माझं शिंकणं?

Submitted by वर्षा_म on 29 September, 2011 - 08:16

बागेश्रीची क्षमा मागुन Happy
http://www.maayboli.com/node/29384

=================================

तुझा रुमाल मागायला
तू आलास....कालचं!

अगदी काल आणि परवा,
ज्यावरची अस्वच्छता मी
धूउन टाकून दिली,
तोच पुन्हा पांघरून...

पटकन नाक दाबुन
उभी झाले पाठमोरी,
पण शिंकल्याचा आवाज
आजही झालाच... कानाच्या पडद्यातून
घुमत....

तू उभा असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
रुमाल उघडण्याची,
बेदरकारपणे पुसलं त्याला.....

आजही मी शिंकले होते...
आणि;
खराब रुमालाचं कारण मात्र

आकलनीयच! ( मला हवाय तो रुमाल, द्यायचा नाहीये परत )

गुलमोहर: 

Pages