वड्यांसाठी:
१ कप डाळिचे पीठ
१ कप दही
२ कप पाणी
चवीनुसार मीठ
१/४ चमचा हळद
चिमुट्भर हिंग
१/४ चमचा किसलेलं आलं
फोडणीसाठी:
तेल
मोहरी
हिंग
कढीपत्ता
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
तीळ
सजावटीसाठी
बारीक चिरून कोथींबीर
ताज्या नारळाचा चव.
१. एका मायक्रोवेव्हमध्ये चालणार्या भांड्यात वड्यांसाठी लागणारं सामान एकत्र करणे
२. विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
३. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
४. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
५. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
६. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
७. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
८. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
आता हे मिश्रण अगदी गरम असतानाच तेल न लावलेल्या अल्युमिनम फॉईलवर कालथ्याने पट्पट पसरणे. अगदी पातळ लेअर करण महत्वाचं( मिश्रण फॉईलच्या एका बाजुला चमच्याने घालून कालथ्याने पटपट पातळ लेअर होईल असे ओढून पसरणे) हे खरं तर ट्रिकी आहे थोडं फार. मिश्रण गरमच असं पाहीजे नाहीतर पसरता येत नाही.
पातळ लेअरच्या सुरीने खूणा करून पट्या कापून घ्यायच्या.
पट्या गुंडाळून वड्या करायच्या.
सगळ्या वड्या गुंडाळून झाल्यावर त्यावर तेल गरम करून फोडणी करून पसरवायची.
वरून ताजी कोथींबीर आणि नारळाचा चव पसरायचा.
मिश्रण पटकन पसराव लागतं नाहीतर गोळा होऊ शकतो.
शिजवण्यासाठी बरोबर ४.५ मिनिटं पुरतात. ( अर्थात मायक्रोवेव्हच्या पॉवरवर अवलंबून आहे)
मिश्रण कालथ्याने एका डिरेक्शनमध्येच ओढायचं
जेवढा पातळ लेअर तेवढ्या वड्या नाजूक होतात.
(No subject)
लागणारा वेळ ५ मिनीटे बघुनच
लागणारा वेळ ५ मिनीटे बघुनच मोह झाला लगेच करायचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त सोप्पी पा.कृ.
ते मिश्रण शिजलंय हे ओळ्खायचं
ते मिश्रण शिजलंय हे ओळ्खायचं कसं? काही मावे मधे ४.५ मिनिट च्या आधि पण होऊ शकेल ना? आजच करीन
आर्च, मस्त दिसतायंत गं वड्या
आर्च, मस्त दिसतायंत गं वड्या
मलाही करुन बघायचा मोह होतोय पण ते मिश्रण पसरणं हेच कौशल्याचं काम आहे आणि तिथे शॉर्टकट नाही त्यामुळे पहिल्यांदा देखरेखीखाली कराव्या असं वाटतंय ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिजलं की मिश्रण चकचकीत होते
शिजलं की मिश्रण चकचकीत होते
झाल्या झाल्या झाल्या
झाल्या झाल्या झाल्या वड्या.... एकदम पर्फेक्ट... आर्च तुला किती धन्यवाद देऊ गं... पहिलाच प्रयोग सफल
फोटो आयफोन वरून कसा अपलोड करायचा?
अरे वा मस्तच. मी मायबोलीवरचीच
अरे वा मस्तच. मी मायबोलीवरचीच कृती वापरून वड्या करते पण त्या कुकरमध्ये कराव्या लागतात. आता यापण करून बघेन.
बाकी शीर्षकात ते झटपट मायक्रोवेव्हच्या झालय ते मायक्रोवेव्हच्या झटपट सुरळीच्या वड्या करशील का प्लीज?
आत्ताच या पद्धतीने सुरळीच्या
आत्ताच या पद्धतीने सुरळीच्या वड्या केल्या, मस्त झाल्या, एकदम परफेक्ट कृती, काहीही चुका झाल्या नाहीत.
धन्यवाद आर्च
सह्ही!!!!! आर्च आणि रूनी,
सह्ही!!!!!
आर्च आणि रूनी, दोघींच्याही सुव मस्त, एकदम तोंपासु !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा. रुनी, माझे पण हात
अरे वा. रुनी, माझे पण हात शिवशिवायला लागले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहेत
मस्तच आहेत
मस्त फोटो आणि कृती.
मस्त फोटो आणि कृती.
>>मस्त फोटो आणि कृती.>> +१
>>मस्त फोटो आणि कृती.>> +१
स्लर्प! स्लर्प!
स्लर्प! स्लर्प!
सुंदरच दिसताहेत वड्या. आईला
सुंदरच दिसताहेत वड्या.
आईला एवढ्यासाठी पाच ताटे तयार ठेवावी लागतात. हा एकच पदार्थ असा असेल कि, ज्यात ताटाला तेल अजिबात लावायचे नसते.
