संयोजनाकरता नावं दिलेल्या आम्हा पाच अतिउत्साही आणि मायबोलीवर बर्यापैकी नव्या अशा सदस्यांना उचलून रूनीने 'मायबोली गणेशोत्सव संयोजन २०११' च्या मैदानात सोडून दिले, मार्गदर्शन केले आणि मग आमच्याकरता सुरू झाली एक अनोख्या अनुभवांची जंगी मालिका!
सुरूवातीला धडपडलो पण मग लवकरच आम्हाला दिशा सापडली अन हळूहळू गणेशोत्सवाची रूपरेषा बनली. स्पर्धा-कार्यक्रम ठरवणे, त्यांचे नियम आणि माहिती तयार करणे, दवंडी-रिक्षांद्वारे त्यांची घोषणा करणे, कार्यक्रम राबवणे, मायबोलीकरांच्या अनेकानेक शंकांना उत्तरे देणे या सगळ्यात गुंतून गेलो आणि बघताबघता सहा आठवडे निघूनही गेले. शेवटची जबाबदारी निकाल घोषित करण्याची. तीही पार पडली.
.......पण अजूनही एक महत्त्वाचा कार्यक्रम बाकी आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा!
'गणेशोत्सवाचा अजून एक सोहळा खेळीमेळीत, उत्साहात पार पडला.' साधं सोपं विधान! मात्र अनेक जणांनी अनेक प्रकारे हा सोहळा परिपूर्ण करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याला तोड नाही. त्यांचे आभार मानून मोकळे होण्यापेक्षा हे ऋणानुबंध जोपासायचे आहेत. त्यामुळे इथे केवळ आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत.
मायबोलीकरांनी आपापल्या घरचे गणपती आणि आपली दैनंदिन कामं सांभाळूनही ज्या उत्साहाने कार्यक्रमांत भाग घेतला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना सलाम! बालगोपाळांचे तर विशेष आभार. आईबाबांच्या मागणीला लगेच होकार देऊन आपल्या कलागुणांनी, गोडगोड बोलांनी आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करण्याबद्दल सगळ्या बालगोपाळांना एक भलीमोठी शाबासकी! भरपूर यश मिळावा, बाळांनो!
मायबोलीवरील अनेक जुन्या-जाणत्या सदस्यांनी सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत वेळोवेळी मोलाची मदत केली. 'काही काम लागलं तर खुशाल सांगा', 'जी काही मदत लागेल ती सांगा' असा मदतीचा हात पुढे करण्यापासून ते कार्यक्रम-मंडपात देखरेख ठेवण्यापर्यंत या सर्वांची बहुमोलाची मदत झाली आहे. बरं, आपलेपणा इतका की संयोजकांच्या अनवधानाने झालेल्या काही चुका, संयोजनाला आणि कार्यक्रमांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीने, पडद्याआडून सांगितल्या. 'हा मायबोलीचा कार्यक्रम आहे' अशी आपलेपणाची भावना बाळगणार्या सगळ्यांचे अनेकानेक आभार.
एका अत्यंत कठीण परिस्थितीत आम्ही साजिर्याला साकडं घातलं. आणि काहीही म्हणजे काहीही आढेवेढे न घेता त्याने आम्हाला अर्ध्या दिवसात ५-६ अप्रतिम पोस्टर्स बनवून दिली. त्याबद्दल साजिर्याचे आभार मानावे तितके थोडेच ठरतील.
या प्रसंगानंतर दिव्याचं आमच्या गृपमध्ये आगमन झालं आणि तिने गणपतीबाप्पांच्या प्रतिष्ठापनेकरता अत्यंत सुरेख आरासी करून दिल्या. यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवात अॅनिमेटेड आरास केली गेली आणि यामागची कल्पना आणि मेहनत यांचं पूर्ण श्रेय दिव्याचं. त्यात मुख्य मूर्तीबरोबरच तिने अष्टविनायकांचे मनोहारी दर्शनही घडवले. दिव्याने इतरही कार्यक्रमांसाठी पोस्टर्स आणि रिक्षा बनवून दिल्या. दिव्याला पुन्हापुन्हा धन्यवाद.
