एक मोठी वाटी भरून तांदळाचे पिठ
पाऊण मोठी वाटी गव्हाचे पिठ
१ मोठी वाटी गुळ
२ चमचे तिळ
२ चमचे गोड तेल
तळण्यासाठी तेल
तांदळाचे पिठ, गव्हाचे पिठ व तिळ एकत्र मिसळून घ्यावे. २ चमचे कच्चे
गोडेतेल (गरम न केलेले) वरून टाकावे. गुळ बारीक चिरून किंवा किसुन
घ्यावा. एका भांड्यात पाणी कोमट करावे. हे कोमट पाणी हळू हळू त्या
मिश्रणात टाकुन पिठ घट्ट मळून घ्यावे. मग लगेच त्या पिठाचे बोरांच्या
आकारा एवढे गोळे वळायचे.
कढईत तेल चांगले कडकडीत तापवायचे आणि मंद आचेवर
मधून मधून हलवत ही बोरे तळायची.
दिवाळी जवळ आली की बायकांची फराळ बनवण्याची लगबग चालू होते. ह्या वर्षी
काहीतरी नविन बनवू असा संकल्प सुरुवातीला आपण करतो. काही वेळा नेहमीचे
प्रकार करण्यातच सगळा वेळ निघुन जातो तर कधी कधी एखादा नविन प्रकार केला
जातो. पण हे नविन प्रकार करण्याच्या उत्साहात आपण जुने पदार्थ मात्र
कालबाह्य करतो. अश्याच जुन्या प्रकारातून मला माहीत असलेला एक प्रकार
म्हणजे बोरं.
बोरं हा जुना व हटके प्रकार मी पहिल्यांदा सासरी पाहीला. ह्या बोरांच्या
रेसिपीच्या आमच्या घरातील स्पेशालिस्ट आहेत माझ्या सासूबाई सौ. शालिनी
दत्तात्रेय म्हात्रे. सासूबाईंनी केलेली ही बोरं ज्या घरात आमची दिवाळी
जाईल तिथे जुना व हटके प्रकार म्हणून कौतूकाचे स्थान मिळवतात. मला
पाकशास्त्राची पहिल्या पासूनच आवड आहे. माझी आई सौ. शामला शशिकांत घरत
हिच्या हाताखाली मी सगळे
दिवाळीचे फराळ शिकले. लग्नानंतर दुसर्या वर्षापासून मी दिवाळीच्या
फराळांची जबाबदारी स्वीकारली. सासूबाईंनी सगळे प्रकार माझ्या आवडीनुसार
करण्यास परवानगी दिली पण बोर मात्र मिच करणार हे त्यांनी आवर्जुन
सांगितले. अजुनही ही बोरे त्याच करतात. आम्ही फक्त बोरे वळायला मदत करतो.
सासूबाईंच्या मते बोर ही कडकच चांगली लागतात. नरम बोरांना तेवढी चव लागत
नाही. अगदी सासूबाईंनी
केलेली ही बोरे चावत चावत खाताना ह्यांची गोडी अधीक वाढते. तर आता पाहूया
ही बोर कशी करतात.
गुळ कमी वाटल्यास थोड्या कोमट पाण्यात विरघळवून ते पिठात कालवावे.
गॅस मोठा ठेऊ नका त्यामुळे आतून न शिजता बोरे करपतील.
ही बोरांची रेसिपी मी चतुरंग ह्या पुरवणीसाठी दिली होती ती आज प्रकाशीत झाली आहे.
जागुतै अभिनंदन ... आजच सकाळी
जागुतै अभिनंदन ...
आजच सकाळी वाचली मी लोकसत्तात
अभिनंदन... जागु आज सकाळीच
अभिनंदन... जागु
आज सकाळीच वाचले मी...पण मला माहिती नव्हते ती तु आहे म्हणुन
>>>>आज सकाळीच वाचले मी...पण
>>>>आज सकाळीच वाचले मी...पण मला माहिती नव्हते ती तू आहेस म्हणून
जागुतै, म्हणजे मला माहीत होतं तुझं नाव.. पण जेव्हा वाचलं तेव्हा क्लिक नाही झालं...
अभिनंदन..
आज वाचलं गं. अभिनंदन. !
आज वाचलं गं. अभिनंदन. !
जागू : अभिनंदन ...........
जागू : अभिनंदन ...........
जागुले..अभिनंदन.. कित्ती मस्त
जागुले..अभिनंदन.. कित्ती मस्त गोड गोड दिस्तायेत बोरं.. अश्शी उचलून घ्यावीशी वाटतायेत!!!
मी पण वाचल
मी पण वाचल लोकसत्तात....

अभिनंदन !!!!!!!
