Submitted by मिलिंदा on 16 September, 2009 - 03:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक कप ओले खोबरे
एक कप बेसन
एक कप दूध
एक कप तूप
तीन कप साखर
वेलची, जायफळ, केशर, बदाम काप, काजूचे तुकडे, बेदाणे अंदाजाने
क्रमवार पाककृती:
एका जाड बुडाच्या पातेल्यात बेदाणे, बदाम आणि काजू सोडून बाकी सर्व एकत्र करा.
बेसनाच्या गुठळ्या फोडून घ्या.
पातेले मध्यम आचेवर ठेवून सतत ढवळत राहा.
साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनी मिश्रण पातेल्याच्या कडेपासून सुटायला लागते.
तेव्हा बेदाणे, बदाम आणि काजू घालून तूप लावलेल्या ताटात ओता.
थोडे थंड झाल्यावर वड्या पाडा.
वाढणी/प्रमाण:
खाणार्यावर अवलंबून
अधिक टिपा:
माहितीचा स्रोत:
मिनोती कुंदरगी
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात मी पुढे केलेले बदल - १/४
यात मी पुढे केलेले बदल -
१/४ कप तूप पुरते. आणि बेसन तूपात थोडे भाजुन घ्यायचे.
येवढे खोबरे वापरायचे नसेल तर त्यात गाजराचा खीस वापरु शकता किंवा गाजर खोबरे एकत्र घेउ शकता.
१/४ रवा आणि ३/४ कप बेसन हा पण काँबो छान लागतो.
मी याचे वेगन व्हर्जन करतेय. ऑल्मोस्ट जमलेय ते झाले की ते पण टाकेन.
ओल्या खोबर्या ऐवजी डेसिकेटेड
ओल्या खोबर्या ऐवजी डेसिकेटेड कोकोनट पण चालते....
आजच सेव्हन कप स्वीट्स केले
आजच सेव्हन कप स्वीट्स केले , मस्त रेसिपी .
तूप मी १/४ कपच घातले . मात्र सगळे मिश्रण हलवून घट्ट व्हायला जवळपास १ तास लागला . मिश्रण खाली लागू नये म्हणून मी गॅस low ठेवला होता .
मलाही एक तास लागतो ह्या
मलाही एक तास लागतो ह्या वड्यांसाठी, मंद आचेवर. ह्यात अनंत व्हेरियेशन केली आहेत, आणि सगळी हिट आहेत. अगदी रेग्युलरली करते मी ह्या वड्या. मिनोतीला कायमचे आभार आहेत ह्या रेस्पीसाठी
मी पण बरेच वेळा या वड्या
मी पण बरेच वेळा या वड्या करते. आधी बेसन थोडं कोरडंच भाजून घेते आणि मग बेसन भिजेल एवढंच तूप घालते.
मायक्रोवेवमधे या वड्या कधी कोणी करून पाहिल्या आहेत का? कमी वेळात होतील का?
मि आज करुन पाहिल्या पण चिक्की
मि आज करुन पाहिल्या पण चिक्की सारख्या चिकट झाल्या....खुट्खुटीत नाही झाल्या..
सगळं प्रमाण निम्म घेतलं होतं..
काय चुकलं असेल?
निम्माच वेळ भाजलं का ?
निम्माच वेळ भाजलं का ?
माझी आई ह्याचच एक वेरिएशन
माझी आई ह्याचच एक वेरिएशन करते. मी कालच तिच्या रेसिपीने केल्या वड्या रवा वापरून.
१ वाटी बारीक रवा + १ वाटी आलं खोबरं + १ वाटी पातळ साजूक तूप + १ वाटी दूध + २.५ वाट्या साखर असं सगळं एकत्र करून एका नॉन स्टीक पातेल्यात शिजवत ठेवावे. सतत ढवळत रहावे. ते सगळ आळत आलं की गॅस बंद करून अंदाजे वॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालून आणखी ढवळावे अथवा कोणालातरी ढवळत रहायला सांगावे.
मग ताटात्/ट्रे मध्ये तळाशी जरासं तूप चोळून त्यावर ते मिश्रण ओतावं मग ते evenly थापावं. जरा थंड झालं की वड्या पाडाव्या.
ह्या घ्या तज्या वड्या. साधारण ५ झाल्या.
निम्माच वेळ भाजलं का ? >>>>>
निम्माच वेळ भाजलं का ? >>>>>
साधारण ५ झाल्या.>> ५० च्यावर
साधारण ५ झाल्या.>>
५० च्यावर दिसतायत. का कोणी मागायला नको म्हणून घरच्या पुरत्या?
मिलिंदा, आर्च,
मिलिंदा, आर्च,
मी केल्या या रेसिपीने पण साखर
मी केल्या या रेसिपीने पण साखर सव्व्वा दोन कप घातली. व्यवशीत गोड झाल्या. मस्त रेसिपी
मिलिंदा , आर्च, ५५ झाल्या.
मिलिंदा , आर्च,
५५ झाल्या. आता १०-१५ च उरल्या आहेत.
सव्वादोन कप च साखर घालणार मी पुढ्च्या वेळी, ह्या जरा किंचित जास्त गोड झाल्यात माझ्या मुलीसाठी.
मी करुन पाहिल्या. गाजराचा कीस
मी करुन पाहिल्या. गाजराचा कीस घालून. १ तास लागला. मस्त झाल्या आणि लगेच फस्तही झाल्या. धन्यवाद मिनोती.
मी पण केल्या या वड्या. मला
मी पण केल्या या वड्या. मला साधारण तीस पस्तीस मिनिटे लागली पण मी तूप एक कप इतके घेतले होते. आता पुन्हा करताना कमी तूप वापरून बघेन,
फोटो काढायचा होता पण वड्याच संपल्या