सुखनवर बहुत अच्छे - ५ - मुनव्वर 'राना'

Submitted by बेफ़िकीर on 14 October, 2011 - 03:12

http://www.maayboli.com/node/22554 -भाग १ - डॉ. 'सर' मुहम्मद 'इक्बाल'

http://www.maayboli.com/node/22651 - भाग २ - 'साहिर' लुधियानवी

http://www.maayboli.com/node/23096 -भाग ३ - डॉ. रघुपती सहाय 'फिराक' गोरखपुरी

http://www.maayboli.com/node/26488 - भाग ४ - मौलाना हसरत मोहानी

==============================================

'सुखनवर बहुत अच्छे' या मालिकेवर काही सदस्यांनी असे मत व्यक्त केले की मराठी संकेतस्थळावर उर्दूची वाहवा कशासाठी करावी. मात्र मला प्रामाणिकपणे वाटते की कलेला भाषेचे बंधन नसावे व भाषा श्रीमंत करायची असल्यास इतर भाषांमधील काही साहित्य नजरेखालून जाण्यात तसे गैर काही नसावे.

त्यामुळे बरेच दिवसांनी पुन्हा साहस करून या मालिकेतील पुढचा भाग प्रकाशित करत आहे.

यावेळेसचा भाग प्रकाशित करताना माझ्या मनात 'किती बोलू आणि किती नको' अशी भावना येत आहे कारण शायर आहेतच तसे! आजवर आपण इक्बाल, फिराक या महान शायरांच्या शायरीचा काहीसा परिचय करून घेतला. परंतु प्रसिद्धीच्या झोतात मी तरी आजवर सातत्याने न ऐकलेले नांव आहे हे! या कवींचा गझलसंग्रहही सांगलीलाच मिळाला आणि केव्हापासूनच हा लेख द्यायचा होता. पण उर्दू साहित्याचा परिचय अशी भावना दिसून आल्यानंतर थोडा निराश झालो होतो, तरी आज ही मालिका पुढे नेण्याचा आणखीन एक प्रयत्न करत आहे.

उर्दू गझलेला कित्येक शतकांचा इतिहास असल्यामुळे उर्दू गझलेत सातत्याने येणारे काही उल्लेख, काही प्रतिमा, व्यक्तीमत्वांचे साचे समोर येतात. जसे प्रेयसी म्हणजे निष्ठूरच, प्रियकर कवी म्हणजे प्रेयसीच्या निष्ठूरतेमुळे जीव देण्यास उद्यूक्त झालेला आणि कायम रस्त्यावरून फाटके कपडे घालून फिरणारा, वाईज म्हणजे दारू, प्रेम या मोहांपासून समाजाला दूर राहण्यास सांगणारा, माळी किंवा पारधी म्हणजे दुष्टच इत्यादी!

हीच परंपरा अगदी आत्ता आत्तापर्यंत तशीच दिसत होती.

परंतु अत्यंत मोठ्या प्रमाणावर गझलेला नवे परिमाण देणे हे काम या शायराने केलेले दिसते. या शायरांची गझल आपल्याला 'आपली गझल व आजची गझल' वाटते. याचमुळे या शायराची गझल आपले उर्दू गझलेबाबतचे अनेक ग्रह बदलवूही शकते.

तर परिचय करून घेऊयात, एका 'दैनंदिन जीवनाला गझलेत बेमालूमपणे गुंफणार्‍या' बंगालस्थित शायराचा... म्हणजेच ... मुनव्वर राणांचा!

२६ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे जन्मास आलेल्या सैय्यद मुनव्वर अली राना यांनी बी कॉम पदवी मिळवली असली तरी त्यांना खरे शिक्षण दिले त्यांच्या आयुष्यानेच!

मुनव्वर राना यांनी कुटुंबाच्या सदस्यांना आपल्या गझलेत अत्यंत मोठ्या प्रमाणावर स्थान दिले. 'माँ, भाई, बेटी' या विषयांवर त्यांचे शेकडो शेर आहेत व ते शेर 'स्वतंत्र शेर' म्हणूनच प्रकाशित करण्यात आलेले आहेत. ते एखाद्या गझलेत एखादा शेर असे नसून त्यांनी खास या विषयांवर असे शेर रचलेले आहेत. मायबोली सदस्य कणखर उर्फ विजय दिनकर पाटील यांच्या गझलेत असे शेर दिसून येताना दिसतात. तसेच, डॉ. समीर चव्हाण यांच्याही गझलेत असे शेर दिसतात.

मुनव्वर रानांचे हे नात्यांवरील शेर म्हणजे अंतर्मुख करायला लावणारे आहेत.

