अखेर होणार होणार करत बरीच चर्चा झालेले गगोकरांचे गटग पार पडले. गगोवरील इच्छुक तरूण किश्या याने आपल्या स्वभावाला साजेश्या उत्साहाने या गटगचे आयोजन केले.
(कशासाठी आयोजन केले आणि कशासाठी इच्छुक ते कृपया विचारण्यात येऊ नये, इथे अनावश्यक चौकशांना केराची टोपली दाखवण्यात येते - एक पुणेरी पाटी).
पण कुठल्याही कार्यासाठी नुसती तरुणाईचा उत्साह असून चालत नाही त्याला अनुभवीपणाची जोड लागते हे बहुदा त्याने कुठेतरी वाचले असावे आणि अनुभवी माणूस म्हणून त्याने गगोवरील एक गंभीर प्रवृत्तीचा आयडी आशुचँप याची निवड केली.
अर्थातच अनुभवी आशुचँपने किश्याच्या सर्व शंकाचे योग्य निरसन करून त्याला अतिशय योग्य तो सल्ला दिला आणि त्याचे तंतोतत पालन करण्यात किश्याने कसलीही कसर न सोडल्याने हे गटग अगदीच संस्मरणीय ठरले...स्मित
(अरे या आशुवर विश्वास कसा ठेवायचा रे..असे कळवळून किश्याने मालकांना विचारल्याचे खासगी सूत्रांकडून कळते
:))
तर ठरलेल्या वेळेनुसार (भारतीय प्रमाणवेळेनुसार) आशुचँप फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल आर्यन इथे दाखल झाले. मायबोली टीशर्ट मिळाल्यानंतरचे पहिलेच गटग असल्याने त्यांनी दिमाखात तो टीशर्ट घालून हॉटेलमध्ये प्रवेश केला. पण त्यांच्या टीशर्टऐवजी चेहर्याकडे पाहूनच तिथल्या एका वेटरने तुमच्याबरोबरचे वरती बसलेत असे सांगत त्यांच्या एकदंरीत उत्साहाला टाचणी लावली.
वर जाताच पिवळाधम्मक टीशर्ट घालून बसलेला किश्या नजरेत भरला. त्याने पोहोचताच आता मी आयुष्यात तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही असे सांगतले. त्यामुळे आशुचँपना त्यांनी दिलेल्या सल्ल्याची महती एकदमच पटून गेली.
इकडे तिकडे नजर टाकताच मालक दृष्टीपथात आले. त्यांनी आज चक्क कधी नव्हे ते आपल्या केशरी झब्ब्याला सुट्टी दिलेली पाहुन सुस्कारा सोडणार तोच ज्युनिअर मालकांकडे लक्ष गेले. ज्युनिअर मालक छानपैकी केशरी रंगात
(ये केशरी रंग कब मुझे छोडेगा...अशा ओळी आशुचँपच्या मनात तत्परतेने डोकाऊन गेल्या)
आपल्या केशरी झब्ब्याची खूप चेष्टा झालेली असल्याने मालकांनी धूर्तपणे ज्युनिअर मालकांना केशरी रंगाचे कपडे घालण्यात हुशारी दाखवली यात तोडच नाही. पण यावरून ते घराणेशाही मानत असल्याचे आणि त्यांच्यानंतर ज्युनिअर मालकांकडे गगोची सूत्रे सोपवणार असल्याची चर्चा रंगल्यामुळे त्यांना नुसतेच चुळबुळत बसून रहावे लागले.
पण मालकांचे सुपुत्र कार्यक्षमतेत त्यांच्यापेक्षा कित्येक पावले पुढे असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मालक निषेधाची नुसती लाल टिकलीच लावतात पण चिरंजिवांनी मोठ्या आवाजात भोकाड पसरत सगळ्यांचे आवाज बंद करून टाकले.
