स्वतःच्या आरोग्याशी संबंधित कोणती माहिती तुम्हांला आयफोन / आयपॅडवर अ‍ॅप वापरून जाणून घ्यायला आवडेल ?

Submitted by संपदा on 9 November, 2011 - 09:09

मी सध्या मेडिकल ईंफोर्मॅटिक्समध्ये मास्टर्स करते आहे . आम्हांला येत्या सेमिस्टरमध्ये अ‍ॅप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करायचे आहे . त्यासाठी विविध कल्पना मी शोधते आहे . तुम्हांला आयफोन अथवा आयपॅड वापरून स्वतःच्या आरोग्याशी संबंधित कोणती माहिती पटकन जाणून घ्यायला आवडेल ?

माझ्या २ कल्पना अशाप्रकारे :-

१. कॅलरी चेक - एखाद्या पदार्थाचे नांव टाईप करून त्यातील कॅलरीज जाणून घेणे , स्वतःला खाण्यायोग्य आहे की नाही हे पडताळून पाहणे .

२. अ‍ॅलर्जी चेक - युरोपात अ‍ॅलर्जीजचे प्रमाण जास्त असल्याने इथे अशी माहिती देणारे अ‍ॅप भारताच्या तुलनेत जास्त वापरले जाईल असं मला वाटतं .

तुमच्याकडे अजून काही कल्पना आहेत का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅलरी चेक - नुस्तेच कॅलरी नाही, पण सगळे न्युट्रिशनल इन्फो ( कार्ब्स, फॅट्स, फायबर, व्हिटामिन्स इ ) याची माहिती .

कॉमन मेडिसिन्स ची माहिती - अ‍ॅक्टिव्ह इन्ग्रेडियन्ट, वया प्रमाणे डोसेज, कॉमन साइड इफेक्ट्स, काउंटर इंडिकेशन्स इत्यादी

कुठल्या व्यायाम प्रकारात किती वेळात किती कॅलरी बर्न होतात त्याची माहिती.

अजून काही आयडिया,

ग्लूकोमीटर अथवा इतर घरगुती वापराची उपकरणे कशी वापरावीत याचे व्हिडिओ - देशी भाषांमधून

औषधांचे रिमाईंडर देणारे कॅलेंडर अ‍ॅप

काही लोकांना दर महिन्या दोन महिन्यांनी ( शुगर असल्यास कधी कधी रोज ) वेगवेगळ्या ब्लड टेस्ट कराव्या लागतात. प्रत्येक रिपोर्टची माहिती एंटर करून ती कॅप्चर करणारे , त्याचे सोपे प्लॉट दाखवणारे अ‍ॅप

दिवसभरामध्ये काय खाल्ल , किती व्यायाम केला यानुसार दिवसभराचा डाटा अ‍ॅनालाईझ करुन हेल्थ ग्रेडींग सिस्टीम सारखे काहीतरी. बर्न केलेल्या कॅलरीज, गेन केलेल्या कॅलरीज यांचा ratio वापरुन.

अ‍ॅनुअल चेक अप रीमाइंडर, पुर्वीचे डॉक रिपोर्ट्स सेव्ह करण्याची सोय , अ‍ॅलर्जी इन्फॉर्मॅशन देणारी माहिती इत्यादी (जेणेकरुन अ‍ॅक्सिडेंट/इमर्जन्सी वगैरेच्या केस मध्ये माझा फोन चेक करुन डॉक्टर्सना ताबडतोब उपचार सुरु करता येतील.) अर्थात हा सर्व डाटा प्रोटेक्टेड असेल याची खात्री करुनच.

प्रेग्नंसी साठी अ‍ॅप.- डॉक्टर विझीटस्, सोनोग्राफी रिमाईंडर्स, ड्यु डेट कॅल्क्युलेटर, दर आठवड्याला होणार्‍या गर्भाच्या वाढीची माहिती.

संपदा आपल्या area मधल्या कोणत्या apothekachi notdienst आहे त्याची माहिती . फार गरज आहे या app ची . म्हन्जे PLZ दिल कि त्या दिवशी कोणाचि turn आहे ते कळेल.

दुकानात दिसलेले एखादे मेडिकल प्रॉडक्ट फोनमधील कॅमेर्‍याने स्कॅन करुन त्याबद्दलची माहिती, त्याचे कंटेंट्स, अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन्स, डोसेज इ. माहिती विविध भाषातुन (सिलेक्टेबल) मिळणे.

शुगर चेक साठी अ‍ॅप. करंट इन्डीविज्युअल शुगर लेवल चार्ट. आणि योग्य शुगर लेवल बरोबर तुलना.