चिकन बोनलेस ब्रेस्ट एक चिकनचे, बारीक चिरलेला कांदा, मिरची, मीठ, चिकन मसाला, धने जिरे पावडर, केचप, कोथिंबीर. आले लसूण पेस्ट हे सारणा साठी.
दोन अंडी फेटून.
मैदा, तेल मीठ. पोळी साठी. तेल आवश्यकते नुसार.
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरचीचे बारीक तुकडे परतावे. आले लसूण पेस्ट घालावी व चिकन मसाला एक चमचा घालावा. त्यावर बारीक चिरलेले चिकनचे तुकडे परतावे. चिकन चांगले परतले की त्यात थोडेसे पाणी व दोन चमचे केचप घालावे. झाकण ठेवून शिजू द्यावे. अंगाबरोबर असे सारण तयार करावे. लिक्विड बाजूला राहता कामा नवे.
मैद्यात तेल व मीठ घालून पोळीसाठी कणीक भिजवून घ्यावी. व तेल लावूनमळून घ्यावी. फ्रॅन्कीच्या पोळ्या मैद्याच्याच चांगल्या लागतात. पौष्टिक म्हणून गव्हाच्या कणकेच्या करू नयेत. चव बिघडेल.
जित्क्या फ्रँकी करायच्या तितक्या पातळ पोळ्या आधी करून घ्याव्या. व हलके शेकून घ्याव्या. होल व्हीट तोर्तिया प्रमाणे.
आता दोन अंडी एका पसरट भांड्यात फेटून घ्यावीत.
हे सर्व आधी करून ठेवता येते किंवा सारण बनवून घरच्या पोळ्यावाल्या बाईस सांग्ता येते कि आयत्या वेळी फ्रँकी बनवून दे म्हणून. सारण व मैदा अंडी फ्रिज मध्ये नीट राहते सकाळी करून ठेवता येते.
दुपारला मुलांना शाळेतून आल्यावर बनवून देता येते.
सो आता, पोळ्यांचा जाड तवा गरम करावा. त्यावर तेल एक चमचा घालावे. मैद्याची एक पोळी
अंड्यात बुडवून तव्यावर ठेवावी. ते अंडे जरा शिजेल. मग चपळाईने उलथन्याने पोळी उलटावी व गरज वाटल्यास अजून अंडे वरून सोडावे. हे थोडे मेसी होउ शकते पण सवईने जमेल. गॅस कमी जास्त करावा कारण अंडे जळल्यास वाइट वास लागतो. खरपूस भाजले पाहिजे. आता वरच्या साइडला
आपले चिकनचे सारण उभे पसरावे. व कच्चा कांदा आवड्त असल्यास आणि कोथिंबीर पसरावी. मग उलथन्याने पोळी त्यावर लपेटावी व रोल बनविता आल्यास उत्तमच. रोल बनवावा.
प्लेट मध्ये घ्यावा. बरोबर खरे तर काही लागत नाही पण हिरवी पुदिन्याची चटणी मस्त लागेल.
एक किंवा दीड फ्रँकीत १३ - १४ वरशाची मुले आउट होतात. अगदीच जबरी एकावेळी दोन खाऊ
शकतात. मोठी मुले, टीन्स घरी आपण हून बनवून खाऊ शकतात. मग कॉलनीत फूटबॉल खेळायला मोकळी. व्हेज फ्रॅन्की बनत नाही.
खिमा कटलेट चे साहित्य घेउन लांब्डे रोल बनविले तर ते ही मैद्याच्या पोळीत लपेट्ता येतील.
सर्व करताना बरोबर किसलेले गाजर, कोबी दिल्यास सलाड मुळे जरा शोभा येइल. बारक्या पोरांना
टिश्यू पेपर मध्ये अर्धा भाग गुंडाळून द्यावे म्हणजे हात तेलकट होणार नाहीत.
