अखेर होणार होणार करत बरीच चर्चा झालेले गगोकरांचे गटग पार पडले. गगोवरील इच्छुक तरूण किश्या याने आपल्या स्वभावाला साजेश्या उत्साहाने या गटगचे आयोजन केले.
(कशासाठी आयोजन केले आणि कशासाठी इच्छुक ते कृपया विचारण्यात येऊ नये, इथे अनावश्यक चौकशांना केराची टोपली दाखवण्यात येते - एक पुणेरी पाटी).
पण कुठल्याही कार्यासाठी नुसती तरुणाईचा उत्साह असून चालत नाही त्याला अनुभवीपणाची जोड लागते हे बहुदा त्याने कुठेतरी वाचले असावे आणि अनुभवी माणूस म्हणून त्याने गगोवरील एक गंभीर प्रवृत्तीचा आयडी आशुचँप याची निवड केली.
अर्थातच अनुभवी आशुचँपने किश्याच्या सर्व शंकाचे योग्य निरसन करून त्याला अतिशय योग्य तो सल्ला दिला आणि त्याचे तंतोतत पालन करण्यात किश्याने कसलीही कसर न सोडल्याने हे गटग अगदीच संस्मरणीय ठरले...स्मित
(अरे या आशुवर विश्वास कसा ठेवायचा रे..असे कळवळून किश्याने मालकांना विचारल्याचे खासगी सूत्रांकडून कळते
:))
तर ठरलेल्या वेळेनुसार (भारतीय प्रमाणवेळेनुसार) आशुचँप फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल आर्यन इथे दाखल झाले. मायबोली टीशर्ट मिळाल्यानंतरचे पहिलेच गटग असल्याने त्यांनी दिमाखात तो टीशर्ट घालून हॉटेलमध्ये प्रवेश केला. पण त्यांच्या टीशर्टऐवजी चेहर्याकडे पाहूनच तिथल्या एका वेटरने तुमच्याबरोबरचे वरती बसलेत असे सांगत त्यांच्या एकदंरीत उत्साहाला टाचणी लावली.
वर जाताच पिवळाधम्मक टीशर्ट घालून बसलेला किश्या नजरेत भरला. त्याने पोहोचताच आता मी आयुष्यात तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही असे सांगतले. त्यामुळे आशुचँपना त्यांनी दिलेल्या सल्ल्याची महती एकदमच पटून गेली.
इकडे तिकडे नजर टाकताच मालक दृष्टीपथात आले. त्यांनी आज चक्क कधी नव्हे ते आपल्या केशरी झब्ब्याला सुट्टी दिलेली पाहुन सुस्कारा सोडणार तोच ज्युनिअर मालकांकडे लक्ष गेले. ज्युनिअर मालक छानपैकी केशरी रंगात
(ये केशरी रंग कब मुझे छोडेगा...अशा ओळी आशुचँपच्या मनात तत्परतेने डोकाऊन गेल्या)
आपल्या केशरी झब्ब्याची खूप चेष्टा झालेली असल्याने मालकांनी धूर्तपणे ज्युनिअर मालकांना केशरी रंगाचे कपडे घालण्यात हुशारी दाखवली यात तोडच नाही. पण यावरून ते घराणेशाही मानत असल्याचे आणि त्यांच्यानंतर ज्युनिअर मालकांकडे गगोची सूत्रे सोपवणार असल्याची चर्चा रंगल्यामुळे त्यांना नुसतेच चुळबुळत बसून रहावे लागले.
पण मालकांचे सुपुत्र कार्यक्षमतेत त्यांच्यापेक्षा कित्येक पावले पुढे असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मालक निषेधाची नुसती लाल टिकलीच लावतात पण चिरंजिवांनी मोठ्या आवाजात भोकाड पसरत सगळ्यांचे आवाज बंद करून टाकले.
