Submitted by ग्लोरी on 2 December, 2011 - 02:25
एक होता छबू
त्याला दिसला भुभू
भुभू होता झोपेत
घोरत होता मजेत
छबूने धरली शेपूट
भुभूला म्हटला ऊठ ऊठ
भुभूला आली जाग
चढला भलता राग
भुभू भुंकत उठला
छबू धावत सुटला
एक होता ठोंबा
त्याला दिसली हंबा
हंबा होती चरत
हिरवे हिरवे गवत
ठोंबा गेला मधे
आणि म्हटला, "दुध दे"
हंबाने उचलली मान
जोरात हलवले कान
चिडली होती भारी
ठोंबा म्हटला सॉरी
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे,पहिल कडवं जास्तच.
छान आहे,पहिल कडवं जास्तच.
चान चान कविता , मस्तच
चान चान कविता ,
मस्तच
ग्लोरिअस मजेदार कविता
ग्लोरिअस मजेदार कविता
छान आहेत दोन्ही.
छान आहेत दोन्ही.