इतर लेखांप्रमाणे या लेखात खरे तर त्यांच्या जीवनाची माहिती देता आली असती. पण माझे मन मला सांगत आहेत की मुनव्वर राना यासारख्या कवीचे फक्त शेर दिलेले उत्तम आणि पुरेसे आहेत. कारण त्यांचे जीवन त्या शेरांमध्ये पारदर्शकपणे दिसते.

तेव्हा, हा लेख गद्य करण्यापेक्षा अधिकाधिक पद्य केलेला बरा!

माझी मुनव्वर राना यांच्या एकंदर काव्यावर असलेली प्रतिक्रिया येथे माझ्या एका द्विपदीतून देऊन मी या भागातील गद्य लेखन थांबवतो.

मुनव्वर वाचाल्यापासून कळली 'बेफिकिर' कविता
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते

=========================

मुनव्वर राना यांचे आई या विषयावरचे शेर! एक एक शेर अप्रतीम, एक एक शेर आईच्या आठवणीने हृदय पिळवटवणारा!

हवा दुखों की जब आई कभी ख़िज़ाँ की तरह
मुझे छुपा लिया मिट्टी ने मेरी माँ की तरह

खिजाँ - पतझड

सिसकियाँ उसकी न देखी गईं मुझसे ‘राना’
रो पड़ा मैं भी उसे पहली कमाई देते

सर फिरे लोग हमें दुश्मन-ए-जाँ कहते हैं
हम जो इस मुल्क की मिट्टी को भी माँ कहते हैं

दुष्मन ए जाँ - जीवाचे शत्रू

जब तक रहा हूँ धूप में चादर बना रहा
मैं अपनी माँ का आखिरी ज़ेवर बना रहा

देख ले ज़ालिम शिकारी ! माँ की ममता देख ले
देख ले चिड़िया तेरे दाने तलक तो आ गई

(निर्दयी पारध्या, आईचे प्रेम पाहा, तू तिच्या पिल्लांना मारू नयेस म्हणून ती पक्षिणी स्वतः तुझ्या जाळ्यापर्यंत आलेली आहे.) (अर्थात आता फक्त तिला पकडून निघून जा, पिल्लांना नेऊ नकोस)

मुफ़लिसी घर में ठहरने नहीं देती उसको
और परदेस में बेटा नहीं रहने देता

(तिची गरीबी तिला घरात राहू देत नाही - म्हणजे घराबाहेर पडून रोजगारासाठी काम करावेच लागते - आणि मुलगा परदेशात आहे पण तो तिला आपल्याबरोबर नेत नाही, ठेवत नाही.)

किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई
मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई

ख़ुद को इस भीड़ में तन्हा नहीं होने देंगे
माँ तुझे हम अभी बूढ़ा नहीं होने देंगे

स्टेशन से वापस आकर बूढ़ी आँखें सोचती हैं
पत्ते देहाती रहते हैं फल शहरी हो जाते हैं

अब देखिये कौन आए जनाज़े को उठाने
यूँ तार तो मेरे सभी बेटों को मिलेगा

(बघुयात कोण माझे प्रेत उचलायला येतो, तार तर माझ्या सगळ्याच मुलांना मिळेल म्हणा!)

कुछ नहीं होगा तो आँचल में छुपा लेगी मुझे
माँ कभी सर पे खुली छत नहीं रहने देगी

दिखाते हैं पड़ोसी मुल्क आँखें तो दिखाने दो
कहीं बच्चों के बोसे से भी माँ का गाल कटता है

(शेजारचे शत्रूचे प्रदेश आपल्याला क्रोधाने पाहत आहेत तर पाहूदेत, काहीवेळा बाळाने आईचे चुंबन घेतल्याने आईचा गाल फाटूही शकतो म्हणा!)

बरबाद कर दिया हमें परदेस ने मगर
माँ सबसे कह रही है कि बेटा मज़े में है

खाने की चीज़ें माँ ने जो भेजी हैं गाँव से
बासी भी हो गई हैं तो लज़्ज़त वही रही

(पदार्थ आंबले तरीही स्वाद तोच राहिला, हे पदार्थ आईने गावाहून मला खास पाठवलेले आहेत.)

‘मुनव्वर’! माँ के आगे यूँ कभी खुल कर नहीं रोना
जहाँ बुनियाद हो इतनी नमी अच्छी नहीं होती

(मुनव्वर आईच्या समोर कधीही मनमोकळा रडू नकोस हं? जिथे आपला पाया असतो तेथे इतकी ओल येणे चांगले नाही.)