वाचुन च तोंडाला पाणी
वाचुन च तोंडाला पाणी सुट्ले... एकदम मस्त.. नक्किच करुन बघेन..
अमा १०० मार्क्स रेसिपीला आणि
अमा १०० मार्क्स रेसिपीला आणि अजून १०० <<व्हेज फ्रॅन्की बनत नाही >> या वाक्याला
व्हेज फ्रँकी बनते. टिब्सची
व्हेज फ्रँकी बनते.
टिब्सची तर अप्रतिम सुंदर लागते आणि तशीच्या तशी घरीही बनवता येते.
तोंपासु !!
तोंपासु !!
मस्त रेसिपी- Friday Night
मस्त रेसिपी- Friday Night करता पर्फेक्ट.
अश्विनीमामी..आठवण करुन दिल्याबद्दल तुला Thank You and TGIF!
व्हेज फ्रँकीची रेसिपी टाका
व्हेज फ्रँकीची रेसिपी टाका कुणीतरी प्लीज. ही वरची मला खाता येणार नाही.
चिकनच्या ऐवजी पनीर घालूनपण
चिकनच्या ऐवजी पनीर घालूनपण छान होते. आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी टोफू घालून.
अश्विनी, लिहिली छान आहेस, रेसिपी.
सायो उद्या लिहिते नक्की.
सायो उद्या लिहिते नक्की.
मस्तच
मस्तच
सायो, मी पण करते गं वेज
सायो, मी पण करते गं वेज फ्रॅन्की.
अमा, मस्त कृती.
मामी... फोटो कुठे आहेत????
मामी... फोटो कुठे आहेत????
स्टाईल आवडली बुवा.
स्टाईल आवडली बुवा.
मी पण करणार, वरुन चाट मसाला
मी पण करणार, वरुन चाट मसाला सारणावर भुरभुरवुन, बटर मधे शेकुन ही फ्रँकी अप्रतिम लागेल.
मस्त! मी पण चिकन नाही पण
मस्त!
मी पण चिकन नाही पण पनीर घालुन करते. एकदा फ्रँकीचा म्हणुन खास रेडीमेड मसाला आणला होता पल्स मधुन. चाट मसाला टाईप्सच होता
पुण्यात, एफसी रोडवर रुपाली हॉटेलच्या बाजुला एक वाडा होता (१०-१२ वर्षापूर्वीची गोष्ट आहे) तिथे एका काकुंचा घरगुती स्नॅक स्टॉल होता. तिथे अफलातुन व्हेज फ्रँकी मिळायची. त्यात कोबीची व कांद्याची कुरकुरीत भजी घाल्याय्च्या त्या आणि वरतुन चिंचेची चटणी, हिरवी चटणी. अजुन काय काय असायचं आता आठवत नाही... पण ती चटपटीत चव मात्र जीभेवर आहे अजुन
तोंपासु...........मस्तच करून
तोंपासु...........मस्तच करून नक्की बघणार.
सक्काळीच बघितली ही रेसिपी.
सक्काळीच बघितली ही रेसिपी. माम्ये, कुफेहेपा??? घरी बोलावुन आता फ्रँकी खायला घाल मला.
ढापली त्या मनस्वी
ढापली त्या मनस्वी ब्लॉगकर्तीने ही पण रेसिपी. http://manaswii.blogspot.com/
त्या ब्लॉगवरची एक रेसिपी तिची स्वतःची नाहीये. बर्याचश्या माबोवरून ढापलेल्या. ही, सखुबत्ता, पेपर डोसा... शब्दनशब्द तश्शीच्या तश्शी उचललीये. स्वतःच्या नावावर खपवलीये.
