तोफू स्टर फ्राय - फोटोसह

Submitted by दिनेश. on 21 November, 2011 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एका माणसाचा भरपेट नाश्ता होतो.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
नेटवर स्टर फ्रायचे अनेक प्रकार आहेत. ते तत्व पाळत काहि प्रयोग !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली. मस्त दिसते आहे. मला तोफू आवडतेच त्यामुळे मला अगदी चालेल.
तिळाच्या तेलाचा आणि तिळाचा वास मस्त लागेल.

मस्त दिसतंय स्टर-फ्राय Happy
टोफूचा वास लपत नाही हे खरे आहे. टोफू चुरुन घेऊन त्यात भरपूर मसाले, कोथिंबीर घालून ते सारण पराठ्यांमध्ये वापरले तर मात्र पनीर आणि टोफूमधील फरक विशेष कळून येत नाही.

माझ्याने हा पदार्थ भकाभक संपेल.>>>

Lol

स्वतःकडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघण्याचा आपला हा हॅन्डसम विचार फार फार आवडला चातकराव! मोठमोठ्या ऋषीमुनींना हे जमले नाही, ते आपल्याला जमले.

पण मी खाल्यानंतर (म्हणजे 'माझ्याकडून खाल्ला गेल्यानंतर' नव्हे बर का?) उरला तर हा पदार्थ आपल्याला मिळणार ना?

प्रयत्ने तोफूचे कण रगडिता अन्नही मिळे!

दिनेशराव, तुम्ही एक कराल का? फोटो फक्त टाकत जाऊ नका, कोणी जेवलेले असते नसते, है की नै?

-'बेफिकीर'!

सॉलिड..... मला तोफु खुप आवडते. मी ते वापरुन खुप पदार्थ करते. बहुतेकदा मी मलई पनीर आणतच नाही. बहुतेकदा तोफुच वापरते. प्रोटीन साठी. मी त्याचे परोठे करते, मटर पनीर करते, पनीर भुर्जी करते, पालक पनीर करते, सामोसे (पट्टीचे ) करते, अनेकदा मिक्स भाजीत कीसून घालते.

वरील पदार्थ मी ही करते पण तयार सॉस वापरुन. ही तीळाची कल्पना छान आहे. आजच करुन पाहेन.

धन्स

आभार सायो, बदल केलाय. (इथे त्याला सोया पनीर असा शब्द वापरतात.)

अश्वीनी, आधी परतलेला तोफू असे काहीतरी डोक्यात होते माझ्या. मग वाटले कुठून परतला, कुठे गेला होता.. असे प्रश्न येतील !

दिनेश अजून एक अफलातून डिशचा फोटो Happy
मला पनीर वगैरे अजिबात आवडत नाही, पण याच पद्धतीने बटाटा भाजी केली तर कशी लागेल हो? Proud

दक्षिणा, फक्त बटाटे उकडून घ्यावे लागतील. बाकिच्या भाज्या कच्चटच ठेवायच्या आहेत. एखाद्या दिवशी ब्रेकफास्टला करुन बघ.
बित्तुबंगा.. घरच्या तोफू ला जरा जास्तच उग्र वास यायला लागला होता.

आमच्याकडे सोयाबीनचे ओले दाणे मिळतात. ते मात्र चवीला छान लागतात.

मस्त! Happy

मी पण करते तोफू स्टर फ्राय... मी शेवटी वरतुन थोडा मध घालते... मस्त चव येते Happy
यातच थोडे काजु पण मस्त लागतात. काजु घातले तर तीळ नाही घालत मी.
कधी कधी बेबी कॉर्न्स पण घालते Happy

इथे तोफू ला 'बीन कर्ड' असेही म्हणतात. यात सिल्कन तोफू, फर्म तोफू, हार्ड तोफू, मॅरिनेटेड तोफू असे बरेच प्रकार मिळतात.

काल केली नूडल्ससहीत बर्‍याचशा भाज्या घालून ( ब्रोकोली, मश्रूम्स, बेबी कॉर्न वगैरे) एकदम छान होते.
स्टेप्स ४-५ प्रमाणे भाज्या परतून घेतल्यामुळे तेल फारच कमी लागलं आणि सॉसमध्येच लसूणपेस्ट टाकायची कल्पना छानच.

दिनेश, तुमच्या टिप्स सगळ्या ट्राईड आणि टेस्टेड असतात त्यामुळे करताना काळजी नसते.

चवीला पदार्थ नेमका कसा आहे ते आता कळेल तेव्हा कळेल पण तो केल्यावर ज्या पद्धतीनी तुम्ही मांडणी करुन फोटो काढता ना त्यात सुद्धा कला आहे. मस्त! बघून एकदम (तेवढ्यापुरता का होईना) करुन खावासा वाटतो. Happy तेवढ्यापुरता ह्यासाठी म्हंटलो कारण माझा पदार्थ करुन बघायचा हुरुप फक्त फोटो बघून ५ मिनीटच राहतो.

आर्चने केले तसे बेबीकॉर्न आणि अंजली म्हणते तसे पनीर घालुन पण मस्त लागेल. नक्की करणार.
अंजली, पनीर बटरमधे थोडे फ्राय करुन घेतले तर नाही तुटत.

मस्त पदार्थ आणि फोटो दिनेश Happy

आर्च.. छान वाटलं.
बुवा. हा कंटाळा ५ मिनिटाचाच असतो, पण स्वतः केलेला पदार्थ मनासारखा जमला तर त्याच्यासारखे समाधान नाही !
अंजली / आरती भाज्या कुठल्याही घेता येतात. खरं तर न्याहारीला अश्या भाज्या खाल्ल्या, तर (मला तरी) ताजेतवाने वाटते.
मी पण तोफू नेहमी नाही वापरत.

Pages