बुज़ुर्गों का मेरे दिल से अभी तक डर नहीं जाता
कि जब तक जागती रहती है माँ मैं घर नहीं जाता

(घरातल्या वृद्धांनी केलेले संस्कार मी आता पाळत नाही तरीही त्यांचे भय माझ्या मनातून मात्र जात नाही. अजूनही आई घरी माझी वाट पाहात जागी असते तोपर्यंत मी घरी जातच नाही, उगाच मला पाहून काहीतरी म्हणायची आणि मला तिने माझ्यावर केलेले संस्कार आठवून आणि आजची माझी परिस्थिती पाहून रडू यायचे.)

धूप से मिल गये हैं पेड़ हमारे घर के
मैं समझती थी कि काम आएगा बेटा अपना

(सावलीऐवजी आमच्या घरातल्या झाडांनी उन्हाशीच फितुरी केली. मला वाटायचे की माझा मुलगा माझ्या उपयोगी पडेलही)

===========================

भाऊ व बहिणीवरचे शेरः

जहाँ पर गिन के रोटी भाइयों को भाई देते हों
सभी चीज़ें वहाँ देखीं मगर बरकत नहीं देखी

(जेथे भाऊ भावाला मोजून खायला देतो तेथे सगळे पाहिले पण ऐश्वर्य कधीही पाहिले नाही)

किसी बच्चे की तरह फूट के रोई थी बहुत
अजनबी हाथ में वह अपनी कलाई देते

(बहिण सासरी जाताना 'लहान मुलासारखी' रडली होती)

जब यह सुना कि हार के लौटा हूँ जंग से
राखी ज़मीं पे फेंक के बहनें चली गईं

=========================

नोस्टॅल्जिया :

हम एक तितली की ख़ातिर भटकते फिरते थे
कभी न आयेंगे वो दिन शरारतों वाले

इतना रोये थे लिपट कर दर—ओ—दीवार से हम
शहर में आके बहुत दिन रहे बीमार —से हम

ज़रा—सी बात पे आँखें बरसने लगती थीं
कहाँ चले गये मौसम वो चाहतों वाले

मैं इस ख़याल से जाता नहीं हूँ गाँव कभी
वहाँ के लोगों ने देखा है बचपना मेरा

हमें दिन तारीख़ तो याद नहीं बस इससे अंदाज़ा कर लो
हम उस मौसम में बिछ्ड़े थे जब गाँव में झूला पड़ता है

नीम का पेड़ था बरसात थी और झूला था
गाँव में गुज़रा ज़माना भी ग़ज़ल जैसा था

न जाने कौन सी मजबूरियाँ परदेस लाई थीं
वह जितनी देर तक ज़िन्दा रहा घर याद करता था

लड़कपन में किए वादे की क़ीमत कुछ नहीं होती
अँगूठी हाथ में रहती है मंगनी टूट जाती है

(लडकपन - अपरिपक्वता, उथळपणा )

वो जिसके वास्ते परदेस जा रहा हूँ मैं
बिछड़ते वक़्त उसी की तरफ़ नहीं देखा.

उन घरों में जहाँ मिट्टी के घड़े रहते हैं
क़द में छोटे हों मगर लोग बड़े रहते हैं

(कद - देह, उंची)

============================

बेटी:

घरों में यूँ सयानी बेटियाँ बेचैन रहती हैं
कि जैसे साहिलों पर कश्तियाँ बेचैन रहती हैं

ये चिड़िया भी मेरी बेटी से कितनी मिलती जुलती है
कहीं भी शाख़े—गुल देखे तो झूला डाल देती है

रो रहे थे सब तो मैं भी फूट कर रोने लगा
वरना मुझको बेटियों की रुख़सती अच्छी लगी

(रुखसती - बिदाईप्रमाणे)

तो फिर जाकर कहीँ माँ_बाप को कुछ चैन पड़ता है
कि जब ससुराल से घर आ के बेटी मुस्कुराती है

ऐसा लगता है कि जैसे ख़त्म मेला हो गया
उड़ गईं आँगन से चिड़ियाँ घर अकेला हो गया

===================

चिंतनीयः

हालात ने चेहरेकी चमक छीन ली वरना
दो चार बरस मे तो बुढापा नही आता

उसे नफरत थी अपने आप से भी
मगर उसको जमाना चाहता था

जिन्दगी जब बहुत उदास लगे
कोई छोटा गुनाह कर डालो

लोग माजी का भी अन्दाजा लगा लेते है
मुझको तो याद नही कल का भी किस्सा कोई\

(माजी अतीत, भूतकाळ)