अय्या किती छान. मी काय
अय्या किती छान. मी काय म्हंटे, फ्रॅन्की मंजे अंडा रोटी व त्यात काहीतरी फिलिन्ग. मग ते व्हेज कसे बनणार? पण टिब्स मध्ये पण पनीर फ्रँकी मिळते. शिवाय आपले व्हेज कटलेट चे लांब रोल बनविले व मध्ये घातले तर जमेलच की. पण जर अंड्यात नाही घोळविली तर ती फ्रँन्की नाही . व्हेज काठी रोल म्हणता येइल. बाल कृपेने नेहमी मला दुसर्या फ्रँकीतली अंडारोटी संपवावी लागते. कारण नुसतेच चिकन हादडून आता पोट भरले असा सिग्नल येतो.
रेसीपी काय चोरतात बाबा लोक?
नी, अगं जस्शीच्या तश्शी कॉपी
नी, अगं जस्शीच्या तश्शी कॉपी पेस्ट केलिये की रेसिपी या मनस्वी ने
बाकीच्या पण इकडुन तिकडुन उचललेल्याच असतिल... काय म्हणावं अश्या लोकांना.....
मामी मस्तच. विकांताला
मामी मस्तच. विकांताला बकर्याला ( लेकाला) खाउ घालते. आणी प्रतिक्रीया कळवते

अरे कॉपी करताना किती केले वगैरे तरी बदला म्हणा लोकांना
हो अल्पनाच्या सखुबत्ता मधे.
हो अल्पनाच्या सखुबत्ता मधे. अल्पनाने इथे जेवढी मिळते असं लिहिलंय तर त्या बयेनं ते पण कॉपी पेस्टलंय. ढ च दिसते!
मामी पाकृ एकदम झक्कास, पण मी
मामी पाकृ एकदम झक्कास, पण मी चिकन खात नाही गं

सोया चंक्सची भाजी करून घालू का फ्रँकीत?
मामी मस्तच रेसेपी. मझ्या
मामी मस्तच रेसेपी.
मझ्या सासुबाइ पण अशिच बनवतात. एकदम हिट रेसेपी आहे आमच्याकडे तरी.
लाजो, मला तो स्टाल आठवतो, पण
लाजो, मला तो स्टाल आठवतो, पण तो पुढे फडके दुधवाल्याचा इथे होता असे वाटते.
अश्विनी, भारी पाककृती. शिवाजी
अश्विनी,
भारी पाककृती. शिवाजी पार्कातल्या टिब्सच्या फ्रँकीवर अनेकदा रात्रीचं जेवण होत असे.
लाजो,
त्या काकूंकडे महान आलूपराठा मिळायचा. रानडे इन्स्टिट्यूटच्या समोर ती इमारत होती. आता तिथे मॉल झाला आहे. त्या काकू तिथे परत दुकान उघडतील असं उगाचच अनेक दिवस वाटत होतं.
वा मस्त.
वा मस्त.
येस्स चिन्मय... त्याच काकु
येस्स चिन्मय... त्याच काकु
त्यांच्याकडे उन्हाळ्यात केशर घतलेलं मस्त पन्हं पण मिळायच
रुपालीच्या आणि या वाड्याच्या मधे एक इंदौरी फरसाणच दुकान होतं त्याच्याकडचे समोसे... आहाहा... अफलातुन चव असायची.. आणि त्याच्याबरोबरची चटणी... त्याच्याकडच खट्टामिठा फरसाण पण बेस्ट...
आता हे सगळं आठवणीतच... मजा होती कॉलेजच्या जमान्यात
व्हेज फ्रँकी लिहाकी
व्हेज फ्रँकी लिहाकी कुणीतरी.
अमा, मी तुझी फ्रँकी खाऊ शकत नसले तरी पाकृ आणि लिहिण्याची पद्धत लै भारी.
आई ग... कसली कॉपी कॅट
आई ग... कसली कॉपी कॅट आहे..
अ.मामी मस्त.. नक्की करुन बघणार..
व्हेज फ्रॅन्की बनत नाही.
व्हेज फ्रॅन्की बनत नाही.

Pages