बदाम - १ वाटी
खवा - १ वाटी
हरबरा डाळ - १ वाटी
साखर - ३ वाट्या
जायफळ
वेलचीपूड - आवडीनुसार
केशर- चिमूटभर
बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी सालं काढून मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्या.
नेहमीच्या पुरणासाठी शिजवतो तशी हरभरा डाळ शिजवून मऊ वाटून घ्या.
आता एका पातेल्यात डाळ आणि साखर एकत्र गरम करा. चटचट आवाज यायला लागला की बदामाची पेस्ट त्यात मिसळा. हे दोन्ही चांगले मिळून आले की त्यात खवा ( न भाजता ) मिसळा. मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवित रहा. त्यात जायफळ-वेलची-केशर घाला. पुरणासारखे हे मिश्रण आवडीनुसार थोडे ओलसर किंवा कोरडे केले तरी चालते.
पुरणपोळीसाठी मळतो तशी कणिक मळून त्यात सारण भरून पोळी लाटा. तव्यावर तेल तूप न घालता भाजून घ्या.
एका परातीत भरपूर तूप घ्या. ( हो ! परातीत !! ) तव्यावर भाजलेली पोळी थेट त्या तुपात बुडवा. उलटीपालटी करून चांगली भिजवा. बदाम पोळी तयार आहे. दिसायला ही नेहमीच्या पुरणपोळीसारखीच दिसते म्हणून फोटो नाही टाकत. चव मात्र.. अहाहा...! एकदा खाऊन बघाच !
आज एका काकुंकडे जेवायला गेले होते. तिथे हा बेत होता. काकूंचं घराणं वेदशास्त्रसंपन्न प्रवचनकारांचं. आजच्या म्हणजे दिवाळीपाडव्याच्या दिवशी हा नैवेद्य परंपरेने चालत आलेला आहे असे काकू म्हणाल्या.
तुपात भिजलेली ती एक पोळी खाऊन दुपारी घरी येऊन जी झोपले ती तीन तासांनी आईने हलवून उठवल्यावरच उठले !!! खूप जड पण खूप चवदार असा हा राजस पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणिंना दिवाळीच्या शुभेच्छांसह
एक राहिलंच ...... आठवडाभराचं
एक राहिलंच ......
आठवडाभराचं व्यायामाचं नियोजन करूनच ही पोळी खा
बाप रे!
बाप रे!
वेगळाच प्रकार आहे रेसिपी
वेगळाच प्रकार आहे रेसिपी वाचायला छान वाटतेय पण करायची आणि खायची हिंमत नाही होणार
राजस्__खरंच.
राजस्__खरंच.
यम्म्म्म्म...... बिल्वा +१
यम्म्म्म्म......
बिल्वा +१
<< रेसिपी वाचायला छान वाटतेय
<< रेसिपी वाचायला छान वाटतेय पण करायची आणि खायची हिंमत नाही होणार >>
अगदीच असं नाही काही, कोणी करुन खायला घालणार असेल तर खायची तयारी आहे. हल्ली जरा अशक्तच झालोय थोडा.
तरी बरं, तूपाचे प्रमाणच
तरी बरं, तूपाचे प्रमाणच दिलेले नाही.
या पोळीत सगळाच जड+,जड माल
या पोळीत सगळाच जड+,जड माल आहे..वर्[ताण्]तुप ही आहेच..ती खाउन [पचवायला]झोप अति आवश्यक आहे..पण तरीही एकुण छान च आहे..
हो... मी पण हि खाल्ली आहे
हो... मी पण हि खाल्ली आहे ..पोळी..पुर्ण तुपात बुडालेली.....एवढ तुप खाल्यामुळे.. संध्याकाळ च जेवण स्किप कराव लागल होत... पण खुप अप्रतिम लागते..
तुपात भिजवलेली पोळी ..डेंजर
तुपात भिजवलेली पोळी ..डेंजर आहे.. मस्तच लागत असणार!
खाण्याच्या कल्पनेनेच पेंग
खाण्याच्या कल्पनेनेच पेंग आली...पण एकूणात चविष्ट वाटतोय हा प्रकार.
माझा पास. पण मितान तुझ्यामुळे
माझा पास.
पण मितान तुझ्यामुळे कळले तरी. थँक्यु.
भारीच आहे.. कोणी करुन खायला
भारीच आहे..
कोणी करुन खायला घालणार असेल तर खायची तयारी आहे>> माझी पण