प्रतिष्ठापनेच्या मूर्तीकरता मायबोलीवरचे प्रचिकार जिप्सी यांना आम्ही विनंती केली होती. त्यांनी अतिशय तत्परतेने आम्हाला छानशी बाप्पाची मूर्ती प्रचिरूपात उपलब्ध करून दिली. त्याबद्दल जिप्सी यांचे आभार.
बित्तुबंगा यांनीही एका पेचप्रसंगात तत्परतेने मदतीचा हात पुढे केला. त्यांचेही खास आभार.
आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन ज्या मायबोलीकरांनी आम्हाला खास लेख लिहून पाठवले त्या सर्वांचे आभार. दिनेशदा, साजिरा, मंजूडी, जागू, दाद, स्वप्ना_राज, केदार, कविता नवरे, अरूंधती कुलकर्णी तुम्ही दिलेल्या लेखांमुळे गणेशोत्सवाला एक वेगळेच परिमाण लाभले.
भाऊ नमसकर यांनी खुसखुशीत व्यंगचित्रं अगदी लगेच पाठवून दिली. त्याबद्दल मंडळ त्यांचे विशेष आभारी आहे. हास्यदालनाने सर्वांना उत्सवभर हसायला लावले.
सँकी यांनी विविध रूपातील गणपतीची रेखाटने आम्हाला पाठवल्याबद्दल त्यांचेही आभार.
आमचे गुप्त-लेखक/ लेखिका नंदिनी (कथा १) आणि बेफिकीर (कथा २) यांचे खास आभार. तोंड बंद ठेवल्याबद्दल आणि लोकांची योग्य दिशाभूल केल्याबद्दल.
नीधप, जिप्सी आणि आशुचँप ने सुंदर प्रचिमालिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळ त्यांचे ऋणी आहे.
उपासक यांनी संगीत दिलेल्या आणि नविनच प्रकाशित झालेल्या 'गान - वीर काव्याचे' या गीत-संग्रहातील काही गाणी गणेशोत्सवाकरता दिली. या गीतसंग्रहाच्या विक्रीतून होणारा सर्व फायदा हा सामाजिक कार्य, स्वा. सावरकरांचे विचार पुस्तिका वाटप, सावरकरांच्या जीवनावर लहान मुलांकरिता Animation Video निर्मिती इत्यादींसाठी वापरण्यात येणार आहे. मायबोलीकर रसिक या स्तुत्य प्रकल्पास भरभरून पाठिंबा देतीलच. उपासक यांचे या निमित्ताने अभिनंदन आणि आभार. आपल्या उपक्रमास मंडळातर्फे शुभेच्छा.
गणेशोत्सवाकरता सुरेल, सुंदर गाणी दिल्याबद्दल रैना, अगो यांचे खास आभार. सुयोग्य काव्यासाठी क्रांती आणि प्रसाद शिरगांवकर तसेच गायन आणि वादनासाठी केदार पावनगडकर आणि सुहास कबरे यांना धन्यवाद. प्रमोद देव यांनी रागांवर आधारीत सुंदर चाली लावून या गाण्यांची गोडी अधिकच वाढवली याबद्दल त्यांचेही आभार. गणपती प्रतिष्ठापनेच्या धाग्यावर खास श्लोक म्हणणार्या प्रमोद देव आणि झाशीची राणी यांचेही आभार.
मायबोली शीर्षकगीताची स्पर्धा पाहून, योग यांनी स्वत:हून मायबोली शीर्षकगीताला चाल लावून देण्याचा प्रस्ताव मांडला. या आपुलकीच्या सहकार्याबद्दल योग यांचे विशेष आभार. योग यांनी त्याबरोबरच परीक्षकांची भुमिकाही स्वीकारली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अजय आणि अॅडमीन यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन शीर्षकगीताचं परीक्षण करण्यास होकार दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
प्रकाशचित्र स्पर्धेच्या परीक्षकांचं खरंच कौतुक! इतक्या प्रवेशिका - त्याही एकसे एक. अतिशय कठीण जबाबदारी तोलून निर्णय दिल्याबद्दल सावली, बित्तुबंगा आणि आशुतोष०७११ यांनाही धन्यवाद.
