोक इंग्रजांचीच अवलाद.) पाकिस्तानला वाटले कि अफगाणिस्तान हा डोंगर दर्यांनी भरलेला देश असल्याने अमेरिका त्यात अडकून पडेल व आपल्याला अमेरिकेचे डॉलर्स आणि भारतापासून संरक्षणाची हमी मिळेल. त्यांचा कयासा नुसार लादेनला पकडल्यावर अमेरिका वर्षा-दोन वर्षात परत जाईल पण उद्या तालिबानी परत केव्हातरी डोक वर काढतीलच. त्यामुळे पाकिस्ताननी अनेक तालिबानींना आपल्या देशात गुप्तपणे आश्रय देणे चालू ठेवले. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात पकडला जाणे हा अमेरिकन जनतेसाठी एक मोठा विश्वासघात होता, पण हे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला २००७-०८ पासून माहित होते. तालिबान हे पाकिस्तानचेच अपत्य असल्याने तालिबानच्या पाहुण्याची जवाबदारी पाकिस्तानवर पडली.
सध्या बिघडलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध हे पाकिस्तानचा पापाचा घडा भरल्याचे द्योतक आहे. जिन्हाचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत काळाने चुकीचा ठरवला आहे. पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून असण्याची भू-राजकीय गरज संपलेली आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या बोर्डर पोस्ट वर केलेला हल्ला हा अमेरिकन सेनेचा राग दर्शवतो. सलग दोन तास केलेला हल्ला हा चुकून झालेला असू शकत नाही. यातून अमेरिका पाकिस्तानला किती जगाची सहानभूती आहे याचा अंदाज घेतीय. इराणवर हल्ला करणार म्हणल्यावर ज्या वेगाने रशियाने इराणचा बचाव केला तसे पाकिस्तानच्या बाबतीत घडलेले नाही. पाकिस्तान जगात एकटा पडत चाललेला आहे याचे श्रेय भारताच्या परराष्ट्र नीतीला नसून ते पाकिस्तानच्याच भारतद्वेषी धोरणात आहे.
अमेरिकेने पाकिस्तानचे लचके तोडण्यास आता सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तान दिवसेंदिवस अधिक अस्थिर बनत होईल. यामुळे इराण-पाकिस्तान-भारत-चीन अशी जी प्रस्तावित तेलवाहिनी चा प्रकल्प लांबणीवर पडेल अथवा रद्द होईल. अमेरिकेने तर इराणला एकटे पडणार हे घोषितच केले आहे.
एकूण गोंधळाच्या वातावरणाने पाकिस्तानातील मुल्ला-उलेमा ची जिहाद ची ओरड वाढणार आहे आणि एक दिवस पाकिस्तानातील कोणतरी येडा जनरल किंवा एखादा अतिरेकी अमेरिकेच्या कुठल्या तरी asset वर हल्ला करेल. अमेरिका आता अशाच घटनेची वाट पाहत आहे. अशा घटनेचे निमित्त करून अमेरिकेला पाकिस्तानवर उघडपणे हल्ला करायची परवानगीच मिळेल. पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी तर कसाब " non-state actor " होता असे सांगून जवाबदारी टाळलीच आहे. आता अशा एखाद्या actor च्या हातात nuclear bomb लागला तर ते जगाला परवडणार नाही. तसेच पाकिस्तान आपले nuclear bomb इराणला हि देऊ शकते. हे अमेरिका आणि एस्रेल या दोघानाही टाळायचे आहे. म्हणून पाकिस्तानचे nuclear assets अमेरिकेने ताब्यात घ्यायचे प्रयत्न्य सुरु केलेले दिसत आहेत.
पाकिस्तानसाठी चीन उघडपणे अमेरिकेशी युद्ध करणार नाही, कारण पाकिस्तानातील मुलतत्ववाद्यांचा चीनच्या वायव्य प्रांताला सुद्धा त्रास आहे. पण अंतस्थ्यपणे पाकिस्तानला चीन लष्करी मदत करेल.आणि भारताकडून " POK " वर हल्ला होऊ देणार नाही. चीनने POK आत्तापासूनच ताब्यात घेऊन स्वताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यास प्रारंभ केला आहे.