दिन-रात के सफर का नतीजा ये है कि अब
आँखोसे सारी उम्र की नींदे चली गयी

परेशानी का मौसमभी बहुत दिलचस्प मौसम है
मेरे चेहरो को लोगोंने गमोंका पोस्टर जाना

मेरा बनवासपे जाने का इरादा था मगर
मुझ को दुनियां मे कही कोई भी सीता न मिली

इत्तफाकन कभी आयी तो कोई गम लायी
ऐ खुषी, तू मुझे इक बार भी तनहा न मिली

(योगायोगाने आलीसच तर एखादे दु:ख सोबत घेऊनच यायचीस, ए खुषी तू मला एकदाही एकटी भेटली नाहीस)

जगह मिली न कहीं उसको सर छुपाने की
तमाम उम्र जो गुडियों के घर बनाता था

पेड उम्मीदोंका ये सोच के काटा न कभी
फल न आ पायेंगे इसमे तो हवाही देगा

(अपेक्षांचा वृक्ष या दृष्टीने कधीही कापला नाही, की निदान त्याला फळे नाही आली - अपेक्षा पूर्ण नाही झाल्या - तरी निदान वाराअ तर मिळेलच - अपेक्षा आहेत ही सुखद भावना तरी राहील)

उस वक्त भी अक्सर तुझे हम ढुंढने निकले
जिस धूपमे मजदूर भी छत पर नही जाते

खिलौनोंके लिये बच्चे अभी तक जागते होंगे
तुझे ऐ मुफलिसी कोई बहाना ढूंढ लेना है (मुफलिसी - गरीबी)

========================================

गझलेबाबत त्यांचे मतः

सितारे, चाँद, कलिया, फूल, फुलवारी नही लाते
गझलमे हम कभी भरती की गुलकारी नही लाते

खुशामद चापलूसी और मक्कारी नही लाते
हम अपने शेर अल्फाज दरबारी नही लाते

(अल्फाज - शब्द, दरबारी - अभिप्रेत अर्थ शब्दबंबाळ करत नाही)

===========================

कत्तअतः

आरजूओ दिले-पामाल की जानिब आना
आसमानों कभी पाताल की जानिब आना

इश्क है काम मेरा, नाम 'मुनव्वर राना'
मुझसे मिलना है तो बंगाल की जानिब आना

============================

धन्यवाद!

'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अप्रतिम शायर आणि अप्रतिम लेखन.... हा लेखही Happy

मला त्यांचा एक खूप आवडलेला शेर

तलवार तो क्या मेरी नजर तक नही उठी
उस शख्स के बच्चों की तरफ देख लिया था

त्यांचे "पीपल छांव, गझल गांव वगैरे गझलसंग्रह अतिशय अप्रतिम आहेत.

लेखाबद्दल अनेकानेक धन्यवाद, आवडत्या दहांत

काही सदस्यांनी असे मत व्यक्त केले की मराठी संकेतस्थळावर उर्दूची वाहवा कशासाठी करावी.
फक्त एकट्या मी तसे लिहीले.
मला काय कळते? मी स्वतः मराठीहि वाचत नाही, हिंदीहि वाचत नाही, त्यातून कविता, गझल, शेर इ. पासून हजार योजने दूर. माझ्या लिहिण्याचा राग मानू नका, तिकडे लक्ष देऊ नका. त्यातून मराठी संकेतस्थळ असले म्हणून काय झाले? जे सुंदर आहे ते सुंदरच राहील.

एव्हढे कुणाला असेल प्रेम मराठीचे तर लिहावे की मराठी कवितांबद्दल!

मी सुद्धा स ध्या मुनव्वरच वाचत आहे आणि इतक्यात हा लेख म्हणजे ''आक्षी'' दुग्धशर्करा योगच.
धन्यवाद भूषणजी.

जब भी कश्ती मेरी सैलाब में आ जाती है
माँ दुआ करती हुई ख्वाब में आ जाती है.

लिपट जाता हूं माँ सें और मौसी मुस्कुराती है
मई उर्दू में गजल कहता हूं हिंदी मुस्कुराती है

त्यांच्या बर्‍याच शेरांत आईचा हटकून उल्लेख वा संदर्भ येतो.

अजून आठवेल तसं लिहीतो.... एक फार चांगल्या शायराच्या परिचयाची हाताळणी.

धन्यवाद भूषणजी.