याच निमित्ताने विशेष उल्लेख करावासा वाटतो तो पूर्ण सहकार्य देणाच्या आमच्या सगळ्यांच्या घरच्या मंडळींचा - अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत! संयोजनात झोकून दिल्यावर घरात झालेले अपरिहार्य बदल कुटुंबातील लोकांनी सहज स्वीकारले आणि जास्तीच्या जबाबदार्या हसत हसत पार पाडल्या. त्या सर्वांच्या या मदतीवाचून इतका मोठा व्याप सांभाळणे शक्य नव्हते. या सगळ्यांचे शतशः आभार.
जगाच्या पाठीवरच्या तीन देशातले पाच मायबोलीकर, कामाचा मेळ सहजपणे सांभाळू शकले ते स्काईपच्या कृपेने. स्काईपवरून लिहून अथवा बोलून संपर्क साधल्याने बर्याच गोष्टी पटापट हातावेगळ्या करता आल्या. त्यामुळे स्काईपचेही आभार.
अनवधानाने जर कोणाचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर क्षमस्व. बर्याच जणांनी लहान-मोठा हातभार लावून हा सोहळा परिपूर्ण करण्यास मदत केली आहे. अशा सर्वांचे आभार.
आता सर्वांत महत्त्वाच्या पडद्यामागच्या कलाकारांचे आभार - अॅडमीन आणि रूनी पॉटर.
अॅडमीन आणि रूनी पॉटर यांच्या कार्याची व्याप्ती अचंबित करणारी आहे. अॅडमीनकडे 'मॅड आय मूडी' चा डोळा आहे हे गुपित त्यांनी आमच्याकडे उघड केले. असणारच. त्याशिवाय इतक्या ठिकाणी इतके बारीक लक्ष ठेवणे शक्य नाही. रूनीची एनर्जी थक्क करण्यासारखी आहे. आणि ती एक अत्यंत सुयोग्य मार्गदर्शक आहे. आमच्या कामात अजिबात कुठेही ढवळाढवळ न करता केवळ योग्य तिथे, योग्य वेळी आणि योग्य तितकाच सल्ला दिला.
अनोळखी आणि ज्यांची क्षमता माहितीही नाही अशा सदस्यांवर गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे संयोजन टाकल्याबद्दल, त्यांना त्यात पूर्णपणे त्यांच्या मर्जीने काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल आणि एकूणच आंतरजालावरच्या अशा अनोख्या उपक्रमाच्या संयोजनाचा अद्भुत अनुभव आम्हाला दिल्याबद्दल, अॅडमीन आणि रूनी, तुमचे शतशः आभार. तुमच्या अपेक्षांना आम्ही पात्र ठरलो आहोत की नाही ते माहिती नाही, मात्र या निमित्ताने मायबोलीची जी जवळून ओळख झाली, या व्यासपीठाची जी ताकद लक्षात आली ती विस्मयकारक होती.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मायबोलीच्या व्यासपीठावर आम्हाला आमची सेवा रूजू करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि समस्त मायबोलीकरांचे पुन्हा एकदा आभार. तुम्ही सर्वांनी कार्यक्रमांना दिलेली दिलखुलास दाद हाच आमचा श्रमपरिहार!
********************************************************
चित्रांगण - १ (नांदी, दवंड्या, आरास आणि स्पर्धा फलक) - मायबोली गणेशोत्सव २०११
चित्रांगण - २ (सांस्कृतिक कार्यक्रम, रिक्षा आणि जाहिरात) - मायबोली गणेशोत्सव २०११
धन्यवाद संयोजक!! सगळ्यात आधी
धन्यवाद संयोजक!!
सगळ्यात आधी रूनीचे हे काम करायची संधी दिली त्याबद्दल आभार. संयोजक मंडळाचं काम आधीच सुरू झालेलं असताना फक्त पोस्टर करण्याच्या कामात मदत म्हणून संयोजक मंडळात माझा प्रवेश झाला आणि पहिल्यांदाच संयोजक मंडळाचं काम खूप जवळून बघायची संधी मिळाली.
