फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

Submitted by लाजो on 14 October, 2011 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

३ अंडी - पिवळे आणि पांढरे वेगळे करुन
२ कप दुध
अर्धा कप सखर
चिमुटभर मिठ
व्हॅनिला बीन किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
सजावटीसाठी लिंबाचे साल किसुन (लेमन झेस्ट) किंवा स्ट्रॉबेरी/रासबेरी सिरप, कॅरॅमल सॉस, टोस्टेड आमंड्स या पैकी काहिही.

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

**************************************************************************

'स्नो एग्ज डेझर्ट' (फ्रान्स)

snow111.JPG

स्नो एग्ज म्हणजे पोच केलेले एग व्हाईट्स. ही क्रिम अँग्लेस म्हणजे व्हॅनिला कस्टर्ड मधे घालुन खातात. १७व्या शतकात एका स्विस शेफ ने सर्वप्रथम एग व्हाईट्स फेटुन ते पोच करुन डेझर्ट्स मधे वापरायचा प्रयोग केला. त्यानंतर फ्रेंच शेफ्स नी ही स्नो एग्ज पाककृती डेव्हलप केली.

यालाच कधी कधी 'फ्लोटिंग आयलंडस डेझर्ट' असे देखिल म्हणतात. परंतु फ्लोटिंग आयलंड मधे युज्वली लिकर आणि बिस्किटाचे लेयर्स असतात.

क्रमवार पाककृती

स्नो एग्ज साठी:

१. सर्वप्रथम एका पसरट पातेल्यात किंवा पॅन मधे दुध गरम करायला ठेवा. यातच व्हॅनिला बीन किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घाला. दुध मंद आचेवर गरम करा. उकळणार नाही याची काळजी घ्या.

२. एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बोल मधे ३ अंड्यातील पांढरे वेगळे करुन घ्या. पांढरे वेगळे काढताना पिवळ्या बलकाचा अंश येणार नाही याची खबरदारी घ्या.

३. एग बिटर किंवा इलेक्ट्रिक बीटर्स (हँड मिक्सर) लो स्पिडवर ठेऊन अंडी फेटायला सुरुवात करा. जरा फेसाळ दिसायला लागले की स्पिड मिडीयम वर वाढवुन फेसायला लागा. 'सॉफ्ट पिक्स' दिसायला लागले की चिमुटभर मिठ आणि दोन टेबलस्पून साखर एका वेळेस थोडी थोडी घालत फेसत रहा. सगळी साखर संपल्यावर सुद्धा थोडावेळ फेसायला लागेल. मिश्रण हलके आणि चकचकित दिसायला लागे पर्यंत फेटा. 'स्टिफ पिक्स' दिसायला हव्यात.

snow2.JPG

४. आता स्टिलचा एक टेबलस्पुन भरुन हे फेसलेले मिश्रण घ्या, दुसर्‍या टेबलस्पुन घेऊन या फेसाला जमेल तितका गोल किंवा फुगिर लंबगोलाकार शेप द्या आणि गोळे जस जसे बनत जातिल तसे ते तापत ठेवलेल्या दुधात सोडा आणि पोच करा.

snow1.JPG

५. साधारण २ मिनीटांनी हे गोळे उलटे करुन परत पोच करा. गोळे थोडे फुगतिल आणि एकसंध दिसायला लागले की भोकाच्या चमच्याने काढुन किचन टॉवेल किंवा किचन पेपर वर निथळायला ठेवा. असे सर्व गोळे 'पोचुन' घ्या Happy

****
क्रिम अँग्लेस साठी:

१. गॅसवर डबल बोयलर किंवा एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.

२. गरम दुधातील व्हॅनिला बीन काढुन घ्या आणि दुध गाळुन घ्या. यात उरलेली साखर घाला आणि व्हॅनिला बीन मधिल बीया खरवडुन घाला.

३. एका हिट प्रुफ बोल मधे ३ अंड्यांचे उरलेले पिवळे बलक हलके फेसुन घ्या. यात थोडे गरम दुध घालुन मिक्स करा आणि मग बाकीचे दुध घाला. हे भांडे उकळत ठेवलेल्या पाण्यावर खाली पाण्याला स्पर्श करणार नाही असे ठेवा. आंच मंद करा आणि मिश्रण लाकडी चमच्याने ढवळत रहा. थोड्याच वेळात मिश्रण घट्ट व्हायला लागेल व क्रिमी कस्टर्ड तयार होइल.

