२ कप उडिद डाळ, जिरे १-२ चमचे भरड्लेले, खोबरयाचे पातळ काप (आवडत असल्यास ) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, चवी पुरते मिठ
उडिद डाळ ५-६ तास भिजत घालावि.... सकाळी नाश्त्याला करावेसे असल्यास... रात्रि भिजत घालावे..
नंतर पाणी काढुन मिक्सर मध्ये वाटावे. वाटताना पाणी घालु नये...
नंतर हे वाटण वाडग्यात काढुन हाताने चांगल फेटुन घ्यावे.. त्यामुळे.. त्यात हवा जावुन वाटण हलके होते..
नंतर त्यात जिरे १-२ चमचे भरड्लेले, खोबरयाचे पातळ काप (आवडत असल्यास ) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, चवी पुरते मिठ घालुन मिक्स करावे.
तळण्यासाठि तेल तापत ठेवुन अग्नि मिडियम हाय वर ठेवावे.. व मेदु वडे सोनेरी रंगावरतळावे.
वडे तेलात टाकताना. एका वाडग्यात पाणी घेवुन..हात ओला करावा.. व पिठ हातात घेवुन मध्ये भोक पाडुन तेलात सोडावे.त्याने पिठ हाताला चिकटनार नाहि
मिश्रण पातळ वाटत असेल.. आणि गोल वडे येत नसतिल...तर एक चमचा तांदुळ पिठ वापरावे.
हि रेसिपि मला माबो वर दिसलि
हि रेसिपि मला माबो वर दिसलि नाहि .. त्या मुळे टाकत आहे.
छान रेसिपी
छान रेसिपी
चांगलिये पाककृती. आजच
चांगलिये पाककृती. आजच कॅन्टीनात खाल्लेत
वर्षा अग मला.. वडे च दिसत आहे
वर्षा अग मला.. वडे च दिसत आहे ग.
आणि मी ते बदल्याण्याचा प्रयत्न करते आहे पण मला दिसत च नाहि कुठे करु ते.
पाणि बदलून पाणी करा.. पाणि
पाणि बदलून पाणी करा.. पाणि म्ह्ण्जे हात
धन्यवाद वर्षा आणि शुभांगी
धन्यवाद वर्षा आणि शुभांगी बद्ल केले आहेत.
मला. माबो वर लेखन करण्याचा..
मला. माबो वर लेखन करण्याचा.. आणी मराठी मध्ये लिहिण्याचा सराव नाही त्यामुळे काही चुका असल्यास सांगावे.
हे मस्त ग दीपा... पण फोटो पण
हे मस्त ग दीपा... पण फोटो पण टाक ना
हो फोटो काढयाचा राहुन गेला..
हो फोटो काढयाचा राहुन गेला.. परत बनवले तर नक्कि काढेन
छान.येउदे दीपा अश्या रेसीपीज.
छान.येउदे दीपा अश्या रेसीपीज.
दीपा मी ते वाटण फुलण्यासाठी
दीपा मी ते वाटण फुलण्यासाठी काही तास ठेवते. ना ही तर वडा आतुन गोळा लागतो. पण तु सांगितलेस तसे हाताने फेटुन पिठ हलके होते का? असल्यास सांग म्हणजे पुढच्या वेळि मला कमी वेळात करता येतील.
मी ते वाटण फुलण्यासाठी काही
मी ते वाटण फुलण्यासाठी काही तास ठेवते.>>>> मोनाली, ते पीठ हाताने तर फेटावंच पण फेटल्यावरही फारतर तासभर ठेवावं, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तर पीठ आंबण्याची क्रीया चालू होते आणि त्यामुळे वडे हलके झाले तरी जास्त तेल पितात.
हो मी जास्ती च जास्त २०-२५
हो मी जास्ती च जास्त २०-२५ मि. ठेवते.. खुप चांगल बरयाच वेळ फेट्ल.. तर नाहि होत.. हाताने जमत नसेल तर सरळ ब्लेंडर ने कराव.. मेदु वडे ना..पिठ ठेवाव लागत नाहि अस मला आई सांगते.
धन्स मंजूडी, दीपा. मी करुन
धन्स मंजूडी, दीपा. मी करुन पाहते पुढच्या वेळी.
डाळ पण फार वेळ भिजवली तर वडे
डाळ पण फार वेळ भिजवली तर वडे खुप तेल पितात