पाकिस्तान हा मैदानी भाग असल्या कारणाने अमेरिकेला अफगाणिस्तान इतके जड जाणार नाही. अमेरिकेला पाकिस्तानची परत एकदा फाळणी करून स्वतंत्र बलुचिस्तान इराणच्या पाठीवर बसवायचा आहे.
बलुचिस्तान सध्या पाकिस्तान, अफगानिस्तान आणि इराण च्या सीमेवरील virtual देश आहे. बलुचिस्तान निर्माण करून इराणवर भविष्यात गरज पडल्यास हल्ला करण्यासाठी base तयार होईल आणि मध्यपूर्व देशातून समुद्रापर्यंत स्वताची तेलवाहिनी बांधता येईल.
यात एक धोका असा कि पाकिस्तान हरायला लागल्यावर द्वेषभावनेने भारतावर अणुहल्ला करेल? भारतीय लष्कर अणुहल्ला रोखायला सक्षम आहे का? अमेरिका हि काळजी घेईल का? का अमेरिका नेहमीप्रमाणे फक्त स्वताचा स्वार्थ बघेल?
सध्या अमेरिकन कंपन्यांना भारताची बाजारपेठ खुणावतेय. अमेरिकन कंपन्या त्यांची investment वाचवण्यासाठी अमेरिकन सरकारवर दबाव टाकतील? एकूणच भारतीय उपखंडातील वायव्य सरहद्द पुर्वापारपणे आता पेटली आहे.
लेख आणि माहिती दोन्ही वाचनिय
लेख आणि माहिती दोन्ही वाचनिय आहेत. तुमचा अभ्यास खुप दांडगा दिसतो आहे...
मला अमेरिकेच्या बला विषयी शंका आहेत अत्यंत आधुनिक शस्त्रांनी सज्ज अशी लाखांची फौज १० वर्षात अफगाण मधे नियंत्रण मिळवू शकत नाही. नियंत्रण म्हणजे काबुल आणि ३० कि मी प्रदेश नाही. अफगाण मैदानी प्रदेश नाही हे कबुल पण इराक मधे जादा कुमक आहे आणि कुठे निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे?
पाकची भौगोलिक व्याप्ती आणि विध्वंसंक कारवाया करण्याची क्षमता अनेक पटींनी जास्त आहे. आणि अमेरिकेची दहा वर्षामधे अफगाण, इराक मधिल कामगिरी बघितल्यावर हे प्रकरण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे.
यात एक धोका असा कि पाकिस्तान हरायला लागल्यावर द्वेषभावनेने भारतावर अणुहल्ला करेल? भारतीय लष्कर अणुहल्ला रोखायला सक्षम आहे का?
----- याबद्दल सहमत... असे होणारच नाही याची काही शास्वती नाही. सद्दाम हुसैन यांनी इस्रायलवर अनेक स्कड मिसाईल्स सोडली होती (जेणे करुन ते हल्ला करतील--- आणि सर्व अरब अमेरिकेविरुद्ध एकत्र येतील)... पण अमेरिकेने इस्रायलला प्रतिहल्ला करण्यापासुन परावृत्त केले होते.
@ गौतमीपुत्र शालिवाहन जी, हि
@ गौतमीपुत्र शालिवाहन जी,
हि लिंक बघा...
http://www.aei.org/events/2011/11/30/military-reform-in-pakistan-will-th...
छान लेख, माहिती, चर्चा.
छान लेख, माहिती, चर्चा.
<<<<<< हा लेख वाचा.. म्हणजे
<<<<<< हा लेख वाचा.. म्हणजे मुसलमान का ताकतवान आहेत हे कळेल... दुसर्या देशातून आलेल्या कोणत्याही मुसलमान व्यक्तीला मुसलमान देश आनंदाने ठेऊन घेतो.. उदा.. एम एफ हुसेन, दाउद.. पण भारत मात्र हिंदू लोकाना अशी वागणूक देत नाही.. ही गोष्ट कुठल्या हिंदुला खटकणार देखील नाही. हाच फरक आहे मुसलमानात आणि हिंदुंमध्ये.>>>>. १०० % अनु मोदन !!!
