दुधिची घशी (भाजी)

Submitted by कल्पु on 27 August, 2011 - 17:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप दुधिभोपळ्याच्या मध्यम चौकोनी फोडी सालकाढून(Cubes)
(सापशिडिच्या खेळातले फासे असतात त्या साईझचे)
१/२ ते ३/४ कप खवलेला नारळ (आपल्या आवडीनुसार प्रमाण घ्या)
३ लाल मिरच्या
१ १/२ टेबल्स्पून धणे
१ चमचा काश्मिरी मिरची पावडर (असेल तर)
२ टेबलस्पून चिंचेचा कोळ*
(विकतच्या कोळाचा आंबटपणा वेगवेगळा असतो त्यानुसार गुळाच प्रमाण घ्याव)
२ टेबलस्पून किसलेला गूळ
५-६ कढिपत्याची पान
तेल, हळद, हिंग, मोहरी (फोडणिकरता)
मिठ चविनुसार, पाणी आवश्यकतेनुसार

क्रमवार पाककृती: 

दुधीच्या फोडी चाळणीवर ठेऊन १० मिनिट वाफवून घ्या. मी मोदकपात्रात वाफवून घेतल्या.
नारळ, धने, मिरच्या मिक्सर मधे गंध वाटून घ्या. त्याच वाटणात चिंचेचा कोळ, गूळ, काश्मिरी मिरची पावडर टाका आणि मिक्स करून घ्या.
२ चमचे तेल तापवून, मोहरी-हिंग, हळदिची फोडणि करून घ्या. त्यात दुधीच्या फोडी टाकून परतून घ्या. नारळाच वाटण टाकून फोडी नीट मिक्स करून घ्या. कढिपत्याची पाने आणि १ वाटी पाणी टाकून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. चविपुरते मिठ टाका.
ही रस भाजी नाही पण ओलसरच असते.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरते
अधिक टिपा: 

तांदूळ, बटाटा वगैरे पदार्थ खूप खाउ शकत नाही म्हणून नाचणीचे डोसे आणि ही भाजी हा एक स्टँडर्ड मेन्यू झाला आहे. छान साऊथ इंडियन फ्लेवर येतो.

माहितीचा स्रोत: 
आई (तिची कोंकणी मैत्रिण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या पदार्थाचा उच्चार कोंकणी लोक वेगळाच करतात. त्यात 'घ' वर जोर असतो, आणि तो थोडा सानुनासिक (घं) टाईप्स असतो... घंऽशी... असा! पहिल्यांदा तो उच्चार ऐकल्यावर मला जाम मजा वाटली होती.
धणे, लाल मिरच्या, नारळ, चिंचेचा कोळ हे वाटण त्या प्रांतातील कॉमन वाटण आहे बहुतेक. अनेक भाज्या हे वाटण लावून करतात. छान लागतात. Happy

आज केली ही भाजी, मस्त झाली आहे. एरवी दुधीची डाळ घालून करतो ती भाजी पचपचीत लागते. पण या वाटणामुळे छान चव आली आहे भाजीला.
धन्यवाद Happy

@ सिंडरेला-खरच की!
@अरुंधती-तू म्हणतेस त्याप्रमाणे हे परंपारीक कोंकणी वाटण आहे. माझी (आणि मेधाची पण) एक कोंकणी मैत्रिण आहे. कॉलेजात असताना तिच्या घरी या वाटणात (चटणीत) दडपलेले पोहे आणि कॉफी आम्हाला खूप खास वाटायचे. वरून कढीपत्ता-मोहरी-हिंग्-हळदीची फोडणी दिलेले आंबट्-गोड्-तिखट चवीचे दडपे पोहे मस्त लागायचे. आणि आपल्या मराठी पद्धतीच्या दडप्या पोह्यांपेक्षा खूपच वेगळी चव लागते.
@मंजूडी- एरवी दुधीची डाळ घालून करतो ती भाजी पचपचीत लागते. . अगदी अगदी. दुधीच काय करायच हा मला नेहमी पडलेल प्रश्न होता. एक सूप सोडल तर मला काही आवडायच नाही.

आत्ताच करुन पाहीली..मस्त झालीये. मी वाटणात साल सुद्धा घातली होती अन छान लागतीये भाजी.