प्रथम भूईछत्र्या सोलुन घ्यायच्या. सोलून घ्यायच्या म्हणजे ह्या थराथरांच्या आवरणांच्या बनलेल्या असतात. सगळ्यात वरचे आवरण काळपट असते ते काढून टाकायचे.
नंतर त्याला हातानचे सुट्टे करत त्याचे बारीक भाग करायचे.
हया भूईछत्र्यांचे तुकडे आता धुवुन घ्यायचे. भांड्यात तेल गरम करुन कांदा शिजत लावायचा. शिजला की त्यात आल्-लसुण, मिरची,कोथींबीरची पेस्ट टाकुन थोड परवायच. त्यानंतर हिंग, हळद, मसाला टाकुन परतवून भूईछत्र्यांच्या फोडी टाकायच्या. व ढवळून शिजत ठेवायचे. भुईछत्र्यांना पाणी सुटते थोडे.
साधारण १०-१५ मिनीटे शिजल्यावर त्यात वरुन टोमॅटो, मिठ व गरम मसाला घालायचा. टोमॅटो शिजला, पाणी आटले की गॅस बंद करायचा.
ही आहे तयार भूईछत्री/मश्रुम्सची भाजी. अगदी मटणासारखी लागते चविला.
भूईछत्र्या ह्या रानात, डोंगरात साधारण ऑगस्ट च्या दरम्यात म्हणजे जरा उन पडायला लागल्यावर, ढग गडगडायला लागल्यावर यायला लागतात. भुसभुशित जागेत त्या उगवतात. भूईछत्र्या ह्या खाण्याच्या आहेत हे मात्र खात्रीकरुन घ्यावे. ह्यात विषारी प्रकारही असतात. जाणकारांकडूनच ह्या घ्याव्यात.
ह्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो म्हणून भाजीत आजीबात पाणी घालू नये.
साफ करण्यात थोडा जास्त वेळ जातो त्यामुळे जास्त प्रमाणात करावयाची असल्यास चिकाटी बाळगावी.
रानभाज्या:
) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
८) कोरल - http://www.maayboli.com/node/16860
९) कवळा - http://www.maayboli.com/node/17069
१०) वाघेटी - http://www.maayboli.com/node/17171
११) कोरांटी/कोलेट - http://www.maayboli.com/node/17448
१२) मायाळू - http://www.maayboli.com/node/17566
१३) सुरणाचे देठ - http://www.maayboli.com/node/17631
१४) दिंडा - http://www.maayboli.com/node/17948
१५) शेवग्याचा पाला - http://www.maayboli.com/node/18177
१६) रानभाजी टेरी (अळू) - http://www.maayboli.com/node/17006
१७) शेवग्याची फुले - http://www.maayboli.com/node/23204
वा.
वा.
वेगळेच आहेत हे मशरुम्स. मी
वेगळेच आहेत हे मशरुम्स. मी पहिल्यांदाच पाहिले. रेसिपी मस्त आहे
मी पण असले मशरुम्स
मी पण असले मशरुम्स पहिल्यांदाच पाहिले आहेत.
बटण मशरुम्स ची पण अशीच करता येईल का भाजी?
दिनेशदा, अगो धन्यवाद. अनु हो
दिनेशदा, अगो धन्यवाद.
अनु हो चालेल ना ह्या पद्धतीने.
जागु मस्तच रेसिपी आहे. मला
जागु मस्तच रेसिपी आहे. मला मश्रुम्स खूप आवडतात.

करून पाहिन एकदा..
जागु, परवाच आई, बाबा या
जागु, परवाच आई, बाबा या भाजीबद्दल बोलत होते.. पप्पांच्या म्हणण्यानुसार हि भाजी बंद असेल तेवढी चांगले; ते एकदा का फुलले कि लवकर खराब होतात आणि चवीत फरक पडतो.. ह्याला आमच्याकडे "अळंबी" असे म्हणतात.
अळंबी!! गोरेगावला पूर्वी
अळंबी!! गोरेगावला पूर्वी भरपूर यायची. विशेषतः वसई-पालघरच्या बायका घेऊन यायच्या. तेव्हा कुणी खात नसत फारशी. त्यामुळे स्वस्त मिळत. कोकणातली माणसं मात्र वाट बघायची. कधी श्रावण लागतोय आणि अळमी येतात.
आता मात्र सगळेच खातात त्यामुळे मिळतच नाहीत किंवा प्रचंड महाग! तू वर दाखवलेल्या अळंब्यासाठी किमान १०० रु मोजावे लागतील
मग कृत्रिमरीत्या पैदास केलेल्यवर तहान भागवुन घ्यावी लागते. 
रुपाली म्हणते तसं बंद (कळ्या) असतील तर आणखी छान लागते भाजी. त्या कळ्या तळुनपण खातात.
आम्ही आधी मिठाच्या पाण्यात बुडवुन ठेवतो. निळं पडलं तर ते घ्यायचं नाही. असो. तोंपासु हे खरं!
रुपाली, भ्रमर तुमच्या टिपा
रुपाली, भ्रमर तुमच्या टिपा आवडल्या पुढच्या वेळेच तसे करेन. आणि मला नावच काल आठवत नव्हते आळंबी हे. आता टाकते वर. धन्स.
दक्षे धन्स.
जागुतै मस्तच रेसिपी आहे. मला
जागुतै मस्तच रेसिपी आहे. मला मश्रुम्स खूप म्हणजे खुपच आवडतात.
खाउन पाहतो आज पुन्हा....
इथे चाइनीज मश्रुम्स येतात्....२००ग्राम च्या पाकीटात. सर्वत्र मिळतात.
अगदी मटणासारखी लागते चविला... >>> हो म्हणुन साधी बनवली तरी भकाभका खाविशी वाटते.
हि भाजी बंद असेल तेवढी चांगले;>> सहमत.