पोस्टर बनवण्याचा अनुभव असला तरी मराठीत पोस्टर बनवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मराठी फॉन्ट चा प्रश्न वेबमास्तर अजय यांनी सोडवला. त्यांनी GIMP या सॉफ्टवेअरशी ओळख करून दिल्याने मला हे काम मराठी फॉन्ट्मधे सहजतेने करण शक्य झालं. त्याबद्दल त्यांचेही खूप आभार.
पहिल्या दवंडीच्या पोस्टरची थीम कंटीन्यु करून दुसर्या दवंडीचं आणि त्या दवंडीच्या स्पर्धांचं पोस्टर जेंव्हां बनवलं, त्यात संयोजकांचही तितकचं सहकार्य झाल आहे. जसं कि पोस्टरसाठी आयडीया सजेस्ट करणं, त्यासाठी लागणार्या कॉपीराईट फ्री इमेजेस शोधणं, नंतरही काही बदल सुचवणं वगैरे. खासकरुन मामी, लाजो, आणि प्रज्ञाच.
वैद्यबुवांनी बनवलेल्या पोस्टरवरच्या अॅनिमेटेड साप-सुरळ्या बघून संयोजकांच्या मनात हलती आरास करायची असा विचार आला. हे चॅलेंजींग होतं कारण अपलोड करताना असलेली फाईल साईजची मर्यादा आणि ठराविक फाईल फॉरमॅट मायबोलीवर अपलोड करता येत होते. त्यात फक्त अॅनिमेटेड gif हा एकच फाईल फॉरमॅट माहिती होता जो अॅनिमेशनला सपोर्ट करत होता. गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी मी वेगवेगळी बरीच पोस्टर बनवली होती त्यात एक अॅनिमेटेड gif फॉरमॅट मधे होतं. पण त्याची क्वालिटी खास नव्हती. जेव्हां अॅडमिननी फ्लॅश अॅनिमेशन मधे आरास बनवण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला तेव्हा फार थोड्या अवधीत ही दुसरी अष्टविनायक दर्शनची आरास तयार झाली. एक वेगळं काहीतरी केल्याचं समाधान सगळ्यांनाच मिळालं. अॅडमिननी खास फ्लॅश अॅनिमेशन च्या आरासीसाठी जी परमिशन दिली त्याबद्दल त्यांचेही आभार.
वरच्या आभारप्रदर्शनात सगळ्यांचे आभार मानणार्या संयोजकांची मेहनत, त्यांच्या कामातल्या अडचणी, त्यांच्या घरच्यांच सहकार्य हे सगळ जवळून बघीतल्यामुळे त्याचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय. बर्याचदा एक सामान्य वाचक म्हणून या सगळ्यांच्या पडद्यामागच्या कष्टांची, अडचणींची कल्पनादेखील नसते. ते जर मी माझ्या शब्दात सगळ्यांपर्यंत पोचवू शकले तर ती देखील त्यांच्या संयोजनाला दिलेली योग्य दाद ठरेल.
स्पर्धांचे विषय ठरवणे, नियम ठरवणे, त्यासाठी लागणार्या चर्चा, नंतर प्रत्यक्ष धागे तयार करणे, मजकूर लिहीणे, लोकांच्या शंकांना काय उत्तरे द्यायची यावर चर्चा करुन उत्तरे देणे, इमेलला रिप्लाय देणे, शुद्धलेखन तपासणे अशी असंख्य कामं ही सगळीच संयोजक मंडळी करत असायची. आणि हे सगळं वेगवेगळ्या देशात चालू होतं. ३ वेगवेगळ्या टाईमझोन मधे असूनही सगळ्यांचं एकमत असल्याशिवाय कुठलाही निर्णय फायनल व्हायचा नाही. त्यामुळे कधी कधी लोकांच्या शंकांना ताबडतोब उत्तरं देणं शक्य व्हायचं नाही पण यात संयोजकांची दिरंगाई नसून अंतराचं आणि वेळेच्या फरकांचं बॅरियर होतं.