भारत सरकार ने तस्लिमा नसरीन ( बांग्लादेशी लेखिका) हिला भारता मध्ये रहाण्याची ( POLITICAL ASYLUM)
परवानगी दिली पण काही हिंदु पाकिस्तानी नागरीक मात्र जगण्याचा हक्क मागू शकत नाहीत ?
ही गोष्ट कुठल्या हिंदुला खटकणार देखील नाही हे मात्र १०० % खर.
एक जबरदस्त आढावा... खूप मोठा
एक जबरदस्त आढावा...
खूप मोठा लेख पण वाचतांना बिलकुल कंटाळा आला नाही. इंटरेस्ट वाढत जातो. आपण पानिपत - Great Game चा जो काही संबंध दाखविला आहे तो mind boggling आहे. असो.
१. मराठ्यांची चूक - ह्या बद्दल एक मुद्दा वर वाचण्यात आला. मुद्दा सामरिक आणि योग्य होता. अटकेपर्यंत जायच्या नादात मराठे हा प्रांत विसरले. त्यामुळेच कदाचित राघोबाच्या नाकाखालून अब्दाली भारतात उतरला.
मी काही वर्ष दिल्लीत काढली, तिथे सोबतीला बरेच इतिहास - अभ्यासक होतेच. सगळ्यांमध्ये एक समज खूप strong आहे - मराठे हे फक्त लुटण्याच्या उद्देशाने उत्तर भारतात आले होते. आपण 'लुटेरे' हा शब्द कितीही नाकारला, तर मराठ्यांनी उत्तर भारतातील काबीज केलेल्या प्रदेशात 'राजकीय घडी' बसविण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. 'देशमुखी', 'चौथाई' वगैरेचे हक्क मिळाले के झाले... याचे गंभीर परिणाम पानिपतच्या युद्धात भोगले, जेंव्हा मराठी अक्षरशः एकटेच लढले. ब्रिटिशांनी भारत मराठ्यांकडून जिंकला, पण तो सैन्य लढाईत. मराठ्यांचे राजकीय अस्तित्व बरेचशे संपत आलेच होते. मराठी प्रांतातही 'पेशव्यांना' मान राहिला नव्हता. उदा. - जानेवारी १८१८ ची कोरेगावची लढाई.
२. पाकिस्तान मध्ये फोफावणार अतिरेकिवाद आपण सुंदर मांडलात. जिना (relatively सेकुलर )नंतर पाकिस्तानची लयाच गेली. ज्या उत्साहात आणि ज्या मुद्द्यावर पाकिस्तान तयार झाला, त्यालाच फाटा देणे चालू झाले. यात महत्त्वाची भूमिका होती ती - अबुल अल मौदुदी याची. हा मुळचा मराठवाड्यातील औरंगाबादचा. फाळणी नंतर पाकिस्तानात गेला. १९४० च्या दशकात ह्याने जमात-इ-इस्लामीचा पाया भारतात घातला, आणि नंतर पाकिस्तानात. ह्या संस्थेने इस्लामला राजकीय रंग द्यायला चालू केली. आज पाकिस्तानने जे काही भेसूर रूप धारण केले आहे, त्यात ही संस्था आणि ही व्यक्ती फार महत्त्वाची.
३. Great Game - ह्याचा इतिहास पण फार झोरदार आहे. Geographical Pivot of History ह्या आपल्या ग्रंथातून मेकेंडरने जी theory मांडली त्यावरून जगाचा राजकीय - भौगोलिक नकाशा बदलला. रशिया बाबत त्याच्या मतामुळे युरोप मध्ये रशियाबाबत बाबत एक भयगंड निर्माण झाला. ह्याची परिणीती म्हणजे हिटलरची रशियावर चाल.
सध्या New Great Game (सी. राजा मोहन) ची हवा आहे. मुख्य स्थान आहे - अफगानिस्तान!!
