आंबाडीच्या बोंडाच्या पाकळ्या, मीठ, साखर, जिरेपूड आणि मिरीपूड. बर्फ
आंबाडीच्या बोंडाच्या पाकळ्या साधारण अर्धा कप भरुन घ्याव्यात. त्या कोमट पाण्यात भिजत घालाव्यात. पाण्याला छान रंग आला कि त्या कोळून घ्याव्यात्.मग त्यात चवीप्रमाणे मीठ साखर आणि जिरेपुड व मिरीपुड घालावी. सरबत तयार. बर्फ घालून प्यावे.
हि पाककृति वाचल्यावर पहिला प्रश्ण येणार तो कुठे मिळतात या पाकळ्या ? भारतात कुठे मिळतात याचे उत्तर मला माहित नाही. मिळतात का याचीही खात्री नाही.
पण जे आखाती प्रदेशात राहतात त्याना मात्र या केअरफॉर सारख्या मोठ्या सुपरमार्केट्मधे करकटे वा करकदे या नावाने, साधारण सुका मेवा जिथे असतो तिथे मिळतील.
आपल्याकडे हे सरबत नक्कीच होते. आद्य पाककृति लेखिका लक्ष्मीबाई धुरंधर यांच्या गृहीणीमित्र या पुस्तकात हे सरबत आहे. रुचिरामधे देखील, रायते म्हणून हे सरबत आहेच. पण तरीही या पाकळ्या मला भारतात कुठेही विक्रीसाठी असलेल्या दिसल्या नाहीत.
आपण जी आंबाडीची भाजी खातो. तिचे मुख्य दोन प्रकार. एक लाल देठाची, आणि दुसरी हिरव्या देठाची. मुंबईत साधारण लाल देठाचीच मिळते. ती जास्त आंबट असते. कोल्हापूर भागात हिरव्या देठाची मिळते. ती जरा कमी आंबट असते. आणि म्हणुन भाजी करताना, ती उकडून तिचे पाणी फेकायची गरज नसते.
बहुतेक महाराष्ट्रभर हि भाजी आवडीने खातात. अगदी नाथांच्या भारुडातही हिचा उल्लेख आहे, ( काळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच नाही, मला दादला नको गं बाई )
आंध्रातही गोंगुरा नावाने हि भाजी खातात. कोल्हापूरच्या सानिध्याने कर्नाटकाच्या काही भागातही खातात, आणि मी हि भाजी सिंगापूरमधेही बघितलीय, त्यामूळे तामीळ लोकही खात असावेत.
मी गावोगावचे आठवडी बाजार बघितले आहेत. कुठेही हि बोंडे मला दिसली नाहीत. मला ती प्रथम दिसली ती मस्कतच्या जत्रेत. छोट्याश्या मोदकासारखे दिसणारे हे किरमीजी रंगाचे बोंड आणि त्यावर जाडसर अश्या या पाकळ्या.
हि भाजी भेंडी, कापूस, जास्वंद या कूळातली असल्याने, तिला तसेच फूल येते. आणि मग हे बोंड लागते. कधी कधी आपल्याकडे भाजीला हि कोवळी बोंडे लागलेली दिसतातही.
आखाती भागात मात्र याचे सरबत आवडीने पितात. माझ्या सुदानी मित्राने मला याची चटक लावली. ते लोक खास करुन रमदानचे उपास सोडताना हे सरबत पितात. पित्ताचा त्रास होत नाही.
डॉ मीना प्रभूंच्या, इजिप्तायन मधे या सरबताचा चहा म्हणुन उल्लेख आहे. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत मी त्याना हे सांगितलेदेखील होते.
या सरबताला बहारीचा रंग येतो. अगदी तेजस्वी माणकासारखा. चवही अप्रतिम. बरीचशी कोकमासारखी. तोंडाला छान चव येते या सरबताने. या पाकळ्या वापरून सोलकढीही करता येते. फक्त कोकमाप्रमाणे या पाकळ्या भाजी आमटीत टाकता येत नाहीत.
उद्या याचा फोटोही टाकतो. भारतातील मायबोलीकरानी या पाकळ्या बाजारात मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
मला एक शंका आहे. कि आंबाडीची भाजी आता मुबलक मिळते ( माझ्या लहानपणी ती इतकी मिळत नसे ). बियांसाठी बोंडे हवीतच. मग ती बाजारात का येत नाहीत ? बाजारात मिळणारे अमृत कोकम यापासूनच करत असतील का ?
>>>>बाजारात
>>>>बाजारात मिळणारे अमृत कोकम यापासूनच करत असतील का ?
नाही, अमृत कोकम रातांबे म्हणून कोकमासारखंच जे फळ असतं त्यापासून केलं जातं (चू.भु.द्या.घ्या) कोकणात आमच्या गावी उन्हाळ्यात वाळवताना पाहिलेलं आहे.
