पाव किलो सुकट स्वच्छ करुन भिजवलेली(५ मिनिटे)
(चिकनचे)वाटण- १ १/२ मोठा डाव
आलंलसुण पेस्ट - १/२ मोठा डाव
१ डाव तेल
१ कांदा बारिक चिरलेला
१ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट मसाला
१-२ चमचा मालवणि मसाला(तिखट हवे असेल तर)
१ चमचा हळद
मीठ चवी नुसार
कोथिंबीर बारिक चिरलेली (गार्निशसाठी)
सुक्या मच्छीच्या वासामुळे खुपशे लोक मांसाहारी असुन देखील सुक्या मच्छीपासुन लांब रहतात. फक्त जरा वास सहन केला तर खरच खुप चवीचे आणि झटपट मांसाहारी जेवण बनु शकते. यासाठी हा सगळा खटाटोप..
आवडला तर जरुर कळवा..
-------------------------------------------------------------------------
कढईत तेल तापवुन त्यात प्रथम कांदा खमंग भाजावा. त्यात आलंलसुण पेस्ट, वाटण, मसाले, हळद सगळे चांगले तेल सुटेपर्यंत भाजुन घ्यावे. त्यात भिजवलेली सुकट, मीठ, पाणि टाकुन मंद आचेवर एक वाफ काढावी(रस्साच पण थोडं घट्ट ठेवा). गॅसवरुन खाली उतरले की त्यावर कोथिंबिर पेरावी.
गरमागरमच भाकरी किंवा भातावर वाढावे.
झटपट एकदम चवीचे सुकट तिकले तयार..
१) ह्यात कोकम(१-२) पण टाकतात पण आंबटपणामुळे तिखट कमी होते.
रूपाली....सहीच्.....मला सुकट
रूपाली....सहीच्.....मला सुकट खूप आवडते.....पण परदेशी अस्ल्याने थोडा problem होतो....तरी बिचारी माझी बायको शोधून आणते ......आणि करते....Thnx...I will share this with her.....तोंपासू....
रुपाली वेगळीच आहे पाकृ
रुपाली वेगळीच आहे पाकृ छान.
मला सुकी मच्छी आवडते. चेंज म्हणून छानच लागते. मी वेगळ्या पद्धतीने करते. कांदा तलून घ्यायचा मग त्याच्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन सुकट टाकायची. पाणी न टाकता वाफेवर मीडीयम गॅसवर शिजवायची. शिजत आली की कोकम टाकायचा मग मिठ, कोथींबिर पेरून पुन्हा एक वाफ आणून बंद करायचे. कालवण करायचे असल्यास चिंचेच्या कोळातच थोडे तांदळाचे पिठ घालून ते उकळवायचे.
नाना, जागुताई धन्यवाद
नाना, जागुताई धन्यवाद
जागुताई, तुझ्या पद्धतीने एकदा करुन बघेन..
तिखट मसाला हा काय प्रकार
तिखट मसाला हा काय प्रकार आहे??
रुपल्या ही रेशिपी टाकूक बरो
रुपल्या ही रेशिपी टाकूक बरो आजचो गुरुवार निवडलस... आता खावक व्हयी लवकरच.
रुपल्या, तुज्या घराक केलेल्या
रुपल्या, तुज्या घराक केलेल्या सुकटाच्या तिखलाचो दरवळ माज्या घरात शिरलो गो ! मेल्या एकट्यानच खाव नुको. वायच वाटीभर धाडुन दी. नाय तर पोटात दुखात ! ................
सुकट... अहाहा!!! नुसते वाचुन
सुकट... अहाहा!!! नुसते वाचुन तोंडाला पाणि सुटले...( उपवास असुन रेसिपी वाचली आता महिना कसाबसा काढावा लागेल )
वेगळीच पद्धत! मी जागूसारखेच
वेगळीच पद्धत! मी जागूसारखेच करते. फक्त शेवटी थोडे ओले खोबरे, कोथिंबीर आणि दालचिनीचा तुकडा वाटून घालते.
रोचीन कोणताही साधा तिखट
रोचीन कोणताही साधा तिखट मसाला.
नीलुताई,
वनाताई, शनवाराकच करुन खाल्लय.. मन एकदम भरुन पावला.
मयुरी, स्वाती
सगळ्यांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद..
हि पद्धत माझ्या सासर्यांची आहे.. माझी नाहि.. पणा चवीला एकदम भन्नाट..
रुपल्या, फुडच्या गटगक घेवन ये
रुपल्या, फुडच्या गटगक घेवन ये म्हणजे मग खावन प्रतिसाद देईन
शैलु..
शैलु..
वाह!! सुकटीची चटणी तर एकदम
वाह!! सुकटीची चटणी तर एकदम आवडीची !! आणि नवरोबाला सुकटीचा वास पण चालत नाही..
रुपाली,
(चिकनचे)वाटण म्हणजे?
(परतलेला कांदा + भाजलेलं खोबरं + लसूण + आलं) ह्या सगळ्याचा वाटलेला गोळा?
होय सोनपालवी तेच..
होय सोनपालवी तेच..
रुपालि फार छान. कनक् वलि च्या
रुपालि फार छान. कनक् वलि च्या आजि चि आटव् न झालि.
फुडच्या गटगक घेवन ये म्हणजे
फुडच्या गटगक घेवन ये म्हणजे मग खावन प्रतिसाद देईन <<<<<<<<<+१
रुपल्या, निदान फोटो तरी टाकुचो, तेवढाच समाधान
फुडच्या गटगक घेवन ये म्हणजे
फुडच्या गटगक घेवन ये म्हणजे मग खावन प्रतिसाद देईन <<<<<<<<<+१>> +२
सुकटाला भिजवुन काप द्यावेत
सुकटाला भिजवुन काप द्यावेत आले लसुण पेस्ट लिंबु विनेगर मीठ लावुन ओवनमधे खरपुस रोस्ट करावे चांगले लागते चवीला.
फोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
फोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSटोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSssssssssssssssssssssssssssssss
ह्या काय रूपल्या? फोटो खय?
ह्या काय रूपल्या?
फोटो खय?
मस्त वाटतेय कृती. मी नेहमी
मस्त वाटतेय कृती. मी नेहमी फक्त कांद्यावर परतून , मालवणी मसाला घालून करते. आता या पद्धतीने करणार .
मस्त गो !
मस्त गो !
चातका गप रव.. मि घाबरलय मा...
चातका गप रव.. मि घाबरलय मा... हे घे वरडा नुको...
अरेव्वा उद्याच्या चाकन्या
अरेव्वा उद्याच्या चाकन्या साठी चांगली सोय झाली.
धन्यवाद.
भाकरीत मस्त स्मायली दिसतोय.
भाकरीत मस्त स्मायली दिसतोय. पण मला सॅड स्मायली दिसतोय
>>पण मला सॅड स्मायली दिसतोय
>>पण मला सॅड स्मायली दिसतोय >> हो ती घाबरलीय ना तिला खाणार म्हणून
मला नाही दिसत??
मला नाही दिसत??