गगोवरपण मी असा आवाज काढला तर गप्प होतील का अजून चेष्टा करतील अशा विचारात मालक असतानाच आशुचँपने त्यांना न विचारता त्यांचा कॅमेरा उघडून त्याचे प्रात्यक्षिक करायला सुरूवात केली.
(आशुचँपनी नुकताच एक महागडा कॅमेरा घेतल्याने ते आजकाल आपल्याला कॅमेरातले सगळे काही कळते असे धरून चालतात)
त्यावेळी उपस्थित असलेल्या पद्मजा, गिरीकंद आणि सुशांत यांच्यासह यजमान किशा यांच्याकडे फारसे लक्ष न देता केवळ बच्चेकंपनीचे (ज्युनिअर सुशांतही आपल्या बाळलीलांनी गंमत आणत होते) फोटो काढण्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे नक्की गटग कुणाचे आहे याचा काही काळ संभ्रम पडला.
दरम्यान, बेफिकीर यांचे दमदार आगमन झाले. त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नसून थोडेसे खाऊन जाणार असल्याचे घोषीत केले. त्या थोडक्या वेळात त्यांनी इतका वेळ गप्प असलेल्या पद्मजाला बोलते केले, ज्युनिअर मालकांना खेळवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला, बाकी बच्चेकंपनीला लाललाल चेरीज देऊन खुश केले. त्यांचा हा धडाका पाहून आशुचँपला विधानसभेत फक्त शून्य प्रहर मिळाल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी आपले पत्रकारी प्रश्न खिशात टाकत फक्त जिव्हाळ्याचा दुबई गटगचा विषय काढला.
(त्यात आशुचँपना नायक करण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. बेफींचे नायक म्हणजे बेटे नशिबवान असतात. कितीही हालअपेष्टात असले तरी त्यांना 'जे' मिळायचे ते मिळतेच. तेच भाग्य आता आपल्या वाट्याला येणार अशी आशा बाळगून असलेल्या आशुचँपना ती मालिकाच बंद झाल्याचे कळताच त्यांचा प्रचंड अपेक्षाभंग झाला :))
बेफींनंतर थोड्या वेळाने विशाल कुलकर्णी यांचे आगमन झाले. त्यांनी सध्या माबोवर काहीही लिहीत नसल्याचे सांगत जबरदस्त धक्का दिला. सध्या दिवाळी अंकाच्या कामात व्यस्त असून त्यानंतर पुन्हा एकदा लिखाण सुरु करू असे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर मग सर्वांना हायसे वाटले.
गप्पांच्या नादात कवीवर्य आप आणि जिगा यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी यापूर्वीच माबोवर असेच एक अवतारी पुरुष होऊन गेल्याची माहीती पुरवली. त्यांच्यापुढे हे आप आणि जिगा मंडळी म्हणजे बालवाडीतली वाटतील हे कळताच आशुचँपने घरी जाताक्षणी त्यांचे मौलिक लिखाण नजरेखालून घालण्याचा संकल्प केला.
जेवण आल्यानंतर ज्युनिअर मालक आणि त्यांची तायडी यांनी मिळून सिनिअर मालकांचे जे काही हाल केले ते पाहून त्यांच्या डोक्यावर केस का नाहीत याचे रहस्य उलगडले. अर्थात, मालकांनी त्यांनी अत्यंत संयमीपणे त्यांचे बालहट्ट पुरवत सर्वांच्या कौतुकभरल्या नजरा झेलल्या.
(गगोवर त्रास देणार्यांना किमान लाल टिकली तरी लावता येते पण इथे तसे काही केले तर घरच्या टिकलीकडून कायमस्वरूपी निशाणी मिळेल या धास्तीने बहुदा :))
बेफी यांनी जाताना आधी यजमान किशाला बाहेर नेऊन कसलीतरी खलबते केली. त्यानंतर ते मालकांना बाहेर घेऊन गेले. त्यांच्या या गुप्त हालचालींचे कोडे बाकीच्यांना काय उलडगलेच नाही.
