दोन एक महिन्यापुर्वीची गोष्ट. एका मित्राने चेहरे पुस्तकात त्याच्या लडाखः ट्रिप चे प्रचि टाकले होते. प्रचंड आवडले मला ते प्रचि. मग अधिक माहिति आणि प्रचि मिळवण्यासाठी "गुगल" देवाला साकडे घातले आणि गुगल देवाने आमच्या पदरात (म्हणजे स्क्रिन वर हो..तुम्हि पण नाsss...) टाकली एक अनोखी लिंक. आपल्या "पक्का भटक्या" च्या "उदंड देशाटन करावे ... लडाख" ची लिंक. अप्रतिम लेखनशैली आणि तितक्याच अप्रतिम प्रकाशचित्रांनी भारावुन गेलो. तब्बल १६ भाग. सगळे च्या सगळे एका बैठकीत वाचुन काढले राव. सगळेच भाग भन्नाट.
पण अजुन पोट भरल नव्हतं. मग सुरु झाली माबो ढुंडो ढुंडो मोहिम. नवीन लेखन, हितगुज, गुलमोहर, लेखमालिका, रंगीबेरंगी सगळी कडे फिरुन आलो आणि जाणिव झाली ती अलीबाबाची गुहा सापड्ल्याची. जादुगाराच्या पोतडीतून काय वाट्टेल ते बाहेर पडावं तसं कथा, कादंबर्या, कविता, गझल, विनोद, प्रकाशचित्र, उखाळ्या-पाखळ्या, सांत्वनाचे शब्द, मोलाचे सल्ले आजून किती नि काय काय सापडत होत माबो वर.
गेल्या पाच वर्षांपासून भारता बाहेर असल्यामुळे मातृभाषेला दुरावल्याची जाणीव माबो ने एक क्षणात दुर केली.
अपवाद वगळता सगळं साहित्य लेखन तर चांगल होतच, पण जास्त मजा आली ते प्रतिसाद वाचुन. बरेच "पु.ले.शु." म्हणत उत्साह वाढवणारे तर काहि कान उघडणी करणारे. पण सगळेच मनापासुन.
लेखन तर लेखन, सगळे माबोकर पण भन्नाट. जगाच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेले. आपल्या मातृभाषेच्या पाउलखुणा जगाच्या कानाकोपर्यात उमटवणारे. बर हे माबोकर नुसतेच व्हर्चुअल नाहित तर चक्क हाडामांसाचे. गटग करुन एकमेकासं भेटणारे. वविची मज्जा लुट्णारे. एकमेकांची सुखःदुखः शेअर करणारे.
इतक्या वर्षात आपण काय काय मिसलं याचि जाणिव मनाला चटका लावुन गेली. म्हटल आता बास झाल. जे मिसलं ते मिसलं आत आण़खी नाहि मिसणार. लगेचच माउस पाँईटर "सद्स्य प्रवेश" कडे सरकू लागला .... आणि मी माबोकर झालो.
मी मराठी संकेतस्थळ शोधत
मी मराठी संकेतस्थळ शोधत असताना मायबोली सापडली आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मलाही अलिबाबाची गुहा गवसली.
मला मायबोली २००८ पासुन माहिती
मला मायबोली २००८ पासुन माहिती होती पण तिचा सभासद मात्र जर्मनी मध्ये आल्यावर झालो. इकडे आल्यनन्तर मातृभाषेला दुरावल्याची जाणीव माबो ने एक क्षणात दुर केली.
धन्यवाद
मी सर्वप्रथम यु.के. ला आलो
मी सर्वप्रथम यु.के. ला आलो २००७ मध्ये. मराठी साहित्य वाचण्याची आमच्या घरात प्रचंड आवड.
ईथे माझ्या प्रोजेक्ट मध्ये मराठी औषधाला ही नाही. आणि कुटूंबिय सुद्धा नंतर आले ३ महिन्यांनी. आणि नेमका ऑक्टोबर मध्ये आलेलो.
जाम रडकुंडीला आलेलो. अचानक 'मायबोली' चे संकेतस्थळ सापडले. याला 'माय' बोली का म्हणतात ते मनापासुन जाणवले.
अगदी मायबोली सुरू झाल्यापासुनचे साहित्य वाचुन काढले, कितीतरी लेखांनी, कथांनी, सच्च्या अनुभवांनी डोळ्यांतुन पाणी कधी काढले तेच कळाले नाही.
