Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 October, 2011 - 02:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकुन त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणार्या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला ? :हाहा:)
आता गोळे करुन पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही)
चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो.
वाढणी/प्रमाण:
कमीत कमी प्रत्येकी दोन.
अधिक टिपा:
ह्यात अजुन मटारची पेस्ट करुन टाकु शकता, मेथी चिरुन टाकू शकता.
असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात.
आले-लसूण पालकातच टाकुन पेस्ट केली तर वेळ वाचतो.
माहितीचा स्रोत:
माझेच उपद्व्याप
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त्....तोडांला पाणि सुटले
मस्त्....तोडांला पाणि सुटले बघुन्....आजच बनवते
एकंच नंबर.... लगेच करुन बघते
एकंच नंबर.... लगेच करुन बघते आज....
मला एक प्रश्न पडलाय
मला एक प्रश्न पडलाय इथे...
हिंग आणि गोडा मसाला घातला का पीठ मळताना..
आणि नाही घातला तरी चालू शकेल ना???
शोभू, दुर्गा धन्स. दुर्गा
शोभू, दुर्गा धन्स.
दुर्गा नाही घातल तरी चालेल. गोडा मसाला ऐवजी धणे-जिरे पुड किंवा नुसत जिर भाजून पुड करुन घातली तरी चालेल. आणि दोन्ही नाही घातलस तरी चालेल फक्त त्याच्या रुचकरपणात थोडा फरक पडेल.
हाय जागु, मला सांग कि हे
हाय जागु,
मला सांग कि हे पराठे हिरवे कसे नाहि दिसत? मि केले कि पाल्का चा हिरवा रंग येतो.हे तर पांढरे आहेत..
मी पण करुन पाहीन किती मस्त
मी पण करुन पाहीन
किती मस्त दिसतायेत !!!!
मस्त जागुतै.
मस्त जागुतै.
धन्स जागु... मी केल्यावर
धन्स जागु...
मी केल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया नक्की कळवेन..
मस्त आहेत जागू.... मला नीट
मस्त आहेत जागू....
मला नीट रेसिपी लिहिता येत नाही म्हणुन इथेच टाकते तु जे पालक आनि गाजर १त्र कणीक मळलीस त्यच्या एवजी वेगवेगळी कणीक भिजवायची आणि प्रत्येकी १ १ गोळा घ्यायचा आणि १त्र पोळी लाटायची २रंगी मस्त पराठा तयार होतो. त्यच्यात लाल रंग यायला बीट वापरता येते.
डिजे, पालक कमी प्रमाणात
डिजे, पालक कमी प्रमाणात घ्यायचा कारण गाजर, इतर साहित्यही असतच.
पियापेटी, अश्विनीमामी धन्स.
जागू, आम्ही तूमच्याकडे खाल्ली
जागू, आम्ही तूमच्याकडे खाल्ली तशी तांदळाची भाकरी पण करता येईल. ती भाजल्यावर पण शुभ्र रहात असल्याने रंग उठून दिसतील.
दिनेशदा चांगली आहे ट्राय करुन
दिनेशदा चांगली आहे ट्राय करुन बघेन. पण हे सगळे जिन्नस टाकल्यावर त्या थापायला कठीण पडतील. कारण ते जिन्नस परातीला चिकटेल.
मस्त ग जागुले..करुन बघायला
मस्त ग जागुले..करुन बघायला हवे एकदा हे पराठे
मस्त गम जागु मी करते त्यात
मस्त गम जागु
मी करते त्यात गाजर किसुन आणि पालक बारीक चिरुन टाकते आणो पाभा मसाला किंवा धणे जिरे पावडर घालते
बीट किसुन घातले तर मस्त गुलाबी रंग येतो पराठे किंवा धिरड्यांना
सह्ही !!!!!! मस्तच तोंपासु
सह्ही !!!!!! मस्तच तोंपासु
भाकरीत गाजर अगदी बारिक किसून
भाकरीत गाजर अगदी बारिक किसून घालायचे, मग नाही चिकटत.
कोकणात अश्या भाकर्या गाजर, फणस वगैरे उकडून त्याच्या गरात पिठ भिजवून करतात.
सुमे, स्मितू धन्स. हो लाजो मी
सुमे, स्मितू धन्स.
हो लाजो मी पण बिट घालायचे आधी. पण हल्ली श्रावणी बिट बघुन खात नाही म्हणून टाकत नाही.
दिनेशदा आता नक्कीच ट्राय करेन.
आपण कुठे असता? खायचे आहेत
आपण कुठे असता?
खायचे आहेत पराठे!
बिफिकीर मी उरणला राहते. डॉ.
बिफिकीर
मी उरणला राहते. डॉ. कैलास आले होते माझ्या घरी. फक्त पन्हे पिऊन गेले. आता त्यांना घेऊन या पराठे खायला
सुंदर गं जागु
सुंदर गं जागु
कसले सह्ही दिसतायत हे.
कसले सह्ही दिसतायत हे. जागुले, मस्त रेसिपी.
राहते. डॉ. कैलास आले होते
राहते. डॉ. कैलास आले होते माझ्या घरी. फक्त पन्हे पिऊन >>> तेव्हा तु रेसिपी टाकत नसशील
आता सगळे जण तुझ्याकडे यायचा प्लॅन करतायेत ना. बाकी मी आता गावाला जाणार तेव्हा गाडी उरण फाट्याला वळवणार. All da Best
मीही कालच बीटरूटाचे पराठे
मीही कालच बीटरूटाचे पराठे केले होते. त्यानंतर ही रेसिपी वाचून मजा वाटली.
मस्त आहेत.. मि करुन बघेन
मस्त आहेत.. मि करुन बघेन उद्याच हे पराठे
मस्त दिसतायेत.
मस्त दिसतायेत.
मस्त आहे. पालकाच्या पेस्ट्चा
मस्त आहे. पालकाच्या पेस्ट्चा रंग सुंदर दिसतोय.
मस्त
मस्त
जागू, तुझे 'उपद्व्याप'
जागू, तुझे 'उपद्व्याप' चांगलेच रुचकर आणि खमंग असतात हं!
मामी, मैना, अवनी, नलिनी,
मामी, मैना, अवनी, नलिनी, अन्कॅनी, आरती, शांकली धन्स.
मोना उरण फाट्यावरून अर्धा तास लागतो
जागू, भारीच बुवा उरक्याची तू!
जागू, भारीच बुवा उरक्याची तू! इतकं सगळं करायचं आणि वर मस्त फोटोही काढून माबोकरांना द्यायचा! व्वा मस्तच!
Pages