!!!! परत वाचायला हवा! प्रचंड
!!!! परत वाचायला हवा! प्रचंड भारी!
लिंक बघितली. बाई एकदम फॉर्मात
लिंक बघितली. बाई एकदम फॉर्मात आहेत. चुएइन्गगम खाताखाता भारताला ३ आठवड्याच्या युद्धाची परवानगी देऊन कामरान शफी ला बसल्या जागी घाम आणला. बाकीचे लोक आपले मोजूनमापून तेच सांगतायेत आणि ही द्रोपदीच्या रोलमध्ये आहे. अणुबॉम्बच्या छत्रछायेखाली दहशतवाद हे जगासाठी नवीन बातमी नाही. अमेरिकन intellectual मध्ये चर्चा घडणे, youtube वर अमेरिका-पाकिस्तान संबंध अशा तत्सम चर्चेचे video पब्लिश होणे , BBC चा secret pakistan documentary प्रसिद्ध होणे, भारतामध्ये सात-आठ terrorist cell पत्ता लागणे, जर्मन बेकरी स्पोटाचे अतिरेकी पकडले जाणे या सर्व गोष्टी आपोआप घडलेल्या नाहीत. पाकिस्तानच्या काळ्याधंद्यांना हळूहळू प्रसिद्धी मिळेल. पाश्यात्य मिडिया आगीत तेल ओतण्याचे काम करत राहील.
पाकिस्तानची विध्वंसक कारवाया करण्याची क्षमता अनेक पटींनी जास्त आहे भारताविरुद्ध; पण अमेरिकेच्या समोर नाही. आणि पाकिस्तानमध्ये इराक सारखे तेल थोडी आहे की म्हणून अमेरिकेला जमीन नियंत्रणात ठेवायची आहे. जर युद्ध झाले तर त्यांचे प्रमुख २ उद्देश असतील.१. tactical nuclear weapons लवकरात लवकर ताब्यात घेणे २. लपलेले ढेकुण मारणे. इराक आणि अफगानिस्तानच्या अनुभवातून अमेरिकेची ढेकुण मारण्यात double phd झालेली आहे. अमेरिकेची विमाने रडारला दिसत नाहीत. आठवडाभरात पाकिस्तानी आकाश अमेरिकेच्या ताब्यात जाईल आणि महिनाभरात तेल, अन्न आणि गोळ्या संपल्यावर पाकिस्तानी आर्मी शरणागती पत्करेल. मग पुढची १० वर्ष अमेरिका शांतपणे उरलेले ढेकुण मारत बसेल आणि स्वताला फायद्याचे करार पदरात पाडुन घेईल.
वरील गोष्टी आता लगेच होणार हा आततायी विचार ठरेल. पुढच्या १० वर्षात केव्हाही योग्य वेळ आली असे अमेरिकन thinktank ला वाटेल तेव्हा. किसीकी जान लेना गुन्हा है, सही समयपे जान लेना राजनीती.
यात एक धोका असा कि पाकिस्तान
यात एक धोका असा कि पाकिस्तान हरायला लागल्यावर द्वेषभावनेने भारतावर अणुहल्ला करेल?
या पेक्षा जास्त भीति मला वाटते की तिथले लोक घाबरून भारतात पळून येतील! मग पुनः १९४७ सारख्या दंगली!
शिवाय आधीच मुसलमान नि त्यांच्या कैवार घेऊन हिंदूंचा सत्तेसाठी संघर्ष या नादात हिंदू धर्मीयांना आपल्याच घरी चोरट्यासारखे रहावे लागेल!
आणि पाकिस्तानमध्ये इराक सारखे तेल थोडी आहे की म्हणून अमेरिकेला ....... मग पुढची १० वर्ष अमेरिका शांतपणे उरलेले ढेकुण मारत बसेल आणि स्वताला फायद्याचे करार पदरात पाडुन घेईल.
अनुमोदन! तेव्हढा शहाणपणा अमेरिकन नेतृत्वात असावा अशी शंका यायला जागा आहे!