गगोवरपण मी असा आवाज काढला तर गप्प होतील का अजून चेष्टा करतील अशा विचारात मालक असतानाच आशुचँपने त्यांना न विचारता त्यांचा कॅमेरा उघडून त्याचे प्रात्यक्षिक करायला सुरूवात केली.
(आशुचँपनी नुकताच एक महागडा कॅमेरा घेतल्याने ते आजकाल आपल्याला कॅमेरातले सगळे काही कळते असे धरून चालतात)
त्यावेळी उपस्थित असलेल्या पद्मजा, गिरीकंद आणि सुशांत यांच्यासह यजमान किशा यांच्याकडे फारसे लक्ष न देता केवळ बच्चेकंपनीचे (ज्युनिअर सुशांतही आपल्या बाळलीलांनी गंमत आणत होते) फोटो काढण्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे नक्की गटग कुणाचे आहे याचा काही काळ संभ्रम पडला.
दरम्यान, बेफिकीर यांचे दमदार आगमन झाले. त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नसून थोडेसे खाऊन जाणार असल्याचे घोषीत केले. त्या थोडक्या वेळात त्यांनी इतका वेळ गप्प असलेल्या पद्मजाला बोलते केले, ज्युनिअर मालकांना खेळवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला, बाकी बच्चेकंपनीला लाललाल चेरीज देऊन खुश केले. त्यांचा हा धडाका पाहून आशुचँपला विधानसभेत फक्त शून्य प्रहर मिळाल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी आपले पत्रकारी प्रश्न खिशात टाकत फक्त जिव्हाळ्याचा दुबई गटगचा विषय काढला.
(त्यात आशुचँपना नायक करण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. बेफींचे नायक म्हणजे बेटे नशिबवान असतात. कितीही हालअपेष्टात असले तरी त्यांना 'जे' मिळायचे ते मिळतेच. तेच भाग्य आता आपल्या वाट्याला येणार अशी आशा बाळगून असलेल्या आशुचँपना ती मालिकाच बंद झाल्याचे कळताच त्यांचा प्रचंड अपेक्षाभंग झाला :))
बेफींनंतर थोड्या वेळाने विशाल कुलकर्णी यांचे आगमन झाले. त्यांनी सध्या माबोवर काहीही लिहीत नसल्याचे सांगत जबरदस्त धक्का दिला. सध्या दिवाळी अंकाच्या कामात व्यस्त असून त्यानंतर पुन्हा एकदा लिखाण सुरु करू असे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर मग सर्वांना हायसे वाटले.
गप्पांच्या नादात कवीवर्य आप आणि जिगा यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी यापूर्वीच माबोवर असेच एक अवतारी पुरुष होऊन गेल्याची माहीती पुरवली. त्यांच्यापुढे हे आप आणि जिगा मंडळी म्हणजे बालवाडीतली वाटतील हे कळताच आशुचँपने घरी जाताक्षणी त्यांचे मौलिक लिखाण नजरेखालून घालण्याचा संकल्प केला.
जेवण आल्यानंतर ज्युनिअर मालक आणि त्यांची तायडी यांनी मिळून सिनिअर मालकांचे जे काही हाल केले ते पाहून त्यांच्या डोक्यावर केस का नाहीत याचे रहस्य उलगडले. अर्थात, मालकांनी त्यांनी अत्यंत संयमीपणे त्यांचे बालहट्ट पुरवत सर्वांच्या कौतुकभरल्या नजरा झेलल्या.
(गगोवर त्रास देणार्यांना किमान लाल टिकली तरी लावता येते पण इथे तसे काही केले तर घरच्या टिकलीकडून कायमस्वरूपी निशाणी मिळेल या धास्तीने बहुदा :))
बेफी यांनी जाताना आधी यजमान किशाला बाहेर नेऊन कसलीतरी खलबते केली. त्यानंतर ते मालकांना बाहेर घेऊन गेले. त्यांच्या या गुप्त हालचालींचे कोडे बाकीच्यांना काय उलडगलेच नाही.
