Submitted by बिल्वा on 21 October, 2011 - 09:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. १ छोटा कुठल्याही ब्रँडचा sour cream चा डबा.
२. तांदळाचे पीठ
३. अगदी बारीक किसलेलं आलं
४. चवीप्रमाणे तिखट, मीठ
५. खसखस
६. ओवा
क्रमवार पाककृती:
sour cream मध्ये मावेल येवढचं तांदळाचं पीठ घालायचं. त्याची consistency भाजणीचं पीठं जसं भिजवल्यावर असतं तशी झाली पाहिजे.
त्यात ओवा, तिखट, खसखस, आलं, आणि मीठ घालायचं. आणि लगेच चकल्या करायच्या.
वाढणी/प्रमाण:
खाऊ तश्या :)
अधिक टिपा:
अगदी, नाजूक, खुसखुशीत चकल्या होतात. चकलीच्या पिठात हळद घालायची नाही. हळद deep fry करताना जळते आणि मग काळपट रंग येतो.
ही मूळ कृती आर्चची आहे. जुन्या माबोवर तिने २००५ मध्ये लिहीली होती. आजपर्यंत दरवर्षी मी ह्याच रेसिपीने चकल्या केल्या आहेत. कधीही बिघडल्या नाहीत. अतिशय मस्त चवीच्या चकल्या होतात.
फोटो नाही. तुम्हीच करा आणि फोटो डकवा इथे.
माहितीचा स्रोत:
मूळ रेसिपी आर्च ची आहे. जुन्या माबोवर ती इथे आहे. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91783.html?1130424502
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यंदा करून बघाव्यात का, अगदीच
यंदा करून बघाव्यात का, अगदीच बेसिक पाककौशल्य असणार्यांना जमतील का या? मी एकदाही चकल्या केलेल्या नाहीयेत.
हवाबंद डब्यात किती दिवस टीकतात या चकल्या?
मी केल्यात या, किती दिवस
मी केल्यात या, किती दिवस टिकतात माहित नाहि, लगेच संपल्या
या वर्षी केल्या तर फोटो टाकेन
रुनी बिन्धास्त गो फॉर इट. मी
रुनी बिन्धास्त गो फॉर इट.
मी खूप टिकण्याच्या एवढ्या प्रमाणात कधी केल्या नाहीयेत. पण आठवडाभर तर नक्कीच कुरकुरीत राहतात. अजिबात मऊ पडत नाहीत.
बिल्वा, बरं झालं जुन्या
बिल्वा, बरं झालं जुन्या हितगुजातून इकडे आणलीस ही पाकृ.
अगदी जास्त विचार न करता करावी. आत्तापर्यंत एकदाही बिघडली नाही.
सोर क्रीम काय असते? ते नसले
सोर क्रीम काय असते? ते नसले तर काय आणि किती घ्यायचे?
बिल्वा मी पण ही रेसिपी जुन्या
बिल्वा मी पण ही रेसिपी जुन्या माबो वरुन करत होते , बरं झालं आता दर वेळी शोधावं नाही लागणार.
आणि याची चव मस्त लागते , लगेच संपतात तोंपासु
हे जरा अतिच विचारतेय पण
हे जरा अतिच विचारतेय पण चकलीचा सोर्या नसेल तर दुसरी कुठली आयडिया आहे का चकली पाडायला? या चकल्या छान आणि सोप्या वाटतायत.करून पाहायच्या आहेत.
फडक्याला भोक पाडून त्यात पीठ
फडक्याला भोक पाडून त्यात पीठ घेऊन दाबून चकल्या पाडा... उत्तर भारतात जिलेबीचे पीठ घट्ट कालवून फडक्यातून अशा जिलेब्या पाडतात
अंजली_१२, हा प्रश्न तुम्ही
अंजली_१२, हा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणून लिहिण्याचे धाडस करते. मला गेल्या वर्षी मॄण्मयीने ही कॄती दिली होती. माझ्याकडे सोर्या नव्हता म्हणून मी हाताने कडबोळ्यांसारखा आकार देऊन तळल्या. त्या आतून मऊ झाल्या. गार झाल्यावर चामट झाल्या. आर्चला आणि मॄण्मयीला 'माझं काय चुकलं ?' असं बहुतेक विचारलं होतं. आता वाटतंय की सोर्या वापरला नाही हेच चुकलं असावं. कुणी दुसर्या पद्धतीने करुन बघितल्या तर इथे सांगा प्लीज.
ज्यांनी केल्या आहेत त्यांनी फोटो टाका की
शक्य आहे.. कारण सोर्याचे भोक
शक्य आहे.. कारण सोर्याचे भोक चांदणीच्या आकाराचे असते.. त्यामुळे चकलीचा जास्त सरफेस एरिया तेलाच्या संपर्कात येतो.. त्यामुळे चकली खुसखुशीत होते... तेच पीठ असले आणि त्याचे कडबोळे, पुरी, धपाटे केले तर ते खुसखुशीत होणार नाही..
मग जामोप्याच्या लॉजिकने शेव
मग जामोप्याच्या लॉजिकने शेव पाडली तर चांगली व्हायला हवी. सोर्या नसला तरी पोटॅटो राइसरने पाडता येईल.
