मी, गगो बोलतोय....

Submitted by स्मितहास्य on 22 October, 2011 - 03:03

नमस्कार मंडळी.

मी गगो बोलतोय.
होय तोच गगो, जिथे येऊन तुम्ही खेळता, बोलता, थट्टा - मस्करी करता आणि हो कधी कधी भांडतासुद्ध्हा..

तर आज म्हटलं जरा स्वत: तुम्हालोकांशी गप्पा माराव्यात. खरं तर मी आलोय ते तुम्हा सगळ्यांचे आभार मानायला. कशासाठी? तर अहो तुम्हीच तर मला अस्तीत्व दिलंत. एक कुटुंब बनलोय आपण.
आपण सगळे इथे जमतो कधी घटकाभर तर कधी तासन् - तास, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे, कधी खर्‍या नावाने तर कधी डू आयडी घेऊन Happy पण येतो हे खरं. आपण इथे आलो, गप्पा मारल्या कधी भावूक होऊन तर कधी खडाजंगीपण झाली. पण आपण मात्र अभेद्य राहिलो.

सगळी सुखं - दुखं सामावून घेतली. चांगल्या चार गोष्टी सांगितल्या. थोडक्यात मालकांनी म्हटल्याप्रमाणे "कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!" हे वाक्य सार्थ ठरविलं. वेगवेगळ्या सणांच्या दिवशी मला सजवलंत, हक्काने इथे येऊन आनंद आणि त्याबरोबर दुखंसुद्धा वाटून घेतलीत. इतकं सुंदर कुटुंब तुम्ही मला दिलंत, मग त्याबद्दल मला आभार नको मानायला तुमचे Happy

इथे चालणारी धमाल, ऐकविल्या जाणार्‍या गझला, कविता, हास्यविनोद या सगळ्यांचा मीसुद्धा मनमुराद आनंद उपभोगत होतो. आणि आता तर दिवाळी आलीये. मग केला विचार पक्का आणि म्हटलं की आज आपणही गप्पांचा फड मांडायचा... Happy आपणंही आपले विचार इथे मांडावेत, हसून-हसून गडबडा लोळावं, रागानं थोडावेळ खट्टू व्हावं म्हणून हा सगळा प्रपंच.

आज आपल्या कुटुंबात किती सदस्य आहेत याची गणनाच न केलेली बरी. काही नेहमी येणारे आहेत तर काही शुक्रतार्‍यासारखे दिसणारे. पण कधी का होईना कुटुंबाची आठवण त्यांना होते हे ही नसे थोडके. नाहीतर म्हटलं आजकाल वेळ कुणाकडे आहे घरी बघायला. तेवढ्यापूरता सणवार आले की आई-वडीलांकडे तोंड दाखवून यायचं, नाहीतर वेळ कुणाला आहे त्यांच्यासाठी. महिन्याचे पैसे पाठवले की संपली जबाबदारी. अरे पण भावनिक नात्यांच काय पोरांनो??? एकवेळ पैसे नका देऊ, पण थोडावेळ त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारा, चौकशी करा... खूप बरं वाटेल त्यांना. म्हातारपणाची काठी म्हणून ज्यांनी तुमच्याकडे पाहिलं त्यांना असंच वार्‍यावर सोडून देतांना थोडा विचार करा. नाही मला माहीतेय की तेवढाही वेळ नाहीये तुमच्याकडे पण तरीपण. एक कुटुंबप्रमुख म्हणून जे वाटलं ते बोलतोय पोरांनो.

मी खरंच खूप नशिबवान आहे की तुम्ही माझी पोरं कितीही व्यस्त असलात तरी घटकाभर का होईना, माझ्याकडे येऊन जाता. खूप खूप बरं वाटतं. आज पोरं परगावी गेलीत. पण जमेल तसं विचारपूस करायला जमतात इथे. आजकालच्या या जमान्यात जिथे, पोर आई-बापाला ओळखत नाही किंवा केवळ पैश्यापाई आईचा जीव घेतं, तिथे तुम्हा पोरांची एकमेकांबरोबर बांधली गेलेली नाती पाहून ट्चकन् डोळ्याच्या पापण्या पाणावतात.