समोर आलेल्या खाद्यपदार्थांवर आडवा हात मारल्यानंतर सर्वच थोडे सुस्तावले. अनायसे रविवार असल्याने आशुचँपनी त्यांचा वामकुक्षीचा बेत जाहीर केला आणि मग सर्वांनाच आता झोप आल्याची जाणीव गडद झाली. त्यामुळे टाटा-बाय मध्ये फारसा वेळ न घालवता सगळ्यांनीच आपापला रस्ता पकडला.
दरम्यान, हॉटेलच्या मागून एक रस्ता कुठे जातो यावर एक माफक चर्चा झाली आणि आशुचँपना खाद्य मिळाले. आपल्या नैसर्गिक चौकसबुद्धीला अनुसरून त्यांनी त्याच मार्गावरून आपले वाहन दामटले...आपल्याला एका नविन रस्त्याचा शोध लागला बहुदा असे त्यांच्या मनात येण्यापूर्वीच तो रस्ता वळून पुन्हा फर्ग्युसन रस्त्याला मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांचा पुन्हा एकदा जोरदार अपेक्षाभंग झाला.
अशा रितीने हे छोटेखानी गटग अतिशय यशस्वी ठरले.
ही काही क्षणचित्रे
विचारमग्न सुशांत
फोटो काढण्याच्या प्रयत्नात मालक. कॅमेरा कुठे आणि नजर कुठे?
गिरीकंद
यजमान किश्या
त्याच्या अनुभवी सल्लागारांबरोबर
बेफि आणि विशाल
रंगलेल्या गप्पा
(डब्बा शब्दाबद्दल कुतुहल निर्माण झाल्यास भेटा अथवा लिहा - आशुचँप)
मी पहिला.
मी पहिला.
(डब्बा शब्दाबद्दल कुतुहल
(डब्बा शब्दाबद्दल कुतुहल निर्माण झाल्यास भेटा अथवा लिहा - आशुचँप)>>
ते ही टाकलं असतस तरीही काही वाटलं नसतं....
बाकी व्रतांत छान...
अर्धवट टाकालास च्यायला मी आणी गीरी १०:४५ ला तीथे हजर होतो..ते नाहिस टाकले.
असही पुणेकर वेळेच्या बाबतीत मंदच आहेत....
किश्या - पुणेकर वेळेच्या
किश्या - पुणेकर वेळेच्या हिशेबाने चालत नाहीत. वेळ पुणेकरांच्या हिशेबाने चालते
पद्मजाचा फोटो नाही दिसत
पद्मजाचा फोटो नाही दिसत ??????????
बाकी वृतांत छान लिहला
बिल कुणी भरलं?
बिल कुणी भरलं?
वृत्तांत पत्रकार इश्टाईल...!
वृत्तांत पत्रकार इश्टाईल...! एकंदर यावेळी ज्युनियर गगोकरांनी हंगामा केला होता..!

काय खाल्लं ? मस्तानी घेतली की नाही?
काका किश्याने तर नक्कीच नाही
काका
किश्याने तर नक्कीच नाही
त्यांचा हा धडाका पाहून
त्यांचा हा धडाका पाहून आशुचँपला विधानसभेत फक्त शून्य प्रहर मिळाल्याची जाणीव झाली. >>>>>>>>>>>
जेवण आल्यानंतर ज्युनिअर मालक
जेवण आल्यानंतर ज्युनिअर मालक आणि त्यांची तायडी यांनी मिळून सिनिअर मालकांचे जे काही हाल केले ते पाहून त्यांच्या डोक्यावर केस का नाहीत याचे रहस्य उलगडले. <<<
किश्याने तर नक्कीच
किश्याने तर नक्कीच नाही>>
किती तो आत्मविश्वास
खरंच बिल कोणी भरलं ते सांगाच
खरंच बिल कोणी भरलं ते सांगाच


वृ छानच.
ये केसरी रंग... >>
ठिकाण ऐनवेळी बदलल का? आधी वाडेश्वरवर स्वारी करायची ठरलेली ना?
