सीरेमिक पे॑न्टि॑ग

Submitted by नाविन्या on 20 November, 2011 - 04:29

Image0010.jpgImage0012.jpgImage0016.jpgImage0017.jpgImage0161.jpgImage0167.jpgImage0169.jpg

गुलमोहर: 

छान! मस्त Happy
कस केल? मटेरिअल काय? रन्ग कोणते? स्टेप्स कोणकोणत्या? चिकटवणे वगैरेकरता काय वापरले?

सुंदर. नाविन्या ह्यात द्राक्षाचे घडही करता येतात. सिर्‍यामिकचे गोल गोल गोळे करुन ते द्राक्षा प्रमाणे लावायचे आणि बाजुला पाने करायची.

सुंदर Happy

पॉटला बेस रंग दिल्यावर एक सुतळ फेव्हीकॉलमध्ये बुडवत बुडवत एकीकडे पॉटवर वेडीवाकडी चिकटवत जायची. नंतर त्या पॉटला २-३ रंगांचे फराटे मारुन रंगवायचे. सुतळीलाही रंग व्यवस्थित लागला पाहिजे. सुतळीमुळे एकप्रकारचे टेक्स्चर येते. नंतर मणी, काचा बटणं वगैरे चिकटवायची.

सिरेमिक पे॑टि॑ग "रेसिपी"... Happy

साहित्य : पॉट, प्रायमर, ऑईलपे॑ट (बेसकलरसाठी), सिरेमिक पाउडर, गो॑द , फेविकॉल, पर्ल कलर्स

कृति: ज्या पॉटवर पे॑टि॑ग करायचे आहे त्याला धुवुन पॉलिश पेपरने हलकेसे घासून घ्यावे. वाळल्यान॑तर त्यावर प्रायमर लावून घ्यावे. चा॑गले सुकल्यावर पॉटला ऑईलपे॑टने र॑गवून घ्यावे. हा र॑ग व्यवस्थित सुकून द्यावा.

डिझाईन तयार करण्यासाठी : सिरेमिक पाउडर घेवून त्यात हळूहळू गो॑द घालुन पिठासरखे मळून घ्यावे. तयार मतिचा गोळा प्लास्टिकच्या पिशवित झाकुन ठेवावा (हवा लागून माती कडक होत जाते). आता या मातिचे छोटेछोटे गोळे बनवून आपल्याला आवडेल ते डिझाईन बनवून घ्यावे आणि तयार डिझाईन पॉटवर फेविकॉलच्या सहाय्याने चिटकवावे. डिझाईन सुकल्यावर आवडते पर्ल कलर्स वापरून र॑गवावे.

मातीचा गोळा लाटण्याने लाटून सुरिने हव्या त्या आकारात कापून घेता येतो.
बेसकलरसाठीही पर्ल कलर वापरु शकता.

छान Happy