समोर आलेल्या खाद्यपदार्थांवर आडवा हात मारल्यानंतर सर्वच थोडे सुस्तावले. अनायसे रविवार असल्याने आशुचँपनी त्यांचा वामकुक्षीचा बेत जाहीर केला आणि मग सर्वांनाच आता झोप आल्याची जाणीव गडद झाली. त्यामुळे टाटा-बाय मध्ये फारसा वेळ न घालवता सगळ्यांनीच आपापला रस्ता पकडला.
दरम्यान, हॉटेलच्या मागून एक रस्ता कुठे जातो यावर एक माफक चर्चा झाली आणि आशुचँपना खाद्य मिळाले. आपल्या नैसर्गिक चौकसबुद्धीला अनुसरून त्यांनी त्याच मार्गावरून आपले वाहन दामटले...आपल्याला एका नविन रस्त्याचा शोध लागला बहुदा असे त्यांच्या मनात येण्यापूर्वीच तो रस्ता वळून पुन्हा फर्ग्युसन रस्त्याला मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांचा पुन्हा एकदा जोरदार अपेक्षाभंग झाला.
अशा रितीने हे छोटेखानी गटग अतिशय यशस्वी ठरले.
ही काही क्षणचित्रे
विचारमग्न सुशांत
फोटो काढण्याच्या प्रयत्नात मालक. कॅमेरा कुठे आणि नजर कुठे?
गिरीकंद
यजमान किश्या
त्याच्या अनुभवी सल्लागारांबरोबर
बेफि आणि विशाल
रंगलेल्या गप्पा
(डब्बा शब्दाबद्दल कुतुहल निर्माण झाल्यास भेटा अथवा लिहा - आशुचँप)
(No subject)
कॅमेरा कुठे आणि नजर कुठे?
कॅमेरा कुठे आणि नजर कुठे?:हाहा:
मी खरेतर आशु लिहीणार
मी खरेतर आशु लिहीणार म्हटल्यावर माबोवर कुठे तो ऐतिहासिक पद्धतीचा लखोटा वगैरे दिसतो का ते शोधत होतो. पण अंमळ निराशा झाली
पद्मजा बहुदा गगोकरांना आजमावुन पाहत असावी कारण आल्यापासुन तिने मौनव्रतच स्विकारले होते. उपस्थित लोकांपैकी एका नालायक माणसाने आमचे आगमन झाल्या झाल्या पुणेकर आणि मुंबईकर अशा वादाला तोंड फोडले , आम्हीही अभिमानाने आपला मुंबईकर बाणा दाखवून दिला. त्या नालायक माणसाने गटग संपून तो निघून जाईपर्यंत त्याची ओळख न दिल्याने पुढच्या गटगचा सगळा खर्च त्याच्या खिश्यावर टाकण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. (सर्वानुमते : अहं ब्रह्मास्मि
)
बाकी बिल किश्यानेच भरले, पण कुणाच्या खिश्यातून भरले हा संशोधनाचा विषय आहे
बाकी जुनियर मालक आणि तायडीने ज्या पद्धतीने "ऑरेंज" ज्युसवर हल्ला बोल चालवला होता त्यावरुन ते मालकांचा वारसा चालवणार याची खात्री पटली.
या दरम्यान बेफिंनी हॉटेल रविराज येथे आदल्या दिवशी पार पडलेल्या एका मुशायर्याची माहिती दिली. ती आगाऊ न कळवल्याबद्दल डॉक्टर कैलासजींचा जाहीर णिषेढ !
ती आगाऊ न कळवल्याबद्दल डॉक्टर
ती आगाऊ न कळवल्याबद्दल डॉक्टर कैलासजींचा जाहीर णिषेढ !>>>
प्रचंड अनुमोदन व विदीपांचा सुध्धा...