काही सदस्यांनी असे मत व्यक्त केले की मराठी संकेतस्थळावर उर्दूची वाहवा कशासाठी करावी.
बेफिकीरजी , अशा प्रतिक्रिया आल्या असतील तर मनस्वी दु:ख झाले. पण असे माबोकर मोठ्या प्रमाणात
नसतील असे वाटते . मी तुमच्या ह्या सिरीजची खरेच वाट बघत असतो , त्यामुळे मला माबोवरुन हाकलले
तरिही मी ह्याची मागणी करेन .
कमीत कमी खेळ , संगीत अशा विषयांमध्ये भाषा , देश असा भेदभाव होऊ नये असे वाटते.
मेहदी हसन ह्यांची प्रक्रुती मध्ये ठीक नव्हती त्यावेळी श्री. अटलबिहारी बाजपाईंनी देखील संवेदना व्यक्त केल्या व त्यांना शुभेच्छा दिल्या असे ऐकले होते. ?

फक्त एकट्या मी तसे लिहीले
झक्कीजी , क्या बात है . तुम्ही जवाबदारी तर स्विकारलीच पण त्याच मोठेपणाने प्रोत्साहन पण दिले ,
जे सुंदर आहे ते सुंदरच राहील. ...मान गये.

अहो विप्रा, मी काही एव्हढा वाईट नाही मुळात! चांगलाच आहे.
मला अत्यंत वाईट वाटले की की बेफिकीर यांच्यासारखे स्वतः साहित्यिक असलेले लोक, यांना मराठीत चांगले काही सापडूच नये! त्या उद्वेगात लिहीले होते.

बाकी मी फक्त माझी मते मांडतो. मायबोली काही मा़झ्या मालकीची नाही. इथे लोक चुकीच्या समजुतीमुळे माझा हिंदू धर्म, माझा भारत देश यांच्याबद्दल वाईट लिहीतात, त्याचा कधी कधी राग येतो. म्हणून लिहितो. पण देव त्यांना क्षमा करो. (ही कल्पना ख्रिश्चन धर्मात, इंग्रजीत नेहेमी सांगतात. त्याचा मराठी अनुवाद.)

वास्तविक ज्यांना संस्कृत येत नसेल त्यांच्यासाठी मी माझे जीवनविषयक तत्वज्ञानाचे सार मुद्दाम हिंदी/उर्दू मधून सांगतो - "जिंदगी ख्वाब है, ख्वाब है......" वगैरे. कारण मराठीत तसे काही प्रसिद्ध असेल तर मला माहित नाही. लवकरच बहुतेक मराठी भाषा पण संस्कृत सारखी मृतवत् होईल, तेंव्हा उगाच मराठी, मराठी करण्यात अर्थ नाही. मुकाट्याने आजकालचे मराठी शिकावे. पुढल्या वर्षी भारतात यायचे आहे, आत्तापासून भाषा शिकायला पाहिजे, नाहीतर नातेवाईकांशी बोलणे कठीण, लोक काय म्हणतात ते समजणार नाही!

बेफीजी आजच तुम्ही ओळख करून दिलेले साहीर, इक्बाल,... सगळे वाचले...... मुनव्वर आवर्जून शेवटी वाचला!!
मला तो फारसा तुमच्या सारखा वाटला
खूप मस्त
तुम्ही दिलेले सगळेच शेर मस्त आहेत त्याचे
मला काही खूप आवडले ..............

किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई
मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई

‘मुनव्वर’! माँ के आगे यूँ कभी खुल कर नहीं रोना
जहाँ बुनियाद हो इतनी नमी अच्छी नहीं होती

न जाने कौन सी मजबूरियाँ परदेस लाई थीं
वह जितनी देर तक ज़िन्दा रहा घर याद करता था

मैं इस ख़याल से जाता नहीं हूँ गाँव कभी
वहाँ के लोगों ने देखा है बचपना मेरा

उन घरों में जहाँ मिट्टी के घड़े रहते हैं
क़द में छोटे हों मगर लोग बड़े रहते हैं

ये चिड़िया भी मेरी बेटी से कितनी मिलती जुलती है
कहीं भी शाख़े—गुल देखे तो झूला डाल देती है

खिलौनोंके लिये बच्चे अभी तक जागते होंगे
तुझे ऐ मुफलिसी कोई बहाना ढूंढ लेना है

लोग माजी का भी अन्दाजा लगा लेते है
मुझको तो याद नही कल का भी किस्सा कोई
________________

बेफीजी तुमचा हा लेखन प्रपंच माझ्या सारख्या गझलेची आणि गझलकारांची ओळख नसलेल्या नवशिक्यासाठी खूप उपयुक्त आहे
मी आपला ऋणी आहे

आपला
वैवकु