हे सगळे जण इथे शक्य तितका वेळ देत होते तेही घरचं सांभाळून. सगळा वेळ इथे देणं घरच्यांच्या सहकार्याशिवाय त्यांनाही शक्य झालं नसतं. मामींनी मुसंबाची भुमिका वेगवेगळ्या टाईमझोन मधे असलेल्या सगळ्या सदस्यांशी कोऑरडिनेट करुन कौशल्याने निभावली. मामींची गोड छोकरी आहे, जिने मामींना पाहिजे तेवढा वेळ काम करण्याची मुभा, एकदा काम संपलं की सगळा वेळ तिला देण्याच्या बोलीवर दिली होती. तसंच आई इतकीच उत्साही आणि बोलकी चार वर्षांची लाजोची लेक, आईचं काहीतरी मोठ्ठं काम चालू आहे सांगितल्यावर खूप समंजसपणे वागून लाजोला या कामात सहकार्य दिलं. लाजोला घरच्या गणपतीचंही काम होत. लाजो आणि वैद्यबुवांना आपापली ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळून इथे काम करावं लागत होतं. आई-वडील सुटीसाठी आलेले असताना आणि मुलाच्या शाळेला सुट्टी असताना देखील वैद्यबुवांनी या कामात वेळ दिला. प्रज्ञानेही जास्तीत जास्त वेळ या कामासाठी दिला आणि ते तिला घरातल्या इतर जबाबदार्या तिच्या घरच्यांनी सांभाळल्यामुळे शक्य झालं. प्रज्ञाच्या घरच्यांचेही योग्य सल्ले देण्यात, बारीक सारीक चूका लक्षात आणून देण्यात मदत झाली. प्रमोद काकांचंही वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांशी संपर्क करुन, गाणी मिळवून, चाली लावून, गाणी म्हणवून घेण्यातलं योगदानही मोठं आहे, त्याही मागे त्यांना बर्याचं खटपटी कराव्या लागल्या असतील. या सगळ्यांच्या घरच्यांचाही या गणेशोत्सवाला तितकाच हातभार आहे. त्यांचेही तितकेच आभार मानायला हवेत.
आणि हे सगळं सगळं फक्त मायबोलीच्या प्रेमापोटी. इतक्या जवळून संयोजकांचं काम बघायला मिळाल्याने आजपर्यंत काम केलेल्या, करणार्या सगळ्याच संयोजक, संपादक, मदत समितीतल्या सदस्यांच्या कामाच्या स्वरुपाची कल्पना आली. त्यांना मनापासून सलाम. खास करून अॅडमिन आणि वेबमास्तर यांनाही, जे वर्षानुवर्षं या विस्तारलेल्या मायबोलीची धुरा अगदी लीलया पेलून आहेत.
रूनी, अॅडमिन आणि वेबमास्तर यांचे ही संधी दिल्याबद्दल आणि सहाय्य केल्या बद्दल परत एकदा आभार.
.
.
सगळ्यांच्या मेहनतीचं कौतुक
सगळ्यांच्या मेहनतीचं कौतुक आहे. प्रचंड अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅडमीन, रुनी आणि संयोजकांना
अॅडमीन, रुनी आणि संयोजकांना उभेराहून सलाम. खरच कौतूकास्पद कामगीरी तुम्ही केली आहे. घरच्यांचा वेळ तुम्ही काहीदिवस फक्त मायबोली साठी दिलात आणि त्यात तुमच्या घरच्यांनीही तुम्हाला सहकार्य केले ही मायबोलीशी तुमचे आणि तुमच्या परीवाराशी जोडलेले ऋणानुबंध दर्शवितात.
आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन ज्या मायबोलीकरांनी आम्हाला खास लेख लिहून पाठवले त्या सर्वांचे आभार. दिनेशदा, साजिरा, मंजूडी, जागू, दाद, स्वप्ना_राज, केदार, कविता नवरे, अरूंधती कुलकर्णी तुम्ही दिलेल्या लेखांमुळे गणेशोत्सवाला एक वेगळेच परिमाण लाभले.
तुम्ही आम्हाला इतक्या विश्वासाने ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
संयोजक आणि प्रशासकांचे
संयोजक आणि प्रशासकांचे मनःपूर्वक आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचं प्रचंड कौतुक!
सगळ्यांचं प्रचंड कौतुक!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही रोज आनंदाने अनुभवत
आम्ही रोज आनंदाने अनुभवत असलेल्या गणेशोत्सवा मागे इतकी प्रचंड मेहनत आहे हे ज्ञात झालं.
आपल्या सर्वांचं प्रचंड कौतुक आणि आभार.
डॉ. कैलासरावांशी पूर्ण सहमत!
डॉ. कैलासरावांशी पूर्ण सहमत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजक समितीच्या प्रमुख
संयोजक समितीच्या प्रमुख म्हणून मामीचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो..संयोजन समितीचं काम सुरळीत होण्याचं सगळ्यात जास्त श्रेय मी तिच्या कुशल नेतृत्वाला देतो... तिने सगळ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन तर दिलंच पण वेळप्रसंगी कानपिचक्या देऊन, कामं सुरळीत आणि वेळेवर होतील ह्यावर जातीने लक्ष ठेवलं...थोडक्यात सांगायचं तर तिने प्रत्येकाच्याकडून उत्तम ते काढून घेतलं.
लाजोबद्दल काय सांगू? तिच्याकडे तर नव कल्पनांची जणू खाणच आहे असं वाटावं इतक्या विविध कल्पना तिने फटाफट सगळ्यांसमोर मांडल्या आणि ज्या कल्पना राबवायचे ठरले त्यासाठीची कार्यवाही देखील तेवढ्याच तत्परतेने करण्याचा तिचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
प्रज्ञा,संवाद लेखनात अतिशय कल्पक आहे हे तिने लिहिलेल्या संवादातून आपण पाहू शकतो..मुद्रितशोधनातही ती वाकबगार आहे...तिनेही अगदी न कंटाळता हे काम केलं...तिच्या सहनशक्तीचं मला खूप कौतुक वाटतं.
वैद्यबुवा! ही व्यक्ती बोलण्या-चालण्यात अगदी मिश्किल आहे हे त्यांनी बनवलेल्या भित्तीचित्रातून(मायबोलीच्या भाषेत रिक्षा) सार्थ ठरवलंय. समितीतलं वातावरण हसतं-खेळतं ठेवण्यात त्यांच्या ह्या स्वभावाचा खूपच उपयोग झाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी,लाजो,प्रज्ञा आणि वैद्यबुवा, ह्यांच्याशी स्काईपवर प्रत्यक्ष बोलण्यामुळे,त्यांचे कामात जीव ओतणे मी खूप जवळून अनुभवू शकलो.
दिव्या! तिच्याशी प्रत्यक्ष संवाद नाही साधता आला पण तिच्या कामातूनच ती बोलत होती...समितीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांना स्वत:च्या कल्पनांची जोड देऊन अतिशय उत्कृष्ट अशा आरासी तिने बनवल्या आणि गणेशोत्सवाला एका नव्या उंचीवर पोचवलं.
मला ह्या सर्व कल्पक आणि सृजनशील मंडळींबरोबर काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो आणि ही अशी संधी दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानतो.
संयोजन समितीतल्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन!
सुरेख झाला उत्सव. तुम्हा
सुरेख झाला उत्सव. तुम्हा सगळ्यांचं कौतुक.
ती एक अत्यंत सुयोग्य मार्गदर्शक आहे. आमच्या कामात अजिबात कुठेही ढवळाढवळ न करता केवळ योग्य तिथे, योग्य वेळी आणि योग्य तितकाच सल्ला दिला >>>> अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कार्य सिद्धीस नेण्यास श्री
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ असतोच. खरेच आपल्याला न कळत सगळ्या विघ्नांचे तो हरण करुन टाकतो.
इथे मायबोलीकरांच्या सहकार्याशिवाय घरच्या मंडळींच्या सहकार्याचाही उल्लेख झाला ते वाचून खुप आनंद झाला.
मामा आणि लारा यांचे खास आभार, माझ्यातर्फेही.
(No subject)
संयोजक आणि गणेशोत्सवाच्या
संयोजक आणि गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात उत्साहाने काम करणार्या, भाग घेणार्या सगळ्याच टिमचे मनःपूर्वक आभार.
