पोळीसाठी -
मैदा - पाऊण वाटी
गव्हाची कणिक - अर्धी वाटी
चमचाभर तेल
चवीप्रमाणे मीठ
कोमट पाणी
पॅटीसांसाठी
मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे - चार ते पाच
गरम मसाला - एक चमचा
आमचूर पावडर - एक चमचा
लाल तिखट - एक ते दीड चमचा
मीठ चवीप्रमाणे
फ्रँकी देताना
मोठे लाल कांदे - दोन (खूप बारीक चिरून नको, मध्यम जाडसर कापून घ्या)
व्हिनेगर - तीन ते चार चमचे
सोया सॉस - एक - दोन चमचे
चाट मसाला - लागेल तसा
हिरव्या मिरच्या - दोन (बारीक तुकडे करून) - ऐच्छिक
१. मैदा आणि कणिक एकत्र करून तेल, मीठ, गरम पाणी घालून पोळीपेक्षा किंचीत सैल कणिक भिजवून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. नंतर कणिक चांगली मळून घेऊन पराठ्याइतपत जाडसर पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकवून घ्या.
२. उकडलेले बटाटे सोलून हातांनीच छोटे छोटे तुकडे करून घ्या. पूर्ण गुळगुळीत मॅश करू नका, खाताना मधेमधे किंचीत फोडी तोंडात लागणं अपेक्षित आहे. त्यात मीठ, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर घालून व्यवस्थित मिसळून घ्या. कबाबांसारखे लांबुळके आकार देऊन तव्यावर किंचीत तेलावर शेकवून घ्या. खमंग परतवू नका. वळलेला कबाब फुटू नये म्हणून फक्त शेकवून घ्यायचे आहे.
३. सोया सॉस आणि व्हिनेगर एकत्र मिसळून घ्या. आवडत असल्यास त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घाला.
४. शेकवून घेतलेली पोळी गरम तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या. पोळी तव्यावर असतानाच त्यावर एक - दीड चमचा सोया-व्हिनेगरचे मिश्रण लावून घ्या. तयार केलेला कबाब, मसाला डोश्यातल्या मसाल्याप्रमाणे व्यवस्थित चपटवून पोळीवर बसवा. दोन चमचे चिरलेला कांदा त्यावर घाला. पूर्ण पोळीवर चमचाभर चाट मसाला भुरभुरवा. पोळीची घट्टा गुंडाळी करून टिश्यू पेपर लावून गरम गरम खाण्यास द्या.
१. पोळीभाजीच्या गुंडाळीला 'फ्रँकी' हे गोंडस नाव आहे.
२. टिब्समधे व्हेज फ्रँकी मिळते त्यात हे असे बटाट्याचे कबाब वापरतात. हाताशी भरपूर वेळ असेल तर बटाट्याच्या मिश्रणाऐवजी अंजलीचे व्हेज कबाब फ्रँकीसाठी करा. शाही फ्रँकी होते.
३. आपल्या आवडीप्रमाणे पनीर, तोफू, मटार किंवा कुठलेही कबाब इत्यादी सारणे फ्रँकीसाठी करता येतील. मामीचे आलू चालवूनही वापरता येतील.
४. पोळी पूर्ण मैद्याची केली तर काही वेळा तेल सोडून भाजताना चिवट होण्याची शक्यता असते. म्हणून त्यात मऊपणा येण्यासाठी कणिक मिसळलेली चांगली.
अरे वा!!! धन्स मंजू. मी कधी
अरे वा!!! धन्स मंजू. मी कधी घरी केली नाहीयेत फ्रँकी. पण आमच्यात आवडतात सगळ्यांना. आता करून बघेन.
सहीच!!!!!!..
सहीच!!!!!!..
मस्तच !!!!!!
मस्तच !!!!!!
अरे हे तर सोपं दिसतंय थँक्स.
अरे हे तर सोपं दिसतंय थँक्स.
अरे वा! वा! धन्यवाद. करुन
अरे वा! वा! धन्यवाद.
करुन पाहणार.
मस्तय.. तोंपासु..
मस्तय.. तोंपासु..
अश्विनीला दाखवा बरं हे.
अश्विनीला दाखवा बरं हे.
अरे वा मस्त रेसिपी मंजूडी.
अरे वा मस्त रेसिपी मंजूडी.
मी आता पर्यंत बाहेरची कोणतीच
मी आता पर्यंत बाहेरची कोणतीच फ्रँकी खाल्ली नाहीए, त्यामुळे हा प्रकार कसा लागेल चवीला याविषयी उत्सुकता आहे.
