गोळे:
१ वाटी भिजवलेली कडधान्ये, [याचे बाजारात पाकीट मिळते, नाहीच मिळाले तर आपल्या आवडीप्रमाणे सम प्रमाणात एकत्र करून भिजवावी]
१/२ वाटी तांदळाचे पीठ,
२ चमचे तेल,
१/२ इंच आले,
१ हिरवी मिरची,
चवीप्रमाणे मीठ.
आमटी:
३ मोठ्या पाकळ्या लसूण,
४ चमचे दाण्याचा कुट [जाडसर असावा],
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ चमचा लाल तिखट,
१ चमचा गोडा मसाला,
१/२ चमचा साखर,
२ पाने कडीपत्ता,
३-४ वाट्या पाणी,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग,
चवीप्रमाणे मीठ.
आमटी:
कढईत तेल घेऊन फोडणी करावी. अगदी पातळ चकत्या करून लसूण मंद आचेवर चांगला लाल होऊ द्यावा. आता फोडणीत कडीपत्ता,हळद,हिंग,लाल तिखट, गोडा मसाला घालावा. थोडेसे डावाने हलवून घ्यावे, म्हणजे तिखटा-मसाल्याचा 'रॉ' वास निघून जातो. ३-४ वाट्या पाणी घालावे. साखर,कोथिंबीर, दाण्याचा कुट घालावा. आमटीला मंद आचेवर उकळू द्यावे, गोळे करायला घ्यावे.
गोळे:
४ ते ५ तसा भिजवलेली कडधान्ये, मिरच्या, मीठ, आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्यावे. वाटताना वरून पाणी घालू नये. एका भांड्यात वाटलेले मिश्रण, २ चमचे तेल आणि त्यात मावेल इतके तांदळाचे पीठ असे सगळे एकत्र करावे. साधारण थालापिठाच्या पीठ सारखा गोळा तयार होतो. याचे छोटे-छोटे गोल-गोल गोळे करून आमटीत सोडावे.
हे गोळे वाफेवर शिजून आपोआप आमटीत तरंगू लागतात. सगळे गोळे वर येईपर्यंत डावाने हलवू नये. एखादा गोळा फुटून आमटी घट्ट झालीच तर शेवटी वरून थोडे गरम पाणी घालावे.
गोळ्यांची गर्दी झाल्यास, वर आलेले गोळे हलकेच डावाने डिशमध्ये काढून घ्यावे आणि जेवणाच्यावेळी परत आमटीत मिक्स करावे. असे केल्याने खालच्या गोळ्यांना डोके वर काढणे सोप्पे जाते.
बेताचेच तिखट असेल तर पोळीबरोबर न खाता, नुसते खायला पण छान लागते. नुसते खाणार असाल तर, उकळलेल्या आमटीत थोडी काकडी किसून घातल्याने अजून खमंग लागते.
छान आहे प्रकार. करुन पहाणार.
छान आहे प्रकार. करुन पहाणार.
प्रकार टेस्टी दिसतोय.
प्रकार टेस्टी दिसतोय. भिजवलेली कडधान्ये म्हणजे कोणती कोणती घ्यावीत?
मस्त प्रकार आहे. डाएटकरता
मस्त प्रकार आहे. डाएटकरता चांगला लागेल बहुतेक.
आडो, मूग, मटकी, तूर, चवळी, हिरवे ओले हरभरे/चणे, ब्राऊन हरभरे वगैरे..
छान आहे प्रकार. करुन बघायला
छान आहे प्रकार. करुन बघायला हवा.
हेल्दी, टेस्टी प्रकार दिसतोय.
हेल्दी, टेस्टी प्रकार दिसतोय. करून बघेन.
आमच्याकडे गोळ्यांची आमटी करतात. पण त्यात कडधान्ये नसतात. फक्त वाटलेली डाळ असते. ही कल्पना छान आहे.
प्रकार चांगलाच आहे, पण
प्रकार चांगलाच आहे, पण गोळ्यांच्या बाबतीत प्रेमाने लिहिलय..ते खासच.
छान आहे हा प्रकार..हे गोळे जर
छान आहे हा प्रकार..हे गोळे जर चाळणीवर वाफवुन नंतर रश्शात सोडले तर ?