आर्च आणि रुनी, दोघींचेही फोटो
आर्च आणि रुनी, दोघींचेही फोटो एकदम मस्त!
नक्कीच करून बघणार ह्या फटाफट होणार्या सुरळीच्या वड्या
आर्च, पाककृती सार्वजनिक करणार का प्लिज?
मस्त रेसिपी ! सुरेख फोटो !
मस्त रेसिपी ! सुरेख फोटो !
अरे वा मस्त!!! मावे मधील
अरे वा मस्त!!! मावे मधील काहीही मला करायला आवडते... आणि त्यातुन आवडती रेसीपी.
आज नक्कि करणार
अरे वा छान कृती, मस्त फोटो.
अरे वा छान कृती, मस्त फोटो.
प्रयत्न करावा का........ ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
काल केल्या पण पार पोपट झाला.
काल केल्या पण पार पोपट झाला. तो का झाला असावा ते ही आलं लक्षात. मावेचं टेंप कमी पडलं. माझ्या मावेत आणखी एक दोन मिनिटं चालू शकलं असतं. जेव्हा मी फॉईलवर पसरलं तेव्हाही मिश्रण बर्यापैकी पातळ होतं. पुढच्यावेळी जरा जास्त वेळ ठेवून बघेन.
कृती सोप्पी, सुटसुटीत आहे ह्यात वादच नाही. धन्यवाद आर्च.
मस्त दिस्ताहेत वड्या, आर्च!
मस्त दिस्ताहेत वड्या, आर्च! मागे कधीतरी तू एका खादाडी ब्लॉगाची लिंक दिली होतीस या वड्यांसाठी. जाड्याभरड्या, पण अफाट मस्त झाल्या होत्या. (पिठाचा थर जरा पातळ पसरायला हवा हे आता लक्षात ठेवून तुझ्या कृतीनं या वड्या करेन.)
अफाट सुंदर दिसत आहेत
अफाट सुंदर दिसत आहेत सुरळीच्या वड्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाय पॉवर म्हण्जे किती वॅट्स
हाय पॉवर म्हण्जे किती वॅट्स ते सांगता येइल का प्लीज? माझ्याकडे ६०० आणि ८०० अशी २ सेटिंग्ज आहेत.
पाकृ. फारच सुट्सुटीत आणि मस्त आहे.
अपर्णा, ८००वर ठेवा.
अपर्णा, ८००वर ठेवा. मायक्रोवेव्ह ओव्हनाच्या कमाल पावरवर शिजवायचं.
आहा. मस्स्स्स्स्स्त आर्च.
आहा. मस्स्स्स्स्स्त आर्च. तुमच्या सर्व पाककृती सोप्या असतात.
आर्च, केल्या या पध्दतीने ,
आर्च,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![svadya.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u200/svadya.jpg)
केल्या या पध्दतीने , कधी जमतील असं वाटलं नव्हतं पण छान जमल्या , थँक्स कृती सोपी केल्या बद्दल :).
हा फोटो
आई एक्स्पर्ट आहे यात.
माझ्या आईचं व्हॅरिएशन, वड्या गुंडाळण्या आधी ओतलेल्या मिश्रणावर हिरवी चटणी पसरते (हिरवी मिर्ची- ओलं खोबरं-कोथिंबिर एकदम घट्ट चटणी), मग गुंडाळते , शिवाय फोडणी सगळं मिळून मस्तं झणझणीत लागतात.
सर्व्ह करताना करदळीच्या किंवा केळीच्या छोट्या किंवा कट केलेल्या पानावर.
मी केलेल्या वड्या जरा गादी
मी केलेल्या वड्या जरा गादी गुंडाळल्यासारख्या झाल्यात पण चव मस्त आणि एकदम झट्पट झाल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! आई याला चोरट खाण
मस्तच! आई याला चोरट खाण म्हणते, सगळे फोटो एक्दम तोंपासु!!
रुनी, दीप्स, आणि अंजली
रुनी, दीप्स, आणि अंजली सगळ्यांच्याच अगदी मस्त दिसतायत वड्या. पाहुण्यांसाठी केल्यावर मात्र पटकन होतास असं म्हणायच नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दीपांजली, चटणी लावायची कल्पना मस्तच. पुढच्या खेपेला नक्की लावणार.
वॉव तोंपासु तोंपासु ... काय
वॉव
तोंपासु तोंपासु ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त फोटो आहेत एक से बढ्कर एक सुगरणींनो. मस्तच
डीजे च्या वड्यांचा रंग काय मस्तय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण रुनी सारखे वड्या वळण्या आधी कोथिंबिर खोबरं आणि फोडणी घालून मग करते गुंडाळया
परवच केल्या होत्या. आता ही मावे ची सोप्पि रेसिपी करुन बघायला हवी.
Pages