मी घरगुती फ्रँकी करते तेव्हा त्यात घरातील कोणतीही कोरडी भाजी / उसळ, कोरडी चटणी, पनीर भुर्जी / स्वीट कॉर्न भुर्जी असे स्टफिंग घालते. अगोदर २ पोळ्या / फुलके किंचित तूप/ तेल/ लोण्यावर हलकेच भाजून घेते, त्यांच्या एकेका बाजूला तिखट / मिरपूड, मीठ (हवे असल्यास) भुरभुरून घेते. तिखट मीठ लावलेल्या बाजूवर भाजी / उसळीचं स्टफिंग घालून त्यावर दुसरी पोळी लावते. दुसर्या पोळीची तिखट भुरभुरलेली साईड भाजीच्या बाजूला असेल. पुन्हा ही स्टफ रोटी दोन्ही बाजूंनी शेकते. त्यांची वळकटी करते, त्यावर हवं असेल तर सॉस / शेव/ चिरलेला कांदा - टोमॅटो असं भुरभुरते, सुरीने कापते व गट्टं स्वाहा!
मंजू.. एकदम परफेक्ट रेसिपी...
मंजू.. एकदम परफेक्ट रेसिपी...
मुंबईहून पुण्याला येताना जो पहिला फूड मॉल आहे तिथे अशीच फ्रँकी मिळते... माझी फेव्हरेट डीश... एकदम जबरी लागते...
छान. करुन पाहणार नक्की.
छान. करुन पाहणार नक्की.
मस्त रेसिपी. व्हेज
मस्त रेसिपी. व्हेज टाकल्याबद्दल थँक्यु.
मस्तच!! सोया सॉस, व्हिनेगर
मस्तच!! सोया सॉस, व्हिनेगर मुळे मस्त चव येत असणार नक्की करुन बघन्यात येइल
सहीच!! करुन बघेन...मी एकदा
सहीच!! करुन बघेन...मी एकदा श्रावणी घेवड्याच्या भाजीचं स्टफिंग असलेली फ्रँकी खाल्ली आहे.ती पण मस्त लागते
मस्त!
मस्त!
मस्त. न्युयॉर्क सिटीत
मस्त.
न्युयॉर्क सिटीत रुमालीमध्ये रोल मिळतात ते साधारण असेच असतात.
चना-मसाला रोल: ह्यात भजी (भज्यांचीच चव असते), नुसतच मीठ लावून शिजवलेले छोले, कच्चा कांदा, लेट्युसचं फिलिंग असतं.
पनीर टिक्का रोल: ह्यात टिक्का पनीर, रोस्टेड भाज्या- बहुतेक करुन सिमला मिरची, कांदा, लेट्युस असं फिलिंग असतं.
आलु टिक्की रोल: हे सेम तू कृती दिली आहेस तसं बनवत असणार. सोया सॉस नसतो मात्र कशातच.
वा वा मस्त आठवण. आजची आर्डर नोंदवते लगेच
आताच करुन पाहते. आज स्सकाळी
आताच करुन पाहते. आज स्सकाळी नाश्त्याला फ्रँकी पाहिजे अशी मागणी आल्यावर लगेच हीच रेसिपी आठवली.
मस्त पोळीभाजीच्या गुंडाळीला
मस्त
पोळीभाजीच्या गुंडाळीला 'फ्रँकी' हे गोंडस नाव आहे.>>
मस्त. थोडे मोड आलेले कडधान्य
मस्त. थोडे मोड आलेले कडधान्य घालुन पण मस्त होईल. करुन पहायला हवे.
मस्त झाला. मी सोया-विनेगर
मस्त झाला. मी सोया-विनेगर वापरले नाही. त्याऐवजी टोमॅटो सॉस पसरला, त्यावर मोझेरेला चिज किसले, वर भाजीची पॅटी टाकली, कांदा टाकला (कोबी नव्हता नाहीतर तोही टाकला असता), परत थोडे चिज आणि गुंडाळी करुन कापुन दिली... मुलीला आवडली. फक्त मुळ पोळी अजुन पातळ लाटायला हवी होती असा रिमार्क मिळाला. पुढच्या वेळेस इंप्रुवमेंट करता येईल.
कणिक घालायची आयडीया चांगली आहे. बाहेरची फ्रँकी खाता खाता थोडी वातड होते हे मुलीने मान्य केले पण तेच घरात मात्र तशी झाली असती तर लगेच नापसंतीचा शिक्का उठला असता. कणकेमुळे वातड होत नाही.
मंजूडी छान रेसिपि नॉन वेज
मंजूडी
छान रेसिपि
नॉन वेज फ्रन्कि चि रेसिपि देवु शकता का?
निलेश,
निलेश, http://www.maayboli.com/node/29235 बघा.
मंजु.... तुझ्या रेसिपीने केली
मंजु.... तुझ्या रेसिपीने केली आज फ्रँकी. मस्त झाली.
सगळ्यांना आवडली खूप. धन्स तुला!
मस्तं रेसिपी. मुलांना
मस्तं रेसिपी. मुलांना डब्ब्यात द्यायला फारच सुटसुटीत.
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी