सारेगमप पर्व नव्हे गर्व - २०११

Submitted by आयडू on 21 June, 2011 - 00:03

'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. Proud ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मन क्यूं बहका..' किती गोड गायली ती खरं. तिला उगाचच टार्गेट केलं सीझनभर असं मला वाटतंय.
सावनी, दिपिकाचं उगाच कौतुक करतात. पूजा अजूनही का आत आहे आणि गात आहे? तिचं 'उई माँ' किती वाईट होतं! मयूरचं यमला पगलाही अजिबात नाही जमलं. प्रसेनजीतच आवडतो मला आणि धवल कधीचकधीच.

मी इथे नियमित लिहित होते, पण कोणीच लिहित नव्हतं जास्त, म्हणून सोडून दिलं.

यंदा अगदी डल चालू आहे स्पर्धा... स्वरुपाच आधी कुठेही परफॉर्म न केलेली होती.. बाकीचे सगळे अगदी रेग्युलरली कुठे ना कुठे गात आहेत.. ह्या वेळेची स्पर्धा आधीच स्टेज वर गात असलेल्यांना टीव्ही वर आणण्यासाठी ठेवल्या सारखी वाटते आहे..
आयडु. जमल्यास बाफचे शीर्षक बदल.. झी वाल्यांनी पण पर्व नव्हे गर्व ही टॅग लाईन काढून टाकली आहे..

@आयडू Happy Happy

त्या सावनीचे तर उगाच कवतिक चालले आहे. अत्यंत सुमार दर्जाची गायिका आहे. एक नोटिस केले आहे का ती जेव्हा वोट अपिल करते तेव्हा तीच्या श्वासाचा केवढा आवाज येतो. नाटकी आहे एक नंबरची... प्रसेनजीत बरे गातो सर्व गायकात.

मी त्या वेळात 'नाना ओ नाना' पाहतो!
मी मराठीवर काही मस्त मालिका चालू आहेत!
झी मराठिवरची 'मधु ईथे अन चन्द्र तिथे' सुद्धा मजेदार आहे.फ्रेश वाटते.

स्वरूपा बर्वे ला काढलं ?????????? अर्थात तिला उगीचच्या उगीच हार्श कमेंट्स द्यायचे गेल्या ३-४ आठवड्यांपासून.. !
अरे त्या पूजा गोपालनला घालवा म्हणं आधी.. जमल्यास दिपीका जोगला पण ! पूजा गोपालन किती भावनाशून्य गाते.... झी वाल्यांची अमराठी स्ट्रॅटेजी दरवेळचीच झाली आहे.. !

पराग , खरंच धक्कादायक निर्णय होता तो !

त्या दीपिका आणि नेहाला काय जोकर बनवून ठेवलं होतं ???? शी.. अतिशय चीप दिसत होतं ते सगळंच .

स्वरूपा बर्वे बाहेर गेली का? चला! म्हणजे आता परीक्षक आणि सारेगमप टीमला मनसोक्त नावं ठेवायला मी मोकळी! !@#$%^&*&(*(

अशक्य वाईट गाणारे लोक अजून आत, आणि मेहनतीने सुधारणा करणारी स्वरूपा बाहेर! वावा! अभिषेक मारोटकर बाहेर पडल्यावर मला असंच वाईट वाटलं होतं. पण उलट बरं झालं. आता अजय-अतुलच्या अमृतमयी बोलातून ते सुटले!

आणि सचिन पिळगावकर.... यांच्याबद्दल म्या पामराने काय बोलावे! "अष्टविनायक" सिनेमाच्या वेळी म्हणे यांच्या हातात ३५ पिक्चरं होती (टाळ्या) नि वेळ नव्हता यांना! पण तरी हट्टाने यात हीरोचा रोल मिळवला... "चांगला दिसणारा हीरो..(टाळ्या)" आत्मस्तुती!
"मी डिरेक्टर आहे, रायटर आहे, अ‍ॅक्टर आहे, डन्सर आहे..."(टाळ्या) आणि हे सगळं मी तोपर्यंत करत रहाणार जोपर्यंत मी सगळ्यात पर्फेक्ट होत नाही" (गणराया, वाचव आम्हाला!)

"वसंतराव तयार नव्हते आधी या सिनेमात काम करायला.....माझे वडील हजरजबाबी.... मग वसंतराव तयार झाले आणि या सिनेमात त्यांनी काम केलं..." (कोणीतरी यांना घेऊन जा इथून!)

गणपतीविशेष भाग होता नि हे मान्यवर! मी (सचिनची बडबड असह्य होऊन, आणि झोप येऊन) डोळे मिटले!

हा मनुष्यविशेष परीक्षकाच्या खुर्चीला चिकटला की समोर "लांगुलचालन अंक पहिला, प्रवेश पहिला" का सुरू करतात लोक? सचिनजी..सचिनजी.... !@#$%^&*()_+

सचिनबद्दलच्या कमेंट्स साठी ...है शाब्बास प्रज्ञा !!!
सचिन अचानक " महान " कसा झाला हे मला न उलगडलेलं कोडं आहे . तरी सारेगमपमध्ये तो १च एपिसोडला आला होता , एकापेक्षा एक म्हणजे केवळ क..ह..र होता . मी एकच सीझन पाहिला ... अप्सरांचा Uhoh

अगं झीवर्चा तो "एकापेक्षा एक" नामक कार्यक्रम त्याचीच निर्मिती (????!!!!!!) होती. "नच बलिये" मधे तो आणि सुप्रिया फायनल जिंकल्यावर अचानक तो म हा न झाला आणि त्याने हा मराठी पोग्राम सुरू केला. "महाराऽस्ट्रीयन टॅलेंटसाठी. मग दळण सुरू. सेलिब्रेटी ए-पे-ए, लहान मुलांचं ए-पे-ए वगैरे...

जिथ्थे जिथ्थे म्हणून भाव खाता येईल आणि मोठेपणा मिळेल तिथ्थे तिथ्थे म्हणून हे महाशय दिसतील तुला झीमरा(ठी)वर.

ओह तोच जिंकला का? बरं बरं.. तसही अजय अतूल त्याचं फारच कौतूक करायचे.
अंतिम फेरीत काय प्रयोग केले ? आम्ही काल पाहिला पार्ट सुरू केला पण नंतर कंटाळा आला म्हणून दिपीका जोगचं हवा हवाई पाहून करमणूक करून घेतली.. Proud

नमस्कार...मी श्रीरंग भावे, १०व्या पर्वात गायलो होतो...अंतिम ८ स्पर्धकांपर्यंत.....इथे लिहिलेल्या अनेक मिश्रित प्रतिक्रियांबद्दल वाचून गंमत वाटली....विशेष वाटले....सगळयांना धन्यवाद

श्रीरंग भावे

अरे वा! श्रीरंग भावे!!! आठवताय तुम्ही मला... वाचून आणि आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद. आणि हो! तुमचे मायबोलीवर स्वागत Happy

Pages