पुण्यात असुन सकाळी सकाळी पळुन गेले
विशाल आम्ही पुणेकर असल्यामुळे
विशाल आम्ही पुणेकर असल्यामुळे असल्या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाला (मुंबईकरांच्या) केराची टोपली पण दाखवत नाही..... उगा कशाला केराची टोपली खराब करायची , नाही का?.... असो पण छोटस पण छान झाल गटग..... येकमात्र नक्की पुढच्यावेळेस पोराला घेऊन येणार नाही.... काही बोलुच देत नाही......
उगा कशाला केराची टोपली खराब
उगा कशाला केराची टोपली खराब करायची , नाही का?>>>>
बरोबर आहे, शेवटी मालकांच्या खिश्यात काय काय टाकायचं म्हणतो मी?
विशाल
विशाल
आई शप्पथ !
आई शप्पथ !
मित्र-हो, माझ्यासोबत, डॉ.राम
मित्र-हो,
माझ्यासोबत, डॉ.राम पंडित्,ए.के.शेख. झहिर शेख्,फातिमा मुजावर ही गझल क्षेत्रातील दिग्गज मंडळी होती....त्यांना नवी मुंबईतून नेण्या-आणण्याची नैतिक जबाबदारी माझी असल्याने,त्यांना सोडून मला गटगला येणे शक्य झाले नाही.......तसेच डॉ.पंडितांना १० वाजता निघायाचे होते.त्या मुळे मला गटगचा विचार सोडून द्यावा लागला.
आशा आहे,आपण सगळे मला समजून घ्याल.न समजून घेतल्यास तुम्हा सर्वांचा जाहीर णिषेद.
(No subject)
पद्मजा बहुदा गगोकरांना
पद्मजा बहुदा गगोकरांना आजमावुन पाहत असावी कारण आल्यापासुन तिने मौनव्रतच स्विकारले होते..
कदाचीत पद्मजा एकटीच लेडिज असल्यामुळे... तिला थोडे ऑड वाटले असणार...
एकटीच लेडी'ज' कशी असेल असा एक
एकटीच लेडी'ज' कशी असेल असा एक प्रश्न भेडसावत आहे, बहुधा एकटीच लेडी असावी. (दिवा)
बेफी, समझ लेने का
बेफी, समझ लेने का
स्मितू.. अगदी ऑड असं नाही
स्मितू..

अगदी ऑड असं नाही गं... पण, तसही मी कमीच बोलते, आणि सगळ्यांना पहिल्यांदाच भेटले होते....सो..
(No subject)
.<<<न समजून घेतल्यास तुम्हा
.<<<न समजून घेतल्यास तुम्हा सर्वांचा जाहीर णिषेद.
<<
ये केशरी रंग, कब मुझे छोडेगा?
ये केशरी रंग, कब मुझे छोडेगा?

गगो म्हणजे काय?
गगो म्हणजे काय?
गगो म्हणजे काय?>>>
गगो म्हणजे काय?>>>
लिंबुकाका गगो =
लिंबुकाका
गगो = गप्पागोष्टी
हे इथे
http://www.maayboli.com/node/13474
ओके ओके मन्दार कळ्ळ,
ओके ओके मन्दार
कळ्ळ, थ्यान्क्स
आशू, मस्तच लिहिलास वृतांत!
आशू, मस्तच लिहिलास वृतांत!

आणि प्रतिसाद तर
ह्म्म्म... पुढचं गटग यवतमाळला
ह्म्म्म... पुढचं गटग यवतमाळला ठेवावं म्हणते..
आईईईईईईईईईईईईईईईईई
आईईईईईईईईईईईईईईईईई शप्पथ


हसुन हसुन ठार वेडी झाले मी
तो वृतांत पण ___/\___ आणि प्रतिक्रिया पण ________/\________
मी मिसलं हे
श्शीईईईईईईईईईईईईई
Pages