सफरचंद - २
नारळाचा चव - १ वाटी
साखर - २ वाट्या
साजुक तुप - १ चमचा
सफरचंद किसुन घ्यावे. २ सफरचंदांचा साधारण २ वाट्या किस होतो.
नारळाचा चव, साखर, सफरचंदाचा किस नॉनस्टीक पॅनमधे एकत्र करुन गॅसवर ठेवावे. मंद आचेवर ठेवावे.
हे मिश्रण हलवत रहावे लागते. १० ते १५ मिनीटांनी आपोआपच पॅन स्वच्छ होते आणि मिश्रण एकत्र होउन गोळा तयार होतो. पाक अटुन घट्ट गोळा तयार होतो. असा गोळा तयार होईपर्यंत हलवत रहावे. शेवटी गॅस मोठा केला तरी चालतो.
ताटाला थोडेसे तुप लावुन गरम असतानाच वड्या थापाव्या.
गार झाल्यावर वड्यापाडुन डब्यात भरुन ठेवाव्या
१.सफरचंद पुरेशी गोड असतील तर साखर १ वाटीच घ्यावी.
२.सफरचंद किसताना पाठीकडुन किसावे, म्हणजे साल नीट किसली जाते. उलटे किसलेतर गर किसला जाउन साल हातात निघुन येते. किसलेले साल, छान केशराच्या काड्यांसारखे दिसते.
३.वेळ वाचवण्यासाठी, स्वयपाकाला सुरुवात करताना हे मिश्रण गॅसवर ठेवावे, साधारणपणे स्वयपाक होईपर्यंत मिश्रण आळुन येते आणि वड्या थापायला तयार होतात.
व्वा!! मस्तच दिसतायत करुन
व्वा!! मस्तच दिसतायत
करुन बघेन नक्की
छानच दिसतायत
छानच दिसतायत
छान वाटतात आहेत वड्या आरती!!!
छान वाटतात आहेत वड्या आरती!!! करुन पाहाणार लवकरच!!
मस्त दिसतायत
मस्त दिसतायत
मस्त.आता करतेच्,घरात दोन्ही
मस्त.आता करतेच्,घरात दोन्ही आहेत
मस्त. एरवी आपण सुवासासाठी
मस्त.
एरवी आपण सुवासासाठी वेलदोड्याची पूड घालतो. ह्यात दालचिनी छान लागेल. सफरचंद + दालचिनी कॉम्बो छान जातो एकमेकांबरोबर.
नॉनस्टिकमध्ये ठेवायचे लक्षातच नाही आले आत्तापर्यंत! कढईपेक्षा नक्कीच चांगल्या होतील असे केले तर!
मस्त! सफरचंद किसण्याची आयडिया
मस्त! सफरचंद किसण्याची आयडिया खुपच आवडली..
दालचीनी चा स्वाद खरंच छान लागेल..
आरती, ही जुन्या मायबोलीत
आरती, ही जुन्या मायबोलीत लिहिली होतीस का पाकृ?
तिकडे वाचून मी केल्या होत्या सफरचंद घालून नारळाच्या वड्या.. स्वाद मस्त लागला होता सफरचंदाचा, पण रंग नाही आवडला
मी खाल्ली आहे ही (ओरिजीनल)
मी खाल्ली आहे ही (ओरिजीनल) वडी, चव अजून आठवतेय. कुठल्यातरी गडावरच खाल्ली होती.
गार झाल्यावर वड्यापाडुन
गार झाल्यावर वड्यापाडुन डब्यात भरुन ठेवाव्या
आणि खायच्या कधी??? की फक्त गडावर गेल्यावरच खायच्या????
रेसिपी मस्त आहे, करुन बघणे नी नंतर खाणेही मस्ट
मस्त!
मस्त!
आजच करुन पाहिन्..छान आहे
आजच करुन पाहिन्..छान आहे रेसीपी
आम्ही सफरचंद आउटसोर्स करतो
आम्ही सफरचंद आउटसोर्स करतो
नारळ आणायचा कंटाळा करतेय पण
नारळ आणायचा कंटाळा करतेय पण आता आणावाच लागेन.
लाजो, अनु ३, अमया, मंजिरी,
लाजो, अनु ३, अमया, मंजिरी, आश, पौर्णिमा, मंजूडी, सुलेखा, दिनेश, साधना, अरुंधती, सुजा
सगळ्यांनाच धन्यवाद
पौर्णिमा,
दालचीनीने याची खास 'फृटी टेस्ट' रहाणार नाही. मी तर काजु पण घालणे बंद केले.
ही जुन्या मायबोलीत लिहिली होतीस का पाकृ?>> मला पण असे आठवत होते, बरीच वर्षे झाली त्याला पण सर्च मधे काही सापडले नाही. लालू आणि दिनेश असे दोनच धागे दिसतात 'सफरचंद' सर्च ला टाकल्यावर, म्हणून टाकली.
नलिनी, लवकर आण आणि फोटो पण पाठव
ही बघ
ही बघ
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/84802.html?1218407518
ते 'सफरचंदाची साल केशराच्या काडी सारखी भासते' वगैरे लिहिलं होतं असं आठवत होतं. थोडसं खणून पाहिलं जुन्या हितगुजात आणी सापडलीच लिंक. पण नव्याने परत लिहिलंस ते छान केलंस. पूर्वी करून पाहिल्या होत्या या वड्या. आता परत करून पाहीन.
आरती, मस्तंच गं. गुलकंदवडी
आरती, मस्तंच गं.
गुलकंदवडी सारखा दिसतोय फायनल पदार्थ.
अर्थात वडी कोणतीही प्रियच आहे मला.
धन्यवाद प्रॅडी. 'सफरचंद' न
धन्यवाद प्रॅडी. 'सफरचंद' न करता 'खोबर' सर्च करायला हवे
धन्यवाद दक्षिणा
मस्तच तोँडाला पाणी सुटले
मस्तच
तोँडाला पाणी सुटले
धन्यवाद जाई
धन्यवाद जाई
एक नंबर झाल्या, चव अतिशय
एक नंबर झाल्या, चव अतिशय आवडली. आरतीचा सल्ला ऐकून दालचिनी, वेलदोडा काहीच घातले नाही. 'फ्रूटी टेस्ट'- अगदी अगदी!
धन्यवाद पौर्णिमा
धन्यवाद पौर्णिमा
आरती, ह्या वड्या करुन पाहीन.
आरती, ह्या वड्या करुन पाहीन. सोप्या आहेतसे वाटते करायला.