जागू, अभिनंदन. आज वाचलं
जागू, अभिनंदन. आज वाचलं
कित्ती मस्त गोड गोड दिस्तायेत बोरं.. अश्शी उचलून घ्यावीशी वाटतायेत!!!>>>>अगदी अगदी
लोकसत्ता-चतुरंग प्रकाशन साठी
लोकसत्ता-चतुरंग प्रकाशन साठी तुझे अभिनंद्नन जागु....मला ही बोरं आवडतात..पारंपारिक रेसिपी साठी तुला आणि तुझ्या सासुबाईना धन्यवाद..फोटो पाहुन मला छान्,खरपुस तळलेले गुलाबजाम [पाकात पोहायला सज्ज] वाटले होते..
अभिनंदन जागू.
अभिनंदन जागू.
जागु, मस्तच गं. मुलांना
जागु, मस्तच गं. मुलांना द्यायला मस्त आहे हा प्रकार
अभिनंदन जागु. करून पहायची
अभिनंदन जागु.
करून पहायची इच्छा होत आहे.
सक्काळी पेपरात वाचल्याबरोबर
सक्काळी पेपरात वाचल्याबरोबर विपुत कौतुक संदेश टाकलाच आहे !
मस्त दिसतायच बोरं .... फोटो
मस्त दिसतायच बोरं .... फोटो पाहून माझ्या आजीची ( आईच्या आईची ) आठवण झाली. अजूनहि ती गावाला दिवाळीला हा पदार्थ न चुकता करते...
कडकच खायला मजा हेते हे मात्र खर...
अभिनंदन जागु.. खुपच मस्त
अभिनंदन जागु.. खुपच मस्त पदार्थ आहे.. आवडला.. नक्कीच करुन बघीन. फोटो बघुन लगेचच तोंडात
घालावीशी वाटली..:)
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. आज करंजी करत आहे म्हणून बर्याच वेळाने आले. आता ब्रेक घेतला आहेत. अर्ध्याच झाल्या आहेत.
अभिनंदन जागुताई मस्त दिसतायत
अभिनंदन जागुताई
मस्त दिसतायत बोरे
जागुताई मी आजच बनवली बोरे ,
जागुताई मी आजच बनवली बोरे , माझ्या आईनी दाखवली बनवायला .पण तुमी केलेली मस्तच ....
अभिनंदन. इथे वाचल्यानंतर
अभिनंदन.
इथे वाचल्यानंतर 'लोकसत्ता' मध्ये वाचलं.
जागु, अभिनंदन दिवाळी सोडून
जागु, अभिनंदन
दिवाळी सोडून इतर वेळेला खायला सुद्धा हा पदार्थ छान वाटतोय.
अभिनंदन.
अभिनंदन.
जागु <<<<<<<ही बोरांची रेसिपी
जागु
<<<<<<<ही बोरांची रेसिपी मी वास्तुरंग ह्या पुरवणीसाठी दिली होती ती आज प्रकाशीत झाली आहे.>>>>>>
वास्तूरंगच्या तिथे चतुरंग करशील?
परत एकदा अभिनंदन!!!!!
मस्तच गं जागू, करुन बघेन
मस्तच गं जागू, करुन बघेन नक्कीच..
उजु धन्स ग. सकाळी करन्जा
उजु धन्स ग. सकाळी करन्जा करायच्या गडबडीत पटकन टाकुन गेले. मागचा बुलबुलचा लेख वास्तुरन्गमध्ये आला होता त्यामुळे त्याचाच सराव झालेला. बदलते आता.
जाई, उल्हास, दक्षिणा, भरत, सारिका धन्यवाद.
ही गरम गरमच खायची असतात गार
ही गरम गरमच खायची असतात गार गार म्हणजे २/३ दिवसांनी खाल्लेली चालतात... म्हण्जे गावाला घेउन जायला चालतील का ?
मस्त आणि सोप्पी रेसिपी.. करुन बघणार नक्की
अभिनंदन. गुलाबजामांसारखीच
अभिनंदन.
गुलाबजामांसारखीच दिसतायत बोरं..
जागू ताई, मस्तंच गं... सुंदर
जागू ताई,
मस्तंच गं... सुंदर आणि हटके पाककृती...

अभिनंदन जागू. मस्त पा.कृ.
अभिनंदन जागू.
मस्त पा.कृ.
अभिनंदन जागू. आमच्या कडे
अभिनंदन जागू. आमच्या कडे बनवतात बोरे. माझे बाबा लहान असताना शाळेत जाताना खिशात भरून घेऊन जात.
तुमच्या कडे डांबोर्या बनवतात का?
मस्तच! अभिनंदन!
मस्तच!
अभिनंदन!
Pages