ढेमसे अर्धा किलो
दोन मध्यम आकाराचे कांदे सोलून पातळ उभे चिरून
सुकं खोबरं अर्धी वाटी
लसूण पाकळ्या आठ दहा
तिळ पाव वाटी
खसखस एक चमचा
बडीशेप एक चमचा
आमचूर पावडर एक चमचा
लाल तिखट, हळद, गरम मसाला, मिठ अंदाजाने स्वादानुसार आवडीप्रमाणे.
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी
ढेमसे स्वच्छ धुऊन पुसुन घ्यावीत.
मग देठाजवळ गोलाकार कापून देठ काढुन टाकावा व आतिल बिया व गर पोखरुन बाहेर काढुन टाकावा.
कढईत एक चमचा तेल टाकून त्यावर पातळ उभा चिरलेला कांदा खमंग परतून घ्यावा. मग लसूण, सुके किसलेले खोबरे, तिळ, खसखस, बडीशेप हे सगळे एक एक करून खमंग भाजून घ्यावेत.
मग हे कांदा खोबरे व इतर भाजलेल्या वस्तूंचं मिश्रण थोडं गार करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, मिठ, आमचूर पावडर घालून मिक्सर वर बारिक वाटून घ्यावं.
तयार वाटप पोखरलेल्या ढेमश्यांमध्ये दाबून गच्च भरुन घ्यावं.
कढईत तेल तापउन जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करून हि भरलेली ढेमसे त्यात टाकावीत. कढीवर झाकण ठेउन मंद आचेवर शिजु द्यावीत. सारण भरून जर थोडे शिल्लक असेल तर तेही वरुन टाकले तरी चालते. पण भाजी शिजताना त्यात पाणी घालू नये. मधे मधे हलक्या हाताने हलवावी म्हणजे ढेमसे जळणार नाहीत. भाजी शिजल्यावर वरून कोथींबीर घालून खायला तयार. फुलके, तांदळाच्या भाकरी किंवा नुसतीही खायला भन्नाट लागतात.
आपल्या ह्या पारंपारीक पद्धतीत बडिशेप आणि आमचूर पावडर घातल्याने मस्त स्वाद येतो.
नॉर्थ कडे ह्यात बारीक चिरलेला कांदा + पनिर किंवा खवा कुसकरुन + मसाले असे स्ट्फिंग करतात.
झकास!
झकास!
ढेमसं म्हणजे काय?
ढेमसं म्हणजे काय?
छान वाटत्येय पाकृ फायनल
छान वाटत्येय पाकृ
फायनल प्रॉडक्टचा मोठ्या आकारात फोटो टाक ना....
डॅफो, पाककृती सार्वजनिक कर.
डॅफो, पाककृती सार्वजनिक कर.
लाजो, इकडे चिन्मयने दिलेली लिंक पहा आणि त्याच बाफवर दिनेशदांनी या भाजीचा मोठा फोटो टाकला आहे.
मला कधीच न आवडणारी भाजी, पण
मला कधीच न आवडणारी भाजी, पण डॅफोने इतकी मस्त रेसीपी केली आहे, नक्कीच करणार.. धन्यवाद डॅफो..
धन्स मंजुडी.
धन्स मंजुडी.
सगळ्या पायर्यांचे फोटो
सगळ्या पायर्यांचे फोटो टाकलेत ते छानच.
(मला कधी जमणार हे ?)
झकास.. हे टिंडे बर्याचवेळा
झकास.. हे टिंडे बर्याचवेळा बघतो दुकांनात पण 'या टिंड्यांचं करायचं काय असतं नक्की?' असा प्रश्न नेहमी पडून कधीच घेत नाही. आता घेईन. यांनाच ढेमसं म्हणतात हे ठाऊक नव्हतं ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद!
सगळ्या पायर्यांचे फोटो
सगळ्या पायर्यांचे फोटो टाकलेत ते छानच.
(मला कधी जमणार हे ?)
सगळ्या पायर्या टाकुन तरी आम्हाला काय फायदा? आम्ही केलेलं तुमच्या फोटोप्रमाणे होतच नाही !
masatch resipee...
masatch resipee... aavadalii..:)
छान रेसिपी!! माझी फेवरेट भाजी
छान रेसिपी!! माझी फेवरेट भाजी मी आतला गर टाकुन न देता, तेलात परतुन मिक्सरमधुन इतर मसाल्यांसोबत वाटुन घेते, छान चव येते.
गेल्या वर्षि अमॄतसर ला एका
गेल्या वर्षि अमॄतसर ला एका पंजाबी मैत्रिणी च्या लग्नात हे भरवां टिंडे खाल्ले होते त्यात खवा घातला होता.प्रचंड आवडली होती हि डिश मला.आता घरी करुन बघायला हवी.
लई भारी... पाककृती आवडली
लई भारी... पाककृती आवडली
धन्स मंजुडी कुणितरी
धन्स मंजुडी कुणितरी लिहिल्यासारखं वाटत होतं म्हणून खुप शोधलं तर सापडलीच नाही चिनुक्स ची रेसिपी. तो धागा पण सार्वजनीक नाहिये.