नको बाई, कोण खेळत बसणार.
नको बाई, कोण खेळत बसणार. तळणीचा पसारा. त्यातून बिघडली शेव ( खायची ) तर डोळ्यांना शेव लावायची वेळ येईल ( ओढणीचा )
त्याची consistency भाजणीचं
त्याची consistency भाजणीचं पीठं जसं भिजवल्यावर असतं तशी झाली पाहिजे.>>> म्हणजे कशी? मी कधी तळायचे प्रकार (चकल्या, पुर्या) केले नाहीत, पण पुपो, पोळ्या, पराठे करते सो त्या comparison मधे dough किती मऊ/घट्ट असला पाहीजे, कोणी सान्गेल का प्लीज?
पीठ घट्टसर पाहिजे.
पीठ घट्टसर पाहिजे.
<<< पण चकलीचा सोर्या नसेल तर
<<< पण चकलीचा सोर्या नसेल तर दुसरी कुठली आयडिया आहे का चकली पाडायला? या चकल्या छान आणि सोप्या वाटतायत.करून पाहायच्या आहेत.
अशा टाईपच्या बिस्किट कटरमध्ये चकलीच्या सोर्यासारखीच एक ताटली असते , त्याने चकली छान पडते . माझ्याकडे सोर्या नव्हता तेव्हा मी हेच वापरत होते . मात्र हात भयंकर दुखतात , कारण चकलीची भाजणी मी जरा घट्ट भिजवते .
मस्त आहे पाकृ. मीपण करणार.
मस्त आहे पाकृ.
मीपण करणार.
बिल्वा, धन्यवाद ग. सगळं परत
बिल्वा, धन्यवाद ग. सगळं परत लिहून काढलस.
मी पीठ सैलसर ठेवते. थलिपिठाच्या पिठाएवढं.
ह्या चकलीची खासियत म्हणजे हसत फसत नाहीत तेलात टाकल्यावर आणि एकदम खुसखुशीत होतात.
फडक्याला भोक पाडून त्यात पीठ
फडक्याला भोक पाडून त्यात पीठ घेऊन दाबून चकल्या पाडा>>>>> ही आयडिया आली होती डोक्यात.. कोणीतरी लिहायची वाट बघत होते
अगो, हो ना चकली करायला जावी तर झाली कडबोळी असं नको... ते चामट प्रकरण नंतर खाववत नाही.
संपदा, बिस्किट कटर भारी वाटतंय पण कुठे मिळेल?
अंजली_१२, 'बिस्किट कटर प्रेस'
अंजली_१२, 'बिस्किट कटर प्रेस' असं गूगल करून बघा.
अंजली, तुम्ही न्यू जर्सीत
अंजली, तुम्ही न्यू जर्सीत आहात का? मग तुम्हाला इंग्रो मध्ये सोर्या नक्की मिळेल. माझ्या मैत्रिणीने परवाच मला ओक ट्री वरच्या अपना बझार ( बहुतेक) मधून घेऊन पाठवला.
हो बिल्वा मी न्यू जर्सीतच
हो बिल्वा मी न्यू जर्सीतच राहते. इथे अपना बाजार मधे बघते मग.
sour cream ला काही पर्याय ?
sour cream ला काही पर्याय ?
जुन्या मायबोलीत (की इकडे?
जुन्या मायबोलीत (की इकडे? नक्की आठवत नाही) मुगाच्या डाळीच्या खिचडीच्या चकल्यांची पाककृती सांगितली होती. कोणाला आठवत असेल तर प्लिज लिंक द्या किंवा इकडे नव्या मायबोलीत आणा.
मंजूडी, फराळाच्या यादीच्या
मंजूडी, फराळाच्या यादीच्या बीबीवर लिंक दिलीये मी त्या चकल्यांची.
त्या नाही गं बिल्लो
त्या नाही गं बिल्लो
अॅक्चुअली मुगाची डाळ आणि तांदुळाची खिचडी करून त्यात मावेल तेवढा मैदा (की तांदूळ पिठी?) घालून चकल्यांची पाककृती होती. 'उरलेल्या खिचडीच्या चकल्या करणार असाल तर त्यातल्या कढीपत्ता, मिरच्या इत्यादी काढून टाका' हे वाक्य मला आठवतंय, पण कोणाची पाकृ, कुठे लिहिली होती हे काही आठवत नाहीये.
मिळ्या, मिळ्या. तिकडे लिंक
मिळ्या, मिळ्या.
तिकडे लिंक देते. आर्चची रेसिपी आहे ती.
चमकी, भारतात असाल तर चक्का
चमकी, भारतात असाल तर चक्का वापरता येईल.
मागे एकदा केल्या होत्या या
मागे एकदा केल्या होत्या या चकल्या पण थोड्या तेलकट झाल्या होत्या...काय चुकले असेल्?
ह्या रेसिपीने केलेल्या
ह्या रेसिपीने केलेल्या चकल्या.
मस्त दिसतायत आर्च.
मस्त दिसतायत आर्च.
Pages