छान मस्तच..... ठिकाण छान
छान मस्तच..... ठिकाण छान आहे..
हे छान लिहलंयस रे
हे छान लिहलंयस रे चंपु.....चटपटीत.
आशू, मस्त लिहिलाय वृत्तांत.
आशू, मस्त लिहिलाय वृत्तांत.
छान ..... अगदी खुसखुशीत
छान ..... अगदी खुसखुशीत वृत्तांत.
छान, पण निषेधाची लाल टिकली हे
छान, पण निषेधाची लाल टिकली हे प्रकरण काय आहे ते कळलं नाही.
मस्त लिहिलाय वृत्तांत....
मस्त लिहिलाय वृत्तांत....
(डब्बा शब्दाबद्दल कुतुहल निर्माण झाल्यास भेटा अथवा लिहा - आशुचँप)>>
मस्त पंचेस रे आशु!! <<जेवण
मस्त पंचेस रे आशु!!
<<जेवण आल्यानंतर ज्युनिअर मालक आणि त्यांची तायडी यांनी मिळून सिनिअर मालकांचे जे काही हाल केले ते पाहून त्यांच्या डोक्यावर केस का नाहीत याचे रहस्य उलगडले<<
छान, पण निषेधाची लाल टिकली हे
छान, पण निषेधाची लाल टिकली हे प्रकरण काय आहे ते कळलं नाही
स्वप्ना त्यासाठी तुला काही काळ गगोवर येऊन धोतर खेचा आंदोलनात सहभागी व्हावे लागेल..आपोआप लाल टिकली लागते का नाय पहा
सर्वांना धन्यवाद...
चँप्या या पुढचे सारे
चँप्या
या पुढचे सारे वृत्तांत तूच लिहीत जा. ऐतिहासिक दस्तैवज ठरतील काही वर्षांनी.
मस्त लिहलेय एकदम
अभिनंदन लोक्स, , , ! मस्त
अभिनंदन लोक्स, , , !
मस्त लिहलंय..:)
झक्कास...... गटगच्या
झक्कास......
गटगच्या यशस्वितेवरून किश्या हा गगोचा उपमालक होण्यास नक्की पात्र आहे असे वाटू लागले आहे. मालकांच्या अनुपस्थितीत तो गगोही व्यवस्थित चालवू शकेल
पुढील गटगला शुभेच्छा
गटगच्या यशस्वितेवरून किश्या
गटगच्या यशस्वितेवरून किश्या हा गगोचा उपमालक होण्यास नक्की पात्र आहे असे वाटू लागले आहे. मालकांच्या अनुपस्थितीत तो गगोही व्यवस्थित चालवू शकेल>>>
लै भारी
>>स्वप्ना त्यासाठी तुला काही
>>स्वप्ना त्यासाठी तुला काही काळ गगोवर येऊन धोतर खेचा आंदोलनात सहभागी व्हावे लागेल..आपोआप लाल टिकली लागते का नाय पहा
>>या पुढचे सारे वृत्तांत तूच लिहीत जा. ऐतिहासिक दस्तैवज ठरतील काही वर्षांनी.
अनुमोदन. ह्याची एक उत्तम बखर होईल
या पुढचे सारे वृत्तांत तूच
या पुढचे सारे वृत्तांत तूच लिहीत जा. ऐतिहासिक दस्तैवज ठरतील काही वर्षांनी.>>>>>>
प्रचंड अनुमोदन.
माझेही अनुमोदन, वृत्तांत
माझेही अनुमोदन, वृत्तांत आवडला आशूचॅम्प !
सर्वांना भेटून खरच आनंद झाला.
फाडू व्रुत्तांत
फाडू व्रुत्तांत आशु..
किश्याचं ते प्रेमाचं टी-शर्ट आयुष्यभराची पुंजी ठरणार वाट्टं.... (याला काय वाटतं काय माहीत की, पोरी याचं टी-शर्ट पाहून याला आवडून घेतील).
हाहाहा!
हाहाहा!
Pages