एकवेळ जेवणाला उशीर होतो, पण मायबोलीवर आज नवीन काय आहे ते तपासल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही.
बायकोचा मायबोलीच्या नावाने ठणठणाट केला नाही असा एकही दिवस जात नाही
मायबोलीचे व्यसनच लागले आहे असे म्हटले तरी चालेल, नाहीतरी ह्या परक्या देशात आपल्या देशाचा अनुभव
करवुन देणारे दुसरे साधन तरी कोठले आहे म्हणा
माबोवर स्वागत मी वैभव
माबोवर स्वागत

मी वैभव जोशींची एक गझल शोधत इथे पोचलो होतो आणि आता पक्का माबोकर होवून गेलोय
मी सध्या त्याच खंडात आहे,
मी सध्या त्याच खंडात आहे, लाईन्स आर ओपन..
मी सुद्धा! "वसंत बापटांची"
मी सुद्धा! "वसंत बापटांची" कविता शोधत असतांना मायबोली सापडली. तेव्हापासून फॅन आहे मी पण! कधीच काही लिहिलं नाही मायबोलीवर पण नेहमीच वाचत आलेय. आतातर काही प्रश्न पडला की उत्तरासाठी पहिले मायबोलीच आठवते!
मला सुद्धा मायबोलिचि सभासद
मला सुद्धा मायबोलिचि सभासद होऊन १ वर्ष ४ महिने झाले. बरेचसे लेख वाचून काढले. आता तर एक दिवस सुद्धा ईथे आल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्यक्ष्यात ज्यांना पाहिलेलेच नसते पण त्यांच्याशी मायबोलिवर गप्पा मारताना वर्षानुवर्षाचे ओळखीचे आहोत नव्हे अगदि जिवाभावाचे मित्र्-मैत्रिणी आहोत असेच वाटते. घरातले तर गमतीने म्हणतात "काही दिवसांनी आम्हाला स्वतःचि ओळख करून द्यावी लागेल. ":)
मायबोलीचे व्यसनच लागले आहे
मायबोलीचे व्यसनच लागले आहे असे म्हटले तरी चालेल, नाहीतरी ह्या परक्या देशात आपल्या देशाचा अनुभव करवुन देणारे दुसरे साधन तरी कोठले आहे म्हणा>>>१००% अनुमोदन
सच्चे लिखाण, तेवडे, "झलो" चे
सच्चे लिखाण, तेवडे, "झलो" चे "झालो" कराना!
शापित गंधर्व
शापित गंधर्व
मायबोलीचे व्यसनच लागले आहे
मायबोलीचे व्यसनच लागले आहे असे म्हटले तरी चालेल, नाहीतरी ह्या परक्या देशात आपल्या देशाचा अनुभव
करवुन देणारे दुसरे साधन तरी कोठले आहे म्हणा>>>>>>> अगदी १००% खर... परदेशात राहणार्यना माय....बोली ...वाचण्याचा मोलाचा दुवा...
मायबोलीची ओळख व अनुभव इथेही
मायबोलीची ओळख व अनुभव
इथेही अनेक मायबोलीकरांनी लिहिले आहे.
हे फक्त सहज आठवले, आणि एक माहिती म्हणून.
अरे..लक्षातचं नाहि
अरे..लक्षातचं नाहि आलं...धन्यवाद मुग्धानन्द .... अपेक्षित बदल केला आहे.
वोक्के, शा. गं.
वोक्के, शा. गं.
शापित गंधर्व छान! मनापासून
शापित गंधर्व
छान! मनापासून लिहिलंत ..आवडलं. मी आठवायचा प्रयत्न केला की कशी आले माबोवर....आज्जिबात आठवत नाही. पण बहुतेक असंच इंटरनेटवर संचार करताना माबो सापडली असावी.
हो हे व्यसनच आहे. पण कधी एकटेपणा(हा मनाचाच असतो) वाटला तर माबोमुळे आपण एका मोठ्या ग्रूपमधे असल्याचं समाधान वाटतं!
मायबोलीची ओळख व अनुभव>>>
मायबोलीची ओळख व अनुभव>>> धन्यवाद साजिरा. चांगली लिंक दिलीत. 'आईने अकबरी' हि काय भानगड आहे? जरा त्याची पण लिंक द्या ना. फारचं उत्सुकता आहे राव.
ते आईना-ए-अकबरी असेल कदाचित !
ते आईना-ए-अकबरी असेल कदाचित !
