२ कप : मिल्क पावडर
१/२ कप : रवा किंवा मैदा
१ चमचा : वेलची पावडर
१ चमचा : खायचा सोडा
१ चमचा : मोहन [गरम तुप्/तेल]
१ कप : दुध
१/२ चमचा : मीठ
पाकासाठी :
१-१/२ कप :साखर
१ कप : साखर भिजे पर्यंत पाणी
पाक कसा करावा? http://www.maayboli.com/node/6445 या धाग्या च्या मदतीने केला.
१.सर्व प्रथम मिल्क पावडर ,रवा किंवा मैदा ,वेलची पावडर , खायचा सोडा,मोहन [गरम तुप्/तेल],मीठ मावेल ईतक्या दुधात मळुन घ्या.[दुध १ कप पेक्षाही कमी लागेल.]
२. आता मळलेल्या कणीकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. तोपर्यंत एका कढईत तळणी साठी तेल तापत ठेवा.आणी पाक बनवुन घ्या. [वरील दिलेल्या लिंक प्रमाणे मी बनवला ]
३. बनवलेले गोळे मंद आचेवर खरपूस होईल अशी तळुन घ्या.
४.सोनेरी रंग आला की एका ताटात काढुन घ्या. थोडे थंड झाले की पाकात सोडा.
१ . रवा किंवा मैदा १ चमचा घेतला तरी चालेल्..जितका कमी तितके गुलाब जामुन फुगतील
२. तळताना गॅस मंद आचेवरच असला पाहीजे नाही तर वरुन झालेले वाटतात आणी आतुन कच्चे !
३. वेलची पावडर ला ओपशन दुसरा कोणताही ईसेन्स घेउ शकतो.
४. लांबट गुलाब जामुन साठी जरा घट्ट पिठ असावे नाही तर तळताना तुटु शकतात.
५. मोहन साठी शकतो तुपच वापरावे,तेलाने खुशखुशीत पणा येत नाही
६. गोल करताना तयार झालेले गोळे एका ओल्या कपडा खाली झाकुन ठेवा.म्हणजे सुरकुत्या पडणार नाहीत.
मस्त!
मस्त!
मस्त... तोंडाला पाणी
मस्त... तोंडाला पाणी सुटले.... !!
झकास! किती निगुतीने केलेत!
झकास! किती निगुतीने केलेत!
काही वर्षांपुर्वी मी आणि
काही वर्षांपुर्वी मी आणि ताईने या रेसेपीचे गुलाबजामुन केले होते, मिल्कपावडर ईतकेच मैद्याचे प्रमाण घेतले होते पण त्यामुळे गुलाबजामुनच्या आत पाक मुरलाच नाही
हे 'वाह रे वाह शेफ' च्या
हे 'वाह रे वाह शेफ' च्या कृतीने केलेले मिल्क पावडरचे गुलाबजामुन.
वाव नलिनी, देख कर ही दिल खुश
वाव नलिनी, देख कर ही दिल खुश हो गया.. स्लर्प
नलिनी, मस्त दिसतायत
नलिनी, मस्त दिसतायत जांबु..... रेसिपी पण योजाटा प्लिज