शिवाजी महाराजांचा फोटो व विश्लेषण

Submitted by केदार on 23 September, 2011 - 11:24

हे चित्र पाहून तुम्ही त्याचे विश्लेषण करू शकाल का?

shivaji-maharaj02.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराजांच्या चेहेर्‍यावर आनंदी, कृतार्थ भाव आहेत असं वाटतय. सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखे.
is it a trick question?

आधी कधी विचार केला नव्हता, पण आता तू पोश्चर बघायला सांगितल्यावर 'सावध' / अलर्ट पवित्रा वाटतो आहे. रेलून/आरामात बसले नाहीयेत. दोन्ही हात शस्त्रांच्या मुठींवर गेलेत. पाय (लगेच उठता यावं म्हणून?) जवळ घेतलेत. हल्ला होत असावा किंवा करावासा वाटत असावा अशी काहीतरी वाटते आहे पोज.

'सावध' / अलर्ट पवित्रा वाटतो >>>> मला उलट रिलॅक्स असावेत असं वाटलं.

राज्यातल्या प्रगतीचा आलेख कुणी वाचतय आणि हे ऐकत आहेत असे भाव आहेत चेहर्‍यावर. ज-रा रेलून बसलेत उजव्या बाजुस.

समाधानी पण सावध.
घारीची नजर कि काय म्हणतात तशी नजर.. एक नजर कायम राज्यावर पुढचा धोका काय याचा विचार करणारी , चिंता करणारी.
हायलाइट केलेलं केशरी गंध जणु तिसरा डोळा :).

स्वाती यु नेल्ड इट!

अनेक बि स्कुलमध्ये मराठा वॉरियर्सच्या पोश्चर बद्दल डिस्कशन झाले आहे. मराठा वॉरियर्स नेहमी "तयारीच्या" पोझ मध्येच बसतात. हेच नाही तर कुठलेही चित्र आठवून पाहा. त्यात एक पाय समोर, एक मागे, जणू काही लगेच उठून निघू शकतो असेच असते. हे जसे तयार असल्याचे लक्षण आहे तसेच बसण्यात एक ऑथोरिटी आहे व सहजता आहे मित्र असाल तर सोबत पण शत्रू असाल तर "मी तयार आहे" ह्यासाठी तलवार घेण्यास सहज सज्ज असलेला पण रिलॅक्स दिसत असलेला हात.

सावध नृपवर! शाळेत पाहिलेली इतर चित्र आठवतात का?

सिंडी +१ किंवा असही म्हणता येईल की राज्याभिषेकाच्या वेळी चाललेले सांस्कृतिक कार्यक्रम बघत असावेत Wink

सिंहासनावर बसलेले महाराज जसे असावेत असे मनात असते अगदी तशीच मूर्ती बनविली आहे. तो भगवा रंग : कपाळावरचा अन झेंड्याचा उगच घुसडलाय असं वाटतं.

रच्याकने.
गाडीत इंधन भरायला थांबलो असतांना मोटारसायकल वर बसून ३ 'शिवप्रेमी' बाजूला थांबले. पावसाळ्याचे दिवस होते. अन शिवप्रेमींच्या नंबरप्लेटवर शिवाजी. त्यावर चिखल इ.
खूप वाईट वाटलं.
न राहवून विचारलंच, म्हटलं अशाने काय होतं? महाराजांचा अपमान होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कदाचित मला ओळखत असावेत किंवा काय ते कुणास ठाऊक पण उलट भांडण न करता एकाने उतरून खिशातील रुमालाने नंबरप्लेटीवरील शिवाजी महाराज स्वच्छ पुसले.
असो.
तुम्हाला दैवत वाटते, तर देव्हार्‍यात ठेवले पाहिजे. वाहवत जाऊ नये.
फोटो पाहून आठवलं म्हणून लिहिलं.

त.टी. मूर्ती. पुतळा नव्हे.

बिचार्‍यांच्या आयुष्यात एव्हढ्या "आरामात" बसायचे भाग्य क्वचितच! बाकी लढाया, काळज्या यात आयुष्य गेले. बहुधा राज्याबिषेक झाल्यावर मातोश्री जिवंत असेस्तवरच्या थोड्या दिवसातले चित्र आहे. एरवी एव्हढी उसंत कुठली मिळायला त्यांना!

>>'सावध' / अलर्ट पवित्रा वाटतो <<
अरे बाबांनो, महाराज सिंहासनावर राजदरबारात बसलेले आहेत, एखाध्या लष्करी छावणीत नाहि. मला फक्त यात छत्रपतिंचं क्षात्रतेज दिसतंय.