फाळणी झाली म्हणजे देशावर
फाळणी झाली म्हणजे देशावर उपकारच झाले आहेत म्हनायचे. नाहीतर हे सगळे 'आपल्या' देशात घडले असते. ( हे म्हणजे नंतर उल्लेखलेले पाकिस्तानमधील प्रस्म्ग)...
फाळणी नसती तर भारतात मुसलमानांची संख्या ४० % झाली असती. आज ती १५ % आहे.
अणुहल्ला होणारच.. मुसलमान
अणुहल्ला होणारच.. मुसलमान टोळीने भारतात घुसायचा प्रयत्न करणारच. भारताची यास चिरडून काढायची तयारी आहे काय हा प्रश्न आहे. सामरिक तयारी आहे. मानसिक तयारी आहे काय, हा प्रश्न आहे.
पाकिस्तान हा सरतेशेवटी भारताची समस्या आहे. हिंदूंच्या काही चुकांमुळे मुस्लीम इतके वाढले. त्या चुकांची फळे आपण भोगीत आहोत. त्या दुरुस्त करायला हव्यात. आपली गटार आपणच साफ करायला हवी. इतर लोक ती आपल्यासाठी करतील हि भारतीय मनोवृत्ती चुकीची आहे. या सर्वांना परत आपल्या धर्मात घेण्यासाठी लागणारी तयारी आणि व्यवस्था हिंदूंना करावी लागणार.
राहिली गोष्ट अण्वस्त्रांची.
तर भारताने पाकिस्तान आणि चीन ला ठणकावून सांगितले पाहिजे कि भारतावर पाकिस्तान कडून अथवा अन्यत्र कुठूनही अणुहल्ला झाला तर पाकिस्तान आणि चीन दोन्ही एकदम जळतील. तशी तयारी भारत करतोय. अणुपाणबुडी अरिहंत, पाणबुडीतून सोडता येणारे अग्नी - ५ आणि सागरिका हे क्षेपणास्त्रे, आणि त्यावरील अण्वस्त्रे. या तीन गोष्टी चीन ला धमकी देण्यास पुरेश्या आहेत.
या दोघांना एकदम धमकी दिल्या शिवाय परिस्थती सुधारणार नाही. जर हाताबाहेर जात असेल तर २ ३ अणुचाचण्या कराव्यात.. स्वतःचा एखादा निकामी उपग्रह उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राने पाडून या दोघांना धमकि द्यावी..
क्षमा, दया , ताप , त्याग , मनोबल सबका लिया सहारा
पर नर व्याघ सुयोधन तुमसे कहो कहाँ कब हारा?
क्षमाशील हो रिपु समक्ष तुम हुए विनीत जितना ही
दुष्ट कौरवों ने तुमको कायर समझा उतना ही
अत्याचार सहन करने का कुफल यही होता है
पौरुष का आतंक मनुज कोमल होकर खोता है
क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल है
उसका क्या जो दंतहीन विषरहित विनीत सरल है
तीन दिवस तक पंथ मांगते रघुपति सिन्धु किनारे
बैठे पढते रहे छंद अनुनय के प्यारे प्यारे
उत्तर में जब एक नाद भी उठा नहीं सागर से
उठी अधीर धधक पौरुष की आग राम के शर से
सिन्धु देह धर त्राहि-त्राहि करता आ गिरा शरण में
चरण पूज दासता ग्रहण की बंधा मूढ़ बंधन में
सच पूछो तो शर में ही बस्ती है दीप्ति विनय की
संधिवचन संपूज्य उसीका जिसमे शक्ति विजय की
सहनशीलता, क्षमा, दया को तभी पूजता जग है
बल का दर्प चमकता उसके पीछे जब जगमग है
हे कवी दिनकारांचे ऋषीवाक्य आहे. हे सदैव स्मरणात ठेवले तर भारत सुरक्षित राहील.