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
शापित गंधर्व ही लिंक वाचा.
मला पण मा.बो. ची ओळ्ख माझ्या
मला पण मा.बो. ची ओळ्ख माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी मुळे ( प्रज्ञा १२३ ) मुळे झाली. ती एक एक गोष्टी
सांगत गेली आणि तसे तसे वाचत गेल्यावर मा.बो. वरचे सर्वच खुप आवडायला लागले..:)
आता मा.बो. जीवनाचे एक अविभाज्य अंग बनली आहे. आणि मला याचा खुप अभिमान आहे. मा.बो,मुळे
खुप नवीन मित्र-मैत्रिणी गप्पा मारायला आणि खुप गोष्टींची देवाण-घेवाण करायला मिळतात . मा.बो.मुळेच
दिनेश दां सारख्या अष्ट्पैलु व्यक्तीची ओळ्ख झाली. तसेच संभाजी पार्क मध्ये झालेल्या ग.ट.ग. मुळे अनेक
मा.बो.करांना प्रत्यक्ष भेटता आले उदा. दिनेशदा, दक्षिणा, मी-आर्या, शोभा १२३, अनिल ७६, आशुच्यैम्प, शशांक आणि शांकली. वगैरे. खुपच मजा आली त्या दिवशी. आता पुढच्या गटग ची आतुरतेने वाट बघत आहे.
आता रोज आज काय असेल मा.बो. वर याची उत्कंठ्ता असते आणि ते बघितल्याशिवाय दिवस पुर्ण झाला आहे असे वाटत नाही.

गंधर्वा.... ........
गंधर्वा....
........ पुर्वाश्रमीचा पक्का भटक्या..
सेन्या, थोडक्यात काय तर,
सेन्या, थोडक्यात काय तर, तुझ्याचमुळे धिरज माबोकर झालाय, लै भारी
अगदी अगदी, मनातलं..! सुरेख
अगदी अगदी, मनातलं..! सुरेख लिहीलं आहेस की..
तुझ्याचमुळे धिरज माबोकर
तुझ्याचमुळे धिरज माबोकर झालाय,
>>> त्याला माझे लिखाण माबोवर मिळाले आहे. त्यामुळे गंधर्व इथे येण्यात माबोचा हात आहे माझा नाही.. .;)
मस्त धिरज.... पु.ले. शु
मस्त धिरज....
पु.ले. शु
गंधर्वा... मस्तच लिहिलय
गंधर्वा...
मस्तच लिहिलय की....
मलापण कुसुमाग्रजांच्या कविता शोधताना माबो. चा शोध लागला होता...
"उदंड देशाटन करावे ... लडाख" ... ओह.. पुर्वाश्रमीचा पक्का भटक्या.. म्हणजे सेनापती का... ह्म्म्म... मी पण पाहिली आहे ती लिंक... छाने
पजो...
पजो...
शा.गं. सुंदर लिहीलय. मला
शा.गं. सुंदर लिहीलय. मला प्रज्ञा१२३ ने इथला मार्ग दाखवला. आणि खरच ओळख नसलेल्या, न पाहिलेल्या मित्र-मैत्रिणी मिळाल्या. नंतर काही जणांची भेट झाली. काही मदत हवी असेल तरी, सगळे तत्परतेने मदत करतात. एकमेकांच्या सुख-दु:खात सगळे सामील होतात. आता मायबोली हे कुटुंबच झाले आहे. प्रज्ञा, धन्यवाद.
प्रिती + १. अगदी माझ्या मनातल लिहीलस प्रिती.
मीही अशीच गुगल करत असताना इथे
मीही अशीच गुगल करत असताना इथे आले....एका कलिग ला मसाल्याची रेसिपि ह्वी होती आनि मला त्यावेळी माबो वर दिनेशदा ची मल्टीपर्प्ज ची रेसिपी सापडली..मग काय स्गळ्या भागातुन फिरुन आले..आनि सभासद झाले...मग टाईपला शिकले..धागा उघडण्याच धाडस केल....आनि हल्ली तर गगो च व्यसन च लागल आहे
मायबोली रॉक्स 
प्रज्ञा१२३ ने इथला मार्ग
प्रज्ञा१२३ ने इथला मार्ग दाखवला
>> म्हणुन तुम्ही देखील शोभा १२३ असा आयडी घेतलात की काय???
पु.ले. शु म्हणजे काय ?
पु.ले. शु म्हणजे काय ?
Pages