गाणपतीच्य
गाणपतीच्या सुमारास आंबट आंबाडे येतात ते आणि हे सारखेच का??? मी ते ऋषीपंचमीच्या मिक्स भाजीत वापरते....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
सायोनारा
सायोनारा मी पण मालवणचाच. भरपूर रातांबे म्हणजेच कोकमाची फळे खाल्ली आहेत. ( मुंबईला प्लाझाच्या समोर मिळतात, ती एप्रिल मे मधे ) कोकमाची मागणी फार वाढली आणि त्या मानाने लागवड वाढलेली नाही. अलिकडे बाजारात येणार्या कोकमाना, तो पुर्वीचा रंग येत नाही. शिवाय कोकमं कालांतराने काळी पडतात, व रंगानेही फिक्कट होत जातात. अलिकडे बाजारात जे सरबत मिळते त्याचा रंग आणि स्वाद, हा कोकमापेक्षा आंबाडीच्या बोंडाचाच वाटतो.
त्याच्या जवळपास जाणारे फळ म्हणजे मँगोस्टीन. गर गोड असतो, पण त्याचे साल फार कडू असते.
साधना, त्या आंबाडीचे झाड वेगळे असते. बरेच मोठे होते. रातांब्याची झाडे सावंतवाडीला खुप आहेत. हे झाड उभे वाढते, फारसा आडवा विस्तार नसतो. फांद्या खालच्या दिशेने वाढतात. आंबाडीच्या फळाचे झाड मात्र गोलसर वाढते. गोव्याला गोकूळाष्टमीला त्याचे रायते करतात. त्या वेळी ती फळे मऊसर असतात. पूर्णपणे खाता येतात. मग त्यात फार रेषा होत जातात. ती नीट खाता येत नाहीत. अर्थात चवीत फारसा फरक पडत नाही.
दिनेशदा मी
दिनेशदा मी जळगाव जिल्ह्यातली, आमच्या शेतात खुप असतात या बोंड्या. आई त्याचि चटनी बनवते ति खुप दिवस टिकते फ्रिज मधे. साधारण जानेवरीत याचा सिझन संपतो. आंबाडीच्या पानांनची ज्वारिचि कणी घालुन भाजि पन करतात पावसाळ्यात. बोंड्या वळवुन त्यची पावडर गोड आंबट वरणातपण वापरतात चिंचेच्या जागी.
उनो. खूप
उनो. खूप आनंद झाला, निदान कुणालातरी हि बोंडे माहित आहेत हे बघून. पुढच्या मोसमात, सरबत नक्की ना ?
मी तर
मी तर बालपणापासून अंबाडीचे बोंड पाहिलेले आहेत. त्यात अकोला तर कापसासाठी प्रसिद्ध आहे म्हणून बहुतेक अंबाडीपण चांगली उत्पादन देत असेल. सिंगापुरात बारोमास लाल देठाची अंबाडी मिळते. हल्ली तर सुपर मार्केटात अंबाडीची ओली बोंड पण मिळायला लागलीत. पण किती तो आंबटपणा या भाजीचा! दात पार आंबतात. तेलुगु लोक अंबाडी आवडीने खातात. अंबाडी सागासारखी वाटून त्यात भात फोडणी देतात. त्याला गोंगुरा भात म्हणतात. अंबाडीच्या बोंडांचे लोणचे माझी आई करते. आणि पराटी म्हणजे कापसाच्या लांब सुकलेल्या काड्या जशा कुळाची घरे बनवन्यासाठी वापरतात तशीच अंबाडीच्या सुकलेल्या काड्या कुळाची घरे बनवायला वापरतात.
दिनेश फार छान माहिती लिहिली. फोटो अवश्य टाका.
आंबाडीचा
आंबाडीचा वाख पण काढतात ना ?
वाख म्हणजे
वाख म्हणजे काय ते आधी सांगा
वाख म्हणजे
वाख म्हणजे दोर, जसा घायपातीचा असतो तसा. तो अननसाच्या पानाचाही काढता येतो.
उनो आणि बी, तूमच्याकडे करडईची बोंडे पण असतील ना ? काय करता त्यांचे ?
दिनेश खरच
दिनेश खरच असेल तर फोटो द्याल का? म्हणजे काय घ्यायचंय ते पक्कं कळेल.
दिनेशदा
दिनेशदा करडईच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. बोंडातल्या बी पसुन तेल बनवतात बाकि जास्त महित नाहि हो मला.
ambadi.jpg (35.19 KB) हा
ambadi.jpg (35.19 KB)
हा घ्या फोटो.
उनो या बोंडाचे लोणचे करतात असे ऐकले होते. भाजी आम्ही करतो. या करडईची बोंडे पण छान दिसतात. एकदा परभणीला शेतात दिसली होती, खुडायला गेलो तर चांगलेच काटे टोचले होते.