राज + १

गाडीत इंधन भरायला थांबलो असतांना मोटारसायकल वर बसून ३ 'शिवप्रेमी' बाजूला थांबले. पावसाळ्याचे दिवस होते. अन शिवप्रेमींच्या नंबरप्लेटवर शिवाजी. त्यावर चिखल इ.
खूप वाईट वाटलं.
>>>>>>>>> झक्कि अगदी मनातलं बोललात. स्वत:च्या मुलांची नावे पुढे आणि महाराजांचे चित्र मागे, काही महाभाग तर number plate खाली mud-guard वर पण लावतात. Angry

>>> झक्कि अगदी मनातलं बोललात<<<<
अहो ते झक्की नसुन इन मीन चार आठवडे वयातच अस्स्खलित देवनागरी टाईपणारे इब्लिस महाशय आहेत.

>>>> कदाचित मला ओळखत असावेत किंवा काय ते कुणास ठाऊक पण उलट भांडण न करता एकाने उतरून <<<<<
नुस्ते ओळखत असावेत काय? चान्गलेच ओळखुन असावेत म्हणून घाबरलेही असावेत, म्हणून तर भाण्डण न कर्ता एकाने उतरुन..... वगैरे वगैरे! (मी नै कालपरवा सपशेल माघार घेतली ठेचाठेचीतुन? Wink नुस्ती माघार नै तर त्यामुळे पुढे मिर्चीचा ठेचा अन भाकरी ड्यु झाली तुम्च्याकडे! Happy लक्षाते ना?)

लिंबू काका,
माफ करा, पण मी इथे येण्याच्या फाssssर आधीपासून मराठी टाईप करतो आहे. अगदी gist ism keyboard देखिल येतो मला. पण याचा अर्थ असा नव्हे की मी कुणाचा डुप्लिकेट आय डी आहे.

तुम्ही सभ्यपणे बोललात, अन माझे चुकले असे वाटले म्हणून माघार घेतली. आता पुन्हा लिंबू अन मिर्ची अस्लं काही खेळायचा विचार आहे का? उग्ग आप्लं कै च्या कै.

शिवाजीमहाराजांच्या या पुतळ्याचा इतिहास गोनीदांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' या पुस्तकात तपशीलात लिहला आहे.
@ केदार
हे चित्र पाहून तुम्ही त्याचे विश्लेषण करू शकाल का?<<<
बाकी हे चित्र पाहून तुम्हाला काय (विश्लेषण) वाटते? ते आधी लिहलत तर बरे होईल.

केदार, एक छोटीशी ओजंळ माझीही....

हा पुतळा होळीच्या माळावर आहे . महाराज कधीही राजदरबारात खुर्चीपध्द्तीच्या सिंहासनावर बसत नसत.. दरबारात नेहेमी वीरासन, दोन्ही पाय मुड्पुन आणि तळवे बाहेरील बाजुस .
या पुतळ्याच्या चेहेर्यावरचे भाव मात्र सतत अलार्ट असेच आहेत .
या पुतळ्यातही बर्याच चुक आहेत.
१. तलवार... राजांची तलवार कधीच अशी मराठा पध्दतीची नव्हती. ते नेहीमी धोप पध्दतीची , सरळ ४-४.५ फुटाची तलवार वापरत.( सध्या महराजांच्यां सांगितल्याजाणार्या ३ तलवरी आहेत १ लंडनच्या रॉयल २. कोल्हापुरच्या गादीकडे आणि ३. सिंधुदुर्गात्ल्या महराजांच्या मंदीरात.)
२.सिंहासन खुर्चीपध्दत.

इब्लीस /झक्की अनुमोदन.
याहुन वाईट प्रकार ... रायगडला ..... मेघड्ंबरीजवळील पुतळ्याजवळ उभे राहुन चक्क महारा़ज्यांच्या खांद्यावर हात टाकुन दोन्ही बाजुला उभ अस्लेल एक जोडप बहुएक नवीन लग्न झालेले असावे..
परीणाम एकच लगेच दोघांना खाली उतरुन .. उठाबशा काढायला लावल्या....

जाउ द्या हो, इब्लिस काय, झक्की काय. श्री. शिवछत्रपतींच्या चित्राबाबत चाललेल्या चर्चेत दोघेहि नगण्य. आमचा मुलाहिजा कोण धरतो?

Back to top