४. बोल पाण्यावरुन काढुन घ्या आणि क्रिम अ‍ॅग्लेस थोडे गार होऊ द्या.

*****

असेंबली:

कस्टर्ड सर्विंग बोल मधे ओता त्यावर १/२ स्नो बॉल्स ठेवा. ते कस्टर्डवर तरंगतिल. बोल्सना प्लॅस्टिक रॅप्/क्लिंग रॅप लावुन हे बोल्स फिज मधे गार करत ठेवा. आयत्या वेळेस त्यावर आपल्या आवडीचे टॉपिंग घालुन सर्व्ह करा.

snow10.JPG

*****************

माझे प्रयोगः

- दुधात व्हॅनिला न घालता मी केशर आणि वेलची घातली.
- कस्टर्ड बनवताना त्यात मी थोडे केशर सिरप घातले.
- सर्व्ह करताना वरतुन टोस्टेड बदाम घातले आणि केशर सिरप ड्रिझल केले.

snow5.JPG

*****************

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके :)
अधिक टिपा: 

- स्नो बॉल्स पूर्णत: निथळु द्या. दुधाचा अंश राहिल्यास ते पचपचित होतिल.
- हे स्नो बॉल्स ३-४ तासापेक्षा जास्त वेळ नुसते राहात नाहित त्यामुळे कस्टर्ड गार होताच त्यावर हे ठेऊन फिज मधे ठेवा.
- कस्टर्ड फार घट्ट नको (साधारण रबडी आणि बासुंदीच्या मधली कन्सिस्टंसी).
- कस्टर्ड न वापरता कुठल्याही फळाच्या प्युरीवर किंवा सॉसवर घालुन हे स्नो बॉल्स खाता येतात. फक्त ते तरंगतिल अशी कन्सिस्टंसी हवी.

माहितीचा स्रोत: 
डिव्हाईन डेझर्ट्स पुस्तक आणि माझे प्रयोग
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतय हेही Happy
तुलाही शुभेच्छा Happy
पण म्हणाजे आमचा हा छळ ( फोटो पाहुन होतो तो ) संपला की काय Uhoh

यम्मीssssssssssss
जो..तिकडे असते तर तुझ्या घरावर लगेच धाड टकली असती हे खायला Proud

लाजो अप्रतिम गं..सगळीच मालिका सुंदर आहे.
आणि अंड्याचे तू केलेले सगळे प्रकार करायला नाजूक असल्याने अजून कष्ट आहेत. तरी स्टेप्स चे फोटो वगैरे टाकणे हे सगळे करून तुझ्या कामातून वेळ काढून हे केलेस म्हणून तुझे खूप कौतुक..आणि आम्हाला दाखवलेस म्हणून आभार!!

मस्त आहे हे अंड्याचं डेझर्ट .. अंड्याचं वाटतचं नै.
खरं सांगायचं झालं तर मला अंड जास्त आवडतच नै तेव्हा हे डेझर्ट मी फक्त कुठ्ल्याही पुर्वकल्पने शिवायच खाऊ शकतो.
पण सगळ्या रेसिप्या सेव्ह करून ठेवल्यात. होगा किसीका मुड तो खायेंग अंडे.. !

वॉव लाजो. कसल्या ग्रेट रेसिप्या टाकतेस.
मला जमणारच नाहीत.
तुझ्या कडे रहायलाच याव आठ दिवस Wink

सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद Happy

जागतिक अंडे दिनाच्या निमित्ताने या सिरीजमधे वेगवेगळ्या देशांच्या पाकृ दिण्याची आयडिया होती. तुम्हाला सगळ्यांना या पाकृ आणि सिरीज आवडली त्याबद्दल आभार Happy

अंडी वापरुन केलेल्या काही अजुन पाककृती लिहीन लवकरच.

दक्षे,
स्नो एग्ज चवीला अप्रतिम लागतात... लेकीनेही आवडीने खल्लेन Happy
मी केशर वेलची वगैरे घातल्यामुळे अंड्याचा वास अजिब्बात आला नाही Happy

Back to top