मस्तच. करुन बघणार ( आणि खाणार
मस्तच. करुन बघणार ( आणि खाणार )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चाळणीवर वाफवुन नंतर रश्शात
चाळणीवर वाफवुन नंतर रश्शात सोडले तर ? >> चालेल की, थोडे काम वाढेल इतकेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मी म्हणायचे की अजुन कोणी म्हणणार आहे ....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तच! धन्यवाद आरती
मस्तच! धन्यवाद आरती![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे आवडलं, मी ते मिक्स
हे आवडलं, मी ते मिक्स कडधान्याची आमटी कायम करते. ही गोळे करायची आयडिया मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्र मी केलेलं सॅलड भरपूर
अर्र मी केलेलं सॅलड भरपूर उरलं वाट्ट![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कडधान्याचे गोळे मस्त प्रकार
कडधान्याचे गोळे मस्त प्रकार वाटतोय. वाफवून घेतले तर आयत्यावेळी घातले तरी चालेल असं वाटतंय. बरं, दाण्याचे कूटवाली आमटी सोडून आणखी कोणत्या आमटी/ग्रेव्ही प्रकारात वापरता येतील का ते?
अ.कु., कुठल्यही कोफ्ताकरी
अ.कु., कुठल्यही कोफ्ताकरी किंवा अंडाकरीच्या ग्रेव्ही मधे चांगले लागेल. गोळ्यांना स्वत:ची फारकाही चव नसल्यामुळे. वाटलेल्या मसल्यांचा कंटाळा आला की आशी साधी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स आरती.
धन्स आरती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! करून बघीन. पण मी गोळे
व्वा! करून बघीन. पण मी गोळे वाफवीन. कारण आमच्या घरात कच्च्या पक्क्याचं फार आहे.
अरे वा, छान प्रकार वाटतोय.
अरे वा, छान प्रकार वाटतोय. करून बघीन.
मस्त आमटी करून बघायला आवडेल
मस्त आमटी
करून बघायला आवडेल नक्की. आणि आमटीत काकडी किसून घालण्याची आयड्या एकदम भारी आहे. ती आयड्या तर लग्गेच अंमलात आणणार.
छान आहे हा प्रकार. आवडला.
छान आहे हा प्रकार. आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त वाटत आहे. मन्जूडी + १
मस्त वाटत आहे. मन्जूडी + १
मस्त मी कधी कधी कडधान्याची
मस्त
मी कधी कधी कडधान्याची पोळी कर्ते अन त्यांचे तुकडे टाकते आमटीत
मस्त आहे रेसिपी.. आमच्या कडे
मस्त आहे रेसिपी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या कडे पण गोळ्याची आमटी करतात. हरभरा डाळीच्या पिठात कांदा घालुन, तिखट मीठ घालुन त्याचे
गोळे करुन आमटीत घालतात. ती पण छान लागते. चवीला आंबट-गोड असते चिंच-गुळामुळे.
मस्तच!!! करून पहायला हवी
मस्तच!!! करून पहायला हवी
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरती, मस्त पाककृती. करून
आरती, मस्त पाककृती. करून बघेन.
घरी इतरांसाठी खिम्याच्या गोळ्यांचा पुलावा झाला की व्हेजिटेरियन मंडळींसाठी असे गोळे घातलेला भात असायचा. तासभर भिजवून निथळलेले तांदूळ, तुपात परतून, तुझ्या कृतीत दिलेल्या रश्श्यात फुलवले तर असा गोळ्यांचा पुलाव करता येईल असं वाटतंय.
आज करुन बघितली हि आमटी...चव
आज करुन बघितली हि आमटी...चव छान आली पण गोळे जरा आतुन कच्चे राहिले...काय चुकले असेल?
कच्चे तेल घतले होते का ?
कच्चे तेल घतले होते का ?
गोळ्यांचा पुलाव करता येईल असं वाटतंय.>> मस्त कल्पना मृ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कच्चे तेल घातले होते..
कच्चे तेल घातले होते..
वा मस्त पाककृती. नक्की करणार.
वा मस्त पाककृती. नक्की करणार.
Pages