अणुपाणबुडी अरिहंत, पाणबुडीतून
अणुपाणबुडी अरिहंत, पाणबुडीतून सोडता येणारे अग्नी - ५ आणि सागरिका हे क्षेपणास्त्रे, आणि त्यावरील अण्वस्त्रे. या तीन गोष्टी चीन ला धमकी देण्यास पुरेश्या आहेत.
----- चिन या काळात काहीच करणार नाही ? त्यांचे संरक्षण तंत्र आपल्या कैक योजने पुढे आहे. त्यांनी काही वर्षांपुर्वीच अवकाशात उपग्रहाचे विध्वंस घडवलेला आहे... (अमेरिकेला पण धडकी भरली आहे.... आता अवकाश पर्यावरणात प्रदुषणाची काळजी).
भारत हा कुठल्याही परिस्थितीत प्रथम अणुहल्ला करणार नाही व तसे वचन भारताने जगाला जरुर नसतांना अनेकवार दिलेले आहे. आता पाककडुन क्षेपणास्त्र सुटल्यास भारताची प्रतिक्रिया काय राहिल ?
भारत हा कुठल्याही परिस्थितीत
भारत हा कुठल्याही परिस्थितीत प्रथम अणुहल्ला करणार नाही व तसे वचन भारताने जगाला जरुर नसतांना अनेकवार दिलेले आहे. आता पाककडुन क्षेपणास्त्र सुटल्यास भारताची प्रतिक्रिया काय राहिल ?
देव करो आणि हे वचन गरज असताना भारत बेलाशक मोडो...
उत्तम लेख !!! काही काही
उत्तम लेख !!! काही काही प्रतिसादही भारी..
चर्चा वाचतोय.
जबरदस्त वाचनिय
जबरदस्त वाचनिय लेख...सुरुवातीला सगळ्या लींक्स समजाऊन घेताना थोडा गोंधळ झाला पण इतक्या मोठ्या आवाक्याचा विषय फारच छान पद्धतीने मांडलाय
याउलट तेव्हा "इस्लाम खतरेमे"
याउलट तेव्हा "इस्लाम खतरेमे" अशी बांग पाकिस्तानातील मुल्ला-मौलवीनी दिली असेल. त्यामुळे सर्व जगातून कसाबछाप रिकामटेकडे मुस्लिम तरुण पाकिस्तानात जातील आणि पाकिस्तान कुरुक्षेत्र बनेल. अमेरिका surgical strikes वर भर देइल आणि collataral damage टाळण्याचा संपूर्ण प्रयत्न्य करेल. पाकिस्तानातच सुरक्षित कॅम्प बनवले जातील. लोकांना भारतात जाऊ दिले तर अतिरेकी निसटण्याचा धोका राहील.
पाकिस्तान हि भारताची समस्या आहे; भारताने भारतीय उपखंडातच गुंतून पडावे यासाठी निर्मिलेली! अमेरिका जास्तीतजास्त पाकिस्तानची फाळणी करून तेलवाहिनीसाठी व इराणची कोंडी करण्यासाठी बलुचिस्तान वेगळा करेल; पण हे वाकडे शेपूट असलेले कुत्र नेहमी मध्य आशियाकडे जाणारा मार्गावर भारतासाठी बांधून ठेवेल.
"No First Use Policy" म्हणजे एक अप्रत्यक्ष धमकी वजा इशाराच आहे. जर कोणी भारताविरुद्ध काही आगळीक केली, तर त्याचा समाचार घ्यायला भारतीय आर्मी समर्थ आहे, अणुबॉम्बची गरज पडणार नाही आहे. पाकिस्ताननी जर अणुबॉम्ब सोडले तर भारताची काही शहरे नष्ट होतील, पण नंतर जो कोणी पाकिस्तानचा झेंडा घेऊन उभा असेल, त्या प्रत्येकाच्या डोक्यावर बॉम्ब फुटतील. भारतीय लोक आता जगाच्या कानाकोपर्यात पोहोचलेत.
लेख आवडला, अंबरीष .
लेख आवडला, अंबरीष . ब्लॉगदेखील वाचतो आहे.