यंदाही मस्त टीम होती
यंदाही मस्त टीम होती
सर्वांचे खूप कौतुक आणि
सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन!
<< आम्ही रोज आनंदाने अनुभवत
<< आम्ही रोज आनंदाने अनुभवत असलेल्या गणेशोत्सवा मागे इतकी प्रचंड मेहनत आहे हे ज्ञात झालं.
आपल्या सर्वांचं प्रचंड कौतुक आणि आभार. >> डॉ. गायकवाडना १००% अनुमोदन !
संयोजकांचे अन् सर्व टीमचे
संयोजकांचे अन् सर्व टीमचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त झाला ह्यावेळचा
मस्त झाला ह्यावेळचा गणेशोत्सव.
संयोजक टीमचे अभिनंदन आणि आभार.
संयोजक,प्रशासक आणि सगळ्या
संयोजक,प्रशासक आणि सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांचं अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन मंडळाचं.. गुड टिम
अभिनंदन मंडळाचं.. गुड टिम वर्क :).
दर वर्षी विचारायचं रहून जातं, अत्ता आठवला म्हणून संयोजकांना एक प्रश्न आहे ,
गणेश चतुर्थीला व्हर्चुअल गणेश प्रतिष्ठापना जशी होते , तसं अनंत चतुर्दशीला मूर्तीचं व्हर्च्युअल विसर्जन -मिरवणूक का नाही होत ?
अभिनंदन ... सर्वांच खुप खुप
अभिनंदन ... सर्वांच खुप खुप अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, लाजो, प्रज्ञा,
मामी, लाजो, प्रज्ञा, वैद्यबुवा,देवकाका, दिव्या तुम्हा सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन आणि आभार!!!!
आम्हाला इतक्या विश्वासाने ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.>>>+१
आम्ही रोज आनंदाने अनुभवत असलेल्या गणेशोत्सवा मागे इतकी प्रचंड मेहनत आहे हे ज्ञात झालं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या सर्वांचं प्रचंड कौतुक आणि आभार. >>>>>डॉकना अनुमोदन
संयोजक टीमचे अभिनंदन
संयोजक टीमचे अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कौतुकास्पद अभिनंदन !
कौतुकास्पद अभिनंदन !
संयोजक टीमचे अभिनंदन आणि
संयोजक टीमचे अभिनंदन आणि मनापासून कौतुक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि एवढे चांगले डीब्रीफींग केल्याबद्दलही अभिनंदन. शेवटचे बॅनर उतरेपर्यंत काही उपक्रम संपत नाहीत.
तुम्ही तर हॉलसुद्धा स्वच्छ झाडून हवाली केलात. अतिशय कौतुक वाटले.
गो टीम, आणि रुनी.
एवढे चांगले डीब्रीफींग
एवढे चांगले डीब्रीफींग केल्याबद्दलही अभिनंदन. शेवटचे बॅनर उतरेपर्यंत काही उपक्रम संपत नाहीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही तर हॉलसुद्धा स्वच्छ झाडून हवाली केलात. अतिशय कौतुक वाटले.
गो टीम, आणि रुनी.>>>>रैना, +१
तुम्ही तर हॉलसुद्धा स्वच्छ
तुम्ही तर हॉलसुद्धा स्वच्छ झाडून हवाली केलात. अतिशय कौतुक वाटले.
जिप्सिला अनुमोदन.
शेवटचे बॅनर उतरेपर्यंत काही
शेवटचे बॅनर उतरेपर्यंत काही उपक्रम संपत नाहीत.
तुम्ही तर हॉलसुद्धा स्वच्छ झाडून हवाली केलात. अतिशय कौतुक वाटले.
>> रैनाला प्रचंड अनुमोदन!
संयोजक, दंडवत स्वीकारा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजक, ..... सलाम, मुजरा,
संयोजक,
..... सलाम, मुजरा, दंडवत !
डॉ. गायकवाड व रैना ला
डॉ. गायकवाड व रैना ला अनुमोदन. सगळ्यांचं प्रचंड कौतुक वाटतय.
Pages