असो, तुम्ही म्हणाल काय हा म्हातारा पाल्हाळ लावून बसलाय. काय मग पोरांनो झाली की नाही दिवाळीची खरेदी? आपल्या घरात तर आधीच उटण्याचा सुगंध पसरलाय, लगबग उरकलीय इतरांनी म्हणा......
धामधूम सगळीकडे दिसतेय. मस्त वाटतंय. एकतर दिवाळी आणि त्यात तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारतोय.

तर पोरानो, सांभाळून दिवाळी साजरी करा, उगा अतिउत्साहात कुठे गालबोट तर लागणारी याची काळजी घ्या. लेकरांना सांभाळा आणि खूप खूप आनंदात सण साजरा करा. माझे आशिर्वाद आहेच तुमच्यापाठी सदैव. आणि असंच आपलं घर नांदतं ठेवा....... तसं बोलायचं खूप होतं पण म्हटलं तुमचीपण लगबग असेल.
आणि हो, कधी वाटलंच आमच्या कुटुंबाला भेटावसं, तर नक्की या.
हा आमचा पत्ता.. गप्पागोष्टी परिवार

सांभाळा... आणि काळजी घ्या..
माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेछ्चा...

क.लो.अ
आपलाच "गगो"

गुलमोहर: 

सुरेख कल्पना..!! शाब्बास गगोकरांनो..! (कौतूकाने स्वतःच्याच पाठीवर थाप मारत... कारण मीसुद्धा एक 'गगोकर' आहे.)

उकाका, अहो गगो हे मला बांधलेल्या घरासारखंच वाटतं. एवढीशी मेहनत ती काय!! Happy
अमित Happy

नाहीतर म्हटलं आजकाल वेळ कुणाकडे आहे घरी बघायला. तेवढ्यापूरता सणवार आले की आई-वडीलांकडे तोंड दाखवून यायचं, नाहीतर वेळ कुणाला आहे त्यांच्यासाठी. महिन्याचे पैसे पाठवले की संपली जबाबदारी. अरे पण भावनिक नात्यांच काय पोरांनो??? एकवेळ पैसे नका देऊ, पण थोडावेळ त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारा, चौकशी करा... खूप बरं वाटेल त्यांना. म्हातारपणाची काठी म्हणून ज्यांनी तुमच्याकडे पाहिलं त्यांना असंच वार्‍यावर सोडून देतांना थोडा विचार करा. >>
याचा काय संबंध इथे? Uhoh

आजकालच्या या जमान्यात जिथे, पोर आई-बापाला ओळखत नाही किंवा केवळ पैश्यापाई आईचा जीव घेतं, तिथे तुम्हा पोरांची एकमेकांबरोबर बांधली गेलेली नाती पाहून ट्चकन् डोळ्याच्या पापण्या पाणावतात.
>>
गगोवर (किंवा माबोवर म्हणा हवं तर) येणारेही "आजकालच्या जमान्यातले लोक" च आहेत नं? मग ते असे नाहीत याची काय खात्री? जरा जास्तच मेलोड्रमॅटिक वाटलं हे.

असो. अगदीच पटली नाही ही वाक्यं म्हणून लिहिलं.

सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा!

लिहलय मस्त वादच नाही.

मला मात्र उगाच जुन्या काही गोष्टी आठवल्या. एखादा बुजुर्ग जेव्हा अनेक पिढ्या खासकरुन स्थित्यंतर असलेल्या पिढ्या पहातो आणि आत्मचरित्र लिहतो तस गगो खरोखरचा म्हातारा झाला की काय अस वाटुन गेल.

गगो ने सिंहावलोकन केल आहे अस म्हणल तर जास्त बर पडेल. दिवाळीच्या वेळेला गगोवर घडलेल्या अप्रिय गोष्टींचा उल्लेख टाळला हे आणखीच छान.

गगो ने सिंहावलोकन केल आहे अस म्हणल तर जास्त बर पडेल. >> नितीनजी, 'सिंहावलोकन' म्हणण्याऐवजी "स्मिहावलोकन" म्हणालात तर जास्त बरं पडेल. कारण हा लेख त्यानेच लिहला आहे. Happy

छान Happy

Pages