मूळ लेख अन्य भाषेत लिहिला
मूळ लेख अन्य भाषेत लिहिला आहे का? अनेक ठिकाणी अर्थाचा अनर्थ झालेला दिसतोय. तो समजून घेऊन लेख वाचायचे प्रयत्न करावे लागत आहेत.
अशी जर वर्षे मोजली तर मूळ भारतावर "परकीयांचे" राज्य फक्त ८०० वर्षे होते :
भारतावर मूळ परकीयांचे राज्य
गजनी-घोरी वगैरे मंडळी म्हणजे बाटलेले ऋषी पतंजली आणि ऋषी पाणिनी चे वंशज : गजनी-घोरी वगैरे मंडळी म्हणजे ऋषी पतंजली आणि ऋषी पाणिनी यांचे बाटलेले वंशज
कालौघात भारताची इच्छा नसताना देखील या संघर्षाला दोन सभ्यतांचे युद्ध असे स्वरूप मिळाले आहे : सभ्यता???? संस्कृती
पुढील वाक्य प्रतिसादात दिसले. मूळ लेखात शोधून मिळाले नाही :
"हिंदू पक्षी भारतीय अंडरवर्ल्डला सरकारी धोरणात्मक पाठिंब्याचे समर्थन" : शासकीय मराठीसुद्धा यापेक्षा समजायला सोपी असते. पाठिंब्याचे समर्थन म्हणजे काय?
भारत एक राष्ट्र असण्याचा/नसण्याचा उल्लेख बरेचदा आला. त्यावर प्रतिसादांतही लिहिले गेले आहे. एकछत्री अंमल असे फार तर म्हणता येईल.
भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक राष्ट्र होता म्हणजे काय ते कळले नाही. संस्कृती कशाकशाने बनते? भारतात भाषा, खानपान, वेश, कुटुंबपद्धती,भौगोलिक स्थिती या सगळ्या गोष्टींत विविधता आहे. तरीही संस्कृतीचा एक प्रवाह असेल तर तो कोणता?
इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला होतं : म्हणजे संपूर्ण भारतावर मराठ्यांच्या/पेशव्यांचा अंमल होता? इंग्रजांच्या लढाया पेशव्यांबरोबरच टिपू सुलताम बंगालचा नवाब, रणजीतसिंह यांच्याबरोबर सुद्धा झाल्या होत्या.
गजनी-घोरी वगैरे मंडळी म्हणजे
गजनी-घोरी वगैरे मंडळी म्हणजे ऋषी पतंजली आणि ऋषी पाणिनी यांचे बाटलेले वंशज
>>
सुरुवातीस लेखक अगदी नि:पक्षपाती लिहीत आहे असे वाटत होते. एका इतिहासाच्या अभ्यासकाच्या दृष्टीने . पण हळू हळू त्यांचा 'झुकलेपणा ' लक्शात येतोय. तसे जर पाहिले तर इस्लाम जिथून उद्गम पावला तिथे त्याचा निर्माता हा इस्लामी असणार फक्त. नन्तर इतर लोक (ज्यांचा पूर्वी काहीतरी धर्म असणार ) त्यांनी हा धर्म स्वीकारल्यानन्तर त्याना बाटलेलेच म्हटले पाहिजे. तसे सगळे अरब मूळचे मुस्लीम थोडेच होते. ख्रिस्त एकटा सोडला तर बाकीचे बाटलेलेच म्हणावे लागतील.
त्यामुळे गजनी घोरींची पेडिग्ग्री शोधण्यात अर्थ नाही . ते मुस्लिम मानसिकताच घेऊन आले होते.
अर्थात किरकोळ गोष्टी वगळता लेख नक्कीच महत्वाचा आहे.
भारतावर अनेक परकीयांनी
भारतावर अनेक परकीयांनी आक्रमणे केली आणि काल्लोघात ते स्वकीय बनून गेले आहेत. सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे मोगल. जेव्हा बाबराने आक्रमण केले तेव्हा तो परकीय तैमुरचा वंशज होता, अकबराने जिझिया कर रद्द करून स्वकीय होण्याकडे पाऊल टाकले. अब्दालिनी दिल्लीवर आक्रमण केले, दिल्लीचे तख्त राखण्याची जवाबदारी मराठ्यांची होती म्हणून मराठे परकीय अब्दाली विरुद्ध लढले. १८५७ साली इंग्रजान विरुद्ध उठावाचे नाममात्र नेतृत्व बहादुरशाह या मुघल बादशाहला दिले गेले. याचाच अर्थ १५ व्या शतकातले परकीय तुर्की मुघल १८ व्या शतकात स्वकीय झाले.
याचप्रमाणे हूण, शक, ग्रीक, इराणी, तुर्की, पोर्तुगीज अगदी इंग्रज सुद्धा भारतीयात मिसळून गेले असणार. त्यामुळे भारतावर परकीयांचे राज्य किती वर्ष होते हे काढणे अवघड आहे.
हिंदू पक्षी भारतीय अंडरवर्ल्डला सरकारी धोरणात्मक पाठिंब्याचे समर्थन - हिंदूंचा पक्ष घेणाऱ्या छोटा राजन डॉन ला भारतीय गुप्तचर संस्थांचे सहकार्य होते. चोराच्या वाट चोरालाच ठाऊक असतात. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्पोटानंतर छोटा राजन दाउद कंपनीतून बाहेर पडला. मग दाउदच्या कारवायांची माहिती छोटा राजन सांगणार नाही तर कोण सांगणार!
भारताचा GDP १८ शतकापर्यंत ब्रिटीश राज च्या आधी जगात सर्वात जास्त होता. आजकाल जसे सर्वजण अमेरिकेकडे पळतात, त्याचप्रमाणे जगातून लोक भारताकडे आकर्षित झाले असणार. त्यामुळे आज भारतात अनेक धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक त्यांच्या विविध परम्परांसकट दाखल झाले आणि त्यांच्या परंपरांच्या आदानप्रदानातून एक compound बनले त्याला भारतीय/देसी संस्कृती म्हणता येईल.
१७६१ सालचा भारताचा नकाशा पाहिला तर मराठा साम्राज्याची व्याप्ती लक्षात येईल. पानिपत नंतर मराठी सत्ता आणि अब्दाली या भावी भारताच्या महासत्ताचा कणा मोडला. त्यानंतर भारतावर कुणाचाही एकछत्री अंमल प्रस्थापित होऊ शकला नाही. याचा फायदा इंग्रजांनी उठवला. दोघांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ!
फाळणी नसती तर भारतात
फाळणी नसती तर भारतात मुसलमानांची संख्या ४० % झाली असती. आज ती १५ % आहे.
माझ्या मते मुसलमान भारतात रहाणे यात काही गैर नाही, दुर्दैवाने हिंदू च त्यांचा 'वापर' करून, आपआपसातल्या सत्तासंघर्षासाठी स्वतःच्या धर्माची वाट लावतात! असे ऐकले की पुष्कळ मुसलमानसुद्धा भारतात आहेत, ज्यांना मुसलमानांचे अतिरेकी विचार पटत नाहीत. पण हिंदूच गद्दार! नि पुष्कळ हिंदूंना सुद्धा नकोच आहे तो धर्म असे दिसते, म्हणून ज्या हिंदूंना तो हवा आहे त्यांची पंचाइत होईल.
माझ्या मते मुसलमान भारतात
माझ्या मते मुसलमान भारतात रहाणे यात काही गैर नाही, दुर्दैवाने हिंदू च त्यांचा 'वापर' करून, आपआपसातल्या सत्तासंघर्षासाठी स्वतःच्या धर्माची वाट लावतात!
माझ्याही मते मुसलमान काय कुणीही भारतात रहाणे गैर नाही. पण हिंदुत्ववाले कायम मुसलमान १५ % आहेत, त्यांच्या मदर्श्यावर किती करोड खर्च होतात, वगैरे काढून पोटदुखी करुन घेत असतात... हे त्यांच्यासाठी लिहिले. मग जर आज देशात ४० % मुसलमान असते तर हिंदुत्ववाल